आंतरराष्ट्रीय

पिरळे येथे शिवजयंती उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवाची सुरुवात सालाबाद प्रमाणे प्रेरणा शिवज्योतनी करण्यात आली.सकाळी सहा वाजता शिंगणापूर ते पिरळे इथपर्यंत पायी चालत शिवभक्तांनी प्रेरणा शिवज्योत आणली सकाळी नऊ वाजता गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमा दरम्यान जि.प.शाळा पिरळे येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगत त्यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावचे प्रथम नागरिक संदीप सेठ नरोळे, प्रख्यात शिवव्याख्याते अजित महाराज खंडागळे व औदुंबर बुधावले,पत्रकार प्रमोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते महादेव माजी सरपंच बुराव गायकवाड,रवींद्र सूर्यवंशी भारत पवार,ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब शिंदे, शिवाजी लवटे,दत्तात्रय रुपनवर,प्रमोद डुडू, कैलास निकम, प्रल्हाद साळवे,संभाजी साळवे ,ज्ञानदेव शिंदे संतोष पाटणे जि.प.शाळा मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, ढवळे सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संदीप वाघ सर, भाऊसाहेब भिसे, संतोष जाधव,मेजर राहुल निकम,विजय जाधव,रोहित माने, हर्षल किर्दक निखिल माने सर, आजिनाथ होळकर सर,गणेश माने, सोमनाथ वाघ,राहुल माने, पप्पू काटकर,भाऊसाहेब गायकवाड, माउली जाधव,आकाश खिल्लारे यांच्यासह शिवजयंती महोत्सव समितील कार्यकर्त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब भिसे सर यांनी केले तर आभार मेजर राहुल निकम यांनी देशभक्तीपर गीत गाऊन व्यक्त केले. 

महाराष्ट्रातील प्रख्यात शिव व्याख्याते अजित महाराज खंडागळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या मनोगतातून व्यक्त करताना

एन.डी.एम.जे राज्य महासचिव अ‍ॅड.डाॅ.केवल उके यांचा महाराष्ट्र भारत विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा

प्रख्यात समाजसेवक अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ठाणे संदेश भालेरावदिनांक १६ फेब्रूवारी २०२२ रोजी एन.डी.एम.जे. संघटनेच्या मुंबई-ठाणे प्रदेश आणि ठाणे जिल्हा व कल्याण शहर कार्यकारिणीने ॲड.डॉ.केवलजी उके साहेबांचा वाढदिवस श्रीसाई हॉल, वायलेनगर कल्याण पश्चिम या ठिकाणी आयोजित केला होता.

ॲड.डॉ.केवलजी उके यांची एक वेगळी ओळख असून ते महाराष्ट्रातील एक कर्तव्यनिष्ठ व्यक्ती, संकट काळी पीडितांच्या मदतीला धाव घेणारे, गरजूंना मायेची हाक देणारे, अन्याला वाचा फोडणारे, मरेल पण अन्याय-अत्याचाराच्या घटनेत कधीही तडजोड न करणारे, कुठल्याही अमिषाला कधीही बळी न पडणारे, सर्व धर्म समभाव अशी भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे, महाराष्ट्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व, सामजिक पत्रकारितेमध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे, स्वबळावर पत्रकारांची टीम निर्माण करणारे, सोशल न्युज नेटवर्क च्या माध्यमाने सरकार ला धारेवर धरणारे कर्तव्यनिष्ठ पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव महिला बालविकास मार्गदर्शक मंत्रालाईन सदस्य तसेच आपल्या लेखणी ने भ्रष्ट अधिकारी यांची झोप मोडणारे कार्य सम्राट आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य, आपल्या कार्याने ओळखले जाणारे, मानवधर्म पाळून लोक हित जपणारे, शेकडो हृदयाचा पाठीराखा, अन्याय अत्याचार ग्रस्त व पत्रकारांच्या व वंचित समाजातील गरजु पिडीतांच्या हाकेला धाव घेणारे कायदेतज्ज्ञ, सुधारित ॲक्ट्राॅसिटी ॲक्ट २०१५ चे जनक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार, कला क्षेत्रात बदल घडवणारे कर्तव्यनिष्ठ आदर्श व्यक्तिमत्व, गरजवंतांना प्रगतीचे मार्ग धाकवणारे असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब* यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.

कल्याण पश्चिमेतील श्री साई हाॅल सभागृहात यावेळेस संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या व वाढदिवसाच्या कार्यक्रमा निमित्त नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज, नेटवर्क,बहुजन बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था ,वंचित बहुजन आघाडी नॅशनल रेल्वे यूनियन चे कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य एन .डी. एम .जे .राज्य सचिव आयु.वैभवजी गिते, न्याय विधी सल्लागार अँड बी.जी.बनसोडे, प्रसिद्ध उद्योजक मा.विनोद जाधव साहेब ऑल इंडिया एस.सी.एस. टी.रेल्वे कर्मचारी संघाचे मुंबई विभाग अध्यक्ष हेमंत जाधव साहेब, एन.डी.एम.जे. मुंबई प्रदेशचे पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष बंदिश सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष प्राध्यापक विकास चव्हाण सर, जिल्हा सचिव विनोद रोकडे, जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली एन. डी.एम.जे. जिल्हाअध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, संदीप घुसळे, संघटक कोंगळे, बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेतील कोषाध्यक्ष नथुराम मोहीते, सुरेश शिंदे, अविनाश बावस्कर, विजय निकाळे, निलेश सपकाळ, बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक कला समिती अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव, मिलिंद वानखडे व पत्रकार गायक व कवी , गौतमराजे व गणेश गायकवाड, एन.डी.एम.जे. माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजेश साळे एन.डी.एम.जे. तालुका उपाध्यक्ष माळशिरस
सुरज गायकवाड, कारूंडे शाखा अध्यक्ष तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, शहापूर तालुक्यातील अध्यक्ष प्रा.गुरुनाथ कशिवले, सचिव सागर रोकडे, प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, सहसचिव गणेश आहीरे,सतिश गवळी सामाजिक कार्यकर्ते इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रथम बद्ध वंदना घेउन आणि वाढदिवसाचा केक कापुन शाल व फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवस संपन्न झाला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, काव्य, गायन, चारोळी व प्रबोधानपर भाषने सुद्धा झालीत.

कार्यक्रमाचे औचित्य साधून एन.डी.एम. जे. संघटनेचे वार्षिक कॅलेंडर व कार्यकर्ता दैनंदिनी (डायरी) २०२२ याच प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुञसंचालक एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली अध्यक्ष अँड. प्रविण बोदडे सरांनी केले तर आभार प्रदर्शन बंदिश सोनावणे यांनी केले.

अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो. आयुष्याच्या या पायरीवर त्यांच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येवो, त्यांच्या इच्छा, आकांक्षा उंच-उंच भरारी द्यावी, यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय धार्मिक, व्यापार , कला क्षेत्रात प्रगती होवो तसेच तयांच्या कडून शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे थोर विचार समाजात रुजवावे व आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच तथागता चरणी मंगलमय सदिच्छा व्यक्त करत राज्यच न्हवे तर संपूर्ण देशातुन समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. याव्यतिरिक्त, प्रख्यात समाजसेवक अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, पुणे, ठाणे जिल्ह्यासह समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.

नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी उत्कर्षा राणी उमेश पलंगे तर उपनगराध्यक्ष पदी मालोजीराजे देशमुख

  

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- नातेपुते येथील ऐतिहासिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी उत्कर्षा राणी उमेश पलंगे तर उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली होती.या निवडणुकीत भाजपचे नेते बाबाराजे देशमुख यांच्या जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे अकरा नगरसेवक निवडून आले होते. तर माजी सरपंच बी वाय राऊत यांच्या नातेपुते विकास आघाडी पॅनलचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत तर एक अपक्ष नगरसेविका म्हणून निवडूनआले होते.जनशक्ती विकास आघाडी सर्वाधिक अकरा नगरसेवक असल्याने जनशक्ती विकास आघाडीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची बहुमताने निवड करण्यात आली.या जनशक्ती विकास आघाडीला बाबाराजे देशमुख, राजेंद्र भाऊ पाटील, मामासाहेब पांढरे, रघुनाथ कवितके,वामनराव पलंगे, चंद्रशेखर भांड यांचे मार्गदर्शन लाभले आहे सर्व एकत्रित आल्यामुळे एक हाती सत्ता येण्यास यश मिळाले आहे. नगर विकास विभागातराज्य निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पदाची सोडत काढली होती.सोडतीमध्ये नातेपुते नगरपंचायत ला  नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षित झाला होता त्यामुळे  जनशक्ती विकास आघाडीच्या उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांनी आपला नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. एकमेव अर्ज असल्याने उत्कर्षा राणी पलंगे ह्या अनुसूचित जाती प्रवर्गातून नगराध्यक्ष झाल्या. तर उपनगराध्यक्षपदी माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचे चिरंजीव युवा नेतृत्व मालोजीराजे देशमुख यांना एक मताने संधी मिळाली आज फक्त औपचारिकता म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी व नातेपुते नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर यांनी दुपारी तीन नंतर  उत्कर्षाराणी उमेश पलंगे यांची नगराध्यक्ष पदी तर उपनगराध्यक्ष पदी  मालोजीराजे शहाजीराव देशमुख यांची निवड झाल्याचे जाहीर केले.नातेपुते जन विकास आघाडी पॅनलचे नूतन नगरसेवक ॲड बी वाय राऊत व दादासाहेब उराडे यांच्यावतीने नगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.दरम्यान नातेपुते नगरीतून हलगी च्या सहाय्याने वाजवत गुलाल उधळत फटाक्यांच्या आतषबाजीत करत सर्वांची मिरवणूक काढण्यात आली.बाबाराजे देशमुख यांच्या वाड्यावर सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बाबाराजे बोलताना म्हणाले की लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे.त्यामुळे विकासाची कामे करावी लागणार आहेत.नगर विकास खात्याकडून निधी आणून प्रामुख्याने पाणी, रस्ते व अनेक सुविधांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. लोकांना सुविधा करून देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करा. नगराध्यक्ष वर्षाराणी म्हणाले की जबाबदारी स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवणार .उपनगराध्यक्ष मालोजीराजे म्हणाले की निश्चितच आमची जबाबदारी वाढली आहे आम्ही जबाबदारीने नातेपुते चा विकास करणार यावेळी मामासाहेब पांढरे,माऊली पाटील वामनराव पलंगे,नाथाजीराव देशमुख,भैय्या साहेब देशमुख अर्जुन जठार.शिवाजी राव पिसाळ, उमेश पलंगे, अमरशील देशमुख अतुल पाटील व इतर अनेक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

नूतन नगराध्यक्षा वर्षाराणी उमेश पलंगे
उपनगराध्यक्ष मालोजीराजे शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख
माजी विद्यमान सरपंच एडवोकेट बी वाय राऊत व दादासाहेब उराडे यांनी नूतन पहिले नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
आई साहेबां समवेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष

उन्हाळ्यात शेतकऱ्याने पीक संरक्षण पेपरचा वापर करावा-कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे

उन्हाळ्यात शेतकऱ्याने पीक संरक्षण पेपरचा वापर करावा-कृषी अधिकारी सतीश कचरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-उन्हाळी हंगाम सुरु झाला आहे. शेतकरी या हंगामात कमी कालावधीत अधिक उत्पन देणारी किफायतशीर भरपूर मागणी असलेले कालिगड ‘ खरबूज टरबुज काकडी या वेलवर्गीय पिकाची लागवडीची लगबग सुरु आहे . शाश्वत पाणी सोय असेल तर हलक्या वालुकामय जमिनित ही दर्जेदार उत्तम प्रतीचे भरघोष उत्पन्न कमी कालावधी मध्ये मिळते. बीया लागवड किंवा प्रोट्रे मध्ये उपलब्ध होणारी रोपे लागवड नंतर पहिले २५ दिवस ते महीना तपमानातील अति थंड अति उष्ण व तपमानातील चढउतार अतिनिल किरणे आणि सुरुवातीच्या काळातील कोवळी लुसलुसीत पाने यावर होणारा मावा थ्रीप्स जसीड . लिफ मायनर इत्यादीचा परिणाम होऊन ६० ते ८० % नुकसान होते आणि किडी नियंत्रणासाठी किटकनाशके फवारनी खर्च वाढतो . या सर्वावर प्रतिबधात्मक उपाय व किटकनाशकांचा सुरुवातीचा खर्च वाचविने ‘ विषाणुजन्य रोगाचा प्रसार रोखणे’ निसर्ग मित्रत्वाचे संबंध ‘ उष्ण व थंड लहरीपासून संरक्षण ‘रक्षण आणि दर्जेदार व भरघोष कमी खर्चाचे उत्पादनासाठी पीक सानिध्यातील कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण वाढून जोमदार पीक वाढीसाठी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला बाजारात सहज उपलब्ध असलेला संरक्षण पेपर ( प्रोटेक्शन पेपर ) वापरण्याचे अहवान सतिश कचरे मंडल कृषि अधिकारी नातेपुते यांनी केले आहे. हा कागद बाजारात कृषि निविष्ठा दुकानात ५ . २५ फुट ते ६ फुट रुंद ४०० ते १००० फुट लांब न विनलेल्या फ्रेब्रीक मध्ये जूट बॅग सारखा पारदर्शक श्वासोच्छवास पुरक ३००० ते ४००० रु प्रतिबंडल अथवा २१० रु प्रति किलो मध्ये उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे पीकाचे लागवड अंतर नुसार ३ते ४ बंडल लागतात . एकरी १० हजार पर्यत खर्च येतो खर्च व नफा विचार करता १:२ प्रमाण आहे तरी उन्हाळी हंगाम मधील कलिगड । खरबुज ठरबुज काकडी या . यांचा प्राधान्याने वापर करावा व अधिक माहितीसाठी नजीकचे कृषि सहायक पर्यवेक्षक व कार्यालयाशी संपर्क करावा अशा वाहन कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे यांनी केले आहे

नातेपुतेत मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मित्र परिवाराकडून वृक्षारोपण

नातेपुतेत मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मित्र परिवाराकडून वृक्षारोपण
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रज्ञेश कांबळे(नातेपुते प्रतिनिधी)-नातेपुते येथील कृष्णा सुनिल माळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी तसेच मित्राची आठवण म्हणून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले हा कार्यक्रम
कैं कृष्णा भैय्या माळी मित्र परिवार यांच्या वतीने देण्यात आले, यावेळी अनिकेत जावीर, गणेश माने, गणेश ठोंबरे, नितेश माने, ओंकार रूपनवर, गुरु अडगळे, चंद्रसेन साळवे, अमोल बंडगर, ओम पागे, अनिकेत सोरटे, सुरज गोरे, स्वानिल अडगळे, संजय खिलारे, विकास गायकवाड, अभिषेक कावरे, अशोक भोई, रोहीत माळी, प्रणव कुचेकर, चैतन काळे, विजय ढाळे, दुर्गेश माळी, गौरव गजाकस, प्रतिक पवार आदि मित्रपरिवार उपस्थित होते.

कराटेचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी देशपातळीवर खेळाव-बाबाराजे देशमुख


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-इंडियन जेनसेरयू कराटे दो- फेडरेशन व सोलापूर जिल्हा कराटे असोसिएशन च्या वतीने दोनदिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बोलताना बाबाराजे म्हणाले की कराटेचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी देशपातळीवर खेळून देशाचं राज्याचे व गावाचं नाव लवकिकरावं तसेच या खेळाचा उपयोग स्वर संरक्षणासाठीच करावा.नातेपुते व परिसरातील विविध क्षेत्रातील खेळाडू शरीर संपत्तीसाठी याचा वापर करतात.
तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर म्हणाले की कराटे प्रशिक्षणामुळे मुलांमध्ये धाडस निर्माण होते मुलींनी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे व संरक्षण काळाची गरज आहे. फेडरेशनचे सचिव संदीप गाडे यांनी देशपातळीवर खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळातील बारकावे सांगितले.कार्यक्रमादरम्यान खाशाबा जाधव आदर्श खेळाडू पुरस्कार मिळाल्याबद्दल पैलवान उमेश सूळ व उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार मिळाला म्हणून ऋतुजा वीरभद्र कावडे यांचा सत्कार करण्यात आला.या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमास जि.प माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,एपीआय मनोज सोनवलकर ,महाराष्ट्रात नावाजलेले कराटे प्रशिक्षक संदीप गाडे सर,विरभद्र कवडे सर, पै उमेश सुळ, डॉक्टर वैभव कवितके, प्रकाश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक सोलापूर जिल्हा कराटे असोसिएशनचे जिल्हा प्रमुख मनोज राऊत सर, कविता राऊत यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील औदुंबर बुधावले यांनी केले तरआभार काळे सर यांनी व्यक्त केले.

बहुजन बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था च्या वतीने त्याग माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -दिनांक ७\२\२०२१रोजी बहुजन बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था कल्याण पूर्व मिलिंद नगर आनंदवाडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद श्यामसुंदर रोकडे यांच्या माध्यमातून तसेच महिला आघाडी प्रमुख वंदना विजय नाईकनवरे यांच्या सहकार्याने त्याग माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदना घेऊन करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे साहेब यांनी माता रमाई जयंती निमित्त मोठ्या संख्येने सहभागी असलेल्या महिला कार्यकर्त्या व संस्थेचे सदस्य पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व माता रमाई यांच्या जिवनावर विचार मांडले त्या प्रमाणे एनडीएमजे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष संस्थेचे कायदेशीर सल्लागार अँड प्रविणजी बोदडे यांनी सुध्दा आपले विचार मांडले व सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या सांस्कृतिक कला समिती चे अध्यक्ष महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव (शहाकर) यांनी आपल्या मधुर स्वरांनी माता रमाई जिवणावर गीतं गायले त्याचं सोबत महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध गायक दिलिपनंद गायकवाड हे उपस्थित होते त्या नंतर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा यांच्या सौजन्याने महिला राज्यस्तरीय त्याग माता रमाई पुरस्कार २०२२ चे वाटप जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष नथुराम मोहिते साहेब राजेद्र भिकाजी सावंत.रविद्र यादव भामरे.विक्रम रामचंद्र जाधव.सुरेश संभाजी शिंदे.कपिल जगन्नाथ पगारे.श्रीधर निवृत्ती शिंदे. विजय रामचंद्र निकाळे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते महिला आघाडी च्या वतीने माता रमाई जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले व खीर वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला त्यासाठी प्रभाग सर्व महिला कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले वंदना विजय नाईकनवरे. रुक्मिणीबाई रोकडे.सौ दमयंती यशवंत निकाळे.सौ.अर्चना वि. रोकडे सौ.नम्रता मोहिते.सौ.अश्विनी अ.रोकडे. सौ.जनाबाई अडसुळे.कलावतीताई मौर्या.सौ.वंदना जॉन बिस्वास. कु.संध्या अ.होवाळे.कु.मयुरी न.मोहिते.हौसाबाई जाधव.जनाबाई गं.मोहिते. सौ.भारती बुकाणे.सुरेखाबाई ओव्हाळ.सौ.बॉबीताई साळवे.रूखसाना शहा.प्रिती स्व.होव्हाळे.स्वाती रा. देशनेहरे.कल्पनाबाई खरात.शितल सं.झोडगे. शांताबाई आ.हिरे.शिला प्र.पवार.सौ.सुप्रिया रा.कांबळे.सौ.वैशाली रा.खंदारे.कमळाबाई झाल्टे. शोभाबाई निकाळे.सौ.योजना श्री.झोडगे.तलोरे ताई. सुशिला सु.धुरदर.निर्मला व.निकम.सौ.प्रिया राजेश निकाळे.रमाबाई जादव.इतर सर्व तसेच कार्यक्रमांचे सुत्रसचालन संस्थेचे कोषाध्यक्ष नथुराम गंगाराम मोहिते यांनी केले व सर्वांचे आभार मानले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल डॉ.केवल उके यांनी जाहीर केला आहे. हा निकाल शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील,बाबाराजे देशमुख,मुख्य अधिकारी माधव खांडेकर व पत्रकार बांधव यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते त्याचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात आयोजित केला जाते. तसेच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक,क्रीडा, औद्योगिक,सांस्कृतिक,वैद्यकीय शासकीय,क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षक,विद्यार्थी,कर्मचारी,अधिकारी ,कलाकार यांचासुद्धा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.स्पर्धेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव,पाणी आडवा पाणी जिरवा, जलशक्ति व स्वच्छता विषय महाराष्ट्रातील अनेक शाळेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात.आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या व वनविभागाच्या माध्यमातून दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.वृक्ष लागवड केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. तसेच संविधान दिन ,15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महापुरुषांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,कपडे वाटप केले जातात. पूरग्रस्त व कोरोना काळात लोकांना अन्नधान्य देऊन मदत केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा ऑनलाइन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.विभागात या स्पर्धेमध्ये 18 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ही चित्रकला स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी ,इयत्ता पाचवी ते आठवी,इयत्ता नववी ते बारावी या तीन गटात स्पर्धा आयोजित केली होती पहिल्या गटासाठी विषय होते झाडे लावा झाडे जगवा,पाणी आडवा पाणी जिरवा. दुसऱ्या गटासाठी वैयक्तिक स्वच्छता काळाची गरज, बेटी बचाओ बेटी पाढाओ, तिसऱ्या गटासाठी संकट काळात देशाला पोलिसांचे योगदान, संकट समयी देशासाठी पत्रकार व मीडिया चे योगदान,अशाप्रकारे विषय होते.या स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्रमांक ईश्वरी कुलभूषण रोटे इ. 3 री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळा नातेपुते, विभागून सूर्यम बाबासाहेब सस्तारेइ.१ली रामदास नारायणदास विद्यामंदिर इंदापूर, *द्वितीय क्रमांक- शौर्य मोहन पवार इ.2 री एस एन डी इंटरनॅशनल स्कूल नातेपुते,आरोही हनुमंत सोनवलकर इ.१ली.जि.प.शाळा मोरोची, *तृतीय क्रमांक निलेश संजय धिंदळे इ.४थी.लोकमान्य प्रा.विद्यालय मुलुंड, स्वरा हनुमंत साळुंखे३री जि.प.प्रा मोरोची,
*दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक-तनवी प्रशांत साळुंखे.इ.७वीशारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती, तनिष्का दिनेश कुलकर्णी इ.८वी.सिंहगड सिटी स्कूल कात्रज पुणे, *द्वितीय क्रमांक- सिद्धी शिवाजी गर्जे इ.८वी. हुजुरपागा स्कूल कात्रज पुणे, भक्ती कुलभूषण रोटेइ.७वी.श्री रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय नातेपुते, *तृतीय क्रमांक – प्रणिता चंद्रकांत दणाने इ.७वी. शारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती,अक्षरा उमेश पोतदार इ.६वी चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते,
*तिसर्‍या गटात प्रथम क्रमांक- अश्विनी बाळू स्वामी इ.१०वी. हुजूर पागा स्कूल कात्रज पुणे, नवदिशा मार्तंड देवकातेइ.१२वी बा.ज दाते प्रशाला नातेपुते, द्वितीय क्रमांक- सोनाली हौसराव कोळी इ.12वी. साहेबराव फडतरे ज्युनिअर कॉलेज कळंब, पियुषा विक्रम कुमार पालवे इ.१२वी. विजयसिंह मोहिते पाटील विद्यालय अकलूज, तृतीय क्रमांक- पायल राजेंद्र गवळीइ.12वी. बा.ज दाते प्रशाला नातेपुते, अंजली आनंदराव बोराटे समता इंग्लिश स्कूल ९वी. या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.सर्व विद्यार्थ्यांचे संचालक डॉक्टर केवल उके, प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाईल लवकरच बक्षीस वितरण सोहळ्याची तारीख सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असे.ऍड डॉ.केवल उके यांनी सांगितले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करताना शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील बाबाराजे देशमुख प्रतापराव पाटील मामासाहेब पांढरे मालोजीराजे देशमुख ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर संदीप सेठ नरोळे व मान्यवर
पुरोगामी महाराष्ट्रचा ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा निकाल जाहीर करताना मुख्याधिकारी माधव कांडेकर सर्व पत्रकार बांधव
बक्षीस वितरण सोहळ्या चे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पटील
2020 राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा डॉक्टर केवल उके मा आमदार रामहरी रुपनवर मा सभापती वैष्णवी देवी वहिनीसाहेब मोहिते-पाटील व मान्यवर विद्यार्थी पालक
2019 राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा
वर्धापन दिनानिमित्त पोलीस बांधवांचा सन्मान
2021-22 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करताना माझी जिप उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे एड बी वाय राऊत एन डी एम जे राज्य सचिव वैभवजी गीते कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे पंचायत समिती सदस्य माऊली पाटील विशाल साळवे व मान्यवर
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने गरीब व गरजू मुलींना ड्रेस वाटप
वृक्षारोपण करताना पिरळे गावचे सरपंच संदीप शेठ नरोळे
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब केलेल्या कामाचे कौतुक करताना
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात मुस्लिम बांधवांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
चित्रकला स्पर्धा प्रदर्शन

रंगभरण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले यांच्याकडून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला शुभेच्छा देण्यात आल्या
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट
महात्मा फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
संभाजी ब्रिगेडचे पुरोगामी विचार रोखठोक मांडणारे श्रीमंत कोकाटे सर यांची सदिच्छा भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल संचालक डॉक्टर केवल उके साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांना अल्बम दाखवता मंत्री
वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका विधानसभा राजकुमार यांची सदिच्छा भेट
आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा व वैभव जी गीते साहेब यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले
क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य
आमच्या हितचिंतक वाचक प्रेक्षकांना दिवाळीची भेट

अमरावतीमध्ये तरुणीच्या योनी मधून स्वॅब घेतली ची धक्कादायक घटना घडली असून मे.कोर्टाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली

अमरावतीमध्ये तरुणीच्या योनी मधून स्वॅब घेतली ची  धक्कादायक घटना घडली असून मेहरबानकोर्टाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली 

अमरावतीमध्ये तरुणीच्या योनी मधून स्वॅब घेतली ची  धक्कादायक घटना घडली असून मे.कोर्टाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना अमरावतीमध्ये घडली होती. अमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेण्याचा धक्कादायक प्रकार; कोर्टाने आरोपीला सुनावली १० वर्षांची शिक्षाअमरावतीमध्ये तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याची धक्कादायक घटना दीड वर्षांपूर्वी घडली होती. अमरावतीमधील मोदी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. टेक्निशियन असणाऱ्या आरोपी अलकेशने तरुणीच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर गुप्तांगातूनही स्वॅबचे नमुने घेतल्याचा आरोप झाला होता. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान आता याप्रकरणी कोर्टानेही महत्वाचा निकाल दिला आहे.आरोपी अलकेशविरोधातील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने त्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अलकेशविरोधात बडनेरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.ऑफिसमधील सहकाऱ्याला करोनाची लागण झाल्याने २८ जुलै २०२० रोजी तरुणी करोना चाचणीसाठी गेली होती. नोकरीनिमित्ताने अमरावतीमधील आपल्या भावाकडे ती राहत होती. तिच्यासोबत इतरांचीही करोना चाचणी करण्यात आली होती. पण नंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगत तिला परत बोलावण्यात आलं.आरोपीने तरुणीला युरिनल चाचणी करावी लागेल असं सांगितलं. यावेळी तरुणीसोबत तिची महिला सहकारीदेखील होती. त्यांनी महिला कर्मचारी आहेत का ? असं विचारलं असता आरोपीने नकार दिला. यानंतर त्याने गुप्तांगातून स्वॅब घेतले आणि रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. पण अशा पद्धतीने गुप्तांगातून नमुने घेतल्याबद्दल शंका आल्याने तरुणीने आपल्या भावाला सांगितलं. यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे चौकशी केली असता त्यांनी अशा पद्धतीने नमुने घेत नसल्याचं सांगितलं. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी तपासानंतर अलकेशला बेड्या ठोकल्या होत्या.

कोल्हापूरातील जातीय अत्याचारात खून झालेल्या नऊ कुटुंबांना पेंशन मंजूर

कोल्हापूरातील जातीय अत्याचारात खून झालेल्या नऊ कुटुंबांना पेंशन मंजूर

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे यांचा एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने सन्मान

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे यांचा एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे-कोल्हापूर जिल्ह्यात २०१६ पासून आजअखेर पर्यंत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल खून प्रकरणांमध्ये एकूण नऊ प्रकरणांमध्ये प्रति महिना पाच हजार रुपये पेंशन व महागाई भत्ता देण्याचा क्रांतिकारी निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार व सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी घेतला आहे.यामुळे पीडित कुटुंबांची उपासमार व हेळसांड काही प्रमाणात का होईना थांबणार आहे.कोल्हापूरच्या इतिहासातील ही पहिलीच दुर्मीळ घटना आहे.
त्यामुळे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, सोलापूर जिल्ह्याचे नेते दत्ता कांबळे,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत,पंढरपूर तालुक्याचे नेते रोहित एकमल्ली यांनी कोल्हापूर येथील सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने महाराष्ट्रातील ४४३ खून प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबांचे शासकिय नोकरी,जमीन व पेंशन देऊन पुनर्वसन करावे म्हणून ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवजी गिते यांच्या नेतृत्वात जिल्हास्तर ते मंत्रालय स्तरापर्यंत खडतर लक्षवेधी पाठपुरावा सुरू आहे.यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा संविधानिक सनदशीर कायदेशीर मार्गांचा अवलंब करून वेगवेगळ्या पद्धतीने उपोषणे,धरणे,मोर्चे व निवेदने दिली आहेत.तसेच राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग,राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनासुद्धा साद घातली
आहे.शिवाय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एट्रोसिटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी व पीडित कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी आकस्मिकता योजना लागू करण्यासाठी संघटनेचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.त्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करून सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन सादर केले आहे.एखादा विषय हातात घेतला की तो विषय मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे हे संघटनेच्या कार्यकर्त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.काही दिवसांपूर्वी राज्य महासचिव मा.अ‍ॅड..डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात एक शिष्टमंडळ महामहीम राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटून 14 मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.२४ जानेवारी २०२२रोजी वैभव गिते व पंचशीला कुंभारकर यांनी राज्यातील सर्व खून प्रकरणात पुनर्वसन करण्याच्या मागणीसोबतच ३७ कायदेशीर मागण्यांबाबत आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या कार्यालयापुढे कडाक्याच्या थंडीत दोन दिवस रात्रंदिवस आंदोलन केले आहे.आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्याशी दोन तास झालेल्या चर्चेनंतर व लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले होते.जोपर्यंत सर्व मुद्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील असे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात नऊ कुटुंबांना पेंशन मंजूर करण्याचा निर्णय स्वागतार्ह असून इतर जिल्ह्यांमध्ये या निर्णयाचे अनुकरण केल्यास नक्कीच पीडित कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.असे ॲड.डॉ.केवलजी उके यांनी सांगितले

You may have missed