रत्नत्रय संस्थेकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण संस्थेकडून मांडवे .यांच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.      यामध्ये  २०२४ – २५ वर्षाकरिता गरीब व गरजू  हुशार विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना रत्नत्रय स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे . त्यासाठी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी स.नगर ,विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात आलेली आहे. यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सातारांकडून केला जाणार आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल दोशी व सचिव प्रमोद दोशी यांच्याकडून योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत अनेक दातारांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरवले आहे.यामध्ये सौ सुनीता अनिल दोशी – माढा १ विद्यार्थी दत्तक घेतलाश्री सचिन केंगार- सांगोला* १ विद्यार्थी दत्तक,श्री मिहीर बाहुबली गांधी – अकलूज* १ विद्यार्थी दत्तक,  चंद्रशेखर हरि थोरात- गोवा १ विद्यार्थी दत्तकअश्विनी गांधी- वेळापूर  विद्यार्थी दत्तक,आणि गुप्त दान करून सुद्धा पाच विद्यार्थी दत्त घेण्यात आले आहे. या दत्तक योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांना लाभ होणार असून. दानशूर दातारांनी यात दत्तक योजनेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सचिव प्रमोद भैया जोशी यांनी केले आहे. रत्नत्रय विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये सहभागी झालेल्या  दातारांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे. दत्तक योजनेसाठी संपर्कप्रमोद अनंतलाल दोशी 989006352,मिहीर गांधी,वैभव शहा, अभिजीत दोशी , अभिजीत दोभाडा,रामदास  गोपने अमित पाटील ..

You may have missed