Blog

माळशिरस तालुका वकिल संघटनेत सचिव पदी ॲड. सुमित सावंत यांची बिनविरोध निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस (प्रतिनिधी) : माळशिरस तालुका वकिल संघटनेच्या सन 2025-26 या निवडणुकीत सचिव पदासाठी ॲड. सुमित सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, खजिनदार या पदांवर निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सचिव पदासाठी फक्त ॲड. सावंत यांचाच अर्ज दाखल झाल्याने, आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी छाननीनंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.उर्वरित सर्व पदांसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे.ॲड. सुमित सावंत हे माळशिरस तालुक्यात नामवंत वकिल म्हणून परिचित असून त्यांनी अनेक सामाजिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले आहे. ते भारत सरकारचे नोटरी म्हणूनही कार्यरत आहेत.सचिव पदी बिनविरोध झालेल्या निवडीबद्दल तालुक्यातील वकिल बांधवांसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नातेपुते येथे अजित ज्वेलर्स या सोने-चांदी दुकानाचे उद्घाटन थाटात संपन्न उद्घाटन प्रसंगी खा.धैर्यशील मोहिते- पाटील यांच्यासह आजी माजी आमदारांची उपस्थिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


नातेपुते येथे अजित ज्वेलर्स शाखा नंबर दोन या सोने-चांदी दुकानाचे उद्घाटन घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच आमदार उत्तमराव जानकर, शांताराम गिरी महाराज, बाळूमामा देवालयाचे कारभारी शिंगारे मामा, मंगू तात्या शिंगारे, बी वाय राऊत, हनुमंत सूळ,मामासाहेब पांढरे, माऊली पाटील,उपनगराध्यक्ष अतुल पाटील, डॉक्टर एम पी मोरे, मालोजीराजे देशमुख,बाळासाहेब सरगर, संजय पाटील, जि प सदस्य ऋतुजाताई मोरे, मुंबई आयुक्त मुख्याधिकारी मुंबई यांच्या पत्नी विद्याताई मोठे, चित्रादेवी देशमुख, तुकाराम देशमुख, गोल्डमॅन अक्षय अर्जुन तसेच पंचक्रोशीतील सरपंच पदाधिकारी मान्यवरांच्या यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी आमदार उत्तमराव जानकर,माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच हनुमंत सुळ यांनी मनोगत व्यक्त केले.मनोगत व्यक्त करताना मान्यवर म्हणाले की रुपनवर बंधूंनी अथक परिश्रम घेऊन जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावर नातेपुते सारख्या शहरात दोन दुकाने उभा केली. व चांगला व्यवसाय चालवला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्व मान्यवरांसाठी रुपनवर परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन,राजू रुपनवर, अजित रुपनवर महावीर रुपनवर व रुपनवर परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात सुरू झाले आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या असून चोख सोन्याची खरेदी फक्त अजित ज्वेलर्स मधूनच करा
. आमचा पत्ता दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने पिरळे येथे फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती कार्य शाळा सन 2025-26वर्ग क्रमांक एक संपन्न.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता मौजे पिरळे हनुमान मंदिर,ग्रामपंचायत पिरळे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने
फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती कार्य शाळा, सन 2025-26वर्ग क्रमांक एक आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी अमित गोरे यांनी केली, शेतीशाळेचा उद्देश, उत्पादनात येणाऱ्या अडचणी यावर चर्चा केली व याच सभेत शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.
यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी रणजीत नाळे यांनी डाळिंब पीक व्यवस्थापन पूर्व तयारी, मृदा परीक्षण, हस्त बहार व मृग बहार याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.उप कृषी अधिकारी नातेपुते एक श्री गोरख पांढरे यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजना, हवामानाचे धोके व विमा संरक्षण याविषयी माहिती दिली.
मंडल कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे यांनी सुधारित वाणांची निवड व लागवड विषयी माहिती दिली. डाळिंब जीआय मानांकन, डाळिंब निर्यात याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यानंतर उत्कृष्ट डाळिंब उत्पादक शेतकरी श्री ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर, पिरळे यांच्या प्रक्षेत्रास भेट दिली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पंढरमीसे यांनी रोप लागवडीविषयी घ्यावयाची काळजी, पावसाळ्यामधील तन व पाणी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमावेळी पिरळे गावचे सरपंच श्री अमोल शिंदे, ग्रामस्थ, बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, नातेपुते अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे साहेब, उप कृषी अधिकारी श्री गोरख पांढरे साहेब, उप कृषी अधिकारी श्री उदय साळुंखे साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी रणजीत नाळे साहेब, दत्तात्रय पांढरमिसे साहेब, नवनाथ गोरे साहेब, विश्वनाथ दुधाळ साहेब, हनुमंत खरात साहेब, दिनेश नाळे साहेब, गणेश जाधव साहेब उपस्थित होते.कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना चहा नाश्टा देण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमित गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दादा किर्दक यांनी केले.


सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

सेट परीक्षेत अमोल बाळासाहेब बंडगर यांच्या यशाबद्दल आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडून सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

(ता. माळशिरस): शिक्षण ही फक्त नोकरी मिळविण्याची साधनं नसून समाजाला दिशा देणारी, संस्कार रुजवणारी आणि व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत शिक्षक ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल बाळासाहेब बंडगर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी (SET) मध्ये यश संपादन केल्याबद्दल माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अमोल बंडगर हे विद्यार्थ्यांसाठी तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
बंडगर सरांनी जीवन विज्ञान या विषयामधून 15 जून 2025 रोजी पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र SET परीक्षेला बसले होते. 30 ऑगस्ट 2025 रोजी निकाल जाहीर झाला असता ते यशस्वी ठरले. यामुळे ते आता सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. SET परीक्षा ही UGC मान्यताप्राप्त आणि महाराष्ट्र तसेच गोवा राज्यांतील उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक असलेली अत्यंत प्रतिष्ठेची पात्रता मानली जाते.
सध्या बंडगर सर अकरावी-बारावी विज्ञान शाखेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना विषय समजावून देताना त्यांची पद्धत, संयम आणि विज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करते. “शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते ज्ञान नसून जीवन जगण्याची कला आहे,” हे ते प्रत्यक्ष अध्यापनातून विद्यार्थ्यांना पटवून देतात.
काल निकाल जाहीर झाल्यानंतर अमोल बंडगर सरांना सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित अनेकांनी त्यांचे कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे श्रीपूरसह माळशिरस तालुक्याचा अभिमान वाढला आहे.
अमोल बंडगर यांचे यश हे केवळ वैयक्तिक नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि तरुण शिक्षकांना दिशा देणारे आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती चिकाटी असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
श्रीपूर परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग त्यांच्या या यशाकडे अभिमानाने पाहत आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी आणखी उंच भरारी घ्यावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री उत्तमराव जानकर साहेब जी यांनी सत्कार पर भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी युवा नेते श्री. जीवन भैय्या जानकर आणि माळेवाडी चे माजी सरपंच श्री खंडागळे सर यांनीही शुभेच्छा दिल्या .


सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

उस्फुर्त प्रतिसादाचे प्रामाणिक फळ म्हणजे नवीन स्थापन होणारी अजित ज्वेलर्स ची दुसरी शाखा – जयंत चिंचकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


२३ सप्टेंबर २०२५ रोजी “अजित ज्वेलर्स” शाखा नंबर २ या नवीन फर्मचे उदघाटन होत आहे.त्यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांचे अजित ज्वेलर्स यांना शुभेच्छा व शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत आहे त्याचा अनुषंगाने नातेपुते येथील सुप्रसिद्ध विचारवंत सामाजिक कार्यकर्ते जयंत चिंचकर यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित ज्वेलर्स यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते म्हणतात की….   साधारणतः सहा वर्षांपूर्वी “अजित ज्वेलर्स” हे सराफी दुकान नातेपुते नगरीत सुरू झाले.दुकान निश्चितच नवे होते,पण दुकान मालकाचा या व्यवसायातील अनुभव खुप मोठा असल्याकारणाने अल्पावधीतच नातेपुतेकरांनी व आजूबाजूच्या पंचक्रोशीने “अजित ज्वेलर्स” या दुकानाला स्वीकारले,आपल्या ह्रदयात स्थान दिले.ग्राहकांच्या या उस्फूर्त प्रतिसादाचे प्रामाणिक फळ म्हणजेच नवीन स्थापन होणारी अजित ज्वेलर्सची ही दुसरी शाखा…      अजित ज्वेलर्स या दुकानाचे मालक श्री.अजित रूपनवर हे साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले एक साधे राहाणीमान असलेले व्यक्तिमत्त्व..! सुमारे २४ वर्ष दुसर्‍याच्या दुकानात काम करून आज सहा वर्ष झाले स्वतःचा स्वतंत्र सराफी व्यवसाय मोठ्या नेटाने निर्माण केला.     मुळातच “प्रामाणिकतेचा दागिना” परिधान करून वावरणाऱ्या अजित रूपनवर यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासी तेजच त्यांच्या यशोगाथेतीची महती सांगते. आजही एकत्र कुटुंब हीच खरी अजित रूपनवर यांच्या व्यवसायाच्या यशोगाथेतेची खरी ताकद आहे.तीन भाऊ आजही एकत्र, एका मनाने,मताने झोकून देऊन व्यवसाय करतात.तिघेही अतिशय प्रामाणिक, प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले…यांच्या दुकानातील प्रत्येक दागिना यांच्या अंगी असणाऱ्या प्रामाणिकतेच्या कोंदणातून झळाळून आपली एक वेगळीच झळाळी प्राप्त करतोय.आज विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजेच “अजित ज्वेलर्स”हे नातेपुतेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्याचेच द्योतक म्हणजे येत्या २३ सप्टेंबर रोजी रूपनवर बंधु आपली “अजित ज्वेलर्स”ही दुसरी शाखा नातेपुतेकरांच्या सेवेसाठी सुरू करत आहेत.    येत्या २३ सप्टेंबर रोजी या “अजित ज्वेलर्स”शाखा नंबर २ ला भेट देऊन, रूपनवर बंधूंना आपला पाहुणचार करण्याची संधी द्या….  “प्रामाणिकतेचे तेज,अजित ज्वेलर्सच्या प्रत्येक दागिन्यात झळाळून दिसते”.


सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉

गावठी पिस्तूल कमरेला घेऊन फिरणाऱ्या एकास नातेपुते पोलिसांकडून अटक

(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते)

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतःजवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ कारवाई केली. दि. 20/09/2025 रोजी पहाटे 03.25 वाजता मौजे मांडवे, ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले.तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके व स.पो.नि. श्री. संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील एएसआय श्रीकांत निकम, पोलीस नाईक राकेश लोहार, व पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली.

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद दीड वर्षात तीन कार्यकर्त्यांना वाटून देणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

मुंबई दि.28 – रिपब्लिकन पक्षाला राज्यात एक राज्यमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. सरकारच्या उरलेल्या दीड वर्षांच्या काळात रिपाइंला मिळणारे मंत्रिपद सहा सहा महिन्यांसाठी तीन कार्यकर्त्याना वाटून देण्यात येईल अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.रिपब्लिकन पक्षाला एकही विधानपरिषद सदस्यत्व मिळालेले नाही.त्यामुळे रिपाइं च्या कार्यकर्त्याला राज्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर त्यास 6 महिन्यांच्या कालावधीत विधिमंडळाचे सदस्यत्व मिळणे आवश्यक आहे. ते न मिळाल्यास आपोआप राज्यमंत्रीपद त्यास सोडावे लागेल. त्यामुळे जरी विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य नसले तरी रिपाइंचा कार्यकर्ता 6 महिन्यांसाठी राज्यमंत्री होऊ शकतो त्यामुळे सहा महिन्यांचे राज्यमंत्रीपद प्रत्येक कार्यकर्त्याला देऊन दीड वर्षांच्या काळात तीन कार्यकर्त्यांना प्रत्येकी 6 महिन्यांसाठी राज्यमंत्रीपद देता येईल असा प्रस्ताव ना रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. शिवसेना भाजप यांच्यातील वादातीत महामंडळ आणि मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा तेंव्हा होऊ द्या मात्र रिपब्लिकन पक्षाला काबुल केलेले एका राज्यमंत्रीपदाचा शपथविधी त्वरीत घेऊन टाकावा यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. सेना भाजप च्या वादात साडे तीन वर्षे होऊन गेली तरी महामंडळाचे वाटप झाले नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे महामंडळांच्या नियुक्त्यांची वाट पाहत आहेत.त्यामुळे फार दिरंगाई झाली असून अजून वेळ दवडण्या पेक्षा कार्यकर्त्यांसाठी लवकरच महामंडळांचे वाटप करावे या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.
अट्रोसिटी कायदा आता अधिक मजबूत केला असून राष्ट्रपतींकडे मंजुरी साठी विधेयक पाठविण्यात आले आहे. तसेच पदोन्नती मध्ये एस सी एस टी साठी आरक्षणाचा कायदा संसदेच्या येत्या हिवाळी करण्यात येणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

मुंबई हापालिकेतील अनुसूचित जाती जमातीच्या रिक्त पदांचा आढावा यावेळी घेऊन नोकरीमधील एस सी एस टी चा अनुशेष भरण्याबाबत विशेष मोहीम हाती घेण्याची सूचना ना रामदास आठवले यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच अट्रोसिटी कायद्यातील प्रकरणांचा आढावा यावेळी ना रामदास आठवलेंनी घेतला. अत्याचार प्रकरणात अनुसूचित जाती जमाती च्या पीडिताचा खून झालेला असल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी एकास शासकीय नोकरी देण्याचे निर्देश असून जोपर्यंत नोकरी दिली जात नाही तोपर्यंत मासिक 3 हजार पेंशन पीडिताला दिली जाते. ती रक्कम तुटपुंजी असून त्यात वाढ करून 5 हजार करण्याबाबत चे निर्देश ना रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना केले असून त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची आपण भेट घेणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

         

कळंबोली येथील मातंग समाजातील संदिपान खिलारे यांचा ग्रामपंचायत कर्मचारी ते वैद्यकीय पदवी पर्यंतचा खडतर प्रवास

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे

ग्रामपंचायत कळंबोली येथे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून गेले दहा वर्ष सेवा बजावत असलेले मागासवर्गीय मातंग समाजातील संदिपान शिवाजी खिलारे यांनी ‘निसर्गोपचार तज्ञ’ व ‘योग व पारंपरिक वैद्य’ या दोन वैद्यकीय पदव्या मिळवून एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.           संदिपान शिवाजी खिलारे यांनी हे यश केंद्र शासन आयुष मंत्रालयाच्या ‘योग व पारंपरिक वैद्य’ या अभ्यासक्रमाची वैद्यकीय पदवी परीक्षा व सातारा येथील मिटकॉन या शासनमान्य प्राप्त संस्थेतून शरीरशास्त्रातील ‘निसर्गोपचार तज्ञ’ या एक वर्षाच्या कोर्सची परीक्षा सुद्धा ते अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत असताना, कळंबोलीसह परिसरातील गावातील गरीब गरजू रुग्णांना आरोग्यविषयक योग्य सल्ला देणे, रात्री बे रात्री गंभीर रुग्णांना योग्य हॉस्पिटलला दाखल करणे, कॅन्सरग्रस्त रुग्णांना बार्शी व इतर रुग्णांलयात दाखल करून मोफत उपचार कसे होतील ? याचा प्रयत्न करणे यासारख्या  रुग्णसेवा ते करत आहेत.            रुग्णसेवा करता करता वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवणे ही कामगिरी आजच्या तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. तसेच जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षण घेणे,नवीन स्वप्न पूर्ण करण्यास वय व काळाचे बंधन नसते हे त्यांनी आपल्या प्रयत्नातून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशाचे समाजाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

शिक्षण हे आजकालच्या प्रत्येक गोष्टीवरील प्रभावी लस आहे -डॉ.एम के इनामदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

 पिरळे ता.माळशिरस येथील समता माध्यमिक विद्यालय येथे 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शिक्षण हे आज कालच्या प्रत्येक गोष्टीवरील प्रभावी लस आहे आणि ही शिक्षणाची लस प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे.आपण शिक्षण घेतले तर प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो.तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागात तुम्हाला चांगल्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीच आपण सोनं केलं पाहिजे.पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडून दिलं पाहिजे. प्रत्येक व्यवसाय आपल्या आवडीने करायला हवा. सध्या कम्प्युटर युग आहे प्रत्येक विद्यार्थ्याने कम्प्युटर प्रशिक्षण घ्यायला हवं. विद्यार्थ्यांनी एकमेकांबद्दल आदर बाळगला पाहिजे तसेच देशाच्या संविधाना बद्दल आदर असला पाहिजे.46 वर्षाच्या कारकिर्दीत ग्रामीण भागात पहिल्यांदाच एवढी चांगली प्रात्यक्षिक समता माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून पाहायला मिळाली,अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम भोसले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की खेड्यापाड्यातील गावकुसातील मुलांना समता माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळत आहे . क्षणा शिवाय पर्याय नाही. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजा रोहनाने करण्यात आली. यावेळी  एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन, धनुर विद्या, लाठी काठी, रायफल शूटिंग, फायर फायटिंग, चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर केली.ओपन जीपमधून शाळेच्या मैदानात मधून डॉक्टर इनामदार यांनी संचलन पाहणी केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले. यावेळी डॉक्टर इनामदार यांना संस्थेच्या वतीने देव माणूस काळजीचे प्रतीक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच संस्थेच्या सभापती पदी प्रमोद काका डूडू यांची निवड झाल्याबद्दल व  महावितरणच्या जिल्हा समन्वयक पदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल दत्तात्रेय रुपनवर यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे  संचालक जब्बर शिंदे, दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष दासाहेब शिंदे सर, कांतीलाल माने, मा.सरपंच ज्ञानदेव शिंदे साहेब, संदीप शेठ नरोळे, काशिनाथ दडस,पोलीस पाटील औदुंबर बुधावले, सरपंच बाळासाहेब शिंदे,संस्थेचे चेअरमन महादेवजी शिंदे,गणेश दडस, दत्तात्रेय लवटे,किशोर मसुगडे, पत्रकार प्रमोद शिंदे,हरिभाऊ लवटे,मनोज डूड्ड,तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ,पालक विद्यार्थी शिक्षक स्टाफ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य दीपक शिंदे सर,दादासाहेब शिंदे सर,सर्व संचालक यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

जगातील सगळ्यात मोठं शिक्षण म्हणजे आई आणि बाप -वसंत हंकारे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क  – प्रमोद शिंदे-
जगातील सगळ्यात पहिलं मोठं शिक्षण आणि विद्यापीठ म्हणजे आई आणि बाप आई आणि बाप हेच आपले पहिले गुरू आहेत.अशा प्रकारचे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी सोलापूर जिल्हा परिषदचे माजी जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त वसंत हंकारे यांचा व्याख्यान व गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कै.नानासाहेब देशमुख, शंकररावजी मोहिते- पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन बाबाराजे देशमुख, वसंत हंकारे व इतर मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे बोलताना म्हणाले की मला गुरु शोधण्यासाठी बाहेर जायची गरज लागली नाही दादांच्या रूपाने मला घरामध्येच गुरु मिळाला. दादांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. रॉयल जीवन कसं जगायचं दादांनी शिकवलं. दादांसोबत राजकारणापलीकडे अनेक लोकांनी नातं जोडला आहे. पंचभक्कम केला तर आपल्या इतर ठिकाणी बर करत नाहीत अशी शिकवण दादांनी दिली. दादांनी शेतीवर खूप प्रेम केले आहे. तसेच बाबाराजे देशमुख यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त न समजलेले आईबाप याविषयी व्याख्यान देताना वसंत हंकारे यांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थी व उपस्थित त्यांना व्याख्याने द्वारे भावनिक केले.आई आणि बाप या विषयी अनेक दाखले देत आई वडिलांचे जीवनातील महत्त्व सांगितली.ते म्हणाले की जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा आई ,बाप गेले की भिंतीवरचा बाप आणि आई परत येत नाहीत. लाखो करोडो रुपयांचा परत उपयोग नसतो. तुमचा एकच देव असायला पाहिजे आई आणि बाप. मुलींनी आपल्या डोळ्यातील अश्रूंना ताकद बनवले पाहिजे, मुलांनी बापासाठी व्यसन न करण्याची शपथ घ्यावी डोळ्यातील अश्रूंना परिवर्तनात बदलले पाहिजे. अशाप्रकारे हंकारे यांनी न समजलेले आई आणि बाप याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाबाराजे उर्फ शहाजीराजे देशमुख,माजी वैद्यकीय अधिकारी एमपी मोरे, मचाले सर ,मा.सरपंच बी.वाय राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, ए.पी.आय महारुद्र परजणे,धैर्यशील भाऊ देशमुख, बाहुबली शेठ चनकेश्वरा,नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, माऊली पाटील, शक्ती पलंगे, एडवोकेट शिवाजीराव पिसाळ, महेश शेटे, अडवोकेट रणवीर देशमुख ,संतोष काळे, मा सरपंच संदीप नरोळे, महादजी शिंदे, डॉ. विठ्ठल कवितके, डॉ.नरेंद्र कवितके,तसेच नगरपंचायत चे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते पालक शिक्षक स्टाफ व विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed