क्रीडा

पिरळे येथे अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-
युवा उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांच्या सहकार्यातून पिरळे येथे अर्जुन सिंह मोहिते पाटील चषक 2022 आयोजन करण्यात आला आहे या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पंचायत समिती माजी सभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील उत्पन्न बाजार समिती उपसभापती साहेब पांढरे नगरपंचायत उपनगराध्यक्ष मालोजी राजे देशमुख पिरळे सरपंच उद्योजक संदीप नरोळे सतीश तात्या ढेकळे मा सरपंच शहाजी दादा धायगुडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी एकशिवचे सरपंच रणजित पाटील  प्रवीण शेट पांढरकर उपसरपंच उमेश खिलारे संदीप वाघ शंकर जानकर विजय धायगुडे बीडनू पाटील साळुंखे साहेब दिनेश भोसले लखनचव्हाण पत्रकार प्रमोद शिंदे दीपक झोडगे भाऊसाहेब भिसे मोहन बुधावले सर तसेच  पंचक्रोशीतील अनेक दिग्गज मान्यवर खेळाडू उपस्थित होते या स्पर्धेच्या आयोजन विष्णू नारायण क्रिकेट क्रिकेट क्लब यांच्या वतीने करण्यात आलेले आहे स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 51 हजार रुपये व चषक द्वितीय क्रमांक बक्षीस 31000 तृतीय बक्षीस 15000 चतुर्थ बक्षीस 11000 व ट्रॉफी अशाप्रकारे असणार आहे स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गणेश माने आजिनाथ होळकर दत्ता शिंगाडे शैलेश निकम सोमनाथ वाघ राहुल माने व विष्णू नारायण क्रिकेट संघातील खेळाडू परिश्रम घेत आहेत. 

जिव्हाळा फाउंडेशन च्या वतीने कारूंडे येथे कबड्डी स्पर्धा संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी : जिव्हाळा फाउंडेशन कारुंडे यांच्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर रोजी कारूंडे ता. माळशिरस जि. सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय खेळ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कारूंडे गावातील व पंचक्रोशी होतकरू खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्धात हेतूने जिव्हाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास दादा पाटोळे यांच्या संकल्पनेतून कारुंडे गावा मध्ये कबड्डी मैदान तयार करण्यास पासून ते स्पर्धेचे संपूर्ण आयोजन पार पाडण्याचा संकल्प केला होता माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाईंजे व एन डी एम जी चे राज्यसचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी स्पर्धा भरविण्यात आली होती
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा माळशिरसचे माजी सरपंच विकास दादा धाईंजे एन डी एम जी चे राज्यसचिव वैभव गीते कारूंडे गावचे अमोल पाटील माजी सरपंच अमर पाटील माजी सरपंच हनुमंत पाटील कारुंडे सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत पाटील, माजी उपसरपंच जगन्नाथ लोंढे, प्रगतशील शेतकरी विजय मस्कर, पत्रकार प्रमोद शिंदे, अध्य क्रांतिवीर उमाजी नाईक संघटना अध्यक्ष बापू पाटोळे, जिल्हा संघटक रिपाई एस एम गायकवाड एन डी एम जी शहराध्यक्ष गणेश गायकवाड आधी मान्यवरांच्या हस्ते पार पडला स्पर्धेसाठी सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून कबड्डी संघ उपस्थित होते स्पर्धेतील सर्व सामाने रंगतदार व अतिठटीने पार पडले जिव्हाळा फाउंडेशन कबड्डी संघाने प्रशिक्षक आगम यांच्या मार्गदर्शनाखाली नवक्या संघाने अतिशय चुरशीची कडवी प्रेक्षणीय झुंज दिली यावेळी गावातील युवक कबड्डी प्रेमी प्रेषक अबला वृद्ध स्पर्धा संपेपर्यंत उपस्थित राहून आनंद लुटला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये अधिक ट्रॉफी जय हनुमान कबड्डी संघ डोरलेवाडी , द्वितीय क्रमांक दहा हजार अधिक ट्रॉफी एस बी वर्ग स्पोर्ट्स पळसदेव, तृतीय क्रमांक पाच हजार अधिक ट्रॉफी जय हिंद कबड्डी संघ मांडवे व सिद्धिविनायक कबड्डी संघ सातारा या संघाने पटकाविला प्रत्यक्षात विजेत्या संघास ट्रॉफी युवा उद्योजक माजी सरपंच अमर जगताप कारुंडे यांच्या वतीने देण्यात आली कबड्डी स्पर्धा पार पाडण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास दादा पाटोळे क्रीडा विभाग प्रमुख हनुमंत गायकवाड, सदस्य आबा मसुगडे फाउंडेशन संचलित जिव्हाळा आश्रम अनाथ आश्रम वृद्धाश्रम व्यवस्थापक नाथा गायकवाड व जिव्हाळा कबड्डी संघ मधील सर्व खेळाडू यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी मेहनत घेतली स्पर्धेच्या बक्षीस वितरण त्रिदल सैनिक संघटना सोलापूर अध्यक्ष आढाव, जिल्हा सचिव झोरे व कारूंडे गावचे मेजर अनिल कर्चे उपस्थित होते यावेळी विकास पाटोळे यांनी जिव्हाळा कबड्डी संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची व दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करणार असल्याचे घोषणा केली या स्पर्धा पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळा कारूंडे व ग्रामपंचायत कारूंडे कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युद्ध कला मार्शल आर्टच्या खेळाडूंचे यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे /प्रतिनिधी: शितोकॉन कराटे असोसिएशन इंडिया आयोजित महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे वानवडी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत युद्धकला मार्शल आर्टच्या खेळाडूनी सर्वोत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कुमीते क्रीडा प्रकारामध्ये आदित्य लिगाडे – रौप्य पदक , काता क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक, अरिम बोहरा – कांस्य पदक, ईशान लिगाडे -कांस्य पदक, आर्णा अनन्या प्रधान – कांस्य पदक अशी सर्वोत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.

सध्याच्या काळात स्व -संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. आपल्यावर होणाऱ्या आक्रमणावर प्रतिउत्तर देता आले पाहिजे. यासाठी कराटे हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी मोठ्या संख्येने मुली, महिला, मुले मार्शल आर्ट तथा कराटे प्रशिक्षण घेत असतात. युद्ध कला मार्शल आर्ट अकॅडमी ही प्रशिक्षण संस्था अल्पावधीमध्ये नावा-रूपाला आल्याचे पहावयास दिसते. या अकॅडमीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मुले,मुली प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत असतात.
हडपसर, भोसरी, सदुंबरे या पुणे परिसरातील युद्धकला मार्शल आर्ट अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदके पटकविल्याबद्दल अकॅडमीला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये मिळाली आहे. या खेळाडूंना अविनाश माने सर, संकेत कंद सर, रोहित भालेराव सर यांनी प्रशिक्षण दिले आहे.

You may have missed