Blog

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्करत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मयुरजी गांधी (माजी अध्यक्ष सन्मती सेवादल) तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्मती सेवादलाचे संस्थापक श्री मिहीरजी गांधी उपस्थित होते. मिहिर गांधी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मिहीर गांधी म्हणाले ” लॉकडाऊन काळात आरोग्य, पोलिस , सफाई कर्मचारी, भाजीपाला विक्रेते व किराणामालाचे दुकानदार यांनी दिलेल्या सेवा बद्दल त्यांचे आभार मानले. तसेच रत्नत्रय शिक्षण संस्थेची होणारी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी या शैक्षणिक संकुलसाठी भरीव निधी मिळवून देण्याच आश्वासन दिले.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले ” आपला देश राज्यघटना व लोकशाही मुळे सुरक्षित आहे. त्यासाठी राज्यघटना व लोकशाही टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
चेअरमन मा. श्री. प्रमोदभैय्या दोशी म्हणाले ” लॉकडाऊन काळात सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
तसेच संस्थेच्या पुढील शैक्षणिक धोरण व योजना स्पष्ट केल्या.”
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन श्री विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन प्रमोद दोशी, उपाध्यक्ष तुषार गांधी, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदस्य श्री रामदास कर्णे, प्रशाला कमिटी सदस्य सतीश बनकर, दत्ता भोसले, अक्षय गांधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दैवत वाघमोडे सर सूत्रसंचालन माधुरी रणदिवे मॅडम व श्री सतिश हांगे सर,तर आभार प्रदर्शन श्री.अमित पाटील सर यांनी केले.

कल्याण येथील पत्री पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

         

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क संदेश भालेराव-

कल्याणरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री_पुलाचे लोकार्पण
आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे मा. पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब तसेच मा. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या लोकार्पण सोहळ्यासमयी मा. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.
कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते…..

पुुुु

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने ऑनलाइन चित्रकला स्पर्धा बक्षीस व पुरस्कार वितरण अकलूज येथे सोहळा मोठ्या थाटात संपन्न (प्रतिनिधी)-

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने चित्रकला स्पर्धा बक्षीस व पुरस्कार वितरण अकलूज येथे सोहळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने tuटवर्क (अकलूज तिनिधी)-पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने द्वितीय वर्धापन दिन व सावित्री जिजाऊ जयंती महोत्सव निमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय चित्रकल स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच आदर्श शिक्षक व सामाजिक औद्योगिक विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या शिक्षक व मान्यवरांना विविध पुरस्कार अकलूज स्मृती भवन येथे वितरित करण्यात आले.  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ॲड.डॉ. केवल उके., माजी आमदार रामहरी रुपनवर विकास दादा धाईंजे रिपाई राष्ट्रीय नेत्या शीलाताई गांगुर्डे पं.स. माळशिरस माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते, पीएस खांदारे पं स सदस्य अजय सकट ऍड हसीना शेख, ऍड.अमोल सोनवणे, बापूसाहेब शीलवंत,सुमित सावंत, डॉ.कुमार लोंढे,संदीपसेठ नरोळे,अँपल खरात, शहाजी धायगुडे महादेव होळकर ,दि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.   पुरोगामी महाराष्ट्र चॅनल ने महाराष्ट्र शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा अभियानात सहभागी होऊन महाराष्ट्रभरात दीड लाख पुरुषांचे वृक्षारोपण केले आहे. तसेच स्वच्छता अभियान बेटी बचाव बेटी पढाव जलशक्ती अभियान राबवले आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रंगभरण स्पर्धा चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.     तसेच कोरोना काळात भुकेल्यांना अन्नदान केल्याबद्दल सीमाताई रामदास आठवले  यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रात लोकांना विविध ठिकाणी मदत केल्याबद्दल पंचायत समिती सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच  राष्ट्रीय नेत्या शीलाताई गांगुर्डे यांनासुद्धा सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार देण्यात आला.सामाजिकऔद्योगिक विविध क्षेत्रात ल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कामाचे व आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमास अनिलभाई गांगुर्डे, महानंदा ताई डाळिंबे,पंचशीलाताई कुंभारकर, संपादक श्रीकांत बाविस्कर,अनिल तांबे,अभिमन्यू आठवले,श्रीनिवास कदम,नागेश लोंढे, रजनी साळवे, संजय हुलगेव माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील मान्यवर  व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संपादक प्रमोद शिंदे का.संपादक प्रशांत खरात यांनी केले होते. सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशीसर,औदुंबर बुधावले सर यांनी केले. कार्यक्रमास विशेष आकर्षण सिने पार्श्वगायिका नयन पुणेकर,बाल अभिनेत्री राशी शिंदे हे होते.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिनिधी औदुंबर पवार, विनोद रोकडे,संदेश भालेराव, प्रज्ञा कांबळे, रवी झेंडे ,दत्ता कांबळे जितेंद्र साळवे ,श्रिकेश वरुडे ,मोहन शिंदे,सागर प्रकाश भोसले दित्य साळवे,साई सेवा दल कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

सुप्रिया शिवगुंडे मॅडम यांना पुरोगामी महाराष्ट्राचा नकाशा स्मार्ट आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
माळशिरस पंचायत समिती माजी सभापती वैष्णवी देवी अर्जुन सिंह मोहिते-पाटील यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
ऑनलाइन चित्रकले सहभागी विद्यार्थी यांचा पारितोषक बक्षीस सोहळा
महानंदा ताई आळंदी यांना सावित्रीबाई फुले प्रबोधनकार पुरस्कार देण्यात आला
लता काशिनाथ चव्हाण उर्फ लता न्यानदेव शिंदे यांना बेस्ट नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
प्रांताधिकारी शमा पवार मॅडम यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चा कोरणा योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी चैनल चे संचालक डॉक्टर केवल ऊके वैभव जी गीते प्रमोद शिंदे व सहकारी
पंचशीला ताई कुंभारकर यांना अहिल्यादेवी होळकर रणरागिनी हा पुरस्कार देण्यात आला
वेदांत सागर दडस या विद्यार्थ्यास बाल कोरणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
एडवोकेट हसी शेख मॅडम यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चा फातिमा शेख आदर्श समाजसेविका पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

तीन गावांमधील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी शासकीय जमीन मंजूर आंदोलनाला ऐतिहासिक यश…विकास धाइंजे

तीन गावांमधील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी शासकीय जमीन मंजूर आंदोलनाला ऐतिहासिक यश…विकास धाइंजे
जोपर्यंत माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गरिबाला घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा मिळत नाही तोपर्यंत अंगाला गुलाल लागू देणार नाही…..वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव,गणेशगाव, व धानोरे या गावांमधील गरीब मराठा,धनगर,माळी, महार,मातंग या समाजातील 26 लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध झाल्याचा शासकीय आदेश पारित झाला आहे.
नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेच्या वतीने माळशिरस शहराचे माजी सरपंच मा.विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन केले होते.राज्य सचिव वैभवजी गिते यांनी माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा देण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. विकासदादा धाइंजे व राष्ट्रीय दलित दलित न्याय आंदोलनाचे राज्य सचिव वैभव तानाजी गीते हे गोरगरिबांना हक्काचे घरकुल,घरकुलांना जागा व अतिक्रमणे नियमित करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत त्यांच्या पाठपुराव्याला मिळालेलं हे पहिलं अभूतपूर्व व ऐतिहासिक यश आहे.सबंध तालुका जिल्हा व महाराष्ट्र ग्रामपंचायतिच्या निवडणुकांच्या निकालात व गुलाल उधळून घेण्यात दंग असताना विकास दादा व वैभव गिते या जोडीने मात्र सर्व जाती-धर्मांच्या गोरगरिबांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देत गरिबांना हक्काचा निवारा मिळवून देण्याचा जो प्रामाणिक व यशस्वी प्रयत्न केला आहे त्यास तोड नाही.

मुलांच्या लग्नात भारतीय संविधानाचे वाटप… वाशिम,


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशिम,-वाशिम जिल्ह्यातील परिवर्तनवादी कार्यकर्ते तथा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे वाशिम जिल्हा सल्लागार आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे बुवा बाजी विभाग प्रमुख शाहीर दतराव वानखेडे यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न समारंभात भारतीय संविधानाच्या प्रती भेट देऊन सामाजिक कार्याचा ठसा उमटवत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे व आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे वाशिम जिल्हा सल्लागार तथा अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेचे बुवा बाजी विभाग दतराव वानखेडे यांचा मुलगा विद्यानंद वानखेडे याचा विवाह मंगरूळपीर तालुक्यातील जांब या गावाचे भाऊराव इंगळे यांची मुलगी वैशाली यांच्या सोबत रविवार तारीख सतरा जानेवारी ला जांब मंगरूळपीर येथे एनडीएमजे चे राज्य सहसचिव पी एस खंदारे यांच्या हस्ते संपन्न झाला.
समाजात बुद्ध, शिव, फुले, शाहु आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करून समाजाला दिशा दर्शक म्हणून काम करणारे वाशिम जिल्ह्यातील जेष्ठ मान्यवर मंडळी चे भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला या मध्ये डा. रामकृष्ण कालापाड, हंसराज शेंडे, शेषराव मेश्राम, बालाजी गंगावणे, भारतीय बौद्ध महासभा डोंबिवली शहर शाखेचे गौतम खंदारे, एनडीएमजे चे वाशिम जिल्हा अध्यक्ष समाधान सावंत,रामदास वानखेडे,कुसुमताई सोनुने, माया खंदारे, भागवत गवई, नारायण सरकटे, महादेव कांबळे,शाहीर लोडजी भगत, शाहीर विश्वनाथ इंगोले, सदाशिव राऊत, प्रकाश अंबेकर, विश्वास कांबळे, संदिप खडसे आमखेडा चे सरपंच जोगदंड आदी मान्यवर मंडळी ला भारतीय संविधान देऊन दतराव वानखेडे यांनी मुलाचा विवाह सोहळा शेकडो लोकांचे उपस्थितीत पार पाडला. एनडीएमजे च्या वतीने उपस्थित कार्यकर्ते यांनी नवदाम्पत्याना शुभेच्छा दिल्या.

बाळासाहेब सरगर यांच्या मुलाचा वाढदिवसाचा खर्च टाळून राम मंदिर उभारणीसाठी दिला निधी.

  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-  वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत बाळासाहेब सरगर यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी देऊन एक वेगळा उपक्रम घालून दिला.  भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचा मुलगा राजवीर सरगर याचा तिसरा वाढदिवस आज असल्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला खर्च करण्यापेक्षा राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला यामुळे तालुक्यात चांगला संदेश दिला.

    हा निधी अॅड  माधव बिराजदार यांच्याकडे सुपूर्द केला त्यावेळी त्यांनी पेढा देऊन आशीर्वाद दिले व या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी अॅड मिलिंद कुलकर्णी ओबीसी मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वावरे माजी तालुकाध्यक्ष सोपान नारनवर सरचिटणीस संजय देशमुख नागेश वाघमोडे नीलेश देशपांडे नितीन मसलेकर संजय हुलगे नागेश होनराव  आदी उपस्थित होते.

नातेपुते येथे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ७३.९६ टक्के मतदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रतिनिधी ) नातेपुते येथे घेण्यात आलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत  जनशक्ती विकास आघाडी विरुद्ध नातेपुते नागरी संघटना पॅनल ची समोरासमोर लढत लागली होती. जनशक्ती विकास आघाडीचे नेतृत्व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख ,समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील , अहिल्या पतसंस्थेचे चेअरमन रघुनाथ (अण्णा ) कवितके चंद्रकांत ठोंबरे, विजय उराडे हे करीत होते. तसेच जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून दहा उमेदवार निवडणुकीसाठी उभे केले होते. नागरी संघटना पॅनलचे नेतृत्व ॲड. बी. वाय. राऊत ,राजेंद्र उराडे, विनायक उराडे, बापू भांड, अमोल पाडसे, संतोष काळे हे करीत होते नागरी संघटनेचे नऊ उमेदवार निवडणुकीत उभा केले होते. तर एक अपक्ष उमेदवार उभा राहिला होता. या निवडणुकीमध्ये एकूण  ७३.९६ टक्के मतदान झाले असून जनतेने केलेले मतदान हे कोणत्या पॅनलचे आहे हे मतपेटीत बंद झाले असून जनतेचा कौल सोमवारी मतमोजणी दिवशी समजणार आहे. उमेदवारांचे भव्य दिव्य मतपेटीत बंद

फोंडशिरस येथे 85 टक्के मतदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रशांत खरात)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 फोंडशिरस येथे 85% मतदान शांततेत पार पडले आहे. वार्ड क्रमांक एक मध्ये1548 पैकी1281 मतदान झाले आहे. वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक 2)1627 पैकी1359, वार्ड क्रमांक ती3) बिनविरोध तीन उमेदवार निवडून आले आहेत. वार्ड क्रमांक चा4)1185 पैकी960, वार्ड क्रमांक5)1331 पैकी1162, तर वार्ड क्रमांक 6)1857 पैकी1468 फोन मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागले आहे.

पिरळे येथे शांततेत मतदान उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नातेपुते (प्रमोद शिंदे)- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 पिरळे  येथे शांततेत मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.किरकोळ वगळता तिरळे ग्रामस्थांच्यावतीने मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून ग्रामपंचायत 11 ची बॉडी असून. एकूण 85 टक्के मतदान झाले आहे. एकूण 2847 मतदानापैकी2489 पोल मतदान झाले आहे. एकूण पुरुष 1490 मतदान पैकी1332 मतदान झाले आहे. एकूण महिला1465 मतदानापैकी1157 मतदान झाले आहे. पिरळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण चार वार्ड आहे. त्यापैकी वार्ड क्रमांक 1)689 पैकी573, पुरुष-345 पैकी291, महिला344 पैकी282 मतदान झाले आहे., वार्ड क्रमांक 2) एकूण मतदान850 पैकी-769, पुरुष450 पैकी416, महिला469 पैकी353, वार्ड क्रमांक 3)633 पैकी568, पुरुष332 पैकी308, महिला300 पैकी260, वार्ड क्रमांक 4) एकूण675 पैकी589, पुरुष363 पैकी317,महिला352 पैकी262. अशा पद्धतीने शांततेत मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आता उमेदवारांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सुरक्षिततेत कपात केल्याने अकलूज प्रांत कार्यालयावर राज्यशासनाच्या विरोधात NDMJ चे निदर्शने

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या सुरक्षिततेत कपात केल्याने अकलूज प्रांत कार्यालयावर राज्यशासनाच्या विरोधात निदर्शने करन्यात आली….

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने आंदोलन

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, रामदासजी आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र शासनाने कमी केली आहे रामदास आठवले यांच्या सुरक्षेत कपात केली आहे यामुळे राज्यातील मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. रामदास आठवले हे गोरगरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात कोरोना covid-19 च्या प्रादुर्भाव मध्ये सुद्धा त्यांनी भारतभर दौरे करून गोरगरिबांच्या अडचणी सोडवले आहेत ते सध्या केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत त्यांच्या सुरक्षेत कपात करून त्यांच्या गाडीच्या मागील एस्कॉर्ट सुद्धा काढून घेतले आहे. आठवले साहेबांचे राजकारणातील महत्त्व कमी करण्याचा हा रडीचा डाव आहे. हा खोडसाळपणा मागासवर्गीय जनता खपवून घेणार नाही महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याविरोधात विरोधी पक्षात असलेले मंत्रीगण यांची सुरक्षा कपात केल्याचे दिसून येत आहे नियम सर्वांना समान असायला हवा तात्काळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना नेहमीप्रमाणे झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राज्यशासनास नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी दिला आहे.
प्रास्ताविक एन.डी.एम.जे संघटनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते भगवान भोसले यांनी केले त्यांनीसुद्धा राज्य शासनाचा निषेध करत रामदास आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करण्याचे जोरदार मागणी केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माळशिरस तालुक्याचे नेते रविराज बनसोडे यांनीसुद्धा शासनाचा निषेध करून तीव्र आंदोलन छेडण्याचा मानस बोलून दाखवला यानंतर अकलूज प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.महापुरुषांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय नारायण झेंडे,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,सतिश शिंदे,समीर नवगिरे,संजय नवगिरे व आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

आठवले साहेबांना सुरक्षा वाढवावी म्हणून एनडी एम जे च्या वतीने प्रांत कार्यालयावर निदर्शने करताना राज्य सचिव वैभव जी गीते साहेब व कार्यकर्ते

You may have missed