य.स.दा सामाजिक संस्था, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड यांच्या संयोजनाने चासोळे गावात आरोग्य शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रतिनिधी संदेशभालेराव
मुरबाड तालुक्यातील टोकावडे विभागातील चासोळे गावात काल यसदा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड लाईफलाईन हॉस्पिटल कल्याण यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थ मंडळ चासोळे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .हे शिबिर चासोळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते .या शिबिराला चासोळे गावातील आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात बीपी तपासणी, डायबिटीज तपासणी ,ईसीजी तपासणी, डोळे तपासणी तसेच रक्तदान शिबिर आणि इतर तपासण्या झाल्या. जवळजवळ शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी सहाय्यक आयुक्त नागपूर सुरेश कांबळे, मुख्य प्रबंधक मुंबई स्वप्निल सोमकुवर, यसदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे, उद्योजक विनोद जाधव, विकास खंडागळे तसेच चासोले गावातील सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत, विनोद राऊत ,आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद चासोळे शाळेचे शिवाजी तुंगार गुरुजी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते. भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड अध्यक्ष पत्रकार भरत दळवी यांनी यावेळी उपस्थिती लावली. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यसदा संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील काही मुख्य गावांत डॉक्टर केवलजी उके साहेब यांच्या मार्गदर्शनात आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जात आहे, तसेच काही सामाजिक उपक्रमसुद्धा राबविले जात आहेत , यसदा संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात भविष्यात आरोग्य उपक्रमाबरोबरच इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी भरत दळवी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रामस्थ मंडळ चासोळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी वैद्यकीय अधिकारी यांचेही स्वागत करण्यात आले . यावेळी मांडे सर, तुंगार सर, महेश राऊत सर, काकाजी थोरात, किसन आलम, दाजी राऊत, संभाजी आलम, शिवाजी निमसे, शकील शेख, मोहम्मद शेख, विशाल थोरात, मनीषा थोरात, किसन राऊत, विलास राऊत, धनाजी निमसे, एकनाथ निमसे, अनघुले सर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहीत आमचे प्रतिनिधि.संदेश भालेराव यांनी दिली