आरोग्य

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने आशा डे उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने आशा डे उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)-पुरोगामी महाराष्ट्र व प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस यांच्या वतीने आशा डे उत्साहात संपन्न झाला.संविधान दिन तसेच आशा डे चे औचित्य साधून परिसरातील सर्व आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.तसेच सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरळे मॅडम ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहायिका  व्ही.पी चव्हाण यांनी केले.बोलताना प्रमोद शिंदे म्हणाले की आशा स्वयंसेविका यांनी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.शासनाचा प्रत्येक कार्यक्रम त्या प्रामाणिक घरोघरी जाऊन राबवतात त्यांचं काम उल्लेखनीय आहे.तसेच त्यांना पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय रुग्णसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भेटवस्तू उस्नेहभोजन देण्यात आले.यावेळी अशा सुपरवायझर कल्पना कुंभार  यांनी सर्व आशांच्या वतीने आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रशांत खरात,आरोग्य सेविका कल्पना जाधव,विजया शिंदे, ज्योती डोंबाळे, वंदना चंदिले, मनीषा कुदळे, गायत्री जाडकर,सी एच ओ तब्बूसुम जुबेरे, पवार मॅडम,वर्षा शिंदे,औषध निर्माता प्रशांत घुंबरे,आरोग्य सेवक गुरुनाथ हिवरे, विठ्ठल काशीद,रमेश बंडगर तानाजी बिबे, बाबूलाल शेख मेजर खिलारे, सचिन गोरे अशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने 26 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते नातेपुते पोलीस स्टेशन व ज्ञानदीप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नातेपुते येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन तसेच 26 /11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे सर्व कर्मचारी व ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष सीडी ढोबळे हनुमंत माने यांनी केले आहे.

श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने आरोग्याच्या दृष्टी कोणातून चांगले काम केले आहे-डॉ श्रेणिक शहा

नातेपुते प्रमोद शिंदे-
श्री 1008 महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने सलग 23 व्या वर्षी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी डॉ.श्रेणिक शहा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
बोलताना ते म्हणाले की संस्थेने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम केले आहे.तेवीस वर्षात अनेक रुग्णांवर उपचार संस्थेने केले आहेत.तसेच या शिबिरामुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना फायदा होत आहे.भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळेल सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले.तसेच ट्रस्टी नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले थोड्याच दिवसात ट्रस्टच्या वतीने ब्रह्म महती सागर आयुर्वेदिक चिकित्सालय मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहे.तसेच दहिगाव येथील भारतातील सर्वात सुंदर मेरू तयार झाला आहे.सी आर दोशी सरांचे स्वप्न होते की मोठी आरोग्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून उभी करायची आहे.ही संकल्पना आपण पूर्ण करणार आहोत.रथ उत्सव हा दहिगाव चा मानबिंदू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. कार्यक्रम उद्घाटनास श्री108 शुभंकीर्ती महाराज यांचे सानिध्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे दातार व उद्घाटक हिंगणगावकर दोशी परिवार हे होते. शिबिरात रुग्ण तपासणीसाठी डॉ.श्रेणिक शहा इंदापूर,डॉ.समीर दोशी अकलूज,डॉ.भूषण चंकेश्वरा, डॉ.महावीर गांधी, डॉ उत्कर्ष गांधी,डॉ निखिल फडे,डॉ अजिंक्य होरा, डॉ.सीमा गांधी यांनी 650 रुग्णांना मोफत सेवा दिली.मेडिकल असोसिएशनच्या वतीने दीड लाख रुपयांची औषधं मोफत देण्यात आली.या कार्यक्रमास आजी माजी सरपंच,उपसरपंच सोसायटी चेअरमन पदाधिकारी सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टी,श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन सन्मान

आरोग्य सेविका मनिषा जाधव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देऊन सन्मान*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
माळशिरस तालुक्यातील मोरोची येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातील सेविका श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव यांना भारताच्या राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मू यांचे शुभहस्ते राष्ट्रीय फ्लाॅरेन्स नाईटींगल पुरस्काराने नवी दिल्ली येथे आज सन्मानित करण्यात आले.
मोरोची आरोग्य केंद्रात गेली १६ वर्ष राष्ट्रीय कार्यक्रम उत्कृष्ट राबविण्यात आल्याबद्दल त्यांना देशातील आरोग्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.यामध्ये बाल स्वास्थ, परिवार नियोजन अशा अनेक उपक्रात चांगले कार्य श्रीमती मनिषा जाधव यांनी केलेले आहे.त्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
श्रीमती मनिषा जाधव यांचे सर्व कुटुंब देशाची व रूग्णांची सेवा करत आहेत.त्यांचे पती भारतीय सैनिक दलात होते.त्यांचे निधनानंतर आपल्या एकुलत्या एक मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव हा देश सेवासाठी पाठविला आहे.सध्या तो गया(बिहार) येथे सैनिक प्रशिक्षण घेत आहे.
मनिषा जाधव यांना देशातील हा सर्वच्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होवू लागला आहे.अकलूजच्या जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते च्या वतीने रक्तदान शिबिर

श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते च्या वतीने रक्तदान शिबिर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते

सालाबाद प्रमाणे याही वर्ष श्री गणेश प्रतिष्ठान नातेपुते यांच्यावतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.कोविड च्या काळात दोन वर्ष गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही यावर्षी मोठ्या उत्साहात नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान च्या वतीने विविध उपक्रम राबवून गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश आगमनाच्या दुसऱ्याच दिवशी मंडळा ने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर घेऊन गणेशाचे स्वागत केले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे 143 रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून नवीन आदर्श समाजापुढे ठेवला आहे सदर रक्तदानाची संकलन ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते यांच्यावतीने करण्यात आले.याही पुढे विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं गणेश मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्यावर शासनाकडून अन्याय होत असल्याने आजपासून काम बंद आंदोलन

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्यावर शासनाकडून अन्याय होत असल्याने आजपासून काम बंद आंदोलन
चौकट- भाजप सरकार असताना समायोजना संदर्भात कमिटी स्थापन केली होती तसेच लेखी आश्वासन दिले होते पहिले एन आर एच एम च्या लोकांचे समायोजन केले जाईल नंतर बाकीच्यांचा विचार केला नाही परंतु या सरकारने विनाअट भरतीची भरती ची घोषणा केली आहे शासनाने प्रथम आमचे समायोजन करावे नंतर नवीन लोकांना घ्यावं अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू संस्थापक अध्यक्ष- नंदकिशोर कासार
नातेपुते प्रतिनिधी( प्रमोद शिंदे)- गेली दहा ते पंधरा वर्षे पासून एन.आर.एच.एम.कंत्राटी आरोग्य कर्मचारी या मध्ये आरोग्य सेविका ,परिचारिका,आधीरिचारिका, डॉक्टर,तालुका,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, फार्मासिस्ट,प्रयोगशाळातंत्र, लेखापाल, 25 हजारापेक्षा जास्त कर्मचारी अविरत दिवस-रात्र सेवा देत आहेत. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता कर्मचारी वाटेल ते अंगावर पडेल ते काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.परंतु त्या मोबदल्यात त्या कर्मचाऱ्यांची शासनाकडून वारंवार हेळसांड होतअसल्याचे दिसून येत आहे.अनेक दिवसापासून या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्याआहेत परंतु शासनाकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते या कंत्राटी कामगार कामगारांना कायम सेवेत करून घ्यावे ही मागणी गेली दहा वर्षापासून कंत्राटी कामगारांकडून होत आहे.परंतु राज्यात येणारे सरकार या कर्मचाऱ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे कोरोना प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्व जबाबदारी या कंत्राटी कामगारांवर टाकण्यात आली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून ते सेवा देत आहेत.परंतु त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही.त्यांना मास्क, सनीटायझर ही दिले जात नाही कर्मचारी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना कोरणटाईन करत आहेत स्वतःच्या हाताने जीव धोक्यात घालून शिक्के मारत आहेत तुटपुंज्या मानधनात शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमात तन-मन-धनाने जीव धोक्यात घालून काम करताना दिसतात या आरोग्य कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार इतकेच मानधन दिले जाते कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा जास्त काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शासन व अधिकारी करून घेत आहेत.परंतु त्याच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा विचार केला जात नाही काही कर्मचाऱ्यांचे वय होत आले आहे तरीसुद्धा त्यांना शासनाने काय करून घेतले नाही मोठी शोकांतिका आहे काही तसेच अन्यायकारक बाब आहे. काही कर्मचाऱ्यांचे वय 45 ते 50 च्या दरम्यान आहे या कर्मचाऱ्यां चे भविष्य अंधारमय झाले असून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले पाहिजे. या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा मोर्चे आंदोलने केली तरीसुद्धा शासनाला घाम फुटला नाही आता शासनाने आरोग्य खात्यात 30 हजर कर्मचारी धरण्याची घोषणा केली आहे. पहिले 25 हजार कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेत करून घ्यावे अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेकडून होत आहे. अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचेआंदोलन छेडले जाईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तेच दिनांक 18 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनआरोग्य कंत्राटी कामगारांकडून सुरू करण्यात आले आहे.

एन.डी.एम.जे.च्या अध्यक्षा कडून पिरळे ग्रामपंचायतीस थर्मल स्क्रीनिंग मशीन भेट

एन.डी.एम.जे.च्या अध्यक्षा कडून पिरळे ग्रामपंचायतीस थर्मल स्क्रीनिंग मशीन भेट*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पिरळे येथील एन डी एम जे चे अध्यक्ष तथा साई उद्योग मॅनेजर प्रमोद शंकर भोसले यांनी पिरळे ग्रामपंचायत व covid-19 समिती यांना 15000 रुपये किमतीची थर्मल स्क्रीनिंग मशीन भेट दिली आहे covid-19 कोणाचा देशात व महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डॉ.केवल उके वैभव गिते व विकास दादा धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य विविध प्रकारे मदत केली जाते. तसेच आज त्याच्या मार्गदर्शनाखाली पिरळे येथील अध्यक्ष तथा साई उद्योग मॅनेजर प्रमोद शंकर भोसले यांनी थर्मल स्कॅनिंग मशीन भेट दिली आहे जेणेकरून गावात येणाऱ्या नवीन लोकांची व korantain करण्यात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यास सोयीस्कर जावे. हे मशीन प्रमोद भोसले यांनी पोलीस पाटील औदुंबर बुधावले तलाठी कपिल मसल खांब ग्रामसेवक रमेश जमदाडे यांच्या स्वाधीन केले यावेळी पत्रकार प्रमोद शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे पाटील,दशरथ जाधव, महादेव शिंदे, प्रल्हाद साळवे, समितीतील सदस्य उपस्थित होते. या केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वंचित बहुजन आघाडीला पिरळे येथे प्रतिसाद

नातेपुते (प्रमोद शिंदे)- वंचित बहुजन आघाडी ला पिरळे येथे चांगला प्रतिसाद मिळाला असून तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजकुमार यांना पसंती देण्यात आली आहे. गाव भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजकुमार यांनी पिरळे, कळंबोली ,पळस मंडळ येथे मतदारांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान पिरळे येथील दलित वस्ती तसेच इतर ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या त्यावेळेस मातंग समाज बौद्ध समाज तसेच मराठा समाज नाभिक समाज तसेच बहुजन समाजातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान बहुजन आघाडी ला मतदान करण्याचे आव्हान राजकुमार यांनी केले यावेळेस सर्व समाजाने वंचित बहुजन आघाडी ला तिसरा पर्याय समजून पाठिंबा देण्याचं जाहीर केले आहे तसेच उमेदवार राजकुमार यांनी लोकांचा अडी-अडचणी जाणून घेतल्या व भविष्यात मी निवडून येऊ अथवा नयेऊ निश्चितच आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले आहे. तसेच ते पुढे म्हणाले मी चळवळीचा कार्यकर्ता आहे व या तालुक्यातील नातेपुते परिसरात माझं शिक्षण झाला आहे आर एस एस च्या जातीवादी भीमा कोरेगाव दंगल सहभाग असणाऱ्या बाहेरचे उमेदवाराला मतदान करण्यापेक्षा माझ्यासारख्या गरीब कुटुंबातील उमेदवाराला मतदान द्या असे ते बोलत होते यावेळी उमेदवार राजकुमार सोनवणे, वंचित चे गायकवाड, आरपीआयचे राजेंद्र बल्लाळ, रामोशी समाज संघटनेचे अंकुश बुधावले ,मराठा समाज ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत जाधव ,माजी सरपंच माजी सरपंच सुनील माने ,नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते विष्णू भाऊ खंडागळे, मातंग समाज संघटनेचे राजेंद्र खिलारे ,तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed