Uncategorized

सिस्टर मुलींनी स्वतःच्या वडिलांना दिली कोरोनाची लास

सिस्टर मुलींनी स्वतःच्या वडिलांना दिली कोरोनाची लास
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :-पिरळे तालुका माळशिरस
येथील ज्ञानदेव शिंदे यांची मुलगी विजया शिंदे ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस ता.माळशिरस येथे यरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत.आजचा योगायोग असकी स्वतःच्या वडिलांना त्यांनी कोरोना लास दिली.वैशिष्ट्ये असकी कोरोना लास देताना दोघांच्या चेऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला.ज्या वडिलांनी जन्म दिला त्याच वडिलांची सेवा करण्याची संधी मिळाली.त्यामुळे हा एक मुलींसाठी व वडिलांसाठीचा अविस्मरणीय क्षण ठरला.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र माहिती व कार्य दिशा पुस्तकाचे प्रकाशन माळशिरस पंचायत समिती मध्ये संपन्न

ग्राहक पंचायत महाराष्ट्र माहिती व कार्य दिशा पुस्तकाचे प्रकाशन माळशिरस पंचायत समिती मध्ये संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस,दि.१५ :- राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत महाराष्ट्र माहिती व कार्य दिशा या पुस्तकाचे प्रकाशन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सौ. स्मिता पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, सभापती शोभा सुनिल साठे, तसेच माजी सभापती वैष्णवी देवी अर्जुनसिंह मोहिते पाटील ,पंचायत समिती सदस्य अजय सकट, सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य श्रीकांत बाविस्कर ,सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य भगवान घुगरदरे , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था नातेपुते महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष विनायक सावंत सर उपस्थित होते.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले की, ग्राहकांनी आपल्या प्रश्नाबाबत जागरूक राहून होणाऱ्या फसवणूकी विरुध्द तक्रार देण्यासाठी समोर आले पाहिजे.यावेळी त्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सर्वजाती धर्माच्या गरिबांची अतिक्रमने नियमनुकूल करा… राज्य सचिव वैभव गिते

सर्वजाती धर्माच्या गरिबांची अतिक्रमने नियमनुकूल करा…वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमहाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शासकीय जागेवरील निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी सांगणकीय प्रणाली टप्पा 2 साठी उद्याची 15 मार्च 2021 ही तारीख अंतिम आहे.असे शासनाने दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उद्देशून लिहलेला पत्रात म्हंटले आहे.ज्या गावांमध्ये एकही अतिक्रमण नाही त्या ग्रामपंचायतींना अतिक्रमण नसल्याचा ठराव ऑनलाइन प्रणालीवर अपलोड करणे
ज्या गावांमधील ग्रामसेवकांनी अतिक्रमण धारकांची माहिती शासनाच्या वेबसाईटवर भरलेली नाही त्यांना दिनांक 15 मार्च 2021 पर्यंत भरायला लावा अन्यथा सर्वजाती धर्मांच्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होणार नाहीत त्यामुळे एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
मोठ्या मेहनतीने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या तीव्रआंदोलनानंतर व मंत्रालयीन पाठपुराव्यानंतर शासनाने अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी दुसरा टप्पा जाहीर केला आहे.अनेक तालुक्यातील गटविकास अधिकारी जाणून-बुजून टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे ग्रामसेवकांवर अंकुश राहिलेला नाही बहुतांश गावांमध्येतर ग्रामसेवकाना या संदर्भातील शासननिर्णयच माहिती नाही.शासनाच्या धोरणांची तालुकास्तरावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची असल्याने कर्तव्यात कसूर करणाऱ्या गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी प्रधान सचिव महसूल विभाग मंत्रालय यांच्याकडे केली आहे…

पिरळे ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे पाच वर्ष नळाला पाणी नाही

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील लता शिंदे यांच्या ग्रामपंचायत नळाला ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे गेली पाच वर्षापासून पाणी बंद पण पाणी पट्टी सुरू पाच वर्षात एक थेंबही पाणी आले नाही. याबाबत वेळोवेळी ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना लेखी व तोंडी पाणी येत नसले बाबत तक्रार दिली होती .गेल्या पाच वर्षात जवळपास पाच ते सहा सरपंच  झाले असून एकाही सरपंचांनी  किंवा सदस्याने दखल घेतली नाही. पाच वर्ष अद्यापही यावर कारवाई झाली नाही त्यासंदर्भात ग्रामसेवक यांना विचारणा केली असता ते याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.ग्रामसेवक  जमदाडे यासंदर्भात कोणत्याही बाबत जबाबदारी घेत नसून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.या नळ बंद असलेले संदर्भात9/10/2019 तसेच या अगोदर सुद्धा लेखी तक्रार दिली आहे यावर ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केले असून अद्यापिही कोणत्या प्रकारची कार्यवाही झाली नाही. म्हणून यासंदर्भात आता मा. गट विकास अधिकारी व कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. गट विकास अधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गेल्यावर ते यासंदर्भात लक्ष घालून कारवाई करतील का हादेखील प्रश्न समोर येत आहे यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची मातोश्रीवर सदिच्छा भेट

विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची कन्हेर येथील बाळासाहेब सरगर यांच्या मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –रविवार दिनांक 7 मार्च रोजी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे कन्हेर भांबुर्डी या गावातील अहिल्या सिंचन विहिरीच्या उद्घाटन व मांडवे येथे मारुती मंदिर सभामंडप उद्घाटन सोहळा यांच्या हस्ते पार पडला व कण्हेर येथील अहिल्या सिंचन विहिरीच्या उद्घाटनासाठी आले असता अचानक भाजपाचे किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांच्या मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली मागील आठ दिवसापूर्वी माळशिरस तालुक्यातील झालेल्या निवडी व युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निवडीवरून झालेला वाद प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पर्यंत पोहोचला होता त्यातच सोलापूर जिल्हा प्रभारी संजय भेगडे यांनी माळशिरस अकलूज येथे मीटिंग घेऊन हा वाद मिटले जी चर्चा होती अशातच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विरोधी गटाच्या निवडी करणाऱ्यांमध्ये अग्रेसर असणारे बाळासाहेब सरगर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळामध्ये भेटीची चर्चा आहे या भेटीच्या वेळी पंचायत समितीचे सभापती शोभा साठे, माजी सभापती वैष्णोदेवी मोहिते-पाटील उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,भाजपा तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर, राहुल वाघमोडे अरविंद भोसले ,संचालक रामभाऊ माने, धर्मराज माने ,कनेर चे सरपंच पोपट माने व माळशिरस तालुका सोशल मिडीया सहसंयोजक प्रमोद काळे

नातेपुते पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नातेपुते पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते -प्रमोद शिंदे
नातेपुते पोलीस स्टेशन येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नातेपुते पोलीस स्टेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर नम्रता होरा,महिला बालकल्याण संरक्षण अध्यक्ष वावरे मॅडम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते ग्रामपंचायत नूतन सरपंच कांचन लांडगे या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एपी.आय मनोज सोनवलकर यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले की महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे महिला दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता नेहमीच महिलांचा सन्मान झाला पाहिजे.महिला या शक्तीपीठ आहेत.
तसेच डॉक्टर नम्रता होरा यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली तर महिला बालकल्याण संरक्षण अध्यक्षा वावरे मॅडम यांनी महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा त्यामध्ये लैंगिक हिंसाचार व अनेक हिंसाचाराचे प्रकार सांगितले. सरपंच कांचन लांडगे म्हणाल्या की मुलींना लाडाने परी बनवू नका तर वाघीण बनवा असा संदेश त्यांनी दिला.महिला आर्थिक विकास महामंडळ शेंडगे साहेब यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले.तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिला कर्मचारी डॉक्टर नम्रता होरा, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली पवार, नेहा बोंदर,सामाजिक कार्यकर्त्या जयश्री अटक यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास रिपाईचे नेते एन के साळवे,दयानंद धाईंजे,पत्रकार लतीफ भाई नदाफ,अभिमन्यू आठवले,आनंद लोंढे,विलास भोसले,आनंद जाधव,भगत महाराज तसेच ग्रामपंचायत सदस्य महिला पोलीस पाटील, बचत गटातील महिला, महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. हा कार्यक्रमात मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून सोशल डिस्टंसिंग मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सोरटे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे आयोजक रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन.के साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बबलू गाडे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

महिला दिनानिमित्त सीमाताई आठवले यांना पुरोगामी महाराष्ट्राचा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार देऊन सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते-(प्रमोद शिंदे)-

रिपाईच्या महिला आघाडी राष्ट्रीय नेत्या सीमाताई रामदास आठवले यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच जिजाऊ-सावित्री जयंती महोत्सव व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.महाराष्ट्रात तसेच देशामध्ये अन्याय अत्याचार झाल्यास अनेक पीडितांना आईच्या माये प्रमाणे प्रेम देऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत स्वतः सीमाताई आठवले ह्या प्रयत्न करून पीडितांना अनेक प्रकारे मदत करत असतात.लॉक डाऊन मध्ये सुद्धा स्वतःची पर्वा न करता अनेक भुकेलेल्या लोकांना स्वतःच्या घरी अन्नदान देण्याचे पुण्य काम केले आहे. अशा अनेक सामाजिक कार्याची दखल घेत पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संचालक एडवोकेट डॉक्‍टर केवल उके साहेब,संपादक प्रमोद शिंदे,कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांच्या वतीने माननीय सीमाताई आठवले यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.हा पुरस्कार बांद्रे मुंबई येथील रामदासजी आठवले साहेब यांच्या संविधान बंगला येथे, शिर्डी येथील पीडित सागर शेजवळ हत्याकांडातील फिर्यादी सीमाताई आठवले यांचे मानसपुत्र आकाश शेजवळ याच्या हस्ते देण्यात आला.यावेळी शिर्डी येथील .त्याप्रसंगी. मंदाताई ठोक,सीमाताई बोरुडे ( रिपाई नगर जिल्हा अध्यक्ष), वैशालीताई सोनवणे (कोपरगाव तालुका अध्यक्ष) कविता_गायकवाड (राहता तालुका अध्यक्ष), तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

दसुर गावच्या पोलीस पाटलावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वेळापूर

माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील दसुर येथील पोलीस पाटील अवैध वाळू धंदा करीत होता. आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पोलीस पाटलाला रंगेहाथ पकडून वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,
महेश अशोक शिंदे, वय 37, रा. दसुर (पोलीस पाटील ) हा वाळूचा अवैध धंदा करीत होता. दरम्यान याबाबत आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दसुर परीसरात या वरती कारवाई केली असून पोलीस पाटील शिंदे सह त्याचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे, रा. खळवे यांचेवर वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदर कारवाई मध्ये 12 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 2 लाख रुपयांची डम्पिंग ट्रॉली, 10 लाख रुपयांचा महिंद्रा ट्रॅक्टर तर 7 हजार रुपयांची वाळू सोबत 25 हजार रुपयांची मोटारसायकल (mh45b9719) असा मुद्देमाल आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षका तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, श पो उ नि खाजा मुजावर, पोहेकॉ नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे हे करीत आहेत सदर अशा प्रकारचा गुन्हा पोलीस पाटलांनी केल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच पोलीस पाटलाला निलंबित करण्याची ग्रामस्थांकडून होत आहे.

जिद्दी आणि कष्टाळू भारत सोरटे युवकांपुढे ठरला आदर्श

कष्ट हेच भांडवल भारत सोरटे युवकांपुढे ज्वलंत उदाहरण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

लहानपणापासूनच परिस्थितीची जाण असलेला नातेपुते येथील भारत सोरटे हा युवक जिद्द ,चिकाटी, कष्टाच्या जोरावर आज युवकांसमोर आदर्श ठरत आहे.भारत वसंत सोरटे याची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती वडील हे कुशल कुस्तीगीर वस्ताद होते वडील आजारी पडल्यानंतर आईवडिलांची अत्यंत प्रामाणिकपणे त्याने सेवा केली आहे.तसेच वाट्टेल ते मिळेल ते काम त्याने करून आपले बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कधीही कोणासमोर हात न पसरता प्रसंगी गवंड्याच्या हाताखाली तसेच मजुरीचे काम न लाजता त्याने केले.काम करत करत त्याला व्यायामाची अत्यंत आवड होती तो स्वतः निर्व्यसनी राहून व्यायाम करत बलदंड शरीर यष्टी त्याने  कमवली पिळदार शरीराच्या जोरावर त्याने कष्ट करून प्रपंच चालवला परिस्थिती नसताना मित्रांच्या सहकार्याने स्वतःचा शुद्ध पाण्याचा प्लांट उभा केला व संपूर्ण नातेपुते व परिसरात लोकांना थंडगार व शुद्ध पाणी पोहोचवण्याचं काम करीत आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो स्वतःचा प्रपंच चालवत असून त्यामध्ये तो खुश आहे. कितीही अडचणी आल्या तरी तो सतत हसतमुख असतो म्हणून तो आज युवकांपुढे एक आदर्श ठरत आहे.

सतत हसतमुख असणारा भारत सोरटे

भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मुरबाड येथे पोलिस स्टेशनला घेराव

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण:संदेश भालेराव
संविधान सन्मान मोर्चा
मुरबाड (दि. ५) :
भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सोमवारी आंबेडकरी समाजाने मुरबाड पोलीस स्टेशनला घेराव घातला असता यावेळी पोलिसांनी क्रॉस कंपलेंटची भूमिका घेतल्याने आज तालुक्यातील आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन संताप व्यक्त केला.
मुरबाड तालुक्यातील फणसोली येथील एका इसमाने फेसबुकवर संविधानापेक्षा मनुस्मृति श्रेष्ठ असल्याच्या आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. या गैरप्रकारामुळे संतापाची लाट उसळलेल्या तालुक्यातील आंबेडकरी जनतेने मुरबाड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून संबंधित घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीला अटक ही करण्यात आली. मात्र यात फिर्यादींवर ही गुन्हे नोंद करण्यात आल्याने संतप्त आंबेडकरी जनतेने आज मुरबाड पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर पायी ‘संविधान सन्मान मोर्चा’ काढून घोषणाबाजी करीत मुरबाड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेचा निषेध केला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

मात्र आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही मोठ्या मोर्च्याचे आयोजन केले जाईल, असा इशारा अनेक आंबेडकरी नेत्यांनी आपल्या भाषणातून वैक्त केले

You may have missed