Blog

कोरोना पार्श्वभूमी अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे च्या वतीने पिरळे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते)  राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत नेशनल दलीत मोमेंत फोर जस्टाइस (एन.डी.एम.जे) महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका,व पिरळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने  पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर रुग्ण उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे, शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे. या मुळे विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत व पुरेशी रक्तदान शिबिर होत नाहीत.म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.भविष्यात रक्त तुटवड्याचे संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले होते यावर दोन महिलांसह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर  सर्व नियमांचे पालन करून  सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आले. या शिबिराचे  उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी लवटे, माजी पोलीस अधिकारी ज्ञानदेव शिंदे, संदीप शेठ नरोळे, महादेव शिंदे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रशांत खरात, सुदाम बुधावले ,व अक्षय ब्लड बँक ,डॉ.वाघमोडे ,डॉ.मोरे व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. हे  शिबिर यशस्वी होण्यासाठी पिरळे येथील युवकांनी परिश्रम घेतले. तसेच हरिदास लवटे, भारत राहुडकर, ज्ञानदेव शिंदे ,आकाश खिलारे ,मोहन शिंदे ,प्रकाश ठवरे, सुवर्णा राहुडकर ,अनिकेत लवटे ,नाथा साळवे, उदय डूडू ,दशरथ खिल्लारे ,रोहित डूडू ,संदीप नरोळे, संतोष जाधव ,राहुल खिलारे, हनुमंत बुधावले, प्रशांत खिलारे ,सचिन खिल्लारे, अमीर मुलानी ,परशुराम लांडगे ,विठ्ठल खंडागळे, दशरथ लवटे, दुर्योधन खिलारे, रुपेश साळवे, गजानन पोटे ,योगेश खिलारे ,संतोष साळवे ,सागर खिलारे ,मयुर साळवे ,अविनाश तोडकर, सुनील साळवे, बाळा बुधावले, विजय खंडागळे ,अधिक्राव यमगर, राजाराम शिंदे ,अनिल खिलारे ,संजय नरोळे, सलीम मुलानी ,उमेश जाधव, अमोल निकम, वैभव खिलारे ,चेतन खिलारे ,विशाल खिलारे ,रामचन्‍द्र राहुडकर, रमेश पांडेचेरी, शिवाजी कांबळे ,सुनील शिंदे, महादेव राहुडकर, ओमकार किर्दक ,सूरज किर्दक ,शैलेश नरोळे ,अक्षय साळवे ,पन्नालाल पैलवान, जनार्दन शिंदे ,अनिल तोडकर ,सुनील दळवी, करीम मुलानी, या रक्तदात्यांनी सामाजिक भान ठेवून देशहितासाठी रक्तदान केले या सर्व रक्ता त्याचे पंचक्रोशीत सोशल मीडियातून कौतुक होत असून यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे बोलले जात आहे.

नातेपुते येथे महिलांसह रक्तदानास उदंड प्रतिसाद


पुरोगमी महाराष्ट्र न्यु्ज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदाना मध्ये महिलांसह अनेक तरुण युवकांनी रक्तदानात सहभागी होऊन 165 लोकांनी विक्रमी रक्तदान करून देशासोबत आम्ही आहोत हे नातेपुतेकरानी दाखवून दिलेले आहे असे माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष विद्यमान सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना माहिती दिली
संपूर्ण देशामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने अनेक लोकांना यमसदनास पाठवलेले आहे काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्तदानाचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी करोना शी लढण्यासाठी जीवघेण्या आपत्तीसाठी सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते
सध्या या संचारबंदी असून 144 कलम लागू आहे यासाठी उद्घाटन वगैरे न घेता पाच पेक्षा ज्यादा माणसे एकत्र न येता हे रक्तदान शांततेमध्ये व नियोजनामध्ये पार पडलेला आहे या रक्तदान शिबिरासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते व डॉक्टर एम पी मोरे यांनी सदरच्या रक्तदानात भेट दिली त्यावेळेस त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उद्घाटनाचा कार्यक्रम टाळला आणि त्यांनी रक्तदानास सदिच्छा भेट दिली सदरच्या रक्तदानांमध्ये स्वयंस्फूर्तीने रक्तदात्यांनी देशावर महाराष्ट्रावर आलेले संकट दूर करण्याकरता आपले स्वतःचे रक्त देण्याकरता स्वयंस्फूर्तीने आलेले होते त्यामध्ये विशेष महिलांचाही सहभाग भाग मोठ्या प्रमाणात होता सदरचे रक्तदान यशस्वी करण्याकरता युवा नेते संदीप दादा ठोंबरे पंकज पिसे फत्तेसिंह राव वैभव पिसे सागर देवडे राहुल बोराटे माऊली खटावकर ज्ञानेश्वर शिंदे रुपेश भरते सुरज शेंडगे अक्षय झंजे आदी कार्यकर्त्यांसह ग्रीन आर्मी तील सदस्यांनी परिश्रम घेऊन स्वतः रक्तदान करून रक्तदानाचा उपक्रम यशस्वी केलेला आहे

* पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे ) राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत *पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे मुळे व विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत त्यामुळे पुरेशी रक्तदान शिबिर होत आहेत म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे भविष्यात रक्त तुटवड्याची संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले आहे बोलताना म्हणाले की रक्तदानामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान हे राष्ट्रहिताचे काम असून आहे तरी शक्य तेवढ्या लोकांनी रक्तदान करून एक समाजहिताचे काम आपल्या आपण घडले पाहिजे. हे रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक 27 मार्च 2020 रोजी सकाळी दहा वाजता मारुती मंदिर सभा मंडप ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. तसेच देशात स्वराज्यात कलम 144 व संचारबंदी असल्याकारणाने का वेळेस तीन ते चार लोकांचे रक्तदान घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त  पिरळे ग्रामस्थ ,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल व महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच गर्दी होऊ नये म्हणून पुढील क्रमांकांवर संपर्क साधा  पिरळे ग्रामपंचायत जवळ संपर्क पत्रकार प्रमोद शिंदे 9975903040, पोलीस पाटील औदुंबर बुधावले- + 96375 91354 सरपंच दशरथ लवटे पाटील9922524069,सुदाम बुधावले-9503993490, गणेश वाघमोडे-9049492262 गणेश दडस9960476042, प्रकाश ठावरे-96575 66395 * मोहन शिंदे.

नातेपुते येथे शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन :

नातेपुते येथे शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन : पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांनी सांगितले
संपूर्ण देशामध्ये कोरोना या विषारी व्हायरसने अनेक लोकांना यमसदनास पाठवलेले आहे काही लोक रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत अशा बिकट परिस्थितीमध्ये रक्तदानाचा तुटवडा होऊ नये यासाठी भव्य रक्तदानाचे आयोजन करून रक्तदान माझ्या देशासाठी करोना शी लढण्यासाठी जीवघेण्या आपत्तीसाठी सामाजिक बांधिलकीसाठी या उदात्त हेतूने शुक्रवार दिनांक 27/ 3 /2020 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी सभाग्रह ग्रामपंचायत कार्यालयावरती नातेपुते येथे आयोजित केलेले आहे सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 144 कलम लागू आहे त्यामुळे रक्तदात्यांनी गर्दी न करता रक्तदान करून सहकार्य करायचे आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानासाठी विशेष सहकार्य अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे राहणार आहे तरी रक्तदात्यांनी माऊली पाटील,98 90 53 94 22 मदभावी साहेब,95 27 39 36 संदिप ठोंबरे 98 90 88 79 70 श्री गाडे, साहेब 70 20 29 23 24 या नंबरची संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानाच्या वेळेमध्ये ते येऊन रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशन व व ग्रीन आर्मी नातेपुते यांच्या वतीने पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे

बँक आणि एटीएम संदर्भात ग्राहकांना दिलासा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : करोना आणि देशभरातील लॉक डाऊनची स्थिती लक्षात घेता अर्थ मंत्रालयाने ATM आणि बँक खात्यातील किमान शिल्लकी संदर्भातील नियम शिथिल करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवरील शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. 

करदात्यांना दिलासा! रिटर्न फायलिंगला मुदतवाढ

करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. पुढील काही दिवस देशात संचार बंदीची स्थिती राहणार आहे. यात बँकिंग यंत्रणा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेबाबत आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

शेअर कोसळला; इंड्सइंड बँकेचे गुंतवणूकदार पोळले

ग्राहकांसाठी किमान शिल्लकीची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यापूर्वीच भारतीय स्टेट बँकेने खात्यातील किमान शिल्लकीची अट रद्द केली होती. आता सर्वच बँकांसाठी हा नियम लागू झाला आहे. 

त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या ATM मधून अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना ३ ते ५ ATM व्यवहार निःशुल्क देण्यात येत होते. इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यास ग्राहकांना शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता करोना आणि देशभरातील लॉक डाऊनमुळे बँकिंग नियमावलीत सूट देण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांना फायदा होणार आहे. 

फोंडशिरस येथील आदित्य संतोष गोरे ची सैनिक स्कुल चंद्रपुर साठी निवड

चि आदित्य संतोष गोरे ची सैनिक स्कुल चंद्रपुर साठी निवड
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस मध्ये इ आठवी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी चि आदित्य संतोष गोरे याची सैनिक स्कूल चंद्रपुर साठी इ नववी प्रवेशासाठी निवड झाली. यामध्ये सर्व प्रवर्गातून त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. लेखी व वैद्यकीय चाचणीदवारेे त्याची निवड झाली. ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील मुलाचे सैनिक स्कूल साठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी विद्यालयाचे गणित विज्ञान शिक्षक श्री संदीप केंगार सर यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयसिंह मोहिते पाटील, संचालक श्री संग्रामसिंह मोहिते पाटील ,संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील , संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे , सहसचिव हर्षवर्धन खराडे ,शाळेचे सभापती श्री हनुमान कुंभार, उपसभापती श्री शंकर वाघमोडे ,सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ ,प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण पालकर सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

शिवामृत दूध संघास महानंदचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांची स्नेहभेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )अकलुज दि १६

  • सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या शिवामृत दूध उत्पादक संघास महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबईचे नवनिर्वाचित चेअरमन रणजीतसिंह देशमुख सह पत्नी यांनी स्नेह भेट दिली. त्यावेळी
    सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. वाहिनी साहेब यांचा सत्कार संघाचे संचालीका सौ.मगर व सौ. पिसे यांनी केला
    त्यानंतर
    शिवामृत दूध संघाच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली, तसेच महानंदा हि महाराष्ट्र ची शिखर संस्था असून महासंघा मार्फत शिवामृत सहकारी दूध संघाला मदत करण्याबाबत,महासंघा ला दूध पुरवठा करणे बाबत चर्चा झाली तसेच कमी काळात महासंघास मोठे निर्णय घेतले आहेत त्यामुळे महासंघाला तसेच सहकारी दूध संघा ना त्याचा मोट्या प्रमाणात फायदे होणार आहे. याची माहिती महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
    संघाचे संचालक श्री हरिभाऊ मगर यांनी केले यावेळी संघाचे व्हा.चेअरमन मा. ढोपे तात्या जेष्ट संचालक भिलारे भाऊ,अवताडे तात्या, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, तसेच संघाचे संचालक संजय मोरे, नवनाथ निलटे,सचिन रणनवरे,दत्तात्रय भिलारे, भीमराव साळुंखे,हनुमंत शिंदे व खाते प्रमुख उपस्थिती होते.

मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे

मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे
पुरोगामीी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– मौजे नातेपुते येथील गट नंबर 265 मधील फेरफार क्रमांक 67 10 प्रांताधिकारी यांनी अपिला मध्ये रद्द केला 2016 ला त्यानंतर 2017 मध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रांत यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले त्यानंतर 2018 मध्ये अप्पर आयुक्त पुणे यांनी िल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले वरील वरिष्ठांचे तिन्ही आदेश नातेपुते येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही उलट त्या शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले हे सर्व प्रकरण चालू असताना त्यामध्ये अनेक खरेदी-विक्री व्यवहार झालेले आहेत त्यांच्या नोंदी 67 घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे होत्या परंतु आर्थिक लालसेपोटी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्व नोंदी धरून घेतल्या त्यामुळे आज त्यांच्या समोर 67 10 रद्द करताना बाकीच्या नोंदी रद्द कराव्या लागत आहेत हे सर्व गोड बंगाल हाणून पाडण्यासाठी व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार यांवर कठोरात कठोर कारवाई तसेच दप्तर दिरंगाई अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 18 तारखेला प्रांत ऑफिस अकलूज यांच्यासमोर थाळीनाद आंदोलन करणार आहे तरी सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे अहवान मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केले आहे
चौकट = नातेपुते येथील मंडल अधिकारी व तलाठी यांचेवर गुन्हे दाखल करा दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेऊन गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आप्पासाहेब कर्चे

*माणिक उदागे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यात वैभव गीते यांचा सत्कार*

*माणिक उदागे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यात वैभव गीते यांचा सत्कार* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून चिखली पिंपरी चिंचवड पुणे येथील गावातील गावगुंडांनी माणिक उदागे या तरुणाचा जातीयद्वेषातून अपहरण करून दगडाने ठेचून हत्या केली होती त्या जातीयवद्याना 6 वर्ष    पाठपुरवठा करूनआरोपी सागर कांन्हू खंडाळे ,सतीश दत्तात्रय बाठे, निलेश हिराजी ताटे,विशाल बाळासाहेब मेमाणे, या चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी  डॉक्‍टर केवल उके  यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न केले व माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे यास नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले म्हणून माळशिरस तालुक्याच्या वतीने वैभव तानाजी गीते एन डी एम जे राज्य सचिव यांचा सत्कार विकास दादां धाईंजे यांच्या उपस्थित करण्यात आला या वेळी पत्रकार प्रमोद शिंदे, बाबासाहेब सोनवणे, फलटण येथील पारधी समाजाचे नेते शिंदे सर ,पंढरपूर येथील  मातंग समाजाचे नेते  धनाजी शिव पालक, दत्ता कांबळे ,प्रसिद्धीप्रमुख अनिरुद्ध गायकवाड ,पोलीस पाटील  संजय नवगिरे, संगीत नवगिरे , बाळासाहेब गायकवाड काका,  रवि झेंडे, नवनाथ भागवत ,गणेश गायकवाड ,नानासाहेब गायकवाड ,विशाल गायकवाड, व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कारुंडे येथील वयोवृद्ध ताई बाजीराव गायकवाड व   कुटुंबीय यांच्यावतीने वैभव गीते यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी,रवींद्र झेंडे, नवनाथ भागवत  ,अनिरुद्ध बाजीराव गायकवाड बादल भागवत  ,नाना गायकवाड, गणेश गायकवाड ,विशाल गायकवाड उपस्थित होते

मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आज दिनांक 15 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

बैठकीत महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे माजी सनदी अधिकारी श्रीयुत खोब्रागडे यांनी सविस्तर सादरीकरण करून संविधान जागृती, अंदाजपत्रकातील अनुशेष, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत मागासवर्गीय भूमिहीनांना शेतजमीन वाटप, रमाई घरकुल योजना, आरक्षणातील अनुशेष, पदोन्नतीतील आरक्षण, मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना अशा विविध विषयांवर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मते मांडली.

वसतिगृहातील प्रलंबित बांधकामांबाबत सामाजिक न्याय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून सदर कामात वेळ कसा येईल याकडे लक्ष पुरवावे असे मला प्रामुख्याने वाटते. जवळजवळ वीस लक्ष भूमिहीनांना बागायती शेतजमीन देणे सध्याच्या प्रचलित किमतीमध्ये शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत भूमिहीन कुटुंबांना उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत पावले उचलावीत असे वाटते.

मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येणे गरजेचे आहे. राज्य शासनाने त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. तसेच मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बरेचदा प्रतिकूल गोपनीय अहवाल अडचणीचे ठरतात. त्याचादेखील संबंधित विभागाने सर्वंकष आढावा घेणे गरजेचे आहे.

माझा अनुभव आहे की महिला अधिकारी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेबाबत कमी नाही. महिला अधिकाऱ्यांना पदस्थापना देताना मागासवर्गीय अधिकाऱ्यांचा देखील प्राधान्याने विचार करावा, ही व अशा काही विनम्र सूचना या बैठकीमध्ये पवार साहेबांनी केले राज्य शासनाला केल्या.

You may have missed