Blog

भंडारा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीची केंद्रीय पथकाकडून चौकशी करा….लोकप्रिय नेते वैभव गिते

राज्यशासनाने प्रत्येक कुटुंबास 25 लाख रुपये मदत करावी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात शिशु मृत्युमुखी पडली आहेत.ही घटना हृदयाला पीळ घालणारी असून याची केंद्रीय पथकाकडून चौकशी झाली पाहिजे.केंद्रीय पथकाने केरळ किंवा कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांकरवी तपास करावा.राज्यशासनाने प्रत्येक कुटुंबास 25 लाखाची तातडीची मदत द्यावी.फक्त फायर ऑडिट न करता महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळतात का?महात्मा फुले जण आरोग्य योजनेची अंमलबजावणी होते किंवा नाही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये मिळणारे उपचार मोफत व योग्य प्रकारे मिळतात का? रुग्णांकडून पैशाची लूट होते का? याचे सुद्धा संपूर्ण ऑडिट झाले पाहिजे.तसेच धर्मादाय अंतर्गत नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये दहा टक्के खाटा राखीव असतात परंतु या दहा टक्के राखीव खाटांवर गोरगरिबांना मोफत उपचार मिळतात का? प्रत्येक जिल्ह्याचे शल्यचिकित्सक या योजनांच्या अंमलबजावणीचे अध्यक्ष असतात ते नियमितपणे बैठका घेतात का? हे सर्व प्रश्न भंडारा जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयाच्या इमारतीस लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या निमित्ताने ऐरणीवर आले आहेत.त्यामुळे सरकारने फक्त फायर ऑडिट करून वरवरची मलमपट्टी करू नये व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाच लाख रुपयांची घोषणा करून हात वर करू नये मार्च 2013 रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या बारामतीच्या कुटुंबास 15 लाख रुपये मदत त्यावेळी दिली होती मग भंडारा दुर्घटनेत फक्त पाच लाखाची तुटपुंज्या मदतीची घोषणा करता हा भेदभाव का करता?असा सवाल राज्यशासनास लोकप्रिय नेते वैभवजी गिते यांनी केला आहे.सत्ताधार्यांनी,विरोधी पक्षांनी व संघटनांनी या दुर्घटनेचे राजकारण न करता या विषई माणुसकीच्या दृष्टकोणातून पाहिले पाहिजे इच्छाशक्तीचा वापर करून गंजलेली व बुरसटलेली तसेच भ्रष्टाचाराने बरबटलेली आरोग्य व्यवस्था सामान्य गोरगरिबांसाठी सुरळीत करावी असे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते,राज्य समनवयक रमाताई आहिरे,सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,महिला संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य उपाध्यक्ष शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे,राज्य सहसंघटक दिलीप आदमाणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यासाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने


अतिक्रमणे नियमित होत नसतील तर तहसीलदारांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही….विकास धाइंजे
घरकुले बांधायला शासकीय जागा दिली नाही तर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार…..वैभव गिते
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -सन 2020-21 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत “महा आवास अभियान ग्रामीण” राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,आवास योजना पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व इतर या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करनेसंदर्भात ज्या शासकीय,गावठाण, गायरान,शेती महामंडळ, व इतर जागेतील जागा व घरे नियमाकुल करण्याच्या संदर्भात तालुका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे पाऊल अथवा कार्यवाही केली नाही त्यामुळे शासन निर्णयांची व शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे अनेक जाती धर्मातील गोरगरीब घरकुल लाभार्थी हक्काच्या घरापासून व जागा व घरे नियमानूकुल होण्यापासून वंचित आहेत.
माळशिरस यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे 2011 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणाऱ्या लोकांच्या नोंदी नमुना नंबर आठ ला नोंदी घेतलेल्या नाहीत.ग्रामसेवकांनी आर्थिक तडजोडी करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व चुकीची दिशाभूल करणारा अहवाल ऑनलाईन पंचायत समितीस व तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयास पाठवला आहे.(उदा.नातेपुते,कुरबावी),नव्याने तालुक्यातील सर्व गावांचा फेरसर्वे करावा.सर्व नोंदी कायदेशीर घेण्यात याव्यात.कुणावरही अन्याय होणार नाही कोणीही या सर्व लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
मा.उपविभागीय अधिकारी (प्रांत) अकलूज यांनी दिनांक 20 मार्च 2020 रोजी तहसीलदार यांना शासकीय जागेतील अतिक्रमणे कायम करणेबाबत शासन निर्णय व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कार्यवाही करावी असे पत्र पाठवले आहे तसेच दिनांक 14/9/2020 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी मा.उपविभागीय अधिकारी (प्रांत)अकलूज याना शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानूकुल करण्यासाठी पत्र पाठवले आहे.तरीसुद्धा माळशिरस तहसील,पंचायत समीती या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना अहवाल मागितला आहे परंतु आजअखेर ग्रामसेवकांचा अहवाल आलेला नाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कार्यवाही करावी.सर्व संबंधित विभागांची व संघटनेच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी
तरी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास VBयोजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास ग्रामीण राबवून सर्व शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानुकूल न केल्याने व घरकुल साठी शासकीय जागा न दिल्याने माळशिरस जि.सोलापूर या तहसील कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी प्रास्तविक करताना विकास दादा धाइंजे यांनी सर्व शासननिर्णय शासनाचे धोरण पंचायत समिती व तहसीलदार यांनी आजपर्यंत केकेल्या कामकाजाचा चुकारपणाचा पाढा जनतेपुढे मांडला व एक महिन्यात सर्व अतिक्रमणे नियमित न केल्यास माळशिरस तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी माळशिरस तालुक्यातील 108 गावांमध्ये अनेक जाती-धर्माच्या नागरिकांना घरकुले मंजूर आहेत परंतु त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्याने घरकुले माघारी जात आहेत.शासनाने ज्यांना घरकुलांसाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासकीय गायरान गावठाण व इतर जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत तरीसुद्धा तालुका प्रशासन जाणून-बुजून लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देत नाही म्हणून प्रशासनाचा निषेध केला ताबडतोब घरकुलांसाठी जागा न दिल्यास माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधण्याचा इशारा यावेळी वैभव गिते यांनी दिला.सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे यांनी नातेपुते पश्‍चिम भागातील सर्व अतिक्रमणे नियमित करावेत अशी मागणी केली. माळशिरस शहराचे माजी अध्यक्ष यांनी मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला डॉ.कुमार लोंढे यांनी तहसीलदार यांचा कडक शब्दात निषेध नोंदवला.उपस्थित जनसमुदायामधील प्रशासनाच्या प्रति रोष व निदर्शनाची तीव्रता लक्षात घेऊन माळशिरस तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी जनसमुदायासमोर घेऊन तात्काळ संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती,अधीक्षक भूमिअभिलेख, तहसील या विभागांची बैठक घेऊन हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाईंजे व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.यावेळी प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे,प्रशांत खरात,रणजित धाइंजे, रणजित सातपुते,दयानंद धाइंजे,संघर्ष सोरटे,रजनीश बनसोडे व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांसह माळशिरस तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थि
त होते.

नातेपुते येथील ज्ञानदीप इन्स्टिट्यूट पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पत्रकारांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते येथील ज्ञानदीप इन्स्टिट्यूट आयटीआय व पॅरामेडिकल कॉलेजमध्ये पत्रकार दिनानिमित्त संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच कॉलेजमध्ये नव्याने विविध ट्रेड साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज भूषण नानासाहेब देशमुख( एस एन डी )इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य संदीप पानसरे व प्रशासकीय अधिकारी शकूर पटेल सर हे होते.तसेच सत्कार मूर्ती म्हणून नातेपुते येथील पत्रकार बांधव उपस्थित होते प्राचार्य संदीप पानसरे व प्रशासकीय अधिकारी शकूर पटेल,आंबेडकरी चळवळीचे नेते पत्रकार एन.के.साळवे,ज्येष्ठ पत्रकार लतीफ भाई नदाफ, प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर  मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पत्रकार अभिमन्यू आठवले,श्रीकांत बाविस्कर,आनंदकुमार लोंढे, मनोज राऊत, विलास भोसले,सचिन रणदिवे, संचालक हनुमंत माने विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.र्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष एम.डी.ढोबळे सर व सी.डी ढोबळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

नातेपुते येथील पै.अक्षय भांड परिवाराच्यावतीने पत्रकारांचा सन्मान *


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते येथील  राष्ट्रवादीचे युव नेतृत्व पैलवान  अक्षय भांड  व आप्पासाहेब भांड यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार लतीफ भाई एन के साळवे यांनी मनोगत व्यक्त केले  तसेच आभार व्यक्त करताना अक्षय भांड  म्हणाले की झ्या प्रत्येक घडामोडी मध्ये पत्रकार बंधूंचे मार्गदर्शन मला लाभते व योग्य वेळी मला योग्य मार्ग दाखवण्याचे काम हे पत्रकार बंधू मला करत असतात त्यामुळे त्यांच्या बद्दल मला नेहमीच आपले पणा वाटतो. तसेच यावेळी पत्रकार  श्रीकांत बाविस्कर आनंदकुमार लोंढे,मनोज राऊत,प्रमोद शिंदे,विलास भोसले, प्रशांत खरात ,हनुमंत माने, सचिन रणदिवे, तसेच रियाज शेख,दादा अटक,राजन चैघुले,संकेत लाळगे,विकी तारळकर,गणेश कुंभार,रवी वाघमारे व माझे सहकारी उपस्थित होते.

गोंदवलेच्या वनराईला ठाण्याच्या इंजिनाने पाणी..

..

नववर्षाची भेट, रोहित-रक्षिता भावंडांसाठी 51 हजारांची मोठी मदत
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे :
गोंदवले खुर्द येथील भावंडांनी पर्यावरण रक्षणासाठी डोक्यावरुन पाणी नेऊन वनराई फुलविली. झाडे मोठी झाल्याने त्यांना डोक्यावरून पाणी नेलेलं पुरेना, याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे येथील श्री स्वामी समर्थ ट्रस्ट चे महेश कदम यांनी या भावंडांना तब्बल 51 हजार रुपयांची डिझेल इंजिन, पाईप देऊन नववर्षाची भेट दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, गोंदवले खुर्द ची भावंडे रोहित बनसोडे व रक्षिता बनसोडे ही गेल्या तीन वर्षांपासून अखंडितपणे माणदेशी दुष्काळी भागात पर्यावरण रक्षणासाठी झुंज देत आहेत.

बोडक्या माळरानावर त्यांनी हजारो झाडांची वनराई साकारली आहे. झाडे लहान असताना पाणी डोक्यावर वाहून ती जगविली, पण आता झाडे भरपूर प्रमाणात लावल्याने त्यांना पाणी घालणे कठीण जात होते. ताकदीच्या आवाक्याबाहेर पाणी घातले जात होते. ही बाब लेखक अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून महेश कदम यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी डिझेल इंजिन आणि पाईपलाईन घेण्यासाठी ही यंत्रसामग्री देऊन रोहित-रक्षिताला अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नववर्षाचा मुहूर्त साधला
गोंदवले येथील रोहित आणि रक्षिता या भावंडांनी केलेल्या कामाची माहिती घेण्यासाठी महेश कदम यांनी नववर्षाचा मुहूर्त साधला. दोघांनी कष्टाने उभा केलेल्या वनराईत वेळ व्यतीत केल्यानंतर त्यांनी या दोघांनाही कायमस्वरूपी मदत करण्याचे आश्वासन दिले. वनराई फुलवण्याचं या दोन्ही भावंडांचे काम इतरांसाठी मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे, असे कदम म्हणाले.

माणदेशी मातीसाठी इथल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही झाडे लावून जगवत होतो. गेल्या तीन वर्षापासून आम्ही ज्या यातना, कळा सोसल्या त्या कदम यांच्या दातृत्वाने भरून पावलं आहे. भविष्यातही हिरवाई स्वप्न निरंतर ठेवू. – रक्षिता बनसोडे गोंदवले

रस्ते भरण्यासाठी पीडब्ल्यूडी कडून लाव लीजाव टमकी बजाव अधिकार्‍यांकडून टक्केवारी साठी च टेंडर?

पिरळे नातेपुते रस्त्यावर अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरण्याचे काम


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)- माळशिरस तालुक्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्या मध्ये खड्डे झाले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील रस्त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पीडब्ल्यूडी कडून रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे.परंतु ते काम नाम मात्र होत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते भरण्याचं काम “लाव लीजाव टमकी की बजाव” अशा पद्धतीने होत आहे. ग्रामस्थांकडून सवाल केला जात आहे की अधिकारी हे फक्त टक्केवारीसाठी टेंडर काढतात का? असे पण आरोप केले जातात अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांचे लागेबांधे आहेत त्यामुळे अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार, ठेकेदार,कशा पद्धतीने काम करतात हे पाहिले जात नाही व डोळेझाक पणे बिले काढले जातात. सध्या पिरळे नातेपुते रस्ता अतिशय खराब झाला असून तेथील थोडीफार खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आला आहे.परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्या आहे.खड्ड्यांमध्ये डांबर वापरले गेले नाही नुसतेच खडी टाकली आहे. या रस्त्याने जास्त वर्दळ आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत सायकल वरून ये-जा करतात असतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खड्डे व्यवस्थित बुजवण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास पीडब्ल्यूडी अधिकारीच जबाबदार असणार आहेत.

पिरळे रस्त्याची दुरावस्था

श्री रमण शेठ ढवळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी).- नातेपुते येथील किशोर प्रिंटिंग प्रेस चे मालक किशोर ढवळे यांचे वडील नातेपुते येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व श्री रमण सेठ कृष्णा ढवळे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. दुःख निधना वेळी त्यांचे वय 75 वर्ष होते. घरची परिस्थिती हलाखीची असताना परिस्थितीवर मात करत  त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून  फलटण येथे दुसऱ्यांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये  काम करत नातेपुते येथे 1968 साल नातेपुते येथील पहिली स्वतःची प्रिंटिंग प्रेस सुरू केली त्यांनी सुरू केलेल्या प्रिंटिंग प्रेस ला  आज 53 वर्षे पूर्ण झाले आहेत. लोक त्यांना आवडीने रमण सेठ असे म्हणत सर्वच जाती धर्मातील लोकांचे त्यांचे आपुलकीचे संबंध होते. त्यांचाच वारसा जपत त्यांचे चिरंजीव किशोर ढवळे प्रिंटिंग प्रेस चालवत आहेतत्यांच्या जाण्याने नातेपुते परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून चार मुली नातवंडं असा परिवार आहेपुरोगामी महाराष्ट्र न्यूज भावपूर्ण श्रद्धांजली

मुद्रा ग्रुपच्या वतीने वारू गडाची स्वच्छता

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- मुद्रा ग्रुपने वारूगड येथे जाऊन गडाची स्वच्छता मोहीम राबवली. नातेपुते -फलटण-गिरवी मार्गे ट्रेकिंग साठी 10 तरुणाचा समूह गेला होता. गडकिल्ले आपण कसे स्वच्छ ठेवावे व त्यांचे कसे संवर्धन करावे हा संदेश यांच्या तर्फे लोकांपर्यंत पोहचवला. गडावरील विहीर स्वछता, प्लास्टिक कचरा, गुटखा पुडया अशा सुमारे 12 ते 15 बैग गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. आजचा तरुण गढ़ किल्ल्यावर जावून गुटखा खातो ही सर्वात वाईट गोष्ट निदर्शनास आली. आज मुद्रा ग्रुप चा हा पहिला ट्रेक होता. या मोहीमेमध्ये प्रा. शिवशंकर पांढरे सर, सतीश सावंत सर,सनी देशमुख,किरण तोरणे, शुभम शेंडे,तुषार निकम ,सागर शिंदे,प्रतीक बडवे, विनायक बडवे,तसेच मुद्रा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष स्वप्नील जाधव हे होते! गढ़ किल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे, त्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे. ट्रेकिंग ने मन व शरीर तंदुरुस्त होते. तरुणांनी राजकारण, व्यसन अशा गोष्टीसाठी एकत्र न येता विधायाक कामासाठी एकत्र यावे. त्याचबरोबर थोड़ा वेळ देवून किल्ले स्वछ करण्याचे आवाहन ग्रूपचे मार्गदर्शक प्रा. शिवशंकर पांढरे यांनी केले. स्वप्निल जाधव यांचा ग्रुप महाराष्ट्रात कार्यरत आहे त्यांनी असे विधायक उपक्रम राबवून आपले कार्य वाढवावे अशा शुभेच्या दिल्या.

जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या 8 तासात मुसक्या आवळल्या वालचंद नगर पोलिसांची कामगिरी

जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या 8 तासात मुसक्या आवळल्या वालचंद नगर पोलिसांची कामगिरी सोबत पोलिस अधिकारी दिलीप पवार व कर्मचारी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)-जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या वालचंद नगर पोलिसांनी आठ तासात मुसक्या आवळून जेरबंद केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 23/12/ 2020 रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान मौजे आनंदनगर, इंदापूर.जि.पुणे येथील जनाबाई मंगल कार्यालयाबाहेर फिर्यादी उदय गणपत देशमुख यांच्या पत्नी उज्वला देशमुख रा.आनंदनगर ता. इंदापूर या जनाबाई मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबलेल्या असताना अचानकपणे एक मोटर सायकल वरून आलेले दोन अनोळखी इसम सौ.मंगल देशमुख यांचे गळ्यातील सोन्याचा गळ्यातील गंठण 80 ग्रॅम वजनाचा तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा तो सोन्याचा गंठण दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसका मारून तोडून चोरून नेला होता. सदर बाबत वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.527/2020 भा.द.वि.कलम 392/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिमान देशमुख यांनी गुन्हा तात्काळ उघड करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी चक्र फिरवत इसम नामे शुभम आनंद किर्ते वय 24 वर्ष रा.आनंद इंदापूर ,जित बापू भोसले वय 24 रा. आनंदनगर, इंदापूर, या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरी झालेले फिर्यादीचे सोन्याचे 80 ग्रॅम वजनाचे तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे गंठण गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,70000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती, उपविभागीय अधिकारी नारायण शीरगावकर बारामती, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार मोहन ठोंबरे,पोलीस नाईक,लक्ष्मण साळवे, पोलीस शिपाई जगन्नाथ कळसाईत,यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आठ तासात चोरट्यांना बेड्या ठोकल्यामुळे परिसरात वालचंदनग पोलिसांचे व अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने साहेब यांनी घेतली धाव कंपने मालकाच्या मुजोरपणामुळे उपोषण कर्त्यांची तब्येत खालावली , उपचारास कामगारांचा नकार.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव_ ठाणेमुरबाड, धानिवली येथील मे. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लि._ कंपनीने पॉवर प्लँट अचानक बंद केल्याने ६० ते ७० स्थानिक कामगारांवर बेकारीची कुह्राड कोसळली आहे. हा पाॅवर प्लँट सुरू करतांना कंपनी व्यवस्थापनाने धानिवली गाव बचाव संघर्ष सिमित सोबत अटी शर्तींच्या अधिन करार केला होता . मात्र या कराराला बारा वर्षांनी फाट्यावर मारुन, कोरोना कालावधीतल्या लॉकडाऊनची वेळ साधून अचानक हे पाऊल उच्चल्याने या कामगारांना कामावर घेण्याच्या मागणी साठि गेट समोर या कामगारांनी आमरण उपोषण सुर केले असुन सहा दिवसानंतरही कंपनी मालकाने कोणतीही सहानूभूती दाखवली नसुन आज मात्र कामगारांची परिस्थिती हथाबहेर गेली असतानही कामगारांनी कोणते हि उपचार घेण्यास नकार दिला असुन न्याय मिळाला नही तर आम्ही मरन पत्करु पण उपोषण मागे घेणार नहीत असा कामगारांनी पवित्रा घेतला आहे.

मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील टेक्नोक्राफ्ट ही नावाजलेली कंपनी असून, कंपनी साठी लागणारी वीज कंपनीने स्वमलकीचा पावरप्लँट उभा करुन निर्माण केली होती. गेली बारा वर्षे हा प्लँट व्यवस्थीत सुरु होता. या प्लँट मुले धानिवली ग्रामंस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणूण गाव बचाव समिती स्थापून ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला होता. परंतू कंपनीने समितिशी योग्या त्या वाटाघाटी करुन उत्पादन सुर केले. या वाटाघाटीत स्थनिक तरुणांना रोजगर देण्याचा वादा केला होता. परंतू बारा वर्षांनी कंपनी व्यवस्थापनाने अचानक पॉवर प्लँट बंद करुन या स्थनिक कामगारांवर उपसमारीची वेळ आणली आहे. यासाठी कंपनीने केन्द्रचा कामगार कायदा व कोरोनचा लॉकडाउनची वेळ साधली आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या कामगारांनी उपोषण करु नये म्हणूण कंपनीचे मेनेजर आमोल म्हात्रे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. परंतू या कामगारांशी चर्चा करण्याचा अधिकार मला नही असे त्यांच्याकडून सांगितले जाते.

*टेक्नॉक्रॉफ लि. मुरबाड जिल्हा ठाणे येथील स्थानिक कामगाराना कामावरून तडकाफडकी कमी केल्यामुळे त्यांतील चार कर्मचाऱ्याने “आमरण उपोषण” सुरू केले आहे. आज सहावा दिवस असून काल एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली होती. उपोषणास पाठिंबा व भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने साहेब यांनी घेतली ठोस भुमिका. ठोस भूमिका घेऊन प्रशासनाला जागे केले. सोमवारी दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी कामगार उपयुक्त भोसले यांच्या कडे बैठकींचे आयोजन केले आहे. उपोषण सुरूच आहे.

You may have missed