नातेपुते येथील पोलीस व व्यापाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन* गरिबांना मदतीचा हात*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी देशात झालेल्या लॉक डाऊनलोड मुळे हातावरती पोट भरणाऱ्या गोरगरीब लोकांचे हाल होत असल्यामुळे नातेपुते तालुका माळशिरस येथील व्यापाऱ्यांकडून माणुसकीचे दर्शन घडून आले आहे .नातेपुते आणि परिसरातील गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे नातेपुते व परिसरातील झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांची उपासमार होत असल्याकारणाने नातेपुते पोलीस स्टेशने चे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे व कर्मचारी यांनी नातेपुते येथील व्यापाऱ्यांना गरीब लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते ची दखल घेत नातेपुते येथील व्यापारीव्यापारी बाहुबली सेठ शंकेश्वर, महावीर नथुराम दोशी, प्रीतम ट्रेडिंग कंपनी, सिद्धांत ट्रेडिंग कंपनी, राजेश मोहनलाल दोशी, सुधीर दोशी, तलकचंद रावजी दोशी, व्यापारी असोसिएशन च्या किराणा व्यापाऱ्यांनी गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. प्रत्यक्षात सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी व कर्मचारी पत्रकार सुनील राऊत,अपूर्व चकेश्वरा, वैभव शहा,सुयोग दोशी, सागर दोशी,पारस शहा, यश गांधी,यांनी प्रत्यक्षात झोपड्यांमध्ये जाऊन मदत दिली. पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बरोबर माणुसकीचे दर्शन घडवल्याबद्दल व्यापारी व पोलीस यांचे परिसरात कौतुक होत आहे.