कोंडबावी येथे मधुमका मुल्य साखळी विकास शेतीशाळा संपन्न
कोंडबावी येथे मधुमका मुल्य साखळी विकास शेतीशाळा संपन्न !

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –आत्मा ‘ तालुका कृषि अधिकारी ‘ माळशिरस व आर्थालय फार्मर प्रोड्युसर कंपनी -कोंडबावी यांचे संयुक्त विद्यमाने कोडबावी येथे मधुमका मुल्य साखळी विकास संबंधी शेतीशाळा वर्ग -३ २३ ऑगस्ट रोजी घेण्यात आली . या शेतीशाळेला आर्थालय फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ३० एकर मधू मका पीक प्रात्यक्षिक दिलेले ३०लाभार्थी उपस्थितीत होते . रत्नाई कृषि महाविद्यालय आनंदनगर चे प्राध्यापक डॉ शिदे सर यांनी सेद्रीय रासायनिक व सुक्ष्म मुलद्रव्ये यांचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन करून शंका निरासन केले . श्री सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी मका पीक उत्पादन खर्च कमी करणे नॅनो युरिया वापर रा. खत बचत ‘ मधुमका बाजारपेठ व कंपनी साठी औजार बॅक इत्यादीची माहिती दिली . तालुका आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री कुलदिप ढेकळे यांनी जमिन तयार ते काढणी पर्यत लष्करी अळी नियंत्रण उपाय योजनांचा उहापोहे केला . श्री ढगे कृस कोंडबावी यांनी म.गा रो.ह.यो फळबाग लागवड बाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमांचे नेटके नियोजन व आयोजन व सुत्रसंचालन सौ क्षीरसागर मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सांगता चहा अल्पोहार व प्रात्यक्षिक प्लॉट प्रक्षेत्र भेट ने झाली या कार्यक्रमास आर्थालय कंपनीचे श्रीविठ्ठल कदम यांचे विशेष सहकार्य लाभले .




































