माळशिरस तालुका

१५ मिनिटांत तुळजापूर महामार्गावर २ दरोडे

कट्ट्याच्या धाकावर भाविकांना लुटले; परिसरात भीतीचे वातावरण; भाविक गंभीरतुळजापूर तुळजाभवानी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांच्या दोन कारवर २५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अशात चोरट्यांनी हल्ला करून दरोडा टाकल्याची थरारक घटना घडली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने तुळजापूर-सोलापूर महामार्गावर दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी चाकू आणि कट्टासदृश वस्तूचा धाक दाखवून सोनं, रोकड आणि मोबाइल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या हल्‌यात एका भाविकाला गंभीर दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पहिली घटना पहाटे ३:१५ वाजता सिंदफळनजीकच्या सर्व्हिस रस्त्यावर घडली. सातारा जिल्ह्यातील संदीप रघुनाथ आटोळे हे कुटुंबासह तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना, गाडी थांबवली असता दोनमोटारसायकलवरील चार चोरट्यांनी चाकू-कटट्याचा धाक दाखवला. त्यांनी महिलांच्या गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. या घटनेनंतर अवघ्या १५ मिनिटांत, म्हणजेच पहाटे ३:३० वाजता सोलापूर महामार्गावर ‘हॉटेल राजगड समोर दुसरी घटना घडली. निलंगा (जि. लातूर) येथील सतीश वीरनाथ विडवे है कुटुंबासह पंढरपूरला जात असताना गाडी शंचवल्यावरविशेष पथके रवानापोलिसांनी तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोन्ही घटनांतील चोरट्यांचे वर्णन सारखे असल्याने ही एकाच टोळीची कारवाई असल्याचा पोलिसांना संशय आहे, यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी झालेल्या दरोड्याचा तपास लागलेला नसतानाच, या सलग घटनांमु‌ळे महामार्गावरील गस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.चार चोरट्यांनी त्यांना लुटले. विरोध केल्याने चोरट्यांनी बिडवे यांच्यावर चाकूने वार करून आणि ठोसा मारून त्यांना जखमी केले.

३० हजार लोकांना हजारो कोटींचा गंडाकेंद्र सरकारचा अहवाल सादर

देशातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या सहा महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी केलेल्या गुंतवणूक घोटाळ्यांनी हजारो लोकांना कंगाल केले. गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेच्या अहवालानुसार, ३० हजारहून अधिक लोकांनी या घोटाळ्यांमध्ये आपली बचत गमावली असून, १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.बेंगळूरु, दिल्ली-एनसीआर आणि हैदराबाद ही शहरे सायबर गुन्हेगारांचे प्रमुख केंद्र बनली आहेत, जिथे सुमारे ६५ टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे, एकूण नुकसानीपैकी एक चतुर्थांशाहून अधिक (२६.३८ टक्के) एकट्या बेंगळूरु शहरात झाले आहे. बळी पडलेल्यांमध्येकशी केली जाते फसवणूक ?सायबर गुन्हेगारांनी या फसवणुकीसाठी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यांसारख्या मेसेजिंग अॅप्सचा सर्वाधिक वापर केला आहे. एकूण प्रकरणांपैकी सुमारे २० टक्के घटना या अॅप्सद्वारे घडल्या आहेत. एन्क्रिप्टेड मेसेजिंग आणि ग्रुप तयार करण्याची सुलभता यामुळे हे प्लॅटफॉर्म स्कॅमर्ससाठी सोयीचे ठरले आहेत.गुंतवणूक३० ते ६० वयोगटातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे, जे एकूण पीडितांच्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे. आपल्या कमाईच्या शिखरावर असलेल्या लोकांच्या आर्थिक आकांक्षांचा गैरफायदासायबर गुन्हेगार घेत असल्याचे यातून स्पष्ट होते. तसेच, ८.६२ टक्के (सुमारे २,८२९) ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) देखील या जाळ्यात अडकले आहेत.नोंदवलेले घोटाळे किरकोळ घटना नाहीत तर त्यात मोठ्या प्रमाणात रक्कम आहे. प्रत्येक पीडिताचे सरासरी नुकसान सुमारे ५१.३८ लाख रुपये आहे, जे दर्शविते की, या गुंतवणूक योजना अत्याधुनिक आहेत आणि वैयक्तिक आर्थिक धोक्यांना मोठा धोका निर्माण करतात.

निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा : राज ठाकरे

राज्यातील विरोधकांनीआता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या म निष्क्रियतेविरोधात हाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चा रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.या बैठकीत राज ठाकरे यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. आम्ही खोट्या मतदारांविरोधातआणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहोत. त्यांनी पदाधिका-यांना निर्देश दिले की, मोर्चा असा घ्या की गल्ली ते दिल्ली सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे लागेल.उपस्थित नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर आणि यशवंत किल्लेदार यांचा समावेश होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोर्चा भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की, केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हीच पाहिजे या म हा ानसिकतेतून सत्ताधारी खोटे मतदार वाढवून लोकशाहीचा गळा घोटत आहेत.राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नयेदरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी मुंबईतील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल ९६ लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. लोकशाहीत जर मतदारच खोटे असतील, तर निवडणुका ख-या कशा राहतील ? त्यांनी मागणी केली की, जोपर्यंत मतदार यादीतील चुका दुरुस्त होत नाहीत आणि सर्व पक्ष समाधानी होत नाहीत, तोपर्यंत राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नये.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला अटक

: फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजता बनकरला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. सकाळी या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती समोर आली शुक्रवारी आणि संपूर्ण साता-यात खळबळउडाली.धक्कादायक बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अशी दोन नावे समोर आली. या घटनेची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. याच प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे

श्री शंकर सहकारी साखर कारखाना ५२ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात संपन्न


 सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारीसाखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन २०२५-२६ चा ५२ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुविध पत्नी नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील या प्रमुख मान्यांवराच्या उपस्थित संपन्न झालायावेळी विधीवत काटा व बैलगाडीची पुजा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री सत्यनारायण महापुजा कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब माने व सौ अरुणा माने या उभयतांच्या शुभहस्ते संपन्न झालीतसेच यावेळी ऊस वहातुक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासद यांचा सन्मान मा चेअरमन साहेबांच्या हस्ते करण्यात आलाया गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील व कै. आक्का साहेब, कै. पप्पाससाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, मा.उपाध्यक्ष जि प सोलापुर बाबाराजे देशमुख माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील युवा नेते विश्वतेसिंह मोहिते पाटील व्हा चेअरमन मि लिंद कुलकर्णीया कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मा. सभापतीसंग्रामसिंह जहांगीरदार, व्हा चेअरमन शंकरराव माने देशमुख, मा.व्हा चेअरमन प्रकाश पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे, सोलापुर जिल्हाअध्यक्ष आर पी आय सोमनाथ भोसले, व्हा चेअरमन दत्तात्रय भिल्लारे, नगराध्यक्ष नातेपुते सौ. अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नगराध्यक्ष महाळुंग सौ. लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष महाळुंग भिमराव रेडे-पाटील, उपनगराध्यक्ष माळशिरस सौ. मंगल केमकर, राहुल बापू वाघमोडे, लक्ष्मण पवार, गौतम माने,मच्छिद्र ठवरे, माणिक वाघमोडे, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे, सौ हेमलता चांडोले, सरपंच विरकुमार दोशी, गौतम माने, मच्छिद्र ठवरे, माणिक वाघमोडे, तुकाराम देशमुख उपसरपंच श्रीमती सुमन भोसले, पुरदांवडे सरपंच सौ. राणी मोहिते, उपसरपंच देवीदास ढोपे, प्रताप साल-गुडे पाटील, विलास आगट, विजय देशमुख, दत्ता भोसले, परमेश्वर देशमुख, ड नितिन खराडे, तात्या एकतपुरे, विलास फडतरे, नाना नाईकनवरे, अभिमान सांवत.माळशिरस तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन, संचालक मंडळ, शेतकरी सभासद्, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, शिवामृत दुध संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य व कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरन्यायाधीशांच्या निवृत्तीसाठी मोदी सरकारची तयारी

न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी १४ मे २०२५ रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी न्यायव्यवस्थेत पारदर्शकता, सुसंवाद आणि संविधानाच्या सर्वोच्चत्वावर भर देणारा कार्यकाळ सुरू केला. न्यायमूर्ती गवई हे भारताच्या इतिहासातील दलित समाजातील दुसरे आणि बौद्ध धर्मातील पहिले सरन्यायाधीश आहेत. त्यांच्या कारकीदींतील हा टप्पा न्यायव्यवस्थेतील सम वेिशकतेचे प्रतीक मानला जातो. तरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात “संविधान हा सर्वोच्च आहे, संसद नव्हे” असा ठाम सदेश दिला आणि न्यायव्यवस्था ही कोणत्याही राजकीय दवावापलीकडे स्वतंत्र राहिली पाहिजे, यावर त्यांनीन्या. गवईना पत्र पाठवित विचारलेविशेष भर दिला. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की ‘मुख्य न्यायाधीश हा इतर न्यायाधीशांपेक्षा श्रेष्ठ नाहीः सर्व न्यायाधीशांचे अधिकार समान आहेत”, अशा वक्तव्याने त्यांनी न्यायालयीन लोकशाहीची भावना अधोरेखित केली.सरन्यायाधीश म्हणून त्यांनी प्रलंबित खटले वेगाने निकाली काढणे, न्यायालयीन प्रक्रियेत डिजिटल प्रणालीचा विस्तार, आणि न्यायालयीन प्रवेश सुलमकरणे यांना प्राधान्य दिले. त्यांनी “वेगवान न्याय म्हणजेच खरा न्याय” या तत्त्वावर भर देत, अटक प्रकरणे आणि बंदिवासाच्या सुनावण्या त्वरित घेण्याचे निर्देश दिले. त्यांच्या कार्यकाळात कोलेजियम प्रणालीतील पारदर्शकता, न्यायाधीशांच्या बढतीत गुणवत्तेचे निकम आणि प्रादेशिक समतोल राखण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी न्याधिक संघटनेतील मतभेदांवर सुसंवादाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आणि उच्च न्यायालयातील नियुक्त्यांम ध्ये विविध पार्श्वभूमीतील न्यायाधीशांचा समावेश व्हावा, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.न्यायमूर्ती गवई यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय, समता आणि संवैधानिक मूल्ये या संकल्पना निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिल्या, ते न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजात साधेपणा, कार्यक्षमता आणि नैतिक जबाबदारी यांना सर्वोच्च मानतात. अल्पावधीचा असला तरी त्यांचा सरन्यायाधीश म्हणूनचा कार्यकाळ सामाजिक न्याय, संस्थात्मक पारदर्शकता आणि संविधाननिष्ठ दृष्टिकोन यांसाठी स्मरणात राहील. मात्र आता सरन्यायाधीश गवईच्या निवृत्तीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारने न्या. गवईना याबाबत पत्र पाठविले. काय आहे पत्रात?केंद्र सरकारने भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना त्यांच्या उत्तराधिकारीच्या शिष्टारशीसाठी पत्र पाठवले आहे.

५० हजार पदवीधर नाव नोंदणी करण्याचा संकल्प

अक्कलकोट जे एन सामाजिक संघटनेच्या वतीने किणी ग्राम पंचायत कार्यालय मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभाग मोफत पदवीधर मतदान नोंदणी २०२६ अभियानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. पदवीधर म तदारांमध्ये जनजागृती करण्याचा उद्देश समोर ठेवून आणि म तदारांची संख्या वाढावी हे लक्ष ठेवून १०० मोफत पदवीधर नाव नोंदणी करून सामाजिक अभियान राबवण्यात आले. या अभियानास उपस्थित असलेले अगरथडे गुरुजी, माजी ग्रामविस्तार अधिकारी भीम तुळजापुरे, गाहितीपर अधिकार प्रवक्ता संजय किणीकर, सरपंच विनायक जाधव, हराप्पा बबले, गंगाधर माने, राम जाधव, मजी सरपंच महादेव बनसोडे, म हादेव सोनकांबळे, ग्रंथपाल म हादेव कोटमाळे, जे. एन. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबासाहेब सोनकांबळे, राहुल बिराजदार, स्वप्निल बोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.अभियान पार पाडण्यासाठी परशुराम सासवे, जनार्धन सोनकांबळे, राजकुम सोनकांबळे, चिरंजीव सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, दगडू सोनकांबळे, निलेश कांबळे, बसवराज लोनकांबळे,नितीन सोनकांबळे, आकाश सोनकांबळे, नितीन व्हनमाने, इस्म ाईल मुल्ला, सतीश वाघमारे, नागराज सोनकांबळे यांनी परिश्रम घेतले. अभियानाची सुरुवात सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचनाने करण्यात आली. यावेळी भीम तुळजापूरे, संजय किणीकर, सागर सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीग सोनकांबळे सर यांनी केले. सूत्रसंचालन आणि नोंदणी प्रमुख म्हणून प्रा. चंदन सोनकांबळे यांनी जबाबदारी सांभाळली.

पत्नीनं गळा आवळून केली पतीची हत्यास्वतः पोलिसांना फोन करून सांगितल्यानंतर अटकेची कारवाई !

पिंपरी चिंचवड पतीच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून पत्नीनं त्याची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे. नकुल आनंद भोईर (वय ४०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. चैताली भोईर असे हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आहे. या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.आज पहाटे पावणे तीनच्या सुग ारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. रागाच्या असलेल्या पत्नीनं पती नकुलचा कापडानं गळा आवळून खून केला. ही घटना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या शेजारीखूनअसलेल्या माणिक कॉलनी येथील भोईर यांच्या राहत्या घरी घडली आहे. या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षे वयाची दोन लहान मुले आहेत. पतीचा खून करून महिलेनं पोलिसांना कळिवलं. घटनास्थळी दाखल झालेल्या चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे लहान मुलांवर मोठे संकट आलं आहे. या प्रकरणाचा चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती चिंचवड पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली आहे.सामाजिक कार्यकर्ता म्हणून नकुल भोईर यांची होती ओळख मृत नकुल भोईर यांचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता. ते मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये जिकरीनं सहभाग घ्यायचे. अनेक संघटनांशीदेखील त्यांचे संबंध होते. तसेच राजकीय नेत्यांशीदेखील त्यांचे जवळचे संबंध होते. सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते. यासाठी आगामी पिंपरी चिंचवड म हापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याच्या पत्नीला उभेदेखील करणार होता. या खुनाच्या घटनेनं भोईर कॉलनी परिसरात प्रचंड तणाव निम णि झाला आहे. पती-पत्नीतील वादातून खुनासारखा प्रकार घडल्यानं समाजातही हळहळ

प्रौढत्व प्राप्त केल्यानंतर व्यवहार नाकारू शकतातअल्पवयान व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार पालक करू शकतात की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अल्पवयीन मुलांशी संबंधितमालमत्ता व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने म हत्वपूर्ण निर्णय दिला आहे. जर आल्पवयीन व्यक्तीची मालमत्ता त्यांच्या आई वडिलांगी किंवा पालनकत्यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय विकली तर ते केवळ वर्तनाद्वारे प्रौढत्व प्राप्त केल्यानंतर व्यवहार नाकारू शकतात, खटला दाखल करण्याची आवश्यकता नाही, न्यावालवाने असे वर्तन देखील कायदेशीररित्या वैध असल्याचे म्हटले आहे. ७ ऑक्टोबर रोजीच्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की एकदा अल्पवयीन व्यक्ती प्रौवत्व प्राप्त केल्यानंतर, ते त्यांच्या पालकांच्या मालम तेच्या हस्तांतरणाला स्पष्ट आणि निर्विवाद कृतीद्वारे नाकारू शकतात, जसे की मालमत्ता स्वतः विकणे किंवा ती दुसऱ्यालाहस्तांतरित करणे, न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय व्यवहारकरता येणार नाहीके. एस. शिवष्णा विरुद्ध श्रीमती के. नीलम्मा या प्रकरणात न्यायमूर्ती पंकज मिथल आणिप्रसमा बी. वरले यांच्या खंडपीठाने हानिर्णय दिला. निकालात मलाच्या अल्पवयीन मिश्रल पासकाने व्यवहार प्रौत्रत्व प्राप्त झाल्यानंतर विशिष्ट वेळेच्या आत किंवा त्याच्या निर्विवाद अंगाबाद्वारे रह करण्यासाठी दाना दखल करून चिंता नाकारता देऊ शकतो असा निष्कर्ष सक्षितपणे वरताअल्पवयीन मुलाच्या गैसर्गिक गालकाला न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय अल्पवयीन मुलाच्या स्थावर मालमत्तेचा कोणताही भाग गहाण ठेवण्याचा, विक्री करण्याचा, भेट देण्याचा किवा अन्यथा हस्तांतरित करण्याचा किंवा अशा मालमत्तेचा कोणताही भाग पाच वषपिक्षा जास्त फालाकीसाठी किंवा प्रीडाय प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक वपषिक्षा जास्त कालावधीसाठी माडेपद्यावर देण्याचा कायदेशीर अधिकार नाहीरुद्रप्याने केलेली विक्री रद्दबातल होती आणि त्यानंतर अल्पवयीन मुलांनी केलेल्या विक्रीमु‌ळे ती वैधपणे फेटाळली गेली. तथापि, २००५ मध्ये प्रथम अपीलीय न्यायालयाने आणि २०१३ मध्ये उच्च न्यायालयाने हा निर्णय उमटवत म्हटले की, अल्पवयीन मुलांनी त्यांच्या वडिलांचा विक्री करार रह करण्यासाठी औपचारिक दावा दाखल केलेला नसल्यामुळे, व्यवहार वैध मानला जाईल. त्यानंतर शिवप्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तरतुदींचा उल्लेख करून, सर्वोच्च न्यायालयाने पुनरुच्चार केला की कोणताही नैसर्गिक पालक न्यायालयाख्या पूर्वपरवानगीशिवाय अल्पवयीन व्यक्तीची स्थावर मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही आणि अल्पवयीन व्यक्तीच्या मांगण्यावरून असा कोणताही व्यवहार र होईल. तथापि, खंडपीठाने स्पष्ट केले की असे रद करण्यायोग्य व्यवहार कसे नाकारले जावेत हे कायद्यात स्पष्ट केलेले नाही.दावणगेरे येथील शमनूर गावात ५६ आणि ५७. क्रमांकाचे दोन लगतचे भूखंड या वादात होते, में मूलतः १९७१ मध्ये रुद्रप्या नावाच्या व्यक्तीने त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांना, महारुद्रप्पा, बसवराज आणि मुंगेशण्या यांच्या नावे खोदी केले होते. जिल्हा न्यायालयानी पूर्व परवानगी म घेता, रुद्रप्पा यांनी हे भूखंड तृतीय पक्षाला विकले, भूखंड क्रमांक ५६ एस.आय. बिदारी यांना विकण्यात आला आणि नंतर बी.टी. यांनी खरेदी केला. १९८३ जयदेवम्मा यांनी खरेदीकाला अल्पवयीन मुलांनी प्रौढत्व मिळवल्यानंतर, त्यांनी आणि त्यांच्या आईन १९८९ मध्ये तोच भूखंड के. एस. शिनप्पा गांगा विकला. जयदेवम्मा यांनी मात्रकी हथापा दावा करणारा दिलाणी खटला अखेर कर्नाटकाने पेटाळून लावला, ग्यामध्ये अल्पवयीन मुलांना त्यांच्या रकाःच्या विक्रीपराहते त्यांच्या वडिलांची विक्री नाकारण्याचा अधिकार कायम ठेवला,

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीवर चाकूने हल्ला

: चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी करण्यात आले.रेखा मिसाळ व हमणंत मिसाळ हे पती-पत्नी असून रेखा या सोलापूरात राहून काम करतात तर हणमंत हा बारामती येथे राहतो. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रेखा मिसाळ या कामावरून घरासमोर आले असता त्यांचे पती हमणंत याने रेखा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्‌याने मारहाण केली. तसेच हणमंत याने त्याच्याकडील चाकू काढून रेखा हिच्या पाठीवरदुखापत करून जखमी केले.याबाबत जखमी रेखा हणमंत मि साळ (वय ५०, रा. रामलिंग नगर, विडी घरकुल, सोलापूर) या म हिलेच्या फिर्यादीवरुन पती हणमंत प्रभाकर मिसाळ (वय ५८, रा. बारामती, जि. पुणे) याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार नवले तपास करीत आहेत.

You may have missed