माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर
माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)
माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील निवेदनाद्वारे केली आहे. माळशिरस तालुक्याचा उपविभागीय अधिकारी यांचा तात्पुरता चार्ज इतर विभागातील अधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले शेतकऱ्यांच्या शेतीच्या केसेस व इतर अन्य प्रशासकीय बाबी वेळेवर होत नसल्याने लोकांचे गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ माळशिरस तालुक्यात कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्यावा अशी मागणी राजकुमार हिवरकर यांनी केले आहे.