आंतरराष्ट्रीय

दहिगाव येथे रथउत्सवानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न

दहिगाव येथे रथउत्सवानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)दहिगाव येथे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवसा निमित्त भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीर राबविण्यात होते.हा बाविसावा सामाजिक उपक्रम होता.यामध्ये मधुमेह,अस्थीरोग, नेत्र रोग,असे विविध रोगावर रोगनिदान शिबिर राबवण्यात आले.या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन व मंगल चरणा ने करण्यात आली होती. शिबिराच्या अध्यक्षस्थानी वर्धमान दोशी होते.या शिबिरास डॉ.वर्धमान दोशी,डॉ.राजेश फडे फलटण, डॉ.निखील गांधी अकलूज,डॉ अजिंक्य होरा नातेपुते, डॉ.सौ.प्रज्ञा गांधी,डॉ.भूषण संकेश्वर,डॉ.अक्षय कुमार दोशी,डॉ.चिराग होरा, डॉ.उदय कुमार दोशी तसेच अकलूज,फलटण, नातेपुते व परिसरातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. व दहिगाव येथील सरपंच ऍड.रणधीर पाटील,बाहुबली शेठ शंकेश्वर,अमृतलाल गांधी,नरेंद्र गांधी,संजय दोशी,अविनाश दोशी, नीलिमा दोशी, पोपट चिकणे,रामचंद्र पाटील,शितल गांधी,रमेश शहा वैभव शहा आरोग्य सेवक के.एस.सोरटे,अमित होरा,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या शिबिरात 930 पेशंटने तपासणीचा लाभ घेतला आहे.तर 60 जणांना मोफत कोरोणा प्रतिबंध लस देण्यात आली.सर्व रुग्णांना मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत औषध देण्यात आली.या शिबिराचे दातार विपुल गांधी कार्यक्रमादरम्यान डॉ.वर्धमान दोशी,डॉ.निखील गांधी, संजय दोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन यांनी केले. डॉक्टर तेजस शंकेश्वर प्रास्ताविक केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्ट,महाविर सेना,दातार व जैन बांधव यांनी परिश्रम घेतले.

कल्याण येथे पैगंबर बिल आणि मुस्लिमांना ५% आरक्षण समर्थन धरणे आंदोलन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जे.जे.मानकर साहेब व महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्षा मायाताई कांबळे महासचिव रेखाताई कुरवारे यांच्या नेतृत्वखाली वंचित बहुजन आघाडी, कल्याण पूर्व सचिव विनोद श्यामसुंदर रोकडे कल्याण पूर्व महासचिव राजाभाऊ त्रिभुवन कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड महासचिव जोतिराम जावळे डोंबिवली पूर्व अध्यक्ष सुरेंद्र ठोके महासचिव मिलिंद साळवे डोंबिवली पश्चिम आध्यक्ष गौतम गवई महासचिव पगारे मोहना शहर महिलाअध्यक्ष कल्पनाताई पायाल संगीता सोनवणे यांच्या वतीने कल्याण तहसील कार्यालयावर
पैगंबर बील आणि ५ % मुस्लिम आरक्षण समर्थन
जाहीर मोर्चा व धरणे आंदोलन
आंदोलनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यास पुष्पहार घालून आंबेडकर उद्यान ते तहसीलदार कार्यालय आंदोलनाला मोठ्या संख्येने कल्याण पश्चिम इंद्रानगर मोहना टिटवाळा डोंबिवली कल्याण पूर्व कल्याण पश्चिम येथीलभैय्यासाहेब किरण शेंडगे सुनिता राजगुरू मॅडम देवानंद कांबळे तसेच बनेली आंबिवली येतो महिला मुस्लिम महिला मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आंदोलनास भाग घेऊन आंदोलन यशस्वी पार पाडले

बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत…वैभव गिते, राज्य सचिव एन.डी.एम.जे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे दालनात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.यामध्ये प्रामुख्याने सफाई कामगार,कंत्राटी कामगार,लाड-पागे समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना,सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती,या विषयांसह जातीय अत्याचारात खून झालेल्या पीडितांचे नोकरी,जमीन,पेंशन देऊन पुनर्वस करणे,एट्रोसिटी ऍक्ट अंमलबजावणी,सर्व जाती धर्माच्या ऊसतोड मजुरांना ओळखपत्र,बांधकाम मजूरांच्या योजना,कायदा सुव्यवस्था इत्यादी विषयांवर जिल्हाधिकारी यांच्याबरोबर महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली.चर्चेत प्रामुख्याने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी हाताने मैला उचलण्यास प्रतिबंध कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणी,कंत्राटी कामगारांना किमान वेतन,भविष्य निर्वाह निधीची मागणी करून कामगारांचे पुनर्वसन करण्यासह शासनाच्या मागासवर्गीयांसाठी चालू योजनांची सद्यस्थिती आणि अंमलबजावणीमधील त्रुटी योजनांचे शासन निर्णय,परिपत्रके,याचे दाखले देत अनेक गंभीर बाबी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणल्या,आमदार प्रणितीताई शिंदे अध्यक्ष अनुसूचित जाती कमिटी विधानभवन यांनी योजनांच्या अंमलबजावणीकरीता महत्वपूर्ण सूचना केल्या.समिती सदस्य बालया मडेपू यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले.जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विषयनिहाय संबंधित विभागांना पुढील बैठकीला येताना सर्व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून प्रत्येक महिन्याला बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले.बैठकीस समाजकल्याण,महानगरपालिका, नगरपालिका,रेल्वे,पोलीस अधीक्षक,पोलीस आयुक्त,विभागातील अधिकारी उपस्थित होते.

अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्याकडून नातेपुते पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)-अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांच्याकडून दी 23/11/2021 नातेपुते पोलीस ठाणे चे वार्षिक प्रशासकीय तपासणी करण्यात आली. ही तपासणी सकाळपासून सुरु होती. तपासणी दरम्यान नातेपुते पोलीस ठाणे येथे सलामी देण्यात आलीSquad drill तसेच,रजिस्टर चेकिंग,नोट्सreading,
मुद्देमाल चेकिंग,गोपनीय रजिस्टर चेकिंग,प्रशासन भाग 4 लिहिणे,शीट, इत्यादी गोष्टी तपासण्यात आल्या.


पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक यांची मिटिंग घेण्यात आली.मीटिंगमध्ये नातेपुते परिसरातील सर्व पोलीस पाटील यांना अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांनी मार्गदर्शन केले.बोलताना ते म्हणाले की पोलीस पाटील हा प्रशासनातील महत्त्वाचा घटक असून हे मानाचे पद आहे.आपण त्या पदाची प्रतिमा राखी पाहिजे.पोलिस पाटलांनी राजकारण करू नये,राजकारणात पडू नये ग्रामीण भागात पंचांच्या माध्यमातून तंटे मिटवण्याचे परंपरा आहे.

त्यासाठी पोलीस पाटील चारित्र्यवान असला पाहिजे.पोलीस पाटील व्यसनमुक्त असला पाहिजे दारू विक्रीची माहिती पोलीस स्टेशनला पोलीस पाटलांनी दिली पाहिजे.पोलीस पाटलांनी आपले काम काळजीपूर्वक करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.पोलीस पाटलांनी सत्याची बाजू घेतली पाहिजे आणि सत्य आहे ते सांगितले पाहिजे.जे पोलीस पाटील राजकारण करतील त्यांना तात्काळ सस्पेंड केले जाईल.ज्यांना राजकारण करायचा आहे त्यांनी राजीनामा देऊन खुशाल राजकारण करावे.पोलीस पाटलांकडे मुशाफिर रजिस्टर,गाव भेट रजिस्टर असणे गरजेचे आहे.पोलीस पाटलांनी राजकीय, धार्मिक,संवेदनशील माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे.ऑपरेशन परिवर्तन व सुरक्षिततेवर भर दिला पाहिजे.गावात सीसीटीव्ही बसवणे,ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी करणे यावर भर दिला पाहिजे.अशाप्रकारे पोलीस पाटील यांना मार्गदर्शन केले.तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सर्वांसमोर गाव गुंडांच्या कुंडल्या वाचल्या तसेच गावगुंडांना व गुन्हेगारांना व्यवस्थित राहण्याचा इशारा दिला.दारू विक्रीत्यांचा बंदोबस्त करू असेही त्यांनी सांगितले.तसेच त्यांनी फोंडशिरस येथे गाव भेट दिली ऑपरेशन परिवर्तन व ग्राम सुरक्षा यंत्रणा याचा वापर करण्याचे आव्हान केले.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव डी.वाय.एस.पी शिवपुजे,नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर,पी.एस.आय बैनवाड मॅडम,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल गणेश कापसे, नागरगोजे,हंगे,लोहार इतर कर्मचारी तसेच महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दैनिक अजिंठा टाइम्स वृत्तपत्राच्या “दिपोत्सव” विशेषांकाचे प्रकाशन ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई (प्रतिनिधी) दिनांक २२/११/२०२१ रोजी सायंकाळी पोलिस वसाहत कल्याण पश्चिम येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे दैनिक अजिंठा टाइम्स वृत्तपत्राच्या “दिपोत्सव” विशेषांकाचे प्रकाशन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस तसेच महिला व बाल विकास विभागाचे मंत्रालइन सदस्य ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी नेते व जेष्ठ विचारवंत राजाराम पाटील तसेच जेष्ठ साहित्यिक व स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष सागरजी तायडे, रेल्वे कंट्रोल अधिकारी सुधाकर सरवदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

दै.अजिंठा टाइम्सच्या प्रकाशनास शुभेच्छा देताना ॲड.केवल उके म्हणाले की सध्याच्या काळात चळवळीचे मुखपत्रे हे फारच कमी झाले आहेत ‌व समाजावरील अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवला जात नाही. याला वाचा फोडण्याचे काम दैनिक अजिंठा टाइम्स व संपादकीय मंडळ व प्रतिनिधी करतील त्या मुळे संबंध देशात आवाज पोहचला जाईल असी अपेक्षा व्यक्त केली. ज्याप्रकारे नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेने समाजात अनेक “चंद्रू “तयार केले आहेत. त्याच पद्धतीने दै.अजिंठा टाइम्स मध्ये लेखणीच्या माध्यमातून चांदृ तयार व्हावेत अशीही अपेक्षा व्यक्त केली. पुढे बोलताना ॲड.केवल उके म्हणाले की अजिंठा टाइम्स चे संपादक हे बोलून दाखवत नाहीत तर करून दाखवतात. संपादक संजय माकेगावकर हे पंधरा ते सोळा वर्षां पासून माझ्या सोबत काम करत असताना बोलणे कमी पण काम हे कृतीत उतरवून करून दाखवतात असेही ॲड.केवल उके म्हणाले.

आग्री कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी व्यापक लढा उभारणारे ओबीसीचे नेते जेष्ठ विचारवंत राजाराम पाटील यांनी दैनिक अजिंठा टाइम्स ला शुभेच्छा पर मार्गदर्शन करताना म्हणाले की मुंबई-ठाणे भागातील ओबिसी समाजाच्या व्यथा मुंबई येथील वृत्तपत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, कोळी समाजाच्या अनेक अडीअडचणी येतात त्यावर वृत्तपत्रातून आवाज उठवला तर तो महाराष्ट्र भर प्रसिद्ध होत नाही. परंतु दैनिक अजिंठा टाइम्सने मुंबई-ठाणे येथील सर्वसाधारण जनतेचा आवाज आपल्या दैनिकाच्या माध्यमातून महाराष्ट्राभर पोहचविण्याचे काम करत आहात त्या बद्दल व दैनिक अजिंठा टाइम्सच्या दिपोत्सव विशेषांकास व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण मोरे यांना काही तांत्रिक अडचणी मुळे प्रत्यक्ष हजर राहता आले नाही परंतु त्यांनी ऑनलाइन व्हिडिओ काॅन्फ्रशद्वारे दैनिक अजिंठा टाइम्सच्या दिपोत्सव विशेषांकाच्या प्रकाशना निमित्त सर्व संपादकीय मंडळास शुभेच्छा दिल्यात.

स्वतंत्र कामगार युनियनचे अध्यक्ष, कामगार नेते सागरजी तायडे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात बोलताना म्हणाले की संपादक संजय माकेगावकर हे माझे सहकारी व चांगले मित्र आहेत. त्यांना मी पंधरा वर्षांपासून ओळखतो त्यांना कामाची तळमळ आहे व ते चिकाटीने काम करतात. निस्वार्थी वृत्तीने व एकनिष्ठेने काम करत असतात. दैनिक अजिंठा टाइम्सच्या या रोपट्याचे भविष्यात विशाल वटवृक्षात नक्कीच रूपांतर होईल आणि वंचित समुद्यचे भविष्य उज्वल करतील अस्या शब्दात शुभेच्छा देताना सागर तायडे हे बोलत होते. यावेळी सेंट्रल रेल्वे अधिकारी सुधाकर सरवदे आणि एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय कांबळे यांच्या सह अनेक मान्यवरांनी शुभेच्छापर विचार मांडले.
दैनिक अजिंठा टाईम्स चे संपादक संजय कांबळे (माकेगावकर) व संपादकीय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजनकेले होते. या करिता एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष अँड प्रविणजी बोदडे व त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून एन.डी.एम.जे सातारा जिल्हा पदाधिकारी पिराजी सातपुते,एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिशजी सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, संघटक शशिकांतजी वाघ, नागसेन बुक डेपोचे संचालक सोमनाथ भोसले, एन.डी.एम.जे ठाणे जिल्हा सचिव विनोदजी रोकडे, उपाध्यक्ष विकासजी चव्हाण, सहसचिव सुनिलजी ठेंगे, ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव, कल्याण डोंबिवली शहर संघटक नथुराम मोहिते,एन.डी.एम.जे.शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड, सुमित जाधव तसेच इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक संपादक संजय माकेगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.डी.एम.जे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण सर यांनी केले.

श्री १00८ महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री  १00८ महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र दहिगाव वार्षिक रथ यात्रेनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे.गेली दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीमुळे रथोत्सव साजरा करता आला नाही परंतु यावर्षी कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने यंदा नेहमीप्रमाणे रथोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा होणार आहे.रथोत्सवाची सुरुवात बुधवार 24 नोव्हेंबर ते शुक्रवार 26 नोव्हेंबर पर्यंत रथ उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 10 भगवान श्री यांचा अभिषेक तसेच संगीतमय भक्ताम्बर विधान दुपारी 2  वाजता श्री 1008 जिनेन्द्र देवाधिदेव पालखी शोभायात्रा,बगीचा येथे संगीतमय चढावे अभिषेक, गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 ते 9:30 श्री 1008 बाहुबली भगवान यांचा अभिषेक तसेच श्री ब्रह्मामहती सागर चरण पादुका अभिषेक सकाळी  10 ते1:30 संगीतमय शांतीनाथ विधान तसेच सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वरोग निदान शिबिर आयोजन.सायंकाळी 4:30 ते 5:30 संगीतमय चढावे तथा अभिषेक आयोजन.शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सुशोभित धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची मूर्ती रथामध्ये विराजमान करून भव्य शोभा रथ यात्रा काढण्यात येईल. दुपारी 12 वाजता सभामंडप उद्घाटन तसेच रथा मधून मंडपामध्ये मूर्ती घेण्याचा कार्यक्रम,त्याच ठिकाणी श्री जिनेन्द्र कला मंच हसुर यांचा संगीतमय कार्यक्रम व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केले आहे. या रथो उत्सवास महाविर सेना नातेपुते,सन्मती सेवा दल स्वयंसेवक उपस्थित होऊन रथ शोभा वाढवतील.या रथोत्सवास अतिशय क्षेत्र दहिगाव समस्त जैन बांधवांच्या वतीने  निमंत्रण देण्यात येत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 16 – एस टी च्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईतल्या आझाद मैदानात संप सुरु आहे. आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन संवाद साधत रिपब्लिकन पक्षाचा एसटी कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर; माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; पनवेल चे उपमहापौर जगदीश गायकवाड; रमेश गायकवाड; चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे; जिल्हा अध्यक्ष संजय पवार; शिरीष चिखलकर आदी उपस्थित होते.

यावेळी ना.रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यमय शैलित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

एसटीचं झालं नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचं होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचं होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी मविआ सरकारला इशारा दिला.

ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं असं म्हटलं आहे.

एसटी नसती तर मी पुढारी नसतो असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

जय भीम आहे माझ्या गाठीशी,
मी तुमच्या आहे पाठिशी,
सरकारला सळो की पळो करुन सोडा असं आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केलं.

हे महाविकास आघाडी सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरं झालं असतं, पण आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, आणि त्यांना काही देणार नाही, असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

विनोद रोकडे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा

विनोद शामसुदंर रोकडे यांच

वाढदिवस अनेक सामाजी

उपक्रमांनी साजरा..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव- ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व संकटकाळात पीडितांच्या मदतीला धाव घेणारे , गरजूंना मायेची साथ देणारे, अन्याला वाचा फोडणारे सर्वधर्मसमभाव जपणारे अशी भूमिका घेऊन, अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे ठाणे जिल्ह्यातील डॅसिंग व्यक्तिमत्व पत्रकारिता मध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे कार्यकुशल सोशल न्युज नेटवर्कच्या माध्यमाने सरकारला धारेवर धरणारे पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनलचे प्रतिनिधि व नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे ठाणे जिल्हा सचिव ,वंचित बहुजन आघाडी कल्याण पुर्व चे सचिव कल्याण पुर्व मिलिंद नगर चे मूळ रहिवाशी समाज सेवक आयु.विनोद शामसुदंर रोकडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजीक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा केला.

.विनोद शामसुदंर रोकडे यांना नॅशनल दलित मुव्हमेट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क वंचित बहुजन आघाडी AISCST नॅशनल रेल्वे यूनियन यांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या.

सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार विनोद शामसुदंर रोकडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास एन डीए एम जे महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब, मा.बंदिश सोनवणे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष, शशिकांत खंडागळे,एनडीएमजे मुंबई ठाणे प्रदेश सचिव , शंशीकात वाघ, एन.डी.एम.जे. ठाणे जिल्हाअध्यक्ष मा .विजय काबंळे, संदेश भालेराव, सुनील ठेंगे,प्राध्यापक गुरुनाथ कशिवले सर, सागर रोकडे,मनोहर गायकवाड, विपुल पंडित, तसेच बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेतील पदाधिकाऱी रमेश अडसुअळे,नथुराम मोहिते,श्रीधर शिंदे,अविनाश, बावस्कर, संदिप घुसळे,रवींद्र भांबरे,दिपक वाघ, कपिल पगारे,आनंद निरभवणे,विक्रम जाधव,सुरेश शिंदे,सुरेश घोडेराव ह्यांच्या उपस्थितीने सर्व प्रथम बूद्ध वंदना घेउन विनोद शामसुदंर रोकडे यांचा वाढदिवसाचा केक कापुन शाल व पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या मंगल कामना व्यक्त करून पुढील कार्यास मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-माळशिरस नगरपंचायतीचे लोकसेवक वडजे यांनी माळशिरस ते कचरेवाडी हद्दी पर्यंतचा रस्ता डांबरीकरणाचे कामाच्या बिलाचा चेक तिरुपती कंट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचा मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम लाच म्हणून मागितले असल्याबाबत दिनांक 30/9 2021 रोजी तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी अर्ज अँटी करप्शन ब्युरो सांगली यांच्याकडे दिला होता तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार 30/9/2021 ते 22/10/2021 रोजी कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली.
असता पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरणाचे कामाचा बिलाचा चेक तिरुपती कंट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याचे मोबदल्यात एक लाख रुपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठी खर्च 26000 अशी एकूण एक लाख 26 हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर 22/10/2021 रोजी व 01/11/2021 रोजी लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांच्याविरुध्द सापळा कारवाई आयोजीत केली असता लोकसेवक वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांनी संशय आल्याने तक्रार यांच्याकडून स्वीकारली नाही श्री विश्वनाथ दिगंबर वडजे मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर वर्ग-2 यांच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाणे जिल्हा सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई मा श्री राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त पोलीस अधीक्षक व श्री सुरज गुरव अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा अप्पर पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे तसेच श्री संजय घाटगे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदत्त मोरे पोलीस निरीक्षक अविनाश सागर,संजय संकपाळ, अजित पाटील,प्रीतम चौगुले,संजय कलगुटगी,चालक बाळासाहेब पवार पोलीस कर्मचारी अँटी करप्शन ब्युरो सांगली यांनी केले आहे.

एन.डी.एम.जे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची गरज.. ॲड.डॉ.केवल उके

एन.डी.एम.जे. संघटनेची वार्षिक आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा थाटात संपन्न

कल्याण येथे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेची वार्षिक आढावा बैठक डाॅ केवल उके यांच्या अध्यक्षतेत संपन्न…

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेरावदिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेचे बुद्धाभुमी फाउंडेशन, वालधुनी कल्याण येथे वार्षिक आढावा बैठक मोठया थाटात संम्पन्न झाली.
संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या अध्यक्षतेत सदर बैठक आयोजित करण्यात आली होती. बुद्ध वंदना घेऊन आणि संघटनेच्या कार्याच्या चित्रीकरणाचे सादरीकरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या मेळाव्याचे उद्घाटन राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य मा.किशोर मेढे यांच्या हस्ते करण्यात आले व आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेच्या विविध समाजउपयोगी कामाचा उल्लेख करून संघटनेला पुढील कार्यासाठी कोणत्याही शासकिय अडीअडचणीत मदत करण्याची हमी देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्र्यांचे स्विय सहाय्यक मा.प्रविण मोरे, वरिष्ठ विधीज्ञ ॲड.बी जी.बनसोडे, भंते गौतमरत्न, लॅपिवंग ग्रुपचे चेअरमन मा.विनोद जाधव, माजी आयकर अधिकारी मा.किशोर सोमकुवर, मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी मा.किरण सोनवणे, रिपाई नेते अण्णासाहेब रोकडे इत्यादी उपस्थित होते. विचारमंचावरून उपस्थितांना संबोधन करत ॲड.डॉ.केवल उके यांनी एन.डी.एम.जे. कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगत शक्य झाल्यास निवडणुका लढविण्याचे सुद्धा आव्हाहन केले.

यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गत वर्षाचा आढावा, येणाऱ्या २०२२ या वर्षाचे कृती कार्यक्रम आणि नियोजन, मीडिया ॲडव्होकसी, कॅलेंडर, माहितीपत्रक, वार्षिक अहवाल मॅगझिन आणि कमिटीचे बुकलेट तयार करणे, दरवर्षीचे नियोजित कार्यक्रम आर्थिक नियोजन इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्यातून वर्षभराच्या कार्याची ज्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या व कृती – कार्यक्रमांचा फोटो असेलेल्या व्हिडिओ क्लिपस् दाखविण्यात आल्या. यापैकी वर्ष २०२१ या वर्षभरात सर्वात उत्कृष्ठ काम करणाऱ्या सोलापूर, सांगली आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या एन.डी.एम.जे. कार्यकारिणीचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाज कार्य पुरस्कार २०२०-२१” हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. तसेच सातारा जिल्ह्यातील १७ खून प्रकरणात पेंशन मिळवून देणारे सातारा जिल्हाध्यक्ष मा.निवृत्तीतात्या रोकडे यांचे व जिल्हा कार्यकारिणीचे सुध्दा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले.
यावेळी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील कार्यकारिनींची घोषणा करून उपस्थित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सहसचिव मा. पी.एस. खंदारे यांनी केले. संघटनेचे राज्य सचिव मा. वैभवजी गीते यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले त्यावेळी संघटनेचे कार्य आणि संघटना कशी चालवावी, अन्याय अत्याचारा विरुद्ध बंड कसा करायचा आणि पीडित कुटुंबांना न्याय कसा मिळवून द्यायचा यावर आपले अनुभव व्यक्त केले. तसेच मा.वैभव गिते यांच्या विनंती वरून या वर्षी नोव्हेंबर/डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाअधिवेशन घेण्याचे नियोजन करण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर करण्यात आला.
संघटनेच्या राज्य कार्यकारणी समितीमधील ऍड.अनिल कांबळे, मा.रमाताई आहिरे. मा.पंचशीला कुंभारकर, मा.शरद शेळके, मा.बी. पी. लांडगे, मा.प्रमोद शिंदे. मा.ऍड. रुचिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

विभागीय कार्यकारणी समितीमधील मा.बंदीश सोनवणे, मा.शशिकांत खंडागळे. मा. शोभा जाधव, मा.शशिकांत वाघ, मा.राहुल सावंत, मा.भारत गवई. मा.दादा जाधव, हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाणे, पुणे, कल्याण, वाशीम, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, बीड, हिंगोली, धुळे, बुलढाणा, अकोला, यवतमाळ इत्यादी सह जवळपास १७ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आयु.विजय काबंळे व इतर पदाधिकारी मा.विकास चव्हाण, मा.संतोष बनसोडे, मा.विनोद रोकडे, मा.सुनीलजी ठेंगे, मा. संदेश भालेराव, ॲड. प्रविण बोदडे, मा. संदीप घुसळे, मा.विनोद भालेराव, मा.धनंजय सुर्वे, मा.श्रीकांत भोईर, मा.गुरुनाथ कशिवले, मा.सागर रोकडे, मा.विपुल पंडित, मा.गणेश अहिरे,मा.प्रतीक अहिरे, मा. मनोहर गायकवाड इत्यदिंनी केले. आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

You may have missed