मोटरसायकल व मंगळसूत्र चोरास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पुगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -प्रमोद शिंदे
नातेपुते आणि परिसरात वारंवार मोटर सायकल चोरी करणारा व मंगळसूत्र चोरणाऱ्या संशयत चोरास नातेपुते पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,
नातेपुते पोलीस ठाणे येथे दि, 25 /03/2024 रोजी फिर्यादी नामे. अभिनंदन अरविंद जोशी रा. नातेपुते यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल MH 45 B 1117 हिरो होंडा कंपनीची सीडी डाऊन 25,000/ रुपये किमतीची अक्षय शिक्षण संस्था नातेपुते येथे गेट समोर लावलेली असता दि. 18/03/2024 रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 99/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोलीस हवालदार धोत्रे हे करत होते तसेच 13/03/2024 रोजी फिर्यादी नामे – सौ कमल बाळासाहेब घनवट रा. नातेपुते ह्या नातेपुते ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी एसटी स्टँड नातेपुते येथून प्रवासाठी बस मध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील 10,000/ रुपये किमतीचे दोन डोरले असलेले मुळे मंगळसूत्र कुणीतरी आज्ञा चोरट्याने चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2024 IPC 379 अन्वये आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याचा तपास पोलीस हवालदार /718 भगत हे करत होते तसेच यापूर्वी दहिगाव चौक नातेपुते येथून 10,000/ रू किमतीची मोटरसायकल चोरी झाले बाबत तक्रारदार नामे – दशरथ सिद्धू शिंदे रा. दहिगाव यांची तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वारंवारं होणाऱ्या मोटरसायकल चोरी बाबत , सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरिश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग नारायण शिरगावकर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली
नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे, पोलीस हवालदार धोत्रे, अमित भगत, अमोल वाघमोडे, नितीन तळेकर,पोलीस कॉन्स्टेबल, रणजीत मदने, सोमनाथ मोहिते यांनी वरिष्ठांच्या प्राप्त सूचना मार्गदर्शन व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक व विश्लेषण करून 2 आरोपी यांचेकडून 3 गुन्हे उघड झाले असून त्यामधील दोन मोटरसायकल व दोन डोरले असलेले मनी मंगळसूत्र असे एकूण किंमत 45,000/ रुपये किमतीचा चोरीतील मुद्देमाल आरोपी उमेश पोपट लोंढे राहणार बरड ता.फलटण जिल्हा सातारा यास अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रीमांड मध्ये असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविषयी गुन्हे घडू नये यासाठी पोलिस पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आलेले आहे…
त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांन कडून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

You may have missed