तब्बल सत्तावीस वर्षांनी जुन्या आठवणी घेऊन भेटले दहिगावचे मित्र-मैत्रिणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दहावीची परीक्षा दिली की अनेक विद्यार्थी आपापल्या करिअरच्या शोधात सोयीनुसार आपल्या जुन्या सवंगड्यांना सोडून गगन भरारी घेण्यासाठी नव्या दिशा शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यानंतर उच्च शिक्षण, नोकरी,व्यवसाय, नंतर कुटुंबाची जबाबदारी त्याचबरोबर सामाजिक कार्यात सामील होता होता कसे भरभर दिवस निघून जातात कळतच नाही. त्यात अनेक वर्षांनी जुन्या मित्रांची कुठेतरी भेट होते. आणि ठरतं सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यायचं असेच दहिगाव हायस्कूल दहिगाव चे 1997 इयत्ता दहावी चे सर्व  माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेह मेळावा व शिक्षकांचा कृतज्ञता मिळावा चैतन्य कार्यालय शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात माजी शिक्षक श्री चंद्रकांत दीक्षित सर, क्षीरसागर सर, नामदेव राऊत सर, निर्मळ सर , मुकुंद मोरे सर ,श्रीमती ढोबळे मॅडम, अंकुश राऊत सर, ढोबळे सर, पानसरे सर तसेच बनकर मामा, सुळके मामा यांना  फेटा,  शाल ,सन्मान चिन्ह आठवणीचे आंब्याचे रोप आणि पुष्पगुच्छ गुरूंचा सन्मान करण्यात आले.यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणींच्या खूप सार्‍या गप्पा झाल्या.तो / ती सध्या काय करते? मुलं काय करतात? माझं बरं चाललंय,तुझं कसं आहे? अशा अनेक गोष्टी झाल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.या स्नेह मेळाव्यास ५५ विद्यार्थी उपस्थित होते.तसेच दत्ता कदम ,गीतांजली दीक्षित , दादा किर्दक यांनी मनोगत व्यक्त केले.किसन ढोबळे सर , क्षिरसागर सर व दीक्षित सर यांनी मार्गदर्शन केले. उमेश खिलारे यांनी दोस्ती वर गीते गायली.या कार्यक्रमासाठी शहाजान शेख ,नितीन पाटील ,संतोष फुले, वैशाली सोरटे यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प शिक्षिका दिलशाद काझी यांनी केले.आभार प्रदर्शन भिमराव नरळे सर यांनी केले .

You may have missed