कोल्हापूर

काेल्हापुरचे सहाय्यक आयुक्त यांच्या आँफिस बाहेरील माहिती फलक बनला मानुसकीचे प्रतीक

कोल्हापूर प्रतिनिधी
काेल्हापुर म्हटल की आठवण हाेते ती काेल्हापुरची तालीम व छत्रपती राजर्शी शाहू त्यांच्या कारकिर्दित जनहितासाठी केलेल्या अफाट कार्यांची तसेच सर्व धर्म समभाव मनात ठेउन जनहिताचा घेतलेला वसा हा सदैव प्रत्यय देत असताे.असाच प्रत्यय काेल्हापुरातील सहाय्यक आयुक्त यांच्या आँफीस बाहेरील माहिती फलकावरील बातमीने प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नक्कीच विचार करण्यास भाग पाडले असेल.सहाय्यक आयुक्तांच्या या माहिती फलकाने गर्व अहंकार मी पणा यांच्यावर मात देत झोपलेल्या माणुसकीला जागे करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाआहे.साधी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाला भेटायचं म्हटलं तरी वेळ मागवा लागतो.पण आयुक्तांच्या या जनहितासाठी दाखवलेल्या प्रेमाने माणुसकीचा प्रत्यय आणून दाखवलेला दिसताे.प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यातून बरच काही शिकण्यासारखं आहे.मिळालेल्या पदाचा पुरेपूर वापर जनहितासाठी कसा राबवता येईल याचे प्रत्येय दिसून येत आहे.नक्कीच याचा बदलाव इतर जिल्ह्यातील तीलतहसील कचेऱ्यापासून प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल अशी आशा बाळगू.