राष्ट्रीय

माळशिरस तालुक्याचे सामाजिक पालकत्व विकास दाद धाइंजे व वैभव गीतेंनी स्वीकारले

माळशिरस तालुक्याचे सामाजिक पालकत्व विकास दाद धाइंजे व वैभव गीतेंनी स्वीकारले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सामान्य जनतेचा आवाज बनून आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य साचीव वैभव गिते हे प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सातत्याने भेटी घेऊन सध्याच्या परिस्थितिचा आढावा घेत आहेत.तालुका प्रशासनाचे मनोबल वाढवून जनतेचे प्रश्न सोडवत आहेत.लॉकडाऊन च्या काळात परराज्यातील व परजिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे,कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून मजुरांना,कामगारांना जीवनावश्यक वस्तूंसह गहू तांदूळ किराणा माल पुरवत आहेत.किराणा दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढवल्याने तात्काळ प्रांतअधिकारी शमा पवार यांची भेट घेऊन जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले प्रांत अधिकारी यांनी जास्त दर आकारणी केल्यास कारवाई करण्याचे नोटीस संबंधितांना काढले
रेशनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही म्हणून तालुका पुरवठा अधिकारी व उज्वला गॅस वितरणासाठी सबसिडी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी तहसीलदार यांची भेट घेतली व धान्य पुरवठा सुरळीत केला.शिवभोजन थाळी अकलूज, वेळापूर,महालुंग
नातेपुते, दहिगाव, पिलीव या गावांमध्ये पाच रूपयांमध्ये गरीब व गरजू जनतेपर्यंत थाळी पोचावी म्हणून प्रांतअधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली
बौद्ध अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी 15 टक्के निधीतुन जीवनावश्यक वस्तू द्याव्यात म्हणून गटविकास अधिकारी यांची भेट घेतली
त्यामुळे आणीबाणीच्या काळात काळजीवाहू मुख्यमंत्री देशाचा कारभार पाहतो तशीच किमया माळशिरस तालुक्यात विकास दादा धाइंजे यांनी केल्याने त्यांना काळजी वाहू आमदार असे जनतेतून म्हंटले जात आहे एक कुटूंब प्रमुख कुटुंबाची काळजी घेतो तशी काळजी तालुक्यातील जनतेची घेत आहेत अशी चर्चा घरा-घरात चालू आहे.

बँक आणि एटीएम संदर्भात ग्राहकांना दिलासा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : करोना आणि देशभरातील लॉक डाऊनची स्थिती लक्षात घेता अर्थ मंत्रालयाने ATM आणि बँक खात्यातील किमान शिल्लकी संदर्भातील नियम शिथिल करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवरील शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. 

करदात्यांना दिलासा! रिटर्न फायलिंगला मुदतवाढ

करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. पुढील काही दिवस देशात संचार बंदीची स्थिती राहणार आहे. यात बँकिंग यंत्रणा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेबाबत आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

शेअर कोसळला; इंड्सइंड बँकेचे गुंतवणूकदार पोळले

ग्राहकांसाठी किमान शिल्लकीची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यापूर्वीच भारतीय स्टेट बँकेने खात्यातील किमान शिल्लकीची अट रद्द केली होती. आता सर्वच बँकांसाठी हा नियम लागू झाला आहे. 

त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या ATM मधून अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना ३ ते ५ ATM व्यवहार निःशुल्क देण्यात येत होते. इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यास ग्राहकांना शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता करोना आणि देशभरातील लॉक डाऊनमुळे बँकिंग नियमावलीत सूट देण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांना फायदा होणार आहे. 

शिवामृत दूध संघास महानंदचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांची स्नेहभेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )अकलुज दि १६

 • सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या शिवामृत दूध उत्पादक संघास महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबईचे नवनिर्वाचित चेअरमन रणजीतसिंह देशमुख सह पत्नी यांनी स्नेह भेट दिली. त्यावेळी
  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. वाहिनी साहेब यांचा सत्कार संघाचे संचालीका सौ.मगर व सौ. पिसे यांनी केला
  त्यानंतर
  शिवामृत दूध संघाच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली, तसेच महानंदा हि महाराष्ट्र ची शिखर संस्था असून महासंघा मार्फत शिवामृत सहकारी दूध संघाला मदत करण्याबाबत,महासंघा ला दूध पुरवठा करणे बाबत चर्चा झाली तसेच कमी काळात महासंघास मोठे निर्णय घेतले आहेत त्यामुळे महासंघाला तसेच सहकारी दूध संघा ना त्याचा मोट्या प्रमाणात फायदे होणार आहे. याची माहिती महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी दिली.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
  संघाचे संचालक श्री हरिभाऊ मगर यांनी केले यावेळी संघाचे व्हा.चेअरमन मा. ढोपे तात्या जेष्ट संचालक भिलारे भाऊ,अवताडे तात्या, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, तसेच संघाचे संचालक संजय मोरे, नवनाथ निलटे,सचिन रणनवरे,दत्तात्रय भिलारे, भीमराव साळुंखे,हनुमंत शिंदे व खाते प्रमुख उपस्थिती होते.

नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची वैभव गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले

नितीन आगे खून खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात मा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या यशस्वी आंदोलनांमुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाने नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवले आहे.वकिलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर प्रश्नचिन्ह आहे.
मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव तानाजी गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रालय शास्त्रीभवन दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन नितीन आगे खून प्रकरणात मंत्रालयीन अधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यासाठी निवेदन दिले यावर मा.मंत्री रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना गृह विभाग,विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यासाठी पत्र लिहले आहे यावेळी रिपाई (आठवले) राज्य सचिव हरेष भाई देखणे व एन.डी. एम.जे चे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे हे उपस्थित होते.

*नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र* *केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची वैभव गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले* *नितीन आगे खून खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात मा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी* अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या यशस्वी आंदोलनांमुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाने नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवले आहे.वकिलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर प्रश्नचिन्ह आहे. मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव तानाजी गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रालय शास्त्रीभवन दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन नितीन आगे खून प्रकरणात मंत्रालयीन अधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यासाठी निवेदन दिले यावर मा.मंत्री रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना गृह विभाग,विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यासाठी पत्र लिहले आहे यावेळी रिपाई (आठवले) राज्य सचिव हरेष भाई देखणे व एन.डी. एम.जे चे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे हे उपस्थित होते.

नायगाव पूर्वेकडील सॅन्टेक वेस्टवल्ड या धोकादायक बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करा. भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.

            नायगाव पूर्वेकडील सॅन्टेक वेस्टवल्ड या धोकादायक बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करा.
                                भाजपच्या अशोक शेळके यांची मागणी.

नालासोपारा, गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी,, २०२० :- वसई तालुक्यातील नायगाव पूर्व टीवरी येथे ग्लोबल अरेना नामक लेआऊटमधील सॅन्टेक वेस्टवल्ड हा एकूण १५० एकर जागेवर २२ माजली ७ टोलेजंग इमारती असलेला बांधकाम प्रकल्प धोकादायक असून या बांधकाम प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे वसई-विरार शहर जिल्हा अध्यक्ष अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
सदर बांधकाम प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून या २२ माजली टोलेजंग इमारतीच्या पायाखालील जमीन खचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इमारतीशेजारील मुख्य रास्ता आणि आसपासची जमीन खचल्यामुळे या बांधकाम प्रकल्पाची पायाभरणी करताना काही गंभीर स्वरूपाच्या त्रुटी राहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे हा बांधकाम प्रकल्प धोकादायक असून यामध्ये घर खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात यावे अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या कामात झालेला हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा याबद्दल संबंधित विकासक, आर्किटेक्ट, कंट्राक्टर आणि वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून सदरचा धोकादायक बांधकाम प्रकल्प तात्काळ स्थगित करावा अशी मागणी अशोक शेळके यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

वसई -विरार शहरात अशुद्ध पाण्याची खुलेआम विक्री; २५ पाणी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल


भाजपचे अशोक शेळके यांच्या मागणीला यश

(पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क )वसई विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक असे अशुद्ध पिण्याचे पाणी विक्री केले जात असल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब उघडकीस आली आहे. वसई-विरार शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या शहरातील २५ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान अशा प्रकारे दूषित पाणी विक्री करणाऱ्या संबंधितांवर फॊजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा पालघर जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य अशोक गजानन शेळके यांनी केली होती. त्यावरून मागील महिन्यात पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या ५१ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता २६ व्यावसायिकांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

साथीच्या विविध आजारापासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्के हुन अधिक  लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी  पाणी खरेदी करतात. मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे? याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.  पिण्याच्या पाण्याची विक्री करणाऱ्या अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत.विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रुपयांची मलाई लाटत आहेत. भाजपच्या अशोक शेळके यांनी या गंभीर प्रकरणी सातत्याने पत्रव्यवहार -पाठपुरावा करून राज्य शासन, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अशोक शेळके यांच्या मागणीनंतर वसई – विरार शहरातील पाणी विक्रेत्यांकडे पाण्याचे नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात होता. हे नमुने तपासल्यानंतर पाणी अपायकारक असल्याचे समजताच  वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ब प्रभाग समितीतर्फे ५१ पाणी विक्रेत्या व्यावसायिकांवर सर्वप्रथम तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे  दाखल करण्यात आले होते . मात्र हे कारवाईचे सत्र असेच सुरु असून आता प्रभाग समिती एफ तर्फे २५ पाणी व्यावसायिकांवर  वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजिवी शास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, ठाणे यांच्या मार्फत तपासले गेले असता, सदरचे पाणी हे पिण्यास अपायकारक असल्याचे अभिप्राय देण्यात आला आहे. एफ प्रभाग समितीमध्ये पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांचे पाणी पिण्यास अपायकारक असल्याचे या तपासणीमद्धे निष्पन्न झाले. महानगरपालिका प्रशासनाकडून या पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटीसदेखील बजावण्यात आल्या होत्या. तरी या बोगस कंपन्यांनी महानगरपालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्री करण्याचा व्यवसाय चालूच ठेवला होता. शेवटी २५ पाणी व्यावसायिकांवर पालिकेच्या आरोग्य विभागाने वालीव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

  गुन्हे दाखल झालेले पाणी विक्री व्यवसायिक :
सुनील ब्राम्हणे, कुमार वझे, अलीम खान, अनवर हुसेन, वामन सुरासे, अब्दुल खान, अबूसामा खान, बसंतलाल यादव, मनोज सिंग, समिम शेख, संजय प्रजापती, लालधारी यादव, अली खान, बबलू भाई, बबु सिंग, रमाशंकर पांडे, नईम शेख, उग्रसेन पाठक, ऐहसान शेख, राजेंद्र कुमार, संजय गुप्ता, शेहनाज शेख, अख्तर शेख, गुड्डू सिंग, राकेश सिंग, सुभाष सिंग

वालवड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

वालवड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (जवळा नि )प्रतिनिधी:दि.9
भुम तालुक्यातील मौजे वालवड येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 644 वी सार्वजनिक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अधिक माहिती अशी कि मौजे वालवड येथील वाल्मिकेश्वर मंदीरात महान संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी संत रोहिदास महाराज यांचे प्रतिमेचे पुजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे भुम तालुका अध्यक्ष सुनिल ढवारे यांचे हस्ते करण्यात आले.जयंती निमित्त ह.भ.प.सुदाम महाराज घाटनेकर यांचे किर्तनही ठेवण्यात आले होते,प्रमुख पाव्हणे एन.डी.एम.जे.जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र कांबळे,जवळ्याचे सरपंच नवजीवन चौधरी,आण्णासाहेब सातपुते,रमेश आगवने,हरीदास आगवने हे होते यावेळी अर्थ व बांधकाम सभापती दत्ता बापु मोहिते,जि.सदस्य प्रविण खटाळ,सरपंच सिता पाटुळे,औदुंबर मोहिते,श्रीहरी बारस्कर,दत्ताञय कुंभार,जालिंदर तात्या मोहिते,हे उपस्थित होते तसेच जयंती उत्सवात सहभागी प्रमुख पावणे यांचेसह उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे नियोजनही करण्यात आले होते कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वालवड येथील चर्मकार समाजातील सर्व कार्यकर्यांसह,सर्वजातीधर्मातील कार्यकर्यांचाही समावेश होता,कार्यक्रमास गावातील सर्व मंडळाचे तरुण कार्यकर्ते, महिला,पुरुषासह व ग्रामस्त उपस्थित होते

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करन्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वैभव गीते यांची मागणी

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करन्याची मागणी नॅशनल दलित मोमेंट फोर जस्टीस राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली

पूर्व महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई )मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांची नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभवजी गीतेंनी भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधीत अधिनीयम 2015 च्या नियम 16 नुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात त्यानुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात दोन म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यामध्ये राज्य पातळीवर उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठका घेणे कायद्याने बंधनकारक आहे मुख्यमंत्री महोदयांनी या समितीची स्थापना करून तात्काळ उच्चअधिकाऱ्यांची बैठक बोलावून राज्यात बौद्ध,दलित आदिवासी अनुसूचित जाती-जमातींच्यावर वाढलेल्या अत्याचाराचा आढावा घ्यावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,खूण बलात्कार जाळपोळ प्रकरणातील पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे, अत्याचारांचे प्रमाण जास्त असणारे जिल्हे अत्याचार प्रवण घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते यांनी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेबांकडे केली आहे.

कोल्हापूर येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक गीताचे लोकार्पण

कोल्हापूर( प्रमोद शिंदे )कोल्हापूर येथील अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे गीत स्वरूपात लॉन्चिंग करण्यात येत आहे. संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चालबद्ध आणि संगीतबद्ध बनवून ही प्रास्ताविका गीत स्वरूपात सादर करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील प्रसिध्द गायक कबीर नाईकनवरे हे अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सलाम संविधान या प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी भारतीय संविधानातील प्रास्ताविकेला नवीन चाल आणि संगीत देऊन प्रास्ताविका गीत स्वरूपात सर्वांसमोर आणली आहे. या गीताला संगीत दिग्दर्शक म्हणून कबीर नाईकनवरे आणि निपाणी येथील दर्शन सुतार यांनी काम पाहिले आहे. या गीतामध्ये दहा गायकांनी गायन केले आहे. यामध्ये कबीर नाईकनवरे, दर्शन सुतार, संग्राम पाटील, मंदार पाटील, प्रसाद विभुते, मोहित कुलकर्णी, विशाल रेळेकर,स्नेहलता सातपुते, पुजा सावरे, सोनाली रायकर या गायकांचा समावेश आहे. या गीताच्या व्हिडिओ शुटचे काम कोल्हापूर येथील प्रसिद्ध कॅमेरामन सैफ बारगीर यांनी केले आहे.तर इडिटिंगचे काम विनायक व्हावळ यांनी केलं आहे. भारतीय संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत अगदी सहज, सोप्या भाषेत पोहोचवण्याचे काम कबीर नाईकनवरे यांचे फौंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. त्यांच्या सलाम संविधान या प्रबोधनपर गीताचा कार्यक्रमाला महाराष्ट्रातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आंनद भोजने, मंदार पाटील, अरुण पाटील, सैफ बारगिर आदी लोक उपस्थित होते.