प्रमोद शिंदे

डॉ. निटवेज ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये पत्रकारांचा सन्मान

ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये पत्रकारांचा सन्माननातेपुते( प्रतिनिधी) मोरची येथील डॉक्टर नीटवेज ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय निटवे यांच्या हस्ते करण्यात आला सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह श्रीफळ गुलाब पुष्प देऊन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे होते खाडे बोलताना म्हणाले की पत्रकारितेची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांनी केली आहे दर्पण म्हणजे आरसा असा पत्रकारिता म्हणजे समाजातील भावना आतापर्यंत पोहोचवणे पत्रकारांची लेखणी तापली की भल्याभल्यांना घाम फुटतो तसेच त्यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर निटवे ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत ,लतीफ नदाफ पत्रकार आनंद लोंढे ,प्रमोद शिंदे विद्यार्थिनी कु समृद्धी रुपनवर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त हनुमंत माने ,एपीआय युवराज, खाडे ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष श्रीकांत बाविस्कर, लतीफ नदाफ, आनंद लोंढे, प्रमोद शिंदे, आनंद जाधव, विलास भोसले ,सुनील गजाकस, प्रशांत खरात ,उमेश पोतदार, आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन इंग्लिश मिडीयम चे प्रिन्सिपल संदीप पानसरे यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

सदाशिवनगर येथील रत्नत्रय संस्थेकडून पत्रकारांना एक लाखाचा विमा

नातेपुते (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून रत्नत्रय पतसंस्था व एज्युकेशन सोसायटी यांच्यावतीने पत्रकारांना एक लाखाचा अपघात विमा भेट म्हणून देण्यात आला.तसेच रत्नत्रय व दोशी परिवाराच्यावतीने माळशिरस तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रप्रभू पतसंस्था नातेपुते चेअरमन राजेश शेठ शंकेश्वर हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद दोशी बोलताना म्हणाले की ही संस्था सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी पत्रकारांचा सन्मान करते पत्रकार हा लोकशाहीचा कणा आहे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे तसेच  पत्रकार गहिनीनाथ वाघबरे, श्रीनिवास कदम पाटील, लक्ष्मण वाघमोडे ,व अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रत्नत्रय संस्थेचे संस्थापक अनंतलाल दोशी ,चेअरमन विरकुमार दोशी, पत्रकार भगवान बनकर,आनंद शेंडगे,संजय हुलगे,प्रमोद शिंदे,विलास भोसले,प्रशांत खरात,बंडू पालवे,आप्पा कर्चे, वैभव शहा तसेच संस्थेचे पदाधिकारी शिक्षक,शिक्षिका,स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच पुरंदावडे येथील शितल एवळे या विद्यार्थिनी ची लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला तसेच शाळेतील शिक्षिका यांना उपक्रमशील आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करा मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे वैभव गीते यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मुंबई )-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 संशोधित अधिनीयम 2015 सुधारीत नियम 2016 नुसार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात दोन बैठका घेणे कायद्याने बंधनकारक आहे मुख्यमंत्री महोदयांनी या समितीची स्थापना करून तात्काळ उच्चअधिकाऱ्यांची बैठक बोलावून राज्यात बौद्ध दलित आदिवासी अनुसूचित जाती-जमातींच्यावर वाढलेल्या अत्याचाराचा आढावा घ्यावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करावे राज्यात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी महाआघाडी करून सत्ता स्थापन करून मंत्रिमंडळाचे खातेवाटप सुद्धा झाले आहे त्यामुळे अधिक वेळ न घालवता दक्षता समितीची स्थापना करावी व न्याय करावा अशी मागणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभवजी गिते साहेबांनी केली आहे

महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची निवडनातेपुते

महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची निवडनातेपुते (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या  नूतन वर्षानिमित्त  व  पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर पदाधिकाऱ्यांचे  नियुक्ती करण्यात आली आहे . या निवडी  महाराष्ट्र पत्रकार संघाचे  राज्याध्यक्ष  विलासरावजी कोळेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली  रत्नागिरी येथे करण्यात  आले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी प्रमोद ज्ञानदेव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष कोळेकर सर व राज्य कमिटीतील सर्व सदस्य यांनी एक मताने केले असून प्रमोद शिंदे यांना संघवाढीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियातून सुद्धा  यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच प्रमोद शिंदे  म्हणाले की संघाने दिलेली जबाबदारी मी माझे कर्तव्य समजून प्रामाणिकपणे पार पाडीन.

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत बाविस्कर यांची निवड

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत बाविस्कर यांची निवडपुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( रत्नागिरी)- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा जिल्हाध्यक्षपदी शांत बाविस्कर यांची निवड करण्यात आली हे निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासरावजी कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली ही निवड राज्य कमिटीतील सर्व सदस्य एक मताने केले असून श्रीकांत बाविस्कर यांना संघवाढीस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडियातून सुद्धा श्रीकांत बाविस्कर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

शेखरभैया खिलारे वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर

शेखरभैया खिलारे वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज (प्रमोद शिंदे) -4/1/2020
युवासेना अकलूज शहर प्रमुख
शेखर भैय्या खिलारे यांच्या 18 जानेवारीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना अकलूज शहराच्या वतीने मोफत रोग निदान व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अकलूज शहर युवासेना व माळसिरस तालुका यांच्या वतीने महषीॅ काॅलनी अकलूज येथे करण्यात आले होते शिबिरात 275 रुग्णांची तपासणी डॉ.एम.के.इनामदार, डॉ तानाजी कदम,डाॅ सुनिल राऊत,डॉ बळते,डॉ काळे,डॉ पाटील,डॉ पिसाळ,डॉ कारंजे या तज्ञ डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी करून यशस्वी झाले महामानवांच्या प्रतिमेचे पुजन अकलूज ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील,संग्रामनगर ग्रा.सरपंच राजवर्धीनी माने पाटील, गणेश इंगळे, सुजयभैया माने पाटील,अॅड विरेंद्र वाघमारे, दिनेश ताम्हाणे,सोनू भैया पराडे पाटील,राजाभाऊ खिलारे,भूषण पराडे,संदीप गांधी,यांच्या प्रमुख उपस्थितीत करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले शिवतेज सिंह मोहीते पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना युवासेना अकलूज शहरचे काम सामाजिक असुन सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले डॉ एम के इनामदार यांनी हा कार्यक्रम दरवर्षी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच राजाभाऊ खिलारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी आरोग्य संबंधित सर्व रक्त चाचण्या व रक्त तपासणी सुध्दा करण्यात आले युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ता साळुंखे,संदीप इंगवले,बिपिन बोरावके,चैतन खिलारे,गणेश भिताडे,सचिन भोसले,सागर साळुंखे रामेश्वर खिलारे,बचन साठे,अजिंक्य पासगे,बच्चन साठे यांनी परिश्रम घेतले सकाळी अकरा वाजता सुरू झालेले शिबिर दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते नागरिकांनी गर्दी केली होती या आरोग्य शिबीराचा अनेकांनी लाभ घेतला
त्यावेळी विविध संघटना व सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते

*क्ष-किरणांचा शोध लावणारे विल्हेम राँटजेन *

विल्हेम रोंटजेन यांनी क्ष-किरणांचा (x-रे)-चा शोध लावला *
पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क(प्रमोद शिंदे)- *_२८ डिसेंबर १८९५_*
*_विल्हेम राँटजेन याने क्ष-किरणांचा शोध लावला._*
_सन १८९५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले._

*प्रताप क्रीडा मंडळ आयोजीत समूहनृत्य स्पधेंत मोरजाई विद्यालयाने पटकवला प्रथम क्रमांक

*प्रताप क्रीडा मंडळ आयोजीत समूहनृत्य स्पधेंत मोरजाई विद्यालयाने पटकवला प्रथम क्रमांक
नातेपुते: प्रतिनिधी
प्रताप क्रिडा मंडळ अकलुज आयोजित समूहनृत्य स्पर्धत मोरजाई विद्यालयाने लोकनृत्यात आणि प्रासंगिक नृत्यात दोन्ही विभागात प्रथम क्रमांक पटकवला आहे या स्पर्धा सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय प्रसिध्द आहेत.या स्पर्धामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थाना अनेक चित्रपटात,मालिकात व पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. विद्यालय हे मोरोची सारख्या ग्रामीण भागातील असूनही या विद्यालयाच्या कलाकाराने अतिशय सुंदर लोकनृत्य आणि प्रासंगिक नृत्य सादरीकरण करुन प्रेक्षक व रसिकांची वाहवा मिळवली .
या कलाकरांना प्रशस्तीपत्र,ट्रॉफी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेच्या संचालिका,.स्वरूपराणी मोहिते-पाटील,स्पर्धा प्रमुख,अँड.नितीन खराडे यांच्या हस्ते देण्यात आले
या विद्यार्थाना मार्गदर्शन विविध गुणदर्शन प्रमूख रणजित बाबर, संपत रुपनवर, अशोक शितोळे, दादासो.हुलगे, स्मिता देशमुख , सुनंदा वजाळे यांनी केले.या दोन्ही गीतांचे दिगदर्शन रणजित बाबर यांनी केले.या विद्यालयाचा शालेय गुणवत्तेबरोबरच कला,क्रिडा,सांस्कृतिक क्षेत्रातही नावलौकिक आहे.या यशाबद्दल प्रशाला समितीचे सभापती,श्री.छगनराव माने, मुख्याध्यापक विकास सूर्यवंशी ,सर्व प्रशाला समितीचे सदस्य आणि पालक यांनी कलाकरांचे अभिनंदन केले आहे

जवळा नि गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा. आजिनाथ राऊत

जवळा नि गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करा.

पोरगा महाराष्ट्र नेटवर्क – मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे साहेबांकडे राऊतांनी केली मागणी…

गावात जर राष्ट्रीयीकृत बँकेची मुख्य शाखा असती तर गावातील एस.बी.आय.ग्राहक सेवा केंद्र चालक आश्रु कारकर याने गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन करुन लाखो रुपये घेऊन पळुन जाऊन केलेल्या फसवनुकीच्या प्रकारास गावासह आसपासच्या खेड्या पाड्यातील ग्राहक बळी पडले नसते अशी खंत मा. जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांचेशी चर्चा करताना व्यक्त केली

परांडा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, कृषी व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या जवळा नि गावामध्ये वारंवार राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेव्दारे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी सबंधित विभागांना यापुर्वीच केल्या आहेत. तरीसुध्दा बँकेची शाखा सुरु करत नसल्याने ग्रामस्थातुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत,

गावांतील लोकांना राष्ट्रीयीकृत बँकेतील व्यवहार करण्यासाठी परंडा,बार्शी,भुम,येथे किमान 23 किलोमीटर व मानकेश्वर येथे 11 किलोमीटर जावे लागते. केंद्र व राज्य शासनांच्या अनेक योजना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी. शासनाच्या विविध कर्जयोजनांचा लाभ घेण्यासाठी, शेती पीककर्जासह सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी तसेच महत्वाच्या इतर बाबींसाठी नेहमीच बँकेची गरज लागत असते.
म्हणुन राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी. त्यासाठी जागेपासून हवी ती मदत देण्यास आम्ही तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत व गावचे सरपंच नवजीवन चौधरी यांचे म्हणणे आहे. गावच्या अडचणी लक्षात घेऊन. गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी आम्ही नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटणेच्या वतीने वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करत आहोत. गावात बँक यावी म्हणुन जवळा नि गावासह आजूबाजूच्या गावांचे ठरावही करून दिले आहेत. राष्ट्रीयीकृत बँक गावची खुप महत्वाची गरज असल्याने लीड बँकेने,जिल्हाधिकारी साहेबांनी,मुख्यमंञी महोदयांनी ग्रामस्थांच्या अडचणींचा व एन.डी.एम.जे.संघटणेच्या मागणीचा विचार करून जवळा नि गावात नव्याने राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी उस्मानाबाद मार्फत मुख्यमंञी महोदयांना केली आहे सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांची स्वाक्षरी आहे

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

नातेपुते (प्रमोद शिंदे)-मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश मिडीयम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये
शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2019 रोजी संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली याप्रसंगी मनोज दोशी, विक्रम रणवरे,भगवान पालवे, सुर्वे सर, दैवत वाघमोडे सर, देशपांडे सर, हांगे सर उपस्थित होते.मनोज दोशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे नियोजन आठवी इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया दोशी आभार प्रदर्शन विशाखा तोरणेने केले. तर स्नेहा नारनवर व रवींद्र काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.