माळशिरस तालुका

अडीच रूपयांच्या कमिशनसाठी गेला २३ मुलांचा जीव ?कफ सिरप प्रकरणात धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली: मध्य प्रदेशात विषारी सिरपचे सेवन केल्याने २३ मुलांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मुलांना हे सिरप लिहून देणाऱ्या डॉक्टरला कंपनीकडून प्रत्येक बाटलीसाठी १०% कमि शन मिळाले होते. श्रीसन फाम स्युिटिकल्सने बनवलेली कोल्ड्रिफ कफ सिरपची एक बाटली २४.५४ रुपयांना विकली गेली.याचा अर्थ केवळ अडीच रूपयांच्या कमिशनसाठी या चिमुरड्यांचा जीव गेल्याचे एका प्रख्यात माध्यमाने हे वृत्त दिले आहे. संबंधित बातमीत म्हटले आहे की पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी डॉक्टर प्रवीण सोनी यांचे श्रीसन फार्मास्युटिकल्सशी संगनमत होते आणि त्यांनी लिहून दिलेल्या प्रत्येक बाटलीसाठी त्यांना २.५० रुपये कमिशन देण्यात आले.शवाय, डॉ. प्रवीण सोनी यांनी लिहून दिलेली औषधेत्यांच्या पत्नी आणि पुतण्यांच्या दुकानात विकली जात होती. १८ डिसेंबर २०२३ रोजी, आरोग्य सेवा महासंचालनालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट सूचना जारी केल्या होत्या की चार वर्षांखालील मुलांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे लिहून देऊ नयेत. असे असूनही डॉ. सोनी त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरप लिहून देत राहिले.

तपासकर्त्यांचा असा दावा आहे की डॉ. सोनी यांनी कोल्ड्रिफ कफ सिरपचे धोके माहित असूनही वारंवार लिहून दिले. पोलिसांने म्हणणे आहे की आरोपी डॉव कमिशन

बिहार येथे विवाहितेने दिला चार मुलांना जन्म

मोतिहारी : बिहारमोतीहारी भागात एका विवाहितेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. या महिलेचा विवाह होऊन पाच वर्षे झाल्यानंतर,तिची ही पहिलीच प्रसूती झाली आहे. या महिलेने एक मुलगा आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. बिहार राज्यातील मोतिहारी वात्सल्य नर्सिंग होम एण्ड आयव्हीएफ सेंटर येथे एका म हिलेने चार बाळांना जन्म दिला आहे. विसुनपुर ढेकहा येथे रहाणारे पप्पू कुमार चौधरी यांची पत्नी रंजू देवी यांनी सकाळी चार अपत्यांना जन्म दिला. यात तीन मुली आणि एक मुलगा आहे. यामुळे या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न

दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, लोणंद ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समुहाच्या चेअरमन तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 490 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.उपस्थिती :
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, डॉ.दिपाली देसाई,
सौ.वनिता खंदारे (सरपंच), प्रियंका नीटवे (सरपंच नीटवेवाडी), श्री. मानसिंग मोहिते (मा. पंचायत समिती सदस्य), श्री. हनुमंत रुपनवर, धनाजी इंगळे, वैभव शिंदे, अशोक पवार, धनाजी खुडे, अंकुश राऊत, अनिल रुपनवर, रमेश फुले, महादेव रुपणवर, ज्ञानदेव मोहिते, बाळासो गाडे, बापूराव नीटवे, अनिता खुडे, ज्ञानदेव ननवरे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

पदवीधर – शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी माळशिरस तालुक्यामध्ये मतदार नोंदणीला प्रारंभ झाला आहे. मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. या तारखेपूर्वी दोन्ही मतदार संघांकरीता पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या या निवडणूकीकरीता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरीता ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये पदवीधर मतदार संघाकरिता १३ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये माळशिरस शहरामध्ये २. अकलुज शहरामध्ये ४, नातेपुते २, वेळापूर २. दहीगाव १.राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र व पिलिव १ मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहे. तर शिक्षक मतदार संघाकरीता एकुण ७ मतदान केंद्र तयार करणेत आलेले आहेत. त्यामध्ये अकलुज, माळशिरस, दहीगाव, नातेपुते, महाळुंग, पिलिव, वेळापूर येथे प्रत्येकी एक अशी एकुण २० मतदान केंद्र माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करणेत आलेली आहेत. पदवीधर मतदार संघाकरीता फॉर्म नंबर १८ तर शिक्षक मतदार संघाकरीता फॉर्म नंबर १९ पात्र मतदार यांनी भरुन द्यावयाचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून अकलूज विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी, माळशिरस – सुरेश -शेजुळ, तहसीलदार माळशिरस, दहिगाव अमोल कदम, नायब तहसीलदार माळशिरस, नातेपुते-प्रवीण सुळ, निवडणूक नायब तहसीलदार, महाळुंग- सुमित जाधव मुख्याधिकारी नगरपंचायत अवाहन आले आहे. वेळापूर-सिद्धनाथ जावीर महसूल नायब तहसीलदार, पिलीव रघुनाथ पांढरे गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. सदर अधिकारी यांचेकडे मतदार यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरुन द्यावयाचे आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म भरणेसाठी https://mahaelection.gov. in या लिंकचा वापर करावा असे मतदारांना

पतीने केला पत्नीचा खून एक मुलगा, दोन मुली पोरकी

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निघुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पो लीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. यशोदा सुहास सिद्धगणेश (वय३५ वर्षे) ही महिला आज (१४ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी यशोदा सिद्धगणेश या महिलेला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, त्यानंतर यशोदा यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. या महिलेची हत्या तिच्या पती-ने केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सोन्याच्या किंमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले, १० ग्रॅम सोन्याचा दर

मुंबई : अमेरिका चीनमधील व्यापार तणाव,जागतिक अनिश्चिततेमुळे सोमवारी भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. सोन्यासह चांदीचे ही भाव ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत इंडियन बुलियन असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ( १४ ऑक्टोबर) १ लाख २६ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला जात आहे. तर किलोमागे चांदीचा दर एक लाख ६१ हजार ६७० रुपयांवर पोहोचला आहे .दरम्यान, २४ तासांपूर्वी (१३ ऑक्टोबर) सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ५२० रुपये होता आज तो १ लाख २६ हजार ५९० झाला आहे. म्हणजेच २४ तासात सोन्याच्या भावात झालेली वाढ ही २०७० आहे

बस पेटताच प्रवाशांचा आक्रोश, १० ते १२ जण होरपळून दगावल्याची भीती

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठा अप घात झाला आहे. जैसलपूरहून जोधप रला निघालेल्या बसला अचानक आग लागली. त्यात तीन मुलं आणि चार महिलांसह १० ते १२ जण गंभीररित्या भाजले, त्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. दुपप्ती साडे तीनच्या सुमारास चैवत गावाच्या जवळ हा अपघात झाला. दुष्टनास्थळ जैसलमेरपासून २० किलोम पेटर दूरवर आहे. बसला अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास बस जैसलमेरहून ५७ प्रवाशांना घेऊन निघाली होती. चैवत गाव सोडल्यावर बसच्या मागील भागा तून धूर निघू लागला. यानंतर अवध्या काही मिनिटांत संपूर्ण बसनं पेट घेतला. प्रवाशांनी आक्रोश सुरु केला. अनेक जण दरवाजे, खिडस्या फोडून कसेबसे बाहेर पडले.ग्रामस्थ आणि वाटसस्नी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केलं. त्यांनी आसपासच्या भागातून पाणी आणि रेती आगूर आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोह चितं. जवळपास तासभरात त्यांनी आग नियंत्रणात आणली.दलाचे पथक दुर्घटनेची माहिती मिळताच अधिशमन पथक १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याची माहिती नगर परिषदेचे सहाय्यक अधिशमन अधिकारी पृथ्वीपाल सिंह राठोड यांनी दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा कस पूर्णपणे जळून खाक झाली होती. ज्याला आम्ही जिवंत बाहेर काढू, अशी एकही व्यक्ती त्यावेळी आम्हाला दिसली नाही. त्यावेळी अंदाजे १० ते १२ जण बसमध्येच होते, असं राठोड यांनी सांगितलं.दुर्घटनेत उखमी झालेल्या स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनंतीन रुग्णवाहिकांच्या मदतीन जैसलमरम चील जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथमोपचारानंतर जोधपूरला हलवण्यात आले, जवळच असलेल्या लष्करी तळावरील जवानांनीदेखील आद विझवण्यास मदत केलीआग लागण्यामागचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम झाल्यानं आग लागली असावी, असा प्राथमिक तपासानंतरचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचे आज १५ ऑक्टोबर रोजी आंदोलन

कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व उपदान मिळावे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

मुंबई : निवृत्तिवेतन, उपदान (ग्रॅच्युईटी), प्रोत्साहन भत्ता, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व उपदान मिळावे यासाठी १५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपदान (ग्रॅच्यूईटी)देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर उपासम दरमहा ारीची वेळ आली आहे. सरकारच्या या उदासिनतेमुळे अंगणवाडी कर्मचारी हतबल झाल्या आहेत. अंगणवाडीकर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये व मतदनीसांना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने आदेश दिले आहेत. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर पवर आपल्या कामाची नोंद करणे बंधनकारकराज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बृजपाल सिंह, कॉ. शुभा शमीम, कॉ. दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, कॉ. जीवन सुरुडे, जयश्री पाटील, कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.केले आहे. राज्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांपैकी ८० टक्क्‌यापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर पवर काम करूनसुध्दा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही.

पीएफमधून १०० टक्के पैसे काढण्यास मान्यता

दिवाळीपूर्वी सरकारने देशातील कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने सोमवारी भविष्य निर्वाह निधी अंशतः काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी अंशतः पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि उदार झाली असून, सदस्य आता त्यांच्या पात्र शिल्लक रकमेपैकी १००% पर्यंत पैसे काढू शकतील. केंद्रीय कामगार मंत्रीपीएफमधून १०० टक्के पैसे…मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या २३८व्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कामगार मंत्रालयाने सांगितले की, ‘सदस्यांचे जीवनमान अधिक सोपे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.’

एकत्र लढण्याबाबत आठवडाभरात मविआचा निर्णय, पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात.

पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात; ५० टक्के तिकिटे राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या युवकांना मुंबई : स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. उद्या आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल आणि येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत धोरण ठरवले जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणान ५० टक्के तिकिटे दिली जातील असे सुतोवाच करताना, पक्षबांधणीसाठी भाकरीतरुणांना संधीशरद पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पण पक्षासाठी परिश्रम घेणा-या युवकांना ५० टक्के तिकिटे दिली जावीत, अशा सूचना पदाधिका-यांना दिल्या. संग्राम जगताप यांच्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी पदाधिका-यांना, नेत्यांना जातीय सलोखा ठेवण्याच्या सूचना दिल्या. सरकारम धील काही नेते व मंत्रीच सध्या वादग्रस्त बोलत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.फिरवण्याचे संकेत शरद पवारांनी दिले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक मुंबईत झाली. बैठकीला पक्षाच्याकार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, डॉ. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी आणि पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करावी की नाही याबाबत स्थानिक खासदार, आमदार व पदाधिका-यांची मते जाणून घेण्यात आली. उद्या महाविकास आघाडीचे नेते मतदारयादीतील गोंधळाबाबत राज्य निवडणूक अधिका-यांची भेट घेणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे ही या शिष्टमंडळात असणार आहेत. त्या भेटीनंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा होईल व धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. एकत्र लढायचे की नाही, याबाबत निर्णय झाल्यानंतर जिल्हानिहाय, महापालिका निहाय बैठका घेण्याचे आज निश्चित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीतील पक्षांमध्ये मतविभागणी होऊ नाय यासाठी एकत्र लढण्याची आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या आघाडीतील सहभागाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीने पूरग्रस्त शेतक-यांना केलेल्या मदतीवर शरद पवार यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे ती तटपुंजी आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. पूर्वी केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरघोस मदत देत असे

You may have missed