मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुजोरांना आवाहन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) लॉक डाऊन मुळे देशातील व महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून देशातील व महाराष्ट्रातील मजूर पर्याय नसल्याने आपल्या गावी चालत जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे अपघात व अनेक घटना घडत असून मजूर वर्गाने चालत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजुरांना केले आहे
तसेच ते म्हणाले की शासनाने रेल्वे व बस ची सुविधा सुरू केली आहे. मजुरांनी रेल्वे व बसनेच आपल्या घरी गेले पाहिजे. सरकारने मजुरांना मास्क, सानीटायझर व सुरक्षेची साधने दिली पाहिजेत. औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या 16 मजुरांना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने द्यावेत
अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केले आहे.



