टोकावडे येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क
संदेश भालेराव

…..य.स.दा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ,ग्रामस्थ मंडळ टोकावडे, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून काल मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावात जी प्लस हार्ड हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे वन विभाग कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बीपी, डायबीटीस, इसीजी तपासणी, डोळे तपासणी, हाडांची तपासणी तसेच यावेळी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते .या शिबिरासाठी यसदा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केवल ऊके तसेच यसदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे , भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा अध्यक्ष भरत दळवी सर, तसेच एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य सचिव वैभवजी गिते
टोकावडे येथील श्रमजीवी संघटनेचे युवा कार्यकर्ते दिनेश नंदकर, तसेच एन.डी.एम.जे.संस्थेचे मुंबई ठाणे विभाग अध्यक्ष बंदीश सोनवणे , सिव्हिल इंजिनियर सतेश तायडे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे पत्रकार संदेश भालेराव आदी उपस्थित होते. सामाजिक महिला कार्यकर्त्या गौरी गीते व एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली सचिव संदिप घुसळे सर उपस्थित होते .यावेळी ग्रामस्थ मंडळ टोकवडे यांच्या वतीने यसदा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच जी प्लस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचेही स्वागत करण्यात आले. अनेकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डोळे तपासणीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. लाईफ लाईन ब्लड बँक बापगाव यांच्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले .पुढच्या आठवड्यात २२ जून २०२४ रोजी चासोळे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एन.डी.एम.जे.महाराष्ट्र महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके यांनी संपूर्ण मुरबाड ,कल्याण ,बदलापूर, अंबरनाथ या ग्रामीण भागात यशदा संस्थेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे असे सांगितले. भरत दळवी यांनी यावेळी सांगितले की मुरबाड, कल्याण ,बदलापूर ,अंबरनाथ या ग्रामीण भागामध्ये यशदा संस्थेच्या माध्यमातून आरोग्य आपल्या दारी ,दवाखाना आपल्या दारी या उपक्रमावर भर दिला जाणार आहे. आरोग्य आपल्या दारी ही मोहीम यशस्वी होणार आहे .यावेळी यावेळी हेही उपस्थित होते. या शिबिराला डॉक्टर योगेश राठोड आणि डॉक्टर योगेश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी चेतन मानधने ,जगदीश शिवदे, अशोक ठाकरे, अभय नंदकर, किशोर साबळे , हरीचंद्र पवार, सुशील चकवा तसेच टोकावडे गावातील सर्व युवा कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले
.

You may have missed