दहिगाव नजिक वालचंद नगर रोडवर मोटरसायकल भीषण अपघातात तीन युवक जागीच ठार
नातेपुते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) : इसार दहिगाव पेट्रोल पंप येथून पिरळे कडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात पिरळे ता. माळशिरस येथील दोन युवक व इंदापूर तालुक्यातील हघारेवाडी येथील एक युवक असा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला सविस्तर हकीकत अशी की हघारेवाडी तालुका इंदापूर येथील संग्राम राजाराम जाधव हा आपल्या सासुरवाडीला म्हणजे मोरोची येथे जात असताना ईसार पेट्रोल पंप दहिगाव येथून पिरळे येथे राहणारे सोन्या उर्फ विशाल शशिकांत बुधावले वय 23 राहणार पिरळे व दीपक विठ्ठल बुधावले वय 25 राहणार पिरळे दहिगाव येथीलआयटीआय कॉलेज समोर रात्री साडेनऊच्या सुमारास जात असताना संग्राम राम जाधव हा रॉंग साईड ने भरधाव वेगाने येऊन बुधावले यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली व दोन्ही मोटरसायकलचे धडक बसल्याने जोराचा अपघात झाला दीपक व विशाल मोटर सायकल वरती शेतासाठी प्लास्टिक कॅनमध्ये डिझेल घेऊन जात होते जोराचा अपघातामुळे डिझेल गाडीवरती पडून आग लागली व आगीचा भडका उडाला त्या आगीत तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.रात्री साडेदहा वाजता तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे आणण्यात आले तेथील डॉक्टर नम्रता व्होरा यांनी त्यांना मृत घोषित केले पुढील तपास एपीआय मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश इंगळे हे करीत आहेत. सदर घटना ही रस्त्याच्या चाललेल्या संत गती कामामुळे झाले असल्याची चर्चा रंगली आहे सदर नातेपुते ते वालचंद नगर रोड च्या कामाची मुदत संपली असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे रस्त्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत रस्त्यातून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो व अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या झालेल्या अपघाताला ठेकेदार जबाबदार आहेत असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. संबंधित ठेकेदारावर ती गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सामाजिक संघटनेकडून होत आहे. सदर अपघातास नातेपुते वालचंद नगर रोड संत गतिने करणारे डी पी जे कंपनीचे ठेकेदाराच आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हनुमंत बुधावले माजी तंटामुक्ती अध्यक्ष पिरळे.यांनी माध्यमांसमोर केली आहे या घटनेमुळे पिरळे आणि परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.