राज्यघटना मोडली तर राष्ट्र कोलमडेल : डॅा. रावसाहेब कसबे

संदेश भालेराव मुंबई पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फूले आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव

भारतीय स्वातंत्र्याच्या पर्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना भारत देशाने स्वीकारली. त्यामुळेच आज अठरापकड जाती, धर्माचे १४० कोटी लोक एकत्र नांदत आहेत व आपला देश एक संघ आहे. विविध प्रांत, चालिरीती, भाषा, प्रथा, परंपरा सांभाळून आपण एक आहोत. जर का, राज्यघटनेत छेडछाड केली, तर आपले राष्ट्र कोलमडेल असे परखड मत प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी मंत्रालयात झालेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त संयुक्त जयंती उत्सव समिती २०२४ द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.
अनुसूचित जाती / जमाती / भज-विजा / इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई च्या विद्यामाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून संयुक्त जयंती उत्सव समिती २०२४ च्या वतीने मा. श्री. सिद्धार्थ खरात सहसचिव, गृह विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२६ एप्रिल, २०२४ रोजी मंत्रालय, मुंबई येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य ज्योतिबा फूले आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मा. डॉ. श्री नितीन करीर, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व मा. श्रो. दिनेश वाघमारे प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण उपस्थित होते. बाबासाहेब व महात्मा गांधी यांचे वैचारीक मतभेद होते. बाबासाहेबांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मंजूर झाली. गोलमेज परिषदेत भारतासाठी जो कायदा तयार करण्यात येत होता त्या कायद्याच्या स्ट्रक्चरल कमीटीचे डॉ. बाबासाहेब अध्यक्ष होते. सन १९३५ मध्ये हा कायदा भारतात अंमलात आला. बाबासाहेबांच्या कायदेविषयक ज्ञानाची माहीती महात्मा गांधी यांना होती. भारताला स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना निर्मितीचे काम सुरू होते. महात्मा गांधी यांच्यासमोर बाबासाहेबांचे नाव होते. भारतीय संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा सहभाग असायला हवा याबद्दल त्या काळात ब्रिटीश विदुषी म्युरियल लेस्टर यांनी बाबासाहेब व महात्मा गांधी यांच्या दरम्यान मध्यस्थीची भूमीका पार पाडल्याचे सांगून त्या वेळी पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचे वर्णन प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. शेवटी संविधानातील समता, बंधुता व भातृभावाचे तत्व समजून घेऊन सामाजिक जबाबदारीची भूमीका मंत्रालय व शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, महात्मा फुले यांचा दलित, अस्पृश्य व शेतक-यांसाठीचा संघर्ष तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य हे गुण घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.. संविधानामुळेच आपण सर्वजण जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करू शकलो असे सांगून महापुरूषांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तसेच प्रधान सचिव मा. श्री. दिनेश वाघमारे यांनी बाबासाहेबांनी केलेल्या खडतर विद्यार्थी जीवनाची माहिती सांगितली. विपरीत परिस्थितीतही उच्च शिक्षणाच्या पदव्या मिळविण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. त्यांचे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मंत्राने अस्पृश्यांचे जीवन बदलले. गुणवत्ता हा बाबासाहेबांचा मुख्य गुण असून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तो अंगीकारावा असे प्रतिपादन त्यांनी केले. संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण, उच्च शिक्षण, गुणवत्ता, चारित्र्य, स्वाभिमान व राष्ट्राभिमान ही गुणवैशिष्ट्ये आहेत असे सांगून ते सिम्बॅाल ॲाफ नॅालेज आहेत असे सांगितले. तसेच महात्मा फुले हे समता व समानतेबाबत लेव्हल फिल्डींगचा आग्रह धरणारे होते. तर ध्येय , निती, शौर्य आणि रयतेचा विचार छत्रपती यांनी मांडलेला असून महाराष्ट्र ही संतांची व महापुरुषांची भूमी आहे, मंत्रालय, पॅावर हाऊस मधून त्यांचे विचार आणि वारसा आपण चालवला पाहिजे असे विचार व्यक्त केले आणि संघटनेच्या कार्याचा गौरव केला.
अनुसूचित जाती / जमाती / भज-विजा / इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई चे अध्यक्ष भारत वानखेडे, यांनी राज्यभर कार्यरत असलेल्या संघटनेच्या कार्याची माहीती देऊन दरवर्षी घेण्यात येत असलेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहीती दिली. डॅा. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या प्रयत्नांची व त्यानंतर मिळालेल्या यशाची माहीती सांगितली. तसेच गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मा. सुजाता सौनिक मॅडम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्याची व पुस्तक विक्रीला प्रचंड प्रतिसादा मिळालेल्याबद्दल ची माहीती दिली…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती .शिल्पा नातू यांनी केले, पाहुण्यांचा परिचय श्री. संतोष साखरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन करताना श्री. सी. आर. निखारे यांनी महापुरुषांचा विचाराचा प्रचार व प्रसारही करण्याचे कार्य संघटनेच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून करीत असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी सुभाष गवई, अंबादास चंदनशिवे, भास्कर बनसोडे, सुबोध भारत, विजय नांदेकर, सी.आर. निखारे, एन. डी. पाटील, सविता शिंदे,, प्रिया रामटेककर, डी.के.खाडे, , श्रीम. चि. नि. सूर्यवंशी, अशोक आत्राम, राजेंद्र सवणे, अजित तायडे, रामदास शेळके, सुनील सरदार, गोपीनाथ कांबळे, नितीन सुर्वे, मनोहर बंदपट्टे, सविता साळुंखे, विकास थोरात, राजेश साळुंके, , प्रशांत सदांशिवे, देविदास भगुरे, रवींद्र पेटकर, सुनील सामंत, पूजा भोसले, विलास थोरात,सपना चव्हाण, राजेंद्र खरात, रविंद्र पवार, दयानंद कांबळे, रसिक खडसे, , मनोज कांबळे, , अरुण कसबे, ,संजय जाधव, विशाल घाडगे, विशाल जोंधळे, विलास थोरात, , विलास धायजे, विकास कांबळे, रविंद्र बोर्डे, संजय कुऱ्हे, बिकेन ठाकूर, विजय अंभोरे, तुषार पैठणकर, , , दीपक बैले मुरलीधर आढाव, , गजानन सारुकते, नरेंद्र शेजवळ, अश्विनी मेंढे, सुनील जाधव, योगेश वासनिक, विजय भोसले, प्रभू कदम, सुनील खाडे, मनीषा जमदाडे,महेश वालदे, प्रदीप खडसे, , , संध्या सोनवणे, श्रीराम गवई, मारुती फड, रोहित गमरे, भारती कोरगावकर, नितीन साखरे, अभिजीत कांबळे, , मिलिंद कांबळे, संदीप कांबळे, मनोज जोगदंड, विजय भोसले, मदन सोंडे, राजेंद्र बच्छाव, , सुरेंद्र सोनकांबळे, सुशील कांबळे विनायक कांबळे, कैलास मुंगरे, प्रकाश जाधव, , अमोल जल्हारे, कैलास शेलार, अशोक जाधव, रत्नप्रभा बेले, संभाजी जाधव, प्रविण पवार, संतोष साखरे, सुगंधा पवार, निलिमा मेश्राम, ज्ञानेश्वर पाटमासे, , डी. के. खाडे, किरण गावतुरे, दिलीप देशमुख, रवींद्र मिठबावकर, इत्यादी पदाधिकारी तसेच इतरही मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed