ठाणे

कल्याण येथे बहुजन उद्देशीय संस्थेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था च्या माध्यमातून
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्य सम्राट.अ

ण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात झाली संपन्न व् ॲड.डॉ.केवलजी उके साहेबांचा करण्यात आला सत्का

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (कल्याण संदेश भालेराव)- बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था या संस्थे च्या वतीने नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस्ट ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे उपस्थितीत तसेच सत्कार मुर्ती आदरणीय नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस राज्य महासचिव अ‍ॅड.डाॅ.केवजी उके सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहिर अण्णाभाऊ साठेचीं जयंती साजरी करत असताना सर्व प्रथम आदरणीय डॉ.केवलजी उके यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुर्ती समोर मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली व ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे साहेब यांच्या हस्ते व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यालय प्रमुख नथुराम गंगाराम मोहिते व बौध्दचार्य आनंदजी निरभवणे याच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अण्णाभाऊ साठे चीं जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली व जयंतीचे औचित्य साधून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांची महाराष्ट्र शासन महीला बालविकास विभाग राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद व पदाधिकारी याच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद श्यामसुंदर रोकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
संस्थेचे उपाध्यक्ष आयु संदिप मधुकर घुसळे यांनी उत्तम प्रकारे केले यावेळेस उपस्थित
संस्थेतील पदाधिकारी
,, मा.सुनिल ठेगें ,संदेश भालेराव, राजेंद्र सावंत , तसेच सन्माननीय सदस्य ,विक्रम जाधव,अविनाश बावस्कर, श्रीधर शिंदे , राजेंद्र सोनावणे
,कार्यालिन कर्मचारी विजय निकाळे व स्थानिक कार्यकर्ते ईतर मान्यवरांसह कार्यक्रम संपन्न झाला.

You may have missed