शैक्षणिक

विद्यार्थी हितासाठी धडपडणारे शिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजेरी साठी बसवली बायोमेट्रिक मशीन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
नातेपुते येथील
नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विभागांमध्ये इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविली. गेली पंचवीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमाची ओळख निर्माण करणारे अभिजीत वाळके सर यांनी यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. इयत्ता चौथी पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा असताना आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती आणले आहेत. तसेच गतवर्षी इयत्ता दुसरीचा वर्ग असताना एकही रविवार सुट्टी न घेता व दिवाळी उन्हाळी सुट्टी मध्ये शाळा घेऊन कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिन्यात एकही दिवस गैरहजर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर वेगवेगळी बक्षिसे पॅड, वॉटर बॉटल, कंपास पेटी ,टिफिन बॅग स्वखर्चातून देऊन विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यास प्रेरित केले तसेच. यावर्षी इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी स्वखर्चातून बायोमेट्रिक मशीन बसवून नवीन उपक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यात हा इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धतीवर हजरी घेण्याचा पहिलाच प्रयोग आहे. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बायोमेट्रिक पद्धतीवर हजेरी देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे कुतूहल मनाला खूप समाधान देत होते असे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी सांगितले. आज सदर बायोमेट्रिक मशीनची अनावरण करण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कूडलिक इंगळे , ज्येष्ठ शिक्षकं संजय जाधव,दादासाहेब देवकाते मनोज पवार, रवी ननवरे , मारूती भांगरे , सूनिल कदम , इंगोले, किशोर,भरते, संतोष वाघमोडे , सागर बरडकर, शिक्षकेतर कर्मचारी विनायक चांगन हे सर्व उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक कूडलिक इंगळे यांनी उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकांनी सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या प्राथमिक विभागाचे नाव उज्वल करावे असे आवाहन सर्व शिक्षक बांधवांना केले.

हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

हनुमान विद्यालय शिंदेवाडी ता माळशिरस येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  ऍड.सुमित सावंत,पत्रकार प्रमोद शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान रॅली काढून करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान पुस्तिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऍड सुमित सावंत बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिला आहे. संविधानामुळे देशात कायदा सुव्यवस्था व समानता आहे.तसेच या देशात कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.तसेच शासनाने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे शासनाने घर घर संविधान हर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार माहित होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर हे होते.याप्रसंगी मुख्याध्यापिका देठे मॅडम,डॉ मचाले सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आखाडे सर यांनी व्यक्त केले..

हनुमान विद्यालयात दिले विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे युवती सक्षमीकरण कार्यशाळा


*महिला दिन विशेष *
नातेपुते /प्रतिनिधी भारतीय जैन संघटना व रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये दोन दिवसीय युवती सक्षमीकरण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन सरपंच गीता सपकाळ ,ग्रामसेविका निलोफोर आतार, पोलीस पाटील शमिता धाईंजे, यांच्या शुभहस्ते तर समारोप निर्भया पथकातील नाजनीन तांबोळी, मोनाली पवार यांच्या उपस्थितीत झाला.
एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे कसे जायचे याची क्षमता मुलीमध्ये यावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या काही वर्षात मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे अशा वेळी मुलींना सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे .बाहेर प्रदूषित वातावरण असतानाही आपल्या घरातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी करिअरसाठी बाहेर पाठवणे क्रमप्राप्त आहे. हे पाठवणे निर्धास्तपणे व्हावे अशी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे .आपली मुलगी हे प्रशिक्षण घेतल्यावर बाहेरील वातावरणात जाऊन अगदी सुरक्षितपणे परत येईल असा विश्वास तिच्या त्या कार्यशाळेनंतर निर्माण होणार आहे .तिला येणाऱ्या संभाव्य समस्येवर सहजतेने मात करू शकते असा अनुभव आला आहे.कॉम्प्युटरमधिल अँटी-व्हायरस चे काम ही कार्यशाळा करते इतर कोणत्याही बाह्य व्हायरसमुळे मुलींचे स्वास्थ्य खराब होणार नाही याची काळजी त्यांना घेता येते .
कार्यक्रमास सरपंच गीता सपकाळ,निलोफर आतार, पोलीस पाटील सुनिता धाईंजे, निर्भया पथकाच्या नाजनिन तांबोळी,मोनाली पवार,सचिन लवटे,सचिन भोसले प्राचार्य सूर्यकांत भालेराव,पर्यवेक्षिका मिताली देठे,ज्योती कांबळे, उषा डोंबाळे ,उर्मिला काशीद,अमृता सपकाळ, सुनिता नलवडे,पल्लवी सोनवले,अनिता गावडे ,कोमल पवार उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलशाद मुलांनी मॅडम यांनी केले..
———————————————————————मुलींना कमेंट्स करणे,मुली जाताना मित्राशी मोठ्याने बोलणे,एसटी ,सार्वजनिक चौक,थांबण्याची गरज नाही त्या ठिकाणी थांबणे ही सर्व छेडछाड असुन विद्यार्थ्यांनी वाईट कृत्य केल्यास अल्पवयीन म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो.चरित्रप्रमाण पत्र मिळत नाही ,अडचणी येतात.विद्यार्थ्यांनी पश्चाताप होईल असे वागू नका.अडचण आल्यास ८०८०१६७२१६ या मोबाईल नंबर वर निर्भया पथकास संपर्क करा.
——- नाजनीन तांबोळी
निर्भया पथक
———————————————————————मुलींच्या संरक्षणासाठी व मुलांच्या बहिणीच्या संरक्षणासाठी ही कार्यशाळा आहे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो मुलींनी निर्भय धाडसी तेजस्वी बनण्यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होईल. ——-प्राचार्य सूर्यकांत भालेराव
हनुमान विद्यालय व ज्यू.कॅालेज शिंदेवाडी
———————————————————
आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवती सक्षमीकरण कार्यशाळा.आत्मजाणीव,संवाद आणि नातेसंबंध ,मासिक पाळी व स्वच्छता, आत्मसन्मान व स्वसंरक्षण,निवड व निर्णय ,मैत्री आणि मोह, प्रलोभने तरुण मुलांचे पालकत्व या सात बाबी या कार्यशाळेत घेण्यात आल्या कार्यशाळेमुळे कोणत्याही बाह्य व्हायरसाचा परिणाम मुलीवर होणार नाही त्यामुळे मुलींचे स्वास्थ्य बिघडणार नाही . ——पल्लवी सोनवले
कार्यशाळा प्रशिक्षिका

दहावीच्या विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे—-डॉ.कुमार लोंढे

दहावीच्या विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे—-डॉ.कुमार लोंढे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क-माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिवराव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज चा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ .कुमार लोंढे म्हणाले जिद्द व चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात त्याकरिता आपणाकडे आत्मविश्वास पाहिजे कोणताही विद्यार्थी वाईट नसतो वाईट असतो तो दृष्टिकोन आणि याकरिता आम्ही अविरत प्रयत्न करून विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा भारत शोधतोय असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी दाहवीचे विद्यार्थी अयाज पठाण ,अनिकेत सरतापे प्रा.दीपक काटे,प्रा.विठ्ठल धाइंजे’ मुख्याध्यापिका स्नेहल उरवणे इ नी मनोगत व्यक्त केले
प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक देठे साहेब,नवनाथ वाघम्बरे इ मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले.शेवटी आभार शेटे मॅडम यांनी मानले

महा किड्स मधे वार्षिक क्रीड़ा सप्ताह सपंन्न

नातेपुते- एस एम पी एजुकेशन सोसायटी नातेपुते संचलित महा किड्स सी. बी. एस. ई स्कूल फोंडशिरस येथे दि 13 ते 20 फेब्रूवारी ला वार्षिक क्रीड़ा सप्ताह संपन्न झाला. क्रीड़ा सप्ताहाचे उदघाट्न अक्षय भांड ,डॉ. आदिनाथ रामहरी रूपनवर, संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर पांढरे यांच्या हस्ते झाले. बुद्धिबळ प्रथम अंडर- 7 आरव अजित जगताप अंडर 8 शौर्य बबन ताम्हने, अंडर 11 श्रवणकुमार किशोर बोराटे, 100 मी धावने प्रथम रुद्र संतोष देवकर , रुद्र सालुंखे, अजय किसन कोकरे, आदित्य अजित जगताप, मूली-सान्वी अमोल मोरे, स्वराली पाटील,स्नेहल शंकर वाघमोड़े, श्रावणी संजय रूपनवर, लांब उड़ी प्रथम सार्थक दुर्योधन पाटील, श्रावणी महेंद्र कोरटकर सैक जम्प प्रथम श्रा वणी सोमनाथ रायते, सई रामकृष्ण बोराटे. कबड्डी प्रथम रेड हाउस कप्तान ऋतुराज मारुती पांढरे, फ्रॉग जम्प– प्रथम आरव दादासाहेब मोठे स्वतेज पोपट वाघमोड़े , ईश्वरी संतोष गोरे ईश्वरी आदिनाथ रूपनवर कलेक्ट बॉल– वीर रामकृष्ण बोराटे , स्वराली पाटील, पार्थ सागर जोरे, अंकिता नीलेश शेंडे, संगीत खुर्ची– आरोही रणजीत सुळ, सिद्धांत बाळासाहेब बंडगर , हिप-हॉप जम्प– आर्यन नवनाथ कदम, ईश्वरी गोरे, दिग्विजय पंतुराज पांढरे, धनश्री संदीप गोरे. कुस्ती– आदित्य अजित जगताप, सार्थक दुर्योधन पाटील, स्वराली सतीश कचरे – खो खो आणि क्रिकेट-प्रथम ब्लू हाउस कप्तान अर्णव रणजीत सुळ, शार्दुल शामकांत उराडे. कराटे– प्रथम आदित्य अजित जगताप, सार्थक दुर्योधन पाटील, तनिष्का केशव जोरे, मल्लखाम्ब– प्रथम अयान जब्बार मुलानी. मार्केट डे बालाजी स्वप्निल पलंगे, पार्थ सागर जोरे. फैंसी ड्रेस– श्रीराज रणित काले, सिद्धि भूषण अहिरे, ट्रेडिशनल ड्रेस शिवतेज चंद्रकांत वाघमोड़े, शार्दुल शामकांत उराडे, सर्व यशस्वी विद्यार्थ्याना मैडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. सांघिक विजेत्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आला.

श्री नारायणदास रामदास विद्यालयात फटाके मुक्त दिवसळी उत्सहात

 * श्री नारायणदास रामदास  विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी *नातेपुते(प्रमोद शिंदे)श्री नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर मध्ये फटाके मुक्त दिवाळी विद्यार्थी व शिक्षक  यांनी सामुदायिक शपथ घेतली यावेळी मुख्याध्यापिका श्रीम्. आगरखेड मॕडम म्हणाले,की आपण सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली पाहिजे परंतु ही दिवाळी साजरी करत असताना हवेत होणारे प्रदूषण पण रोखता आले पाहिजे तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही,माणसांना  श्वसनाचे ञास होणार  नाहीत,झाडे,वेली,फुले,पशु,पक्षी यावर ही परिणाम होणार नाही,तसेचआपणास कोणतीही ईजा होणार नाही,म्हणून आपण फटाके न उडविता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करु या  !दिवाळी साजरी करत असताना शिक्षकांनी दिलेला अभ्यासही पुर्ण करावा.वाचन दिन आपण साजरा केला आहे त्याचे एखादे तरी गोष्टीचे पुस्तक वाचन करावे. तसेच दिवाळी उत्सव आनंदाने साजरा करा पर्यावरणाची हानी म्हणजेच आपल्या भविष्याची हानी तसेच विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छ दिल्या . त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्ताने खाऊवाटप करण्यात आला शिक्षक  यावेळी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते .
 शपथ वाचन नजमा पठाण यांनी केले.

नारायण दास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर येथे दीपावलीनिमित्त विविध उपक्रम

इंदापूर ( प्रतिनिधि )💐🏨🌹🏨👭👬👭👬आज दिनांक १९/१०/१९ श्री . नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर प्रशालेत बालवाडी विभाग आणि इ. १ली ते ४थी विद्यार्थ्यांनी दिपावालीनिमित्त आयोजित विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला . बालवाडी मधील मुलांनी रांगोळी काढणे, रंगीत कागदाचे आकाशकंदिल 🏮बनविणे यात सहभाग घेतला . पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध 🌷🌹🌸🌺फुलांचे हार स्वतः बनविले तर दुसरीच्या मुलांनी टाकाऊ📿 लेस,🎨 रंगीत खडे, डाळी अशा साहित्याचा वापर करत भेटकार्ड🧧 बनविण्याचा आनंद घेतला. इयत्ता तिसरी च्या विद्यार्थी वर्गाने जुन्या पणत्या रंगवून विविध साहित्य वापरून सजावट करुन त्या पणत्या नविन बनविल्या तसेच हार बनविण्याचा आनंद घेतला . इयत्ता ४ थी मुलींनी फुलांची रांगोळी रेखाटली आणि रंगीत आकाशकंदिल 🏮🏮स्वतः गोटीव कागदापासून तयार केले . अशाप्रकारे आज मुले विविध उपक्रमात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले . शालेय सर्व सहकारी स्टाफने सहकार्य केले . सदर उपक्रमास मुख्याध्यपिका आगरखेड मॕडम यांनी मार्गदर्शन केले . 💐🏨👭👬🙏🏻🙏🏻

You may have missed