माळशिरस तालुका

दहिगव येथील अक्षय जयसिंग मोरे याची बँक असिस्टंट पदी निवड

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

अक्षय मोरे यांची बँक असिस्टंट पदी निवड झाली असून दहिगाव परिसरात उत्साहाचे वातावरण नर्माण झाले आहे आहेअक्षय जयसिंग मोरे यांनी पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण दहिगाव येथुन घेतले 11 वी ते 12 पर्यंतचे शिक्षण नातेपुते येथील बा.ज.दाते प्रशाला येथुन घेतले परत पुढील शिक्षण विश्वासराव रणसिंग कॉलेज कळंब मधुन घेतले अक्षय याचे पहिल्यापासून स्वप्न  पोलिस होण्याचे होते. थोड्या थोड्याच मार्कत पोलिस होण्याचे स्वप्न राहिले घरची परिस्थिती मध्यम होती सामाजिक क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे  जयंती महोत्सव व इतर कार्यक्रम अस  स्वतः पुढाकार घेऊन ते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत असे. तसेच राजकारणातील आवड मोठ्या मोठ्या लोकांची जीवाभावाचे संबंध खूप मोठा मित्रपरिवार तसेच खूप संघर्ष करत आपल्याला काय तरी बनायचे आहे ही जिद्द चिकाटी व कष्ट अभ्यास करून कधी कधी डायव्हिंग, पेंटींग चे शेतातील कामे,वेल्डिंगची काम करत  कंपनी मध्ये पण काम केले CA यांच्या ऑफिस मध्ये काम केले आहे .बजाज फायनान्स मध्ये पण लोन  ऑफिसर म्हणून काम केले  अक्षय मोरे यांनी अजुन अभ्यास चालू ठेवला असून आता त्याची बँक अकाऊंट असिस्टंट म्हणून निवड झाली आहे. त्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबोली चे मुख्याध्यापक दादासाहेब साळवे सर व मित्रपरिवार यांचे मार्गदर्शन लाभले.

रत्नत्रय प्री स्कूल नातेपुतेच्या बाल चमू चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम अतिशय धूम धडाक्यात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
‌. ‌‌. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित रत्नात्रेय प्री स्कूल नातेपुते, येथे दिनांक १०/३/१५(सोमवार) रोजी स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम, घनवट बिल्डिंग, मोरे हॉस्पिटलच्या प्रांगणात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माननीय डॉक्टर श्री एम पी मोरे (वैद्यकीय अधिकारी) , ॲड. मयूर शहा (कर सल्लागार), नातेपुतेचे ए पी आय महा रुद्र पपरजने साहेब, नगरसेविका शर्मिला चांगण श्री हनुमंत धालपे यांच्या उपस्थितीत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमास रत्नत्रय परिवारातील रत्नत्रय स्कूल मांडवे चे सचिव माननीय श्री प्रमोद दोशी, रत्नात्रेय प्री स्कूलचे सभापती व वेवस्थापक श्री वैभव शहा, उपसभापती श्री प्रीतम दोशी, संचालक श्री विनय दोबाडा श्री अमित शहा, सुरेंद्र शहा रत्नत्रय पतसंस्थेचे मॅनेजर राऊत सर, रत्नत्रय प्री स्कूल व अकॅडमीचे मुख्याध्यापक (दहिगाव) श्री सतीश हांगे सर, रत्नत्रय आयटीआय दहिगाव चे प्रिन्सिपल ,जगताप सर रत्नत्रय प्री स्कूल माळशिरस च्या मुख्याध्यापिका व वनिता निंबाळकर, रत्नत्रय एज्युकेशन च्या मांडव्याच्या मुखादक दैवत वाघमोडे उप मुख्याध्यापिका सविता दे साई मॅडम, मांडवे येथील शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कार्यक्रमास आपली उपस्थिती लावली. नातेपुते गावातील प्रतिष्ठित व्यापारी श्री रौनक चंकेश्वरा , श्री बाहुबली चंकेश्वरा श्री नीलम कुमार गांधी, पत्रकार मनोज राऊत, वैभव आठवले स्कूलचे पालक हितेश सावंत, रोहित गांधी, तुषार देसाई, सुभाष इंगोले, अतुल नाळे, संभाजी अवघडे, रविराज नलवडे, सौ अर्चना गटकुल, सौ निकिता शहा सौ प्रीती दोशी शाहीन मुलांनी, सो आता र, पूजा नलवडे, सौ शीतल पटेल वर्षा नाळे, मनीषा हरनवळ, सीमा सावंत, अंकिता गांधी, संजना चकेश्वरा, असा बहुसंख्य महिला वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता. या कार्यक्रमाची सुरुवात नाविन्य वेद असलेल्या फॅशन शो ने करण्यात आली. यानंतर रत्नोत्तरे प्री स्कूलचे पापा मेरे पापा हा डान्स अंश वी काटवटे या प्ले ग्रुपच्या विद्यार्थिनींनी सादर केला, मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारा सोशल मीडियावरील डान्स ,सुनो गोरसे हे देशभक्तीपर गीत तसेच सर्व विद्यार्थी व त्यांच्या माता पालक यांचा असलेला एकटी एकटी घाबरलीस ना प्री स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, जुबी डुबी या गाण्यावर सर्व बालचंदूनी खूप सुंदर डान्स केला, तर बम बम बोले साठी सर्व मुले आनंदाने नाचली. या कार्यक्रमात दिव्यांशी शहा व निकिता शहा या यांच्या जोडीने सुद्धा अतिशय सुंदर डान्स केला . रुद्रली सावंत या विद्यार्थिनी ने सुद्धा उत्कृष्ट डान्स करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेपरी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अजूनच न्यारी झाली होती. या कार्यक्रमात बक्षीस वितरण सुद्धा घेण्यात आले शाळेत घेतलेल्या स्पोर्ट्स व क्वीज कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण तसेच महिला दिन दिनानिमित्त घेतलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरण या समारंभात घेण्यात आले. सर्व विद्यार्थी बक्षीस घेऊन अतिशय खुश झाले होते. तसेच पाककलेतील बक्षीसांसाठी सौ सीमा सावंत-१, सौ अंकिता गांधी-२, सौ सविता इंगोले-३ यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे सभापती वैभव शहा यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री सतीश हांगे व मुख्याध्यापिका माधवी रणदिवे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व रत्नत्रय प्री स्कूलचे सहशिक्षिका पूजा दोशी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कोरिओग्राफी करत सुंदर डान्स बसवले होते.व सर्वाना स्कूल तर्फे नास्ता ची सोय केली होती . वंदे मातरम घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेचे सभापती श्री वैभव शहा यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नातेपुते रत्नत्रय प्रीस्कूल चा वार्षिक स्नेह संमेलन

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित रत्नत्रय प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोरे हॉस्पिटल शेजारी घनवट बिल्डींग येथे सोमवार १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मि. आयोजित करण्यात आल्याची माहिती स्कूलचे सभापती व व्यवस्थापक वैभव शहा यांनी माळशिरस लाईव्हशी बोलताना दिली.

या वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम डॉ.एम.पी.मोरे यांचे प्रमुख उपस्थित कर सल्लागार मयूर शहा व नातेपुते पोलीस स्टेशन सह. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, उपसभापती प्रितम दोशी, सदस्य विनय दोभाडा, अमित शहा, मुख्यध्यापिका माधवी रणदिवे व समस्त प्रशाला समिती यांनी पालक, शिक्षणप्रेमी नागरिका यांनी या बाल कलाकरांच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेचे वतीने २०२५-२६ हे शैक्षणिक वर्ष विविध उपक्रम राबवीत अनंत अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत असून या वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संस्था साजरे करणार आहे. या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थीच्या विविध कलागुणांना वाव मिळणार असून बालचमूची बहारदार कला पाहण्यासाठी पालकासह, शिक्षण प्रेमी नागरिक आतुरले आहेत.

विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या शाही विवाह सोहळ्यास दिग्गजांसह लाखो मान्यवरांची उपस्थिती.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीतील  चिरंजीव विश्वतेजसिंह व चिखली जि वाशिमचे श्री उदयसिंह सरनाईक यांची कन्या चि सौ का शीवांशिका यांच्या शाही विवाह सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातील राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग आदी क्षेत्रातील लाखो मान्यवरांची उपस्थिती लाभली . गोरज मुहूर्तावर  सुमारे दीड लाख निमंत्रित मित्र परिवारांनी वधूवरास शुभाशीर्वाद देत याची देही याची डोळा मोहिते पाटील परिवारातील चौथ्या पिढीचा शाही विवाह सोहळा पाहिला .या विवाह सोहळ्यास खा.शरदचंद्र पवार , सौ.प्रतिभा पवार , ना..रामदास आठवले , ना.शिवेंद्रराजे भोसले, ना.शंभूराज देसाई , सौ.स्मिता देसाई, खा.उदयनराजे भोसले , कल्पनाराजे भोसले सातारा , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,  विश्वजीतराजे नाईक निंबाळकर , विश्वजीत कदम , सौ.स्वप्नाली कदम , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , आ. किरण सरनाईक, माजी मंत्री   हर्षवर्धन पाटील , खा शाहू महाराज छत्रपती , खा..निलेश लंके , खा.बजरंग सोनवणे , .संजीवराजे नाईक निंबाळकर , सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर .श्रीनिवास पवार , सौ.शर्मिला पवार , क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना दत्तात्रय भरणे , आ दिलीप सोपल., आ सचिन कल्यानशेट्टी , आ नारायण पाटील , आ उत्तमराव जानकर, आ समाधान आवताडे , आ अभिजीत पाटील , आ राजू खरे , माजी आ दिलीप माने , दीपक साळुंखे ,  धनाजी साठे , सिध्दाराम म्हेत्रे , प्रशांत परिचारक , प्रकाश पाटील पानीवकर,बाबाराजे देशमुख, कल्याणराव काळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते , सहकार , शिक्षण , उद्योग , सामाजिक , नाट्य , चित्रपट क्षेत्रातील असंख्य मान्यवर तसेच सोलापूर तसेच इतर जिल्ह्यासह माळशिरस तालुका मोहिते पाटील प्रेमी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.तसेच जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांनी वरातीमध्ये लेझीम खेळून उपस्थितांचे लक्ष वेधले तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ रणजितसिंह मोहिते पाटील, खा धैर्यशील मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्यासह परिवारातील सदस्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. .

रत्नत्रय पतसंस्थेचा 21वा वर्धापन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
सदाशिवनगर तालुका माळशिरस येथील रत्नत्रय संस्थेचा 21 वा वर्धापन दिन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा.श्री.अनंतलाल (दादा) दोशी यांच्या शुभहस्ते साजरा करण्यात आला यावेळी पतसंस्थेचे चेअरमन व सदाशिवनगर गावचे विद्यमान सरपंच‌ मा.श्री.विरकुमार भैया दोशी .शंकर कारखान्याचे संचालक मा.श्री.रामदास करणे डी.सी.सी बँकेचे शाखाधिकारी लोंढे साहेब कर्तव्य दक्ष संचालक प्रमोद दोशी संचालक रामदास गोफणे , जगदीश राजमाने अजय गांधी सोमनाथ राऊत तज्ञ संचालक सुरेश काका कुलकर्णी विलास साळुंखे व सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला….
कार्यक्रमाचे प्रस्तावित कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी यांनी यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की रत्नत्रय पतसंस्था ही 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे व 22 व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत असताना संस्थेने 22 कोटींच्या ठेवीचा आकडा पार केलेला आहे हा आकडा संस्थापक व संचालक मंडळावर सर्व ठेवेदारांनी ठेवलेला विश्वास आहे आपली संस्था ही संपूर्ण संगणिकृत असून ऑनलाईन व्यवहार करीत आहे सर्व सभासदांना एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत संस्थेमार्फत सभासदांना भारतात कुठेही डीडी काढण्याची आरटी जिएस एनएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे तसेच सर्व वाहनाचे इन्शुरन्स नवीन पासपोर्ट पॅन कार्ड काढणे क्यूआर पेमेंट अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत चालू आहेत असे ते म्हणाले.
यानंतर संस्थेचे संस्थापक मा श्री .अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले की लवकरच आपली पतसंस्था ही .स्वमालकीच्या जागेत भव्य अशी इमारत बांधत आहे व यापेक्षाही चांगली सेवा सभासदांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे ते म्हणाले यानंतर तज्ञा संचालक सुरेश काका कुलकर्णी यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले व पुढील काळात ही संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी .कायम संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील असे सांगितले
तसेच महिला दिनानिमित्त पतसंस्थेने रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचेही बक्षीस वितरण संस्थेचे संस्थापक मा.श्री.अनंतलाल (दादा) दोशी यांच्याा शुभहस्ते करण्यात आले
खुलागट रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक प्रीती राम कुलकर्णी द्वितीय क्रमांक अमृता महेश मोहिते तृतीय क्रमांक प्राजक्ता मनोज दांगट
खुला गट चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक मेघा संदीप चव्हाण द्वितीय क्रमांक स्वाती रामचंद्र शेंडगे तृतीय क्रमांक निकिता राहुल मगर
लहान गट चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक मयुरी तानाजी सालगुडे
द्वितीय क्रमांक आदिती अमितकुमार करणे‌‍‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌
तृतीय क्रमांक श्रुती दत्तात्रय शिंदे उत्तेजनार्थ अक्षता निलेश गांधी.
लहान गट रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक समीक्षा नाना कोकरे
द्वितीय क्रमांक समीक्षा महेंद्र कापसे
तृतीय क्रमां श्रीलेखा दीपक जाधव
या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन मा.श्री. वीरकुमार (भैया) दोशी यांनी मानले तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे हेमंत कुलकर्णी वैभव मोडासे मंगेश जगताप टी.डी.देशमुख नीता रणवरे विक्रम पालवे युवराज वळकुंदे रणजीत गोरडे यांनी काम पाहिले..

बारामती हिंदुस्तान कॅटल फीड च्या वतीने समता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्कूल बॅग वाटप

पुरोगाम महाराष्ट्रा न्युज नेटवर्क प्रमोद शिंदे

बारामती हिंदुस्तान कॅटल फीड लिमिटेड कंपनी तसेच श्री विष्णू नारायण दूध संकलन केंद्र चे  चेअरमन संदीप तात्या नरोळे यांच्या सौजन्याने  समता माध्यमिक विद्यालय श्री भिवाई देवी जुनियर कॉलेज पिरळे येथील 175 मुलींना स्कूल बॅग व सॅनिटरी पॅड  वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले व समता माध्यमिक विद्यालय संस्थापक अध्यक्ष कै. मानसिंगराव (आबासाहेब) शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  हिंदुस्तान फीडस् चे  तांत्रिक विस्तार अधिकारी श्री अक्षय गावडे  व मार्केटिंग ऑफिसर श्री मयूर शेळके माजी सरपंच संदीप तात्या नरोळे,पत्रकार प्रमोद शिंदे,प्राचार्य दीपक शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी संस्थेचे चेअरमन महादेव शिंदे,दत्तात्रय लवटे पाटील, मुख्याध्यापक गायकवाड सर शिक्षक स्टाफ व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेली भुतोजी महाराज खळदकर यांच्या हस्ते रुद्र मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन

पुरोगाम महाराष्ट्र न्युज नेटवर्क- प्रमोद शिंदे


दहिगाव तालुका माळशिरस येथे रुद्र मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या या औषधांच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा श्री शिवयोगी तेली भूतोजी नाना महाराज खळदकर (मुख्य मानकरी, शिखर शिंगणापूर )यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी दहिगाव गावच्या सरपंच सौ सोनम ताई रंजीत खिलारे, उपसरपंच संदीप अण्णा सावंत युवा नेते बाळासाहेब कदम, रामचंद्र दादा पाटील, संभाजी फुले सर राहुल सावंत, रमेश मोरे, खळद पंचक्रोशी चे अमोल टिळेकर, अजित काका खळदकर, तात्यासाहेब राणे,धनाजी बापूराव चिकणे, संग्राम धनाजी चिकणे ,बिबीशन धनाजी चिकणे,शिवशक्ती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहिते-पाटलांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात आपण लढतोय पिरळे येथून -मा.आमदार राम सातपुते


शंभर टक्के जिल्हा परिषद च्या अगोदर माळशिरस तालुका विधानसभा पोटनिवडणूक लागणार आमदार उत्तमराव जानकर यांना राम सातपुते यांचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे तालुका माळशिरस येथे भाजपच्या शाखेचे उद्घाटन तसेच गावातील विविध विकास कामांचे  उद्घाटन समारंभ प्रसंगी माजी आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राम सातपुते बोलताना म्हणाले की चाळीस-पन्नास वर्षाची मोहिते पाटलांची जुलमी राजवटीच्या विरोधात आपण  लढत आहोत. इथल्या छोट्या छोट्या घटकावर मोहिते पाटलांनी जुलूम केला आहे.म्हणून यंदा निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे .पिरळ्यातील लोकांनी मला  लीड दिल आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की आता त्यांच्यासोबत फक्त दोन नंबर करणारी लोक राहिलेले आहेत भविष्यकाळात हे सगळे दोन नंबर धंदे हळूहळू  बंद करू भविष्यात कार्यकर्त्यांला ताकत देणार असून पिरळे गाव हे विकासासाठी मी दत्तक घेतला आहे. आपण महादेव मंदिर पुलाचे काम रस्त्यांचे काम आपण केली आहेत हे मोहिते पाटलांना कधी दिसला नाही. निवडणूक झाल्यानंतर माझा खोटा प्रचार केला मी माळशिरस तालुका सोडून जाणार, परंतु मी यांना मासनात पोहोचवल्या शिवाय जाणार नाही  अशा प्रकारे मोहिते पाटील यांच्यावर टीका करत लवकरच माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अगोदर शंभर टक्के पोट निवडणूक लागणार असा चिमटा ही आमदार उत्तम जानकर यांना राम सातपुते यांनी काढला आहे. याप्रसंगी भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बी वय. राऊत, शिवप्रसाद उद्योग समूहाचे उद्योजक शरद बापू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर ,दादासाहेब लवटे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी महादेव मंदिर सभा मंडप, भाजपा शाखा उद्घाटन तसेच रामनगर रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास. भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर,प्रदेश सचिव सोपान काका नारनवर ,दिलीप पांढरे राजुशेठ पांढरे ,राहुल पद्मन, दत्तात्रेय रुपनवर, माऊली तरंगे हनुमंत करचे ,शशि कल्याणी,वैभव शहा ,अमित चांगण संतोष शिरतोडे, रितेश पालवे, संजय देशमुख, अशोक तोडकर,संभाजी साळवे,राजेंद्र बल्लाळ,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारत पवार,पप्पू बुधावले,सचिन किर्दक, सुदाम बुधावले,सुरज माने,प्रल्हाद नरोळे,आनंदा लवटे,पांडुरंग माने, धनाजी दडस अनिल खिलारे तसेच शाखेतील पदाधिकारी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

जागर संविधानाचा राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठया उत्साहात संपन्न सौ. निकिता पोळ प्रथम, सौ. कोमल सावंत व्दितीय, कार्तिकी इंगवले तृतीय

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस प्रतिनिधी – जागर संविधानाचा राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचा पारितोषीक वितरण समारंभ मोठया उत्साहात दि. १९/०२/२०२५ रोजी माळशिरस येथे प्रा. नीलम पंडीत व मा.न्यायाधिश दिपक राजे-पांढरे यांचे शुभहस्ते पार पाडला.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माळशिरस तालुका वकील बांधवांनी आयोजित केलेल्या जागर संविधानाचा अभियान अंतर्गत राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा, २०२५ ही स्पर्धा माळशिरस येथील गोपाळराव देव प्रशाला येथे पार पडली. सदर स्पर्धेत मोठ्या संख्याने स्पर्धकांनी भाग घेतला होता व त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषीक हे सौ. निकिता प्रविण पोळ यांनी पटकिवले असुन, त्यांना आयोजकांच्या वतीने आटा चक्की, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. व्दितीय क्रमांक सौ. कोमल सुमित सावंत यांना मिळाले असल्याने मिक्सर, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे पारितोषीक कार्तिकी गणेश इंगवले यांना डिनरसेट, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर प्रसंगी विचार व्यक्त करताना प्रा. नीलम पंडीत यांनी संविधानाचा जागर करीत असताना त्यातील मुल्य जीवनामध्ये अंमलात आणावे असे सुचित केले, तर मा. न्यायाधिश दिपक राजे-पांढरे यांनी संविधानाने अस्पृश्यता नष्ट झाले असुन, जातीयता व अस्पृश्यता पाळणे गुन्हा असल्याचे अधोरेखीत केले. तसेच यावेळी विचार व्यक्त करीत असताना शंकर बागडे यांनी पोलीस पाटील पदावर काम करीत असल्याचे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळेच शक्य झाल्याचे नमुद केले. तर प्रमोद शिंदे यांनी त्यांचे मनोगत खऱ्या अर्थाने माळशिरस तालुक्यातील वकील बांधवच संविधनाचा जागर करीत असल्याचे कौतुकउध्दार केले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन माळशिरस वकील संघटनेच्या अध्यक्षा सौ. मोहिनी देव, पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनेलचे संपादक श्री. प्रमोद शिंदे, माळशिरस वकील संघटनेचे मा. अध्यक्ष तथा व्हाईस चेअरमन शंकर सहकारी साखर कारखाना, लि. सदाशिवनगर चे ॲड. श्री. मिलिंद कुलकर्णी, स्माईल एफ.एम. अकलूज चे हेड श्री. शंकर बागडे, डॉ. कुमार लोंढे आदिसह मोठ्या संख्येने समाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक ॲड.धनंजय बाबर, सुत्रसंचालन ॲड.भारत गोरवे यांनी केले. तसेच पारितोषीक जाहीर करण्याचे काम ॲड. सुमित सावंत यांनी केले. तर आभार प्रदर्शन अँड.रजनी गाडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक समितीचे ॲड. सुनिता सातेपुते, ॲड. रजनी गाडे-सोनवळ, ॲड. धनंजय बाबर, ॲड. सुमित सावंत, ॲड. भारत गोरवे, ॲड. नितीन भोसले, ॲड. वैभव धाईजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. मनोज धाईंजे, ॲड. निलेश जाधव, ॲड. दत्तात्रय सावंत व सर्व सन्मानिय माळशिरस वकील संघटना सदस्य यांनी केले.

महिलेची फसवणूक करून 13500 रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महिलेची फसवणूक करून तेरा हजार पाचशे रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास नातेपुते पोलिसांनी चार तासात ठोकल्या बेड्या याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की, नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक -11/02/2025 रोजी फिर्यादी नामे रेखा संतोष मोहिते वय 40 वर्ष रा, नातेपुते यांनी पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्याद दिली की, फिर्यादी ह्या दुपारी 12.46 वाजता बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते मध्ये त्यांचे बचत खाते अकाउंट वरून 40,हजार रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष हा फिर्यादीच्या जवळ येऊन माझ्याकडे फटक्या नोटाचे बंडल आहेत असे म्हणून हातच्यालाकी करून  त्यांच्याकडील 40 हजार रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील 13,500 काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला बाबत  माहिती पोलीस स्टेशनला कळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे psi विक्रम दिघे, pn राकेश लोहार, यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोचे व आरोपी MOB चे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी बाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातारा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली, सदर बाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार महेंद्र खाडे, गणेश खाडे, सहदेव साबळे यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर पाहिजे आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे, प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलीस हवालदार मनोज करडे, अमोल बंदुके, संतोष वारे, अमित भगत, रंजीत मदने, असलम शेख, अमोल देशमुख, यांनी सदर आरोपी यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव सरफराज पिता मानू इराणी वय 43 वर्ष राहणार सय्यद नगर पुणे, असे असून त्याच्याकडे गुण्यातील रकमेबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे सांगून त्याच्याकडे 11,600 रुपये मिळून आले, तसेच त्याच्याकडे स्कुटी 50,000/ किमतीची असे एकूण 61,600/ रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यत जप्त करण्यात आला आहे , सदर आरोपी हा सराईत असून त्याने  यापूर्वी सोलापूर, पुणे सांगली, धाराशिव येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/2025 भारतीय न्याय संहिता 318(4) अन्वये गुण्यामध्ये मध्ये अटक करण्यात आले असून त्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत