अंकुश भाऊ सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठान व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांच्यावतीने अंकुश भाऊ सुर्वे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये रक्तदान,वृक्षारोपण, जि. प . प्राथमिक शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद शाळांना सुर्वे प्रतिष्ठान नातेपुते यांच्या वतीने जिल्हा परिषद पांढरे वस्ती शाळेस 55 इंच स्मार्ट एलईडी टीव्ही तसेच नातेपुते परिसरातील बोराटे वस्ती,बरड कर वस्ती, केंद्र शाळा, पांढरे वस्ती, कन्या शाळा व पालखी मैदान शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यास स्पोर्ट गणवेश देण्यात आला. आजच्या काळात मराठी शाळांकडे बघण्याचा पालकांचा  दृष्टिकोन बदलावा यासाठी आपण इथून पुढे प्रयत्न करणार आहोत असे सुर्वे प्रतिष्ठानचे प्रमुख विनायक सुर्वे बोलतं म्हणाले.       शाळांना चांगल्या दर्जाचे साहित्य दिल्याबद्दल सर्व शाळांच्या वतीने मा.विनायक सुर्वे यांचा सहपत्नी सत्कार करण्यात सत्कार करण्यात आला.अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठान व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांनी जि. प. शाळांना केलेल्या मदतीबद्दल परिसरातील पालक व ग्रामस्थांच्या वतीने  कौतुक होत आहे. तसेच माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनीही अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे व विनायक भैय्या सुर्वे यांचे आभार व्यक्त केले.

You may have missed