Uncategorized

चैत्यभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एन. डी.एम.जे च्या वतीने एक लाख पोट कार्डचे निवेदन

मुंबई ( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )यंदा चैत्यभूमी दादर येथे नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन डी.एम जे) या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक लाख पोस्टकार्ड चे निवेदन पाठवण्यात आले आहे या निवेदनात अनुसूचित जाती जमाती तील लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार थांबावे व त्यांना न्याय मिळावा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन पोस्ट कार्ड द्वारे देण्यात आले या निवेदनात
1) अनुसूचित जाती आणि जमाती च्या आर्थिक विकासासाठी बजेट चा कायदा करा.
2) भिमा कोरेगाव दंगलीतील बौध्दावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे.
3) एट्रोसिटी च्या कायद्याची प्रभावी अमलबजावणी करा.
4) एट्रोसिटी च्या अत्याचारात मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्ती ला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे.
5) एट्रोसिटी चे खटले जलदगती ने निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जलदगती न्यायालय सुरू करावे.
6)खर्डा नितीन आगे खून प्रकरणाचा फेर तपास करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी
7) अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांच्या नोकरीतील आरक्षणामध्ये वाढ करण्यात यावी यासाठी कायदा करण्यात यावा. अशा प्रकारच्या विविध मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे पाठवण्यात आले अशा प्रकारे संघटने च्या वतीने च्या सात वर्षापासुन आतापर्यंत एकूण सात लाख पोस्ट कार्ड विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. हे निवेदन पाठवताना संघटनेचे
राज्य महासचिव डॉ.अँड.केवलजी उके ,
राज्य सचिव .वैभवजी गिते, समन्वयक रमाताई अहिरे , सहसचिव पि.एस.खंदारे, विधी सल्लागार ॲड. अनिल कांबळे, कोषाध्यक्ष शिवरामजी कांबळे, संघटक अँपल खरात, निरीक्षक बी.पी लांडगे महिला संघटक पंचशीला कुंभारकर ,प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे, तसेच संजय झेंडे ,शशी खंडागळे, वर्षा शेरखाने, वर्षाताई ऊके, आजिनाथ राऊत, दत्ता कांबळे, सचिन झेंडे, गोरख गायकवाड, रवींद्रर झेंडे खुशी ऊके, तसेच पुणे, मुंबई, सोलापूर, रायगड, सातारा वाशिम, हिंगोली, पश्चिम महाराष्ट्र ,विदर्भभ ,मराठवाडा, येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिित होते.

सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान

सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान
माळशिरस( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )-सोशल ही संस्था समाजातील वंचित व दुर्लक्षित लोकांकरिता गेली दहा वर्षे कार्यरत असून मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळी मोफत आरोग्य सेवा, मुले दत्तक योजना,लाडली योजना,शालेय साहित्य मदत,महिला व ग्रामविकास इ उपक्रम अविरतपणे सुरू आहेत.
महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी ही संस्थेने सलग अठरा तास अभ्यास अभियान राबवले.या वेळी सुरुवातीस प्रतिमेचे पूजन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास धाइंजे,भटक्या समाजाचे नेते मारुती सरगर ,सोशल चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास धाइंजे म्हणाले असे अभियान च्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.सर्व बहुजन समाजातील मुले आणि विशेषतः मुलींची संख्या लक्षणीय आहे अठरा तास अभियान राबवणारी ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली शाळा असेल व खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या पेक्षा वेगळी आदरांजली असूच शकत नाही.डॉ.पंचशीला लोंढे,डॉ.कुमार लोंढे,प्रा.कुंडलिक साठे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सदर अभियानात पाचवी ते बारावी गारवाड,तरंगफळ, पठाणवस्ती ,चांदापुरी, निमगाव,कुसमोड या परीसरातील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थिनी सहभाग झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले तर प्रास्तविक स्नेहल उरवने मॅडम केले यावेळी आण्णा भोसले, अरुण बोडरे,महादेव मिसाळ दत्ता सोरटे,प्रा.राम चौगुले,प्रा.दीपक काटे,प्रा.चोरमले,प्रा.अल्ताफ पठाण,डी. जी लोंढे सर,साजिद पठाण सर,कोमल शेटे,अरुणा लोंढे मॅडम, वायदंडे सर,आर्शिद पठाण सर इ नि कार्यक्रम यशस्वी केला तर शेवटी आभार प्रा.धाइंजे सर यांनी मानले

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापुर येथे शालेय क्रीडा उद्घाटन

इंदापूर (प्रतिनिधी )श्री.नाराणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत शालेय क्रिडास्पर्धांचेआले उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रम ना.रा. हायस्कुल चे क्रिडा शिक्षक श्री. तानाजी गलांडे सर, सहशिक्षक श्री. रामदास देवकर सर आणि आय काॕलेज सायन्स विभागाचे श्री. वीर सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम इ.४थी च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते क्रिडाज्योत प्रज्वलन करण्यात आली. मैदान पूजन बरोबरच इ. ३री च्या विद्यार्थ्यांनी “अॕरोबिक हा व्यायाम” प्रकार सादर केला. इ. २री मुलांनी” संगीत खुर्ची “या खेळाचे सादरीकरण केले. तसेच या सप्ताहात विविध सांघिक आणि वैयक्तिक खेळ आयोजित केल्याची माहिती शाळा प्रमुखांनी दिली . सुञसंचलन श्रीमती. संतोषी वखरे यांनी केले . सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय स्टाफ ने मोलाचे सहकार्य केले .

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

तीन पक्षांचे सरकार बनल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली…..वैभव गिते

महाराष्ट्रात अन्याय अत्याचार झाल्यास अत्याचार केलेला आरोपी हा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असतो किंवा त्याचे लगेबंध असतात
साहजिकच शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप या पक्षांचा असतो त्यामुळे हे आरोपी त्यांच्या पक्षातील आमदार,खासदार मंत्री यांच्यामार्फत पोलिस प्रशासनावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत असतात
यामध्ये भरडली जाते ती सामान्य दलित आदिवासी बौद्ध गोरगरीब जनता यापूर्वीची सत्ताधारी मंडळी दोन पक्षांची मिळून असायची परंतु सध्याचे सरकार तीन पक्षांचे मिळून बनल्याने सामान्य जनतेपुढील आव्हाने अधिक वाढली आहेत
नवीन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मनावर घेऊन जर जातीय अत्याचार संपवण्याची मोहीम हाती घेतल्यास खरोखरच बदल होईल देशाला स्वातंत्र्य मिळून 70 पेक्षा जास्त वर्ष झाली पण दलित आदिवासी बौद्धांची मागासवर्गीयांची स्थिती जशीच्या तशी आहे त्यांच्या हक्काचा प्रगतीचा निधी इतरत्र वळवला जातोय आखर्चित ठेवला जातोय त्यामुळेच मागासवर्गीयांची स्थिती बिकट होत चालली आहे गरिबांना अधिक गरीब करून आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करून राज्य करायचे हा जणू अलिखित नियमच झाला आहे
त्यामुळेच धोका टळलेला नसून अधिक वाढला आहे सामाजिक काम करणाऱ्या बुद्ध,फुले शाहू आंबेडकर लहुजी आण्णा भाऊंच्या विचाराने जबाबदारी घेऊन प्रमाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे

वैभव तानाजी गिते राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस इमेल vaibhav10484@gmail. com

नातेपुते येथे संविधान दिन उत्साहात साजरा

नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते ग्रामपंचायत यांचे वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला
:शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार ७० वा संविधान दिन ग्रा. पं.नातेपुते येथे सरपंच बी. वाय.राऊत यांचे हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रंथपाल प्रदीप वणसाळे यांनी उद्देशीका व प्रतिज्ञा वाचन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्र पुरोगामी न्यूज चॅनलचे वतीने वृक्ष लागवड सहभागाबद्दल जी.प.सदस्य महेश सोरटे व सरपंच भानुदास राऊत यांचा सन्मान संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांनी केला.या कार्यक्रमासाठी एन के साळवे , पत्रकार श्रीकांत बाविस्कर जी.प.सदस्य महेश सोरटे, ग्रा. पं.सदस्य भारत सोरटे,सुरेश पांढरे, टेंबरे,जयराम पांढरे, मा.सदस्य समीर सोरटे,नंदकुमार देशपांडे,दत्ता सोरटे,गोरख ढोबळे,बाबा बरडकर, ग्रा. वि.अधिकारी मोरे व नागरिक उपस्थित होते.

विश्वसम्राट बळीराजा मिरवणूकीचे उद्या 15 वे वर्ष

विश्वसम्राट बळीराजा मिरवणूकीचे यंदा 15 वे वर्ष

पुणे (प्रतिनिधी )पुणे-सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि बळीराजा गौरवसमिती,पुणे तर्फे दरवर्षी बलिप्रतिपदा दिनी दि.28ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथे महात्मा फुले वाडा(समता भूमी) ते लाल महाल अशी बळीराजा ची भव्य मिरवणूक काढली जाते
यंदाचे हे 15 वे वर्ष आहे.सदर मिरवणूकीत
दरवर्षी प्रमाणे हमाल पंचायत चे डॉ.बाबा आढाव यांचे शुभहस्ते फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून नंतर बळीराजाला हार घालून फळ,भाजीपाला,
धनधान्याने, सजविलेल्या बैल गाडीतून धनधान्य फळे,भाजीपाला, वाटत वाटत फुले वाडा ते वस्ताद लहुजी साळवे तालीम कडून,लाल महाल पोहचणार आहे..लाल महालातील मॉं जिजाऊ साहेब यांना बळीराजा झालेले रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल.त्यानंतर समारोप होताना प्रबोधन पर भाषणे आणि पानसुपारी चा कार्यक्रम होईल.
तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्यने या विश्वसम्राट बळीराजा मिरवणुकीत सामील होऊन ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो ,तसेच नव्या रूपातील वामनी विचार गाडण्यासाठी नक्की सहभाग घ्यावा आणि आपल्या परिसरात बलिप्रतिपदा दिनी खरा शेतकरी राजा बळीराजा यांची सर्वत्र भव्य मिरवणुक काढावी असेआवाहन प्रा.प्रतिमा परदेशी, तोडकर,किशोर ढमाले,सचिन बगाडे, आकाश ढोक,प्रतीक परदेशी यांनी केले आहे

विधानसभा निवडणुक निकाल २०१९ महाराष्ट्र नूतन आमदार

विधानसभा निवडणुक निकाल २०१९

मुंबई

कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप
धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम – सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी – अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना
अणुशक्ती नगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना – संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप
चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप – योगेश सागर, भाजप
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर
दहिसर – मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली – सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले – पराग अळवणी, भाजप

ठाणे आणि कोकण

पालघर

डहाणू – विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड – सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर – श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा – क्षितीज ठाकूर, बविआ
वसई – हितेंद्र ठाकूर, बविआ

ठाणे

भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व – रईस शेख, सपा
शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड – किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर – कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली – रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर – गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे – संजय केळकर, भाजप
ऐरोली – गणेश नाईक, भाजप
बेलापूर – मंदा म्हात्रे, भाजप

सिंधुदुर्ग

सावंतवाडी – दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण – वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड – नितेश राणे, भाजप

रत्नागिरी

राजापूर – राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी – उदय सामंत, शिवसेना
चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर – भास्कर जाधव
दापोली – योगेश कदम, शिवसेना

रायगड

महाड – भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग – महेंद्र दळवी, शिवसेना
पेण – रवीशेठ पाटील, भाजप
उरण – महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत – महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल – प्रशांत ठाकूर

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्
इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा – मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड – राहुल कुल, भाजप
पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप
पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी – महेश लांडगे, भाजप
मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर – अनिल शिरोळे, भाजप
हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूर

इचलकरंजी – प्रकाश आवडे, अपक्ष
करवीर – पी एन पाटील, काँग्रेस
कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर – अनिलभाऊ बाबर, शिवसेना
तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली – धनंजय गाडगीळ, भाजप
जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारा

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना
पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण – जयकुमार गोरे, भाजप
वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर

अक्कलकोट – सचिन शेट्टी
करमाळा – संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस -राम सातपुते, भाजप-रिपाइं
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

अहमदनगर

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक

इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड – राहुल अहेर, भाजप
दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप
निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण – दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळे

साक्री – मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण – कुणालबाबा पाटील, काँग्रेस
धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप
शिरपूर – काशिराम पवार, भाजप

नंदुरबार

अक्कलकुवा – केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;
शहादा – राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप
नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगाव

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप
जामनेर – गिरीश महाजन, भाजप
पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ – संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस

विदर्भ

बुलडाणा

खामगाव – आकाश फुंडकर, भाजप
चिखली – श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप
बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला

अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप

वाशिम

कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड – अमित झनक, काँग्रेस
वाशिम – लखन मलिक, भाजप

अमरावती

अचलपूर – बच्चू कडू, प्रहार
अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप
बडनेरा – रवी राणा, अपक्ष
मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी – देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

वर्धा

आर्वी – दादाराव केचे, भाजप
देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर – केदार छत्रपाल, काँग्रेस
हिंगणा – समीर मेघे, भाजप
उमरेड – राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, भाजप
नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस
कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक – आशिष पेंडम, अपक्ष

भंडारा

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप
साकोली – नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा – विजय रहांगडले, भाजप
गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली

आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली – देवराव होली, भाजप
अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर

चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर – बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा – सुरेश धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ

वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव – अशोक वोईके, भाजप
यवतमाळ – मदन येरावार, भाजप
दिग्रस – संजय राठोड, शिवसेना
आर्णी – संदीप धुर्वे, भाजप
पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड – नामदेव सासणे, भाजप

मराठवाडा

औरंगाबाद

औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर – प्रशांत बंब, भाजप
पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप

परभणी

जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर – नारायण कुचे, भाजप
भोकरदन – संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद

उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना
परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड

किनवट – भिमराव केराम, भाजप
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव – राजेश पवार, भाजप
भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस

लातूर

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा – अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

बीड

गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप
परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज – नमिता मुंदडा, भाजप
बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

महायूती व महाआघाडीत माळशिरस तालूक्यात चुरस

खडूस (रजनी साळवे) देशात व राज्यात सत्ता परिवर्तन होताना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालूक्यातही विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाची लाट टिकेल की , राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाची लाट टिकेल , म्हणजेच दुसऱ्या शब्दात माळशिरस तालूक्याच्या मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील व नरेद्रमोदीच्या प्रतिमेलाच मते दिली . तशीच ती स्थानिक पातळीवर आता विधानसभा निवडणूकीतही देतील का ? ., या प्रश्नाच्या उत्तरावरच माळाशिरस तालूक्याच्या आमदारपदाची सूत्रे कोणाकडे जाणार ते ठरणार आहे .
या प्रश्नाचे उत्तर होकार अर्थी आलेतर भाजपाच्या अगदी नवख्या काल , परवा पक्षात
आलेल्या उमेदवाराकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाजलेल्या उमेदवाराचा सहज आश्चर्यकारकरीत्या पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष हा शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने माळशिरस तालुक्‍यात पुन्हा सत्तेवर बसेल आणि ते उत्तर नकारार्थी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सत्ता हस्तगत करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अकलूज येथे ज्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली त्या उमेदवाराने विजय मिळविला. त्यातही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्वतःचे हक्काचे मतदान ही जमेची बाजू ठरली होती आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणूक विजयानंतर माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात पक्षसंघटना मजबुतीकरण करण्यास लक्ष घातले आणि मजबूत करण्याचा एक भाग म्हणून विधानसभा निवडणूक पार झाली आणि पक्ष मजबूत करण्याचा मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थेट पाचारण करण्यात आले या विधानसभा निवडणुकीत उमेदवार भाजपलाच निवडून द्या व एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच निवडून द्या असे साकडे गल्लीतही व वाड्या-वस्त्यांवरही मतदार राजांना घालण्यात आले माळशिरस मतदार नेमका काय करेल तो पुन्हा नमो नमहा म्हणत भाजप पक्षाला एकतर्फी विजय मिळवून देईल का ? की स्थानिक पातळीवर वेगळा विचार करून ग्रामीण भागात सहकार क्षेत्रावर वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून देईल .याची उत्सुकता आता लागली आहे या निवडणुकीतील प्रमुख पक्षांमधील फोडाफोडी सुरू झाली ती काही गोष्टी गृहीत धरूनच त्यानंतर उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात मात्र भाजप पक्षाने अकारण चुकीच्या खेळी केल्या बाहेरून आयात उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यातही पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून तालुका बाहेरील व्यक्तीस उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवार हा मुद्दाही पक्ष प्रतिमेला मारक ठरला त्याचा विपरीत परिणाम पार्श्वभूमीचे उमेदवार दिलेल्या प्रभागात नव्हे तर सर्व तालुक्यात झाला दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागल्याने हबकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात खूपच कौशल्य वापरल्याचे दिसून आले स्थानिक आणि प्रभावी उमेदवार निश्चित केला गेला . ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाचा वर्चस्व असल्याकारणाने वर्चस्व प्रस्थापित करीत खणखणीत प्रभावी उमेदवार दिला गेला त्यामुळे प्रचारात अन्य मुद्दे यापेक्षा भाजप उमेदवार हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला .भाजपने मात्र विकासाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजवटीतील कमकुवत मुद्देही मांडले अर्थात कार्यकर्ता हा मोहिते-पाटलांचा आत्मा असल्याने प्रदीर्घकाळ सत्तेची सूत्रे सांभाळलेल्या मोहिते-पाटील घराण्याची अस्तित्वाची लढाई आहे मतदार गृहीत धरून आखाडे बांधले तर तोंड पोळून घ्यायची वेळ येते .हे या पूर्वीच्या अनुभवावरून दिसून आले आहे त्यामुळे आयात उमेदवार व स्थानिक उमेदवार यामध्ये कोणाची सरशी होणार यावरच येणारा निकाल अवलंबून आहे.

नातेपुते-दहिगाव रस्ता देतोय मृत्यूला निमंत्रण* खड्ड्यांमुळे अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार- एन डी एम जे*

नातेपुते दहिगाव रस्ता देतोय मृत्यूला निमंत्र
नातेपुते (प्रमोद शिंदे)- नातेपुते- दहिगाव हा रस्ता जणूकाही मृत्यूला निमंत्रण देत असल्याचं दिसून येत आहे कारण नातेपुते दहिगाव रस्त्यावरती खूप मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत. या अपघातात लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत आहे. या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो .रस्त्यामध्ये एक-एक दोन-दोन फुटाचे मोठे खड्डे पडले असून हे खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत वर्षातून दोन-तीन वेळा लाखो रुपयांचे टेंडर काढून या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम तात्पुरत्या स्वरूपात केला जाते सध्या नातेपुते दहिगाव रस्त्याचं मोठ काम चालू आहे यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून काम पूर्ण होण्यास बराच कालावधी जाणार आहे परंतु सध्या रस्त्यामध्ये खड्डे पडले असल्याने सतत अपघात होत आहेत. या खाड्या संदर्भात संबंधित पीडब्ल्यूडी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता तात्पुरते त्यांनी खड्डे भरण्याचे मोहीम हाती घेतली आहे. परंतु हे खड्डे मातीने भरले जातात त्यामुळे माती पाऊस पडल्यानंतर निघून जाणार आहे. पुन्हा  या ठिकाणी खड्डा पडून चिखल होऊन गाडीचा अपघात होऊ शकतो व त्या ठिकाणी एखादी व्यक्ती  प्राण गमवू शकते म्हणून हा रस्ता मृत्यूला निमंत्रण देत आहे जर या रस्त्यावरती अपघात होऊन एखाद्या व्यक्ती चा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल जनतेतून होत आहे. तसेच लवकरात लवकर खडी आणि  डांबराने खड्डे भरले नाहीत तर पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, एन.डी.एम.चे पश्चिम महाराष्ट्र सचिव  बाबासाहेब सोनवणे  व पदाधिकारी आंदोलन करून रस्त्यांमध्ये वृक्षारोपण करणार तसेच अपघात होऊन मृत्यू झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली

नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेची ची जय्यत तयारी*

नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभेची ची जय्यत तयारी*
प्रमोद शिंदे ( नातेपुते )नातेपुते तालुका माळशिरस येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे जय्यत तयारी नातेपुते येथे सुरू करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून राम सातपुते हे उमेदवार आहेत राम सातपुते यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या सभेचे नातेपुते येथील पालखी मैदान येथे पक्षाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या तयारीसाठी स्वतः माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी लक्ष घातले असून या तयारीसाठी शिवामृत संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील तसेच नातेपुते येथील सोलापूर जिल्हा माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख सरपंच भानुदास राऊत ,मामासाहेब पांढरे माऊली पाटील दादासाहेब उराडे ,व परिसरातील नेतेमंडळी स्वतः पालखी मैदान वरती सभेची तयारी करत असताना दिसून येत आहेत सभेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे कमतरता भासू नये याची काळजी मोहिते पाटील कुटुंबीय व कार्यकर्ते घेत असल्याचे दिसत आहे. या सभेसाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे या सभेसाठी बारामती एडिशनल एस.पी तसेच 2 डी.वाय.एसपी 12 अधिकारी व 170 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार असल्याची सूत्रांकडून माहिती देण्यात आली

You may have missed