प्रमोद शिंदे

पिरळे येथे खासदार व आमदार यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे तालुका माळशिरस येथे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील खासदार माढा मतदार संघ आमदार उत्तमरावजी जानकर साहेब( आमदार माळशिरस विधानसभा) यांचा भव्य नागरी सत्कार तसेच दलित पॅंथर चे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दि-20 जानेवारी २०२५ रोजी सायं.6 वा. आयोजीत केला आहे.तसेच यावेळी पारंपरिक गाजी ढोल खेळ होणार असून यात सहभागी होणारे गजी मंडळ  श्री नाथ गजी मंडळ लोणंद धुळदेव गजी मंडळ  मारकडवाडी सतोबा गजी मंडळ बांगर्डे बिरदेव गजी मंडळ पांगरी व टाकेवाडी. बानलिंग गजी मंडळ फोंडशिरस,चक्रेश्वर हलगी, सनई ग्रुप चाकोरे ,हलगी ग्रुप पलसमंडळ / मावळा, दहा जणांचा तुतारी ग्रुप, कै. बबनरावजी ठोंबरे गजी मंडळ उंबरे दहीगांव या द्वारे मा. खा. धैर्यशील मोहिते पाटील व  आ. उत्तमरावजी जानकर यांची भव्य- दिव्य अशी मिरवणूक व JCB मधुन पुष्प वृष्टी होणार आयाजन करून गवच्यावतीने भव्य असा  नागरी सन्मान सोहळा समत विद्यालय क्रीडांगणावर संपन्न होणार असून मान्यवरांचे हस्ते समता माध्य.व. श्री भिदेवी कनिष्ठ, पिरळे,एस. एम. एस. इंग्लिश मेडिअम स्कूल पिरळे यांचा  वार्षिक स्नेह संम्मेलन उद्धघाटन सोहळा संपन्न होणार आहे.पंच कृशितील सर्व नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दालित पँथर जील्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे व प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन- सचिव आबारत्न शिक्षण संस्था, पिरळेसरपंच व सर्व सदस्य ग्रा.पं.पिरळेचेअरमन व सचिव सर्व सदस्य वि.का.स.पिरळेसमस्त ग्रामस्थ पिरळे माळशिरस यांनी केले आहे.

जि प शाळा पिरळे येथे युद्ध कला शिबरास प्रारंभ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे प्राचीन युद्ध कला शिबिराचे आयोजन करण्यात आल आले आहे हे शिबिर दिनांक 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत घेण्यात येणार असून. या शिबिरात लाठीकाठी दांडपट्टा तलवार ढाल चालवणे शिकवले जाणार असून त्यासोबत व्यायामाचे प्रकार सुद्धा मुलांना शिकवले जातात. सायंकाळी चार ते सात या वेळेमध्ये हे शिबिर होणार असून 100 विद्यार्थ्यांचा सहभाग या नोंदवाला गेला आहे. हे शिबिर कोल्हापूर येथील सरसेनापती धनाजीराव जाधव प्रतिष्ठान पेठ कोल्हापूर आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. हे शिबिर डॉक्टर फुले यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. प्रशिक्षक म्हणून वैष्णवी गोंदकर व त्यांचे सहकारी हे आहेत शिबिर घेण्यासाठी मुख्याध्यापक संजय ढवळे सर शिक्षक हनुमंत फुले सर निगडे सर व सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतला आहे.

परभणी येथील हिंसाचार प्रकरणाची तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठित

शासनाने गठीत केलेल्या न्यायालयीन चौकशी समिती मध्ये सुधारणा करणे आवश्यक…… वैभव गिते.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने ऍड.डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात एक शिष्टमंडळ परभणी येथे संविधान शिल्प प्रतिकृती विटंबना प्रकरण व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू या प्रकरणाबाबत भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन फिर्यादी वैभव गिते,पी.एस खंदारे, शरद शेळके, दिलीप आदमाने, संजय माकेगावकर,जगदीप दिपके,ऍड
नवनाथ भागवत यांच्या टीमने परभणी दौऱ्यात हकीकत जाणुन घेत साक्षीदार यांचे म्हणणे जाणून घेऊन एक सत्यशोधन अहवाल नागपूर हिवाळी अधिवेशन येथे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन हा फॅक्ट फाइंडिंग अहवाल प्रकाशित करण्यात आला.
यामध्ये परभणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडी मधील मृत्यूप्रकरणी व संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना गुन्ह्याबाबत न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात मा. विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देताना मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केल्यानुसार दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाची तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत येईल असे आश्वासित करण्यात आले होते. त्यानुसार
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने
दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणाची तसेच कोठडीत असलेल्या स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दि. १५.१२.२०२४ रोजीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश मा. व्ही. एल. आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली “एक सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.२. सदर न्यायालयीन चौकशी समितीसाठी संदर्भ अटी (The Terms of Reference/ToR) खालीलप्रमाणे असतील(अ) दि. १० डिसेंबर, २०२४ रोजी परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या हिंसाचार प्रकरणातील तसेच स्व. श्री. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे व परिणाम याचा अभ्यास करणे,
(आ) या घटनेसाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का याची तपासणी करणे.(३) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने केलेले नियोजन आणि तयारीची पर्याप्तता (Adequacy) पुरेशी होती किंवा कसे?(ई) उपरोक्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का याची तपासणी करणे.(उ) उपरोक्त अट (आ), (इ) आणि (ई) संदर्भात जबाबदारी निश्चित करणे,(ऊ) अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी करावयाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरुपी उपाययोजना सुचवणे.(ए) सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित इतर कोणतीही महत्त्वाची सूचना करणे.३.सदर न्यायालयीन चौकशी समितीस खालील अतिरिक्त अधिकार असतील :-१. सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी चौकशी समिती कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलाविण्याचा अधिकार राहिल.२. कोणत्याही इमारतीत / जागेत प्रवेश करण्याचा अधिकार किंवा त्यासाठी कोणालाही प्राधिकृत करण्याचा अधिकार आणि कोणतेही संशयित दस्ताऐवज, खाते किंवा कागदपत्रे इ. जप्त करण्याचा अधिकार राहिल३. समितीसमोरील कार्यवाही ही न्यायालयीन स्वरुपाची कार्यवाही राहील.४. चौकशी समितीचे मुख्यालय परभणी येथे राहील. चौकशी समिती स्वतः च्या कार्यपद्धतीचे नियमन करेल, चौकशी समिती या दुर्घटनेची चौकशी करुन आपला चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह सदरहू शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या आत शासनास सादर करेल.असा शासन निर्णय गृह विभागाने 15 जानेवारी 2025 रोजी काढलेला आहे.
21 डिसेंबर 2024 रोजी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी बोलताना परभणी व बीड या दोन्ही प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने 15 जानेवारी 2025 रोजी म्हणजे तब्बल 25 दिवसांनी विलंबाने एक सदस्य चौकशी समिती स्थापन केलेली आहे.या चौकशी समितीमध्ये नऊ सदस्य असावेत. या नऊ सदस्यांमध्ये माजी न्यायमूर्ती अध्यक्ष व मुख्य सचिव सुजाता सौनीक (IAS) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे (IAS) आयुक्त समाजकल्याण पुणे ओम प्रकाश बखोरीया (IAS),माजी IAS अधिकारी माजी IPS आय.पी.एस अधिकारी,सिनियर कौन्सिल यांचा समावेश तात्काळ करावा.दी.10 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या संविधान प्रतिकृती शिल्प विटंबना गुन्ह्यात तपासी अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केली आहे का? या तपासात निष्काळजीपणा केला आहे का? आरोपीस शिक्षा होईल असे पुरावे प्राप्त केले आहेत का ?महापुरुषांच्या प्रतिमांचे पुतळ्यांचे विटंबना अवहेलना होऊ नये याकरिता उपाययोजना सुचविणे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशी दुर्दैवी घटना घडल्यास शासन व प्रशासनाच्या वतीने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता करावयाच्या उपायोजना सुचवाव्यात.भारतीय संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या अनुषंगाने उसळलेल्या आंदोलन प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन लाटी हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले होते याबाबत लेखी आदेश प्राप्त करून बेकायदेशीर आदेश देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत अथवा पोलीस कोठडीमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसल्याची बातमी जिल्हाधिकारी यांनी दिली. हा व्हिडिओ पोलीस अधीक्षक परभणी यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.असं काहीही घडलं नाही ही अफवा आहे असा व्हिडिओ जिल्हाधिकारी यांनी का जारी केला. याबाबत जिल्हाधिकारी यांचा जबाब नोंदवून याची चौकशी करावी.या समितीच्या पुढे सामान्य नागरिक, पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेले लोक, पीडित संस्था संघटनांना, वकिलांना लेखी युक्तिवाद करण्याची, लेखी म्हणणे मांडण्याची परवानगी असावी.या समितीने आपला अहवाल एक महिन्याच्या आत स्वतंत्र मूल्य निर्धारित करत आपल्या स्वयं स्पष्ट अहवालासह शासनास सादर करावा. समितीने शासनास सादर केलेला अहवाल जनतेसाठी खुला करावा.समितीच्या या अहवालावर कार्यवाही करणे शासनास बंधनकारक असावे.समितीचे सर्व कार्यवाही व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे पूर्ण करावी.शासनाने स्थापन केलेल्या एक सदस्य चौकशी समितीमध्ये बदल करून आम्ही सुचवलेले कार्य व जबाबदारी समितीच्या सदस्यांना देण्यात यावी..इत्यादी सुधारणा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर या संघटनेचे वतीने शासनास सुचवण्यात आलेल्या आहेत. या सुधारणांवर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता या सुधारणांसह निवेदन
एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते शासनास देणार आहेत.

जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

जमिनीच्या वादातून झालेल्या खुनाच्या प्रकरणावरून माळशिरस सत्र न्यायालयाने तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,
नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक 20/10/2021 रोजी 00.29 वाजता फिर्यादी नामे – बापू नाना वाघमोडे वय – 35 वर्ष राहणार, फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली की
फिर्यादीची मौजे फोंडशिरस फुले मळा तालुका माळशिरस येथे जमीन गट नंबर 1413 जमीन आहे सदर सामाईक जागेवरून फिर्यादीचे वडील नामे – नाना अण्णा वाघमोडे वय – 70 वर्ष यांचे बरोबर भावकीतले नामे 1. किरण महादेव वाघमोडे व 19 वर्षे 2.अंकुश महादेव वाघमोडे वय 27 वर्ष 3. धर्मेंद्र महादेव वाघमोडे वय 35 वर्षे यांनी संगणमत करून वडील नाना अण्णा वाघमोडे यांना लोखंडी पाईप ने डोकीत मारून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले म्हणून वैगरे मजकुराची फिर्याद वरून नातेपुते पोलीस ठाणे येथे गुर नंबर 365/ 2021 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 302 307 323 504 506 34 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल झाला होता,सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर हे करीत होते सदर दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर यांचे मार्गदर्शनाखाली दप्तरी सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे यांनी काम केले तसेच तपासाचे दरम्यान आरोपी विरुद्ध सबळ असा पुरावा हस्तगत करून सदर आरोपीविरुद्ध माननीय सत्र न्यायालय माळशिरस येथे दोषारोप पत्र दाखल केले होते माननीय सेशन कोर्ट न्यायाधीश श्री एल डी हुली सत्र न्यायालय यांनी सदर गुन्ह्याचे ट्रायल चालूउण सदर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना दोषी धरून दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने i) भा.द.वि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी 5000रुपये दंड,दंड न भरल्यास 1 वर्ष सश्रम कारावास तसेच 504,506,34, मध्ये 1वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठाण्यात आली आहे ।। आशी शिक्षा सुनावली आहे सदर केससाठी पुण्यातील सबळ पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन उत्कृष्ट पने कर्तव्य पार पाडलेले आहे सरकारी वकील एस एस पाटील ,कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे ,पोलीस नाईक मारुती शिंदे यांनी काम पाहिले आहे
सदरची कामगिरी माननीय डी वाय एस पी शिरगावकर साहेब प्रभारी अधिकारी सपोनी महारुद्र परजणे साहेब ,तत्कालीन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर साहेब, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल गडदे मा.सरकारी वकील एस एस पाटील साहेब ,कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घाडगे, पोलीस हवालदार मारुती शिंदे यांनी केली आहे

सहकार महर्षींनी माळशिरस च्या माळरानावर नंदनवन फुलवलं-पद्मजादेवी मोहिते

पाटील-संपत्तीचे वारसदार होण्यापेक्षा सुसंस्काराचे वारसदार बनणे श्रेष्ठ – पद्मजादेवी मोहिते-पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचे उद्देशाने दिनांक सात जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले यामध्ये प्रा. नारायण माने यांच्या मार्गदर्शनाखाली मुले- मुली यांच्या कबड्डी, खो-खो आदी क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच काव्यवाचन, वक्तृत्व, गायन, निबंध लेखन, पुष्प सजावट,रांगोळी, हस्ताक्षर, पारंपारिक दिन या सारखे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आटपाडी येथील प्रा शहाजी पारसे यांचे ‘ सहकार महर्षी आणि त्यांचे जीवनकार्य‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले,सामान्य माणसाविषयी त्यांच्या मनात अपार श्रध्दा होती. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी ते तत्पर असत. वंचितांचे, उपेक्षितांचे आणि शेतकऱ्यांचे- शेत मजुरांचे जीवनमान उंचावले जावे. त्यांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे या विचाराने ते समाज सेवा करीत राहिले. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन त्यांनी अकलूज येथे शैक्षणिक संकुल उभा केले. अनेकांना रोजगार निर्माण व्हावा शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती साधता यावी यासाठी त्यांनी दूध संघ, कुकुटपलान, जर्सी गायी छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते-पाटील उपस्थित होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते म्हणाले
माळशिरस च्या माळरानावर सहकार महर्षींनी नंदनवन फुलवलं तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी समाजकार्य वा राजकारण करताना भेदभाव कधी केलानाही.
सहकार महर्षी यांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, या हेतूने तालुक्यातील सर्व संस्थांची सहकार तत्त्वावर उभारणी केली. आज त्यांच्या विचारांचा वारसा चालविण्याची गरज आहे, असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील महाविद्यालयात सहकार महर्षीच्या १०७ व्या जयंतीनिमित्त बोलताना
ते पुढे म्हणाले, महर्षींनी राजकारणासाठी राजकारण कधीच केले नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने त्यांचे राजकारण होते असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निवृत्त प्राचार्य डॉ चंद्रकांत कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमा मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुनील राऊत, निनाद पाटील, एन. के. साळवे, समीर सोरटे, अभिमन्यू आठवले, मनोज राऊत, सुनील गजाकंस,श्रीकांत बाविस्कर,, सुनील ढोबळे, संजय पवार , या सर्व पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ , डायरी पेन देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार प्रमोद शिंदे यांची द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निनाद पाटील, सुनील राऊत आपल्या मनोगतातून सहकार महर्षी यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
प्र प्राचार्य डॉ रज्जाक शेख, डॉ दत्तात्रय साळवे आणि विद्यापीठ सुवर्णपद विजेता अजय कुंभार यांचा विशेष मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सांस्कृतिक विभागातील प्रा नितीन देशपांडे, प्रा सौ पुष्पा सस्ते, प्रा सौ रब्बाना शेख, प्रा. दयानंद साठे, प्रा राजेंद्र साठे, प्रा. उत्तम सावंत, प्रा जगदीशचंद्र मुळीक, प्रा श्रीकांत पवार,प्रा डॉ बाळासाहेब निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ रज्जाक शेख यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र खंदारे यांनी केले तर प्रा. सुहास नलवडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

रायझिंग डेनिमित्त नातेपुते पोलिसांकडून 6 लाखाचा चोरी गेलेला मुद्देमाल फिर्यादिला दिला गिफ्ट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे


नातेपुते पोलीस ठाणेकडील चोरी घरफोडी सारख्या विविध उघडकीस आणलेल्या गुन्हयामधील व चोरी झालेले २० मोबाईल असे एकुण ०६,१६,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे व मोबाईल “महाराष्ट्र पोलीस रेजींग डे सप्ताह” निमीत्त मुळ फिर्यादीस परत करून दिले गिफ्ट


याबाबत हकीकत आशिकी
नातेपुते पोलीस ठाणेस मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो। सोलापुर ग्रा., मा. श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो। अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे हददीत दिनांक ०९/०८/२०२३ रोजी रात्राो ०२:०० वा ते ०३:४५ वा चे दरम्यान फिर्यादीनामे श्री सुभाष नरहरी केंजळे वय ५४ वर्षे व्यवसाय शेती रा केंजळेवस्ती धर्मपुरी ता माळशिरस यांचे राहते घर फोडुन घरफोडी झालेबाबत फिर्याद प्राप्त झाली होती. त्यांची तक्रारीवरुन नातेपुते पोलीस ठाणे येथे २५३/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री महारुद्र परजने नातेपुते पोलीस ठाणे हे करीत होते. सदर गुन्हयाचा तपास करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहिती मिळवुन सदर गुन्हा करणारे वेगवेगळे आरोपीना नातेपुते पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी श्री विक्रांत डिगे पोलीस उपनिरीक्षक व पोहकॉ राहुल रणनवरे पोहेकॉ नवनाथ माने, पोना अमोल वाघमोडे पोना राकेश लोहार पोकॉ नवनाथ चव्हाण यांनी आरोपीनामे देवगण बापु उर्फ विजय पवार रा आटपाडी सांगली यास अटक करुन त्यांचेकडुन वरिल गुन्हयातील २,००,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिणे हस्तगत केले होते सदरचे सोने फिर्यादीस देणेबाबत श्री. यु बी पेठे मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस न्यायालय यांचे आदेश झाल्याने तसेच नातेपुते पोलीस ठाणे परिसरातील गहाळ व चोरी झालेले वेगवेगळया कंपणीचे मोबाईल पोकॉ रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे, पोकॉ रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक विश्लेशन करुन सुमारे ४,१६,०००/-रु किंमतीचे वेगवेगळया कंपणीचे २० मोबाईल हस्तगत केले असुन वरिल एकुण ६,१६,०००/- रु किंमतीची मुददेमाला “महाराष्ट्र पोलीस रेजींग डे सप्ताह” चे औचित्य साधुन वरिल मुददेमाल मा. श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोो सोलापुर ग्रा., मा. श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा. मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोा अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपुर्वक वरिल सर्व गुन्हयातील फिता यांना बोलावुन घेवुन त्यांना सोन्याचे दागिणे व मोबाईल परत करण्यात आले त्यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे श्री महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकॉ रामचंद्र चौधरी, पोहेकॉ राहुल रणनवरे, पोहेकॉ महादेव कदम, पोना राकेश लोहार, पोकॉ रणजित मदने, पोकॉ दिनेश रणनवरे, पोकॉ नितीन पन्नासे, पोकॉ अमोल बंदुके, पोकॉ सोमनाथ मोहिते, पोकॉ रमेश बोराटे, पोकॉ गणेश कुलकर्णी, पोकॉ रमेश कर्चे, पोकॉ अमोल देशमुख, पोकॉ नवनाथ थिटे, मपोकॉ नेहा बोंदर यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेच कौतुक करण्यात येत असुन नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रणजीत कागदे यांना पीएच.डी.प्रदान


माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रणजीत भारत कागदे यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
दसूर येथील रणजीत कागदे हे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. त्यांनी वेलटेक युनिव्हर्सिटी चेन्नई येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम विथ रिस्क लेव्हल इव्हॅल्युएशन इन वायरलेस सेन्सर नेटवर्क युजींग ऑप्टिमायझेशन असिस्टेड डिप लर्निंग मेथडस् या विषयामध्ये पीएच.डी पूर्ण केली. यामध्ये त्यांना प्राध्यापक आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.एन विजयराज यांनी मार्गदर्शन केले. कागदे यांनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला. त्यांचे पाच शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसूर, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने महाविद्यालय अकलूज, पदवी शिक्षण बी.ई. (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी), स्वेरी, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर येथे तर पदव्युत्तर शिक्षण: एम.ई. (संगणक अभियांत्रिकी), सिंहगड इन्स्टिटयूट, पुणे येथे झाले आहे.
कागदे यांच्या या यशाबद्दल दसूर गावासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

नितेश माने वाढदिवसानिमित्त261 जणांनी केले रक्तदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते येथे नितेश माने यांच्या वाढदिवसानिम्मित संयुक्त प्रतिष्ठान नातेपुते च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस लोकांचा पार्टी करण्याचा,एन्जॉय करण्याच्या दिवस तरी पण शिना माने यांचा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क च्या जोरावर 261जनानी रक्तदान करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला.या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.रक्तदान 7:30 वाजता संपल्या नंतर ही मित्र परिवार रक्तदान करण्यासाठी येत होताच पण वेळेअभावी त्यांना रक्तदान करता आले नाही.हा कार्यक्रम यशस्वी होण्या साठी संयुक्त प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम  घेतले या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकावर नातेपुते पोलिसांकडून कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते पोलीस ठाणे अंतर्गत आगामी नवीन वर्षाच्या अनुषंगाने सर्व वाहनधारकाने ” वाहतुकीचे नियम पाळावे व अपघात टाळावे ” तसेच जे वाहनधारक हे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आशा वाहनधारकावर वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेले आहे
1) वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे 13 केसेस 13,000/ दंड
2) विना हेल्मेट वाहन चालविणे 58 केसेस 58,000,/हजार रुपये दंड3) ट्रिपल सीट वाहन चालवणे 28 केसेस 28,000/ हजार रुपये दंड4) वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभा करणे 40 गुन्हे दाखल केले.वाहनधारकाने रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून मोटर वाहना अधिनियम अन्वये 2115 किसेस करून जवळपास 12,25,400/- रुपयापर्यंत दंड आकारणी केलेली आहे तसेच मध्य प्राशन करून वाहन चालवले म्हणून 22 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच आगामी नवीन वर्ष स्वागत अनुषंगाने काही वाहनधारक हे दारू पिऊन गाडी चालवतात आशा तळी रामावर नातेपुते पोलीस स्टेशन मार्फत वेगवेगळ्या पथके नेमलेले असुन त्यामध्ये Api महारुद्र परजने, psi विक्रांत दिघे , पोलीस कॉन्स्टेबल , विश्वास जानकर, सुधीर हंगे, गणेश कुलकर्णी, रमेश करचे ,सोमनाथ मोहिते, सचिन चव्हान अमलदार , अधिकाऱ्यांची पथके नेमलेले असून सक्त करवाई करण्यात येत आहेत याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस API महारुद्र परजने यांनी माहिती दिली.

जय भीम शिवपालक अध्यक्ष आमचा लढवय्या नेता गेला- वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
धनाजी तुकाराम शिवपालक यांचा दिनांक 25/12/2024 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रक्षा विसर्जन दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 7.30 वाजत होणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे नेते धनाजी शिवपालक यांच्या अकाली अचानक झालेल्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार राज्य महासचिव
ऍड. डॉ. केवलजी उके यांनी श्रद्धांजली पर मनोगतात सांगीतले.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले की आमचे नेते सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज,ढाण्या वाघ,
धनाजी शिवपालक यांच्या निधनाच्या नंतर आम्ही शिवपलक यांच्या कुटुंबीयांच्या सोबत शेवट पर्यंत आहोत.
सर्वांनी पार्थिवाचे अंतीम दर्शन घेतले.
धनाजी शिवपालक यांच्यासारखा निस्वार्थी वाघासारखा लढणारा शेवटपर्यंत साथ देणारा मित्रत्व जपणारा नेता आम्ही हरवला आहे… असे उदगार आंबेडकरी चळवळीचे नेते व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाईंजे यांनी काढले.
यावेळी मुंबईहुन उद्योजक सामजिक कार्यकर्ते विनोद जाधव व मुंबई प्रदेश सचिव शशीभाऊ खंडागळे, ऍड.सुमित सावंत,महेश शिंदे मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष हे उपस्थित होते. त्यांनीही शिवपालक यांना श्रद्धांजली दिली. हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले संविधान वय 10 वर्ष अनिरुद्ध 6 वर्ष अशी मुलांची नावे आहेत.
धनाजी शिवपालक हे अन्याय अत्याचाराच्या विरोध लढणारे एक लढवय्या योद्धा होते. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता.
धनाजी शिवपालक हे मातंग व बौद्ध समाजाला जोडणारा मौल्यवान महत्त्वाचा दुवा होते. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांच्या अडचणीमध्ये धावून जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे हा शिवपालक यांच्या स्वभावाचा एक भाग होता. आपल्या स्वभावाने माणसांना जोडत राहणे हा त्यांचा विशेष गुण होता.
उंबरे पागे तालुका पंढरपूर या गावात बौद्ध मातंग दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता हा अन्याय धनाजी शिवपालक यांनी मोडून काढला शिवपालक यांनी मंदिर प्रवेश करून मंदिर सर्वांसाठी खुले केले होते. पण ते स्वतः कधीही मंदिरात जात नव्हते.जे मंदिर सर्व समाजासाठी खुले आहे फक्त दलितांना सोडून ही बाब त्यांना खटकत होती. तहसील कार्यालय पंढरपूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलने मोर्चे काढून अनेक आंदोलन त्यांनी यशस्वी केली.
त्यामुळे धनाजी शिवपालक यांना समाजभूषण पुरस्कार,
फुले शाहू आंबेडकर पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वाशिम येथे घेण्यात आलेल्या महाअधीवेशन दरम्यान धनाजी शिवपालक यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यात बौद्ध मातंग चर्मकार होलार व अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे अकरा खून प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबीयांना शासकीय नोकरी जमीन व पेन्शन मिळवून देण्यात धनाजी शिवपालक यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग सिंहगर्जना केल्यासारखे भाषण, वाघाच्या डरकळ्या फोडल्यासारख्या महापुरुषांच्या घोषणा धणाजी शिवपालक द्यायचे.. आझाद मैदान मुंबई येथे देखील त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी कंटिजंसी प्लॅन लागू होण्यासाठी आंदोलन केले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील पंढरपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाल्याच्या नंतर संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी धनाजी शिवपाल हे सज्ज झाले होते. भारतीय संविधान व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास त्यांचा चालू होता.
धनाजी शिवपालक यांचे ऐतिहासिक सामाजिक कार्य पाहून शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने धनाजी शिवपालक यांना सोलापूर जिल्ह्याच्या सर्व शासकीय उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती वरती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
प्रांत,तहसीलदार,डी.वाय.एस.पी,पोलीस निरीक्षक यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे शासन निर्णय,परिपत्रकाचे दाखले देणे व गोरगरिबांची कामे करणे यामध्ये शिवपालक यांचा हातकंडा होता. अनेक नव्याने आंबेडकरी चळवळीत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी शिवपालक एक ऊर्जा स्त्रोत होते. नवख्या पदाधिकाऱ्यांना नवख्या नेत्यांना शिवपालक नेहमी मार्गदर्शन करायचे.

माझ्या खांद्याला खांदा लावून मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख बजावने, माझा शब्द खाली न पडू देने, माझ्या सुरक्षेची काळजी घेणे, असा ऑलराऊंडर नेता आज आमच्यात राहिला नाही. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे कायम अमर राहील.
धनाजी शिवपालक यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला. मातंग समाजाला आंबेडकर वाद शिकवणारा संविधान समजावून सांगणारा, मातंग व बौद्ध या दोन्ही समाजामध्ये समन्वय साधनारा सामंजस्य निर्माण करणारा कोहिनूर हिरा म्हणजे धनाजी शिवपालक होय.
सकाळी उठले की जय भिम, झोपताना जय भीम, जय भीम हा शब्द म्हणजे शिवपालक यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला.
मी महाराष्ट्रातली अनेक हत्या व हत्याकांड पाहिले आहेत. अनेक प्रकारच्या केसेस हाताळले आहेत परंतु माझ्या डोळ्यात कधी पाणी आणले नाही. आज धनाजी शिवपालक यांनी या दगडासारख्या मनाच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आणले.

माणुस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य धनाजी शिवपालक यांच्यासाठी तंतोतंत लागु होते.

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
सदस्य जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती पुणे
8484849480

You may have missed