नातेपुते शहराला सीसीटीव्ही सर्वे लाईन ने जोडणार- आमदार राम सातपुते

पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-(प्रमोद शिंदे)

नातेपुते शहराला सीसीटीव्ही सर्वे लाईन ने जोडणार असल्याचे प्रतिपादन सुंन्धा स्वीटस अँड रेस्टॉरंट च्या उद्घाटन प्रसंगी आमदार राम सातपुते यांनी केले. नातेपुते शहराला 25 खेडी जोडलेली आहेत व्यापार व गावची सुरक्षितात  महत्वाची आहे.त्या साठी 1.5 कोटीची तरतूद तसेच सर्व रत्यांवर दिवे लवण्याठी 2.65 कोटी तरतूद केली आहे.काम लवकरच सुरू होईल.राव परिवाराने नातेपुते शहराला चांगले रेस्टॉरंट दिली आहे. माजी आमदार अर.जी.रुपणवर  बोलताना म्हणाले की राव कुटुंबाने हॉटेल सुरू करून लोकांची चांगली सोय केली आहे.या प्रसंगी मा.जी. प. उपाध्यक्ष राजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, डॉ.मोरे,रघुनाथ कावितके, मा.जी.प.सदस्य शरद मोरे, पं.स.सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,न.पं. बा.सभापती अतुल पाटील, रणवीर देशमुख, सर्व नगरसेवक, पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित.कार्यक्रमाचे आयोजन फत्तेसिंह राव,शैलेश राव,यांनी केले होते.

You may have missed