पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You may have missed