जि प शाळा पिरळेतील शिक्षकांनी शाळेच्या परिस बागेत फुलवला भाजी पाल्यांचा मळा.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जि प शाळा पिरळे येथील शिक्षक यांनी शाळेच्या परिसरात अनोखा उपक्रम राबवला आहे.
शाळेच्या परिसरात परिस बागेसाठी पुरेशी जागा असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग कसा केला पाहिजे याचे उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक यांनी एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवले आहे. शाळेमध्ये मध्यान भोजन योजना सुरू आहे. या यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्य अन्नासाठी दररोज बाहेरून पालेभाज्या आणाव्या लागतात. ह्या पालेभाज्या आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा बराचसा वेळ व पैसे खर्च होतात. तसेच तो भाजीपाला ऑरगॅनिक पद्धतीचा व विषमुक्त मिळत नाही. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा लागतो. यावर मुख्याध्यापक व काही शिक्षकांना एक भन्नाट संकल्पना सुचली ती म्हणजे शाळेच्या परिसरात ऑरगॅनिक पद्धतीचा भाजीपाल्याचा मळा तयार करण्याची.मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली. संजय ढवळे सर, हनुमंत फुले, जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर, सचिन निगडे सर, शिक्षिका, शेंडगे मॅडम, मुलाणी मॅडम, व नामदेव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परिश्रम घेत.शाळेच्या परिस बागेत अक्षरशा भाजीपाल्याचा मळा फुलवला.यामध्ये प्रामुख्याने शेवगा ,वांगी , टोमॅटो, दुधी भोपळा , घोसावळे , फ्लॉवर , मिरची ,कोबी, कढीपत्ता ,कोथिंबीर,मेथी , पालक , घेवडा , दोडका ,अशा ऑरगॅनिक विषमुक्त पाल्या भाज्यांचा समावेश आहे. या उपक्रमाने महाराष्ट्र भरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

You may have missed