पिरळे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी पालखी दिंडी सोहळा उद्घाटन संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
पिरळे तालुका माळशिरस येथे श्री दत्त जयंती निमित्त पिरळे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्याचे सलग सातवे वर्ष असून या सोहळ्यात शेकडो भाविक सामील होतात.या सोहळ्याचे उद्घाटन माझी पंचायत समिती उपसभापती किशोर भैय्या सुळ, व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.19 डिसेंबर रोजी पादुका आगमन व 20 डिसेंबर रोजी पादुका पूजन, विना तुळस ग्रंथ पूजन करण्यात आले. तसेच डीजे, लेझीम, हालगी , टाळ, मृदुंग व पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक काढून गाव प्रदक्षणा करण्यात आली.याप्रसंगी सरपंच गणेश दडस, सरपंच अमोल दादा, माजी सरपंच, ज्ञानदेव शिंदे,संदीप नरोळे, महादेव शिंदे, दत्ता रुपनवर, पत्रकार प्रमोद शिंदे, धनंजय महाराज कदम, सुनील माने,अजित महाराज खंडागळे, भाऊसाहेब भिसे सर, हनुमंत फुले सर, दत्ता लवटे, नाथा लवटे, व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिंडी सोहळ्याचे आयोजन मामासाहेब लवटे, सचिन सूर्यवंशी, काशिनाथ लवटे, यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केले.याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले.