Uncategorized

फोंडशिरस येथे अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सॅनिटायझर फवारणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रवादी महिला काँगेस प्रदेशाध्यक्षा व माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या आधारस्तंभ सौ रुपालीताई चाकणकर यांच्या वाढदवसानिमित्त फोंडशिरस येथे सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली.
त्यावेळी माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय भांड तसेच गणेश शेंडे माळशिरस तालुका संघटक माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य
फोंडशिरस गावचे सरपंच पोपट बोराटे उपसरपंच दादा रणदिवे ग्रामपंचायत सदस्य सुनील गोरे, भाऊ पाटील, ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब ,पत्रकार बंधू प्रशांत खरात, तसेच युवा नेते विशाल शेंडे ,अक्षय शेंडे उपस्थित होते

मराठा साम्राज्यातील भटशाहिस आव्हान देणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर

मराठा साम्राज्यातील भटशाहिस आव्हान देणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर

  • Written By Dr.Kumar Londhe

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा महिला विषय असणारा दृष्टिकोन शूद्र मानसिकता चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि प्रकांडपंडित यांचा धर्म व्यवस्थेवर असणारा पगडा या बाबी आपणास माहीत आहेत. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31मे 17 25 रोजी बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला मानकोजी व सुशिलाबाई शिंदे हे त्यांचे आई वडील होय . वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह विवाह सुभेदार मल्हारराव होळकर याचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या बरोबर झाला.

हा विचार आजही व्यवस्था परिवर्तनाच्या आखाड्यातील बहुजन बांधवास तारणारा आहे.त्या अर्थाने राजमाता या आम्हास सत्तेच्या अतुच्य शिखरावरील महाराणी आहेत .

               कर्तुत्वाच्या जोरावर कार्यक्षम राज्यकर्ते म्हणून मराठ्यांच्या इतिहासात साम्राज्यात अहिल्या बाई होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांना दोन अपत्ये होती सासरे यांचा प्रचंड विश्वास त्यांच्यावर होता. पती खंडेराव यांचा कुंभेरीच्या लढाईत दुर्दैवी मृत्यू झाला पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा त्या काळी प्रचलित होती सासरे मल्हारराव होळकर  म्हणाले प्रजाहित साठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य सांभाळणे ही तुमची जबाबदारी आहे सासर्‍यांचा मान राखून सती न जाता त्यांनी राज्यकारभारावर लक्ष दिले. सतीची प्रथा नाकारून त्यांनी महिला स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे महान असे अद्भुत कार्य केले.आपल्या कन्येचा विवाह करताना त्यांनी स्वयंवर घोषित केले चोर दरोडेखोर लुटारू याचा बंदोबस्त जो करील त्या शूर व्यक्तीस आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह करून देऊ असं त्यांनी निश्चय केला. एवढेच नव्हे तर हा विचार त्यांनी प्रत्यक्षात साकारून प्रजेसमोर व व्यवस्थेसमोर एक आदर्श निर्माण केला ही जात व्यवस्थेविरुद्ध मोठी चपराक होती. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणारे एक धाडसी पाऊल होते हे आपण मान्य करणे महत्वाचे आहे. प्रजा व स्वराज्याची संकल्पना स्पष्ट होती 1772 रोजी एका पत्रामध्ये त्या पेशव्यांचा चांगलाच समाचार घेतात दिसतात! ब्रिटिशांना बरोबर हात मिळवणी करण्याबाबत  त्या चांगलीच ताकीद देतात! एक छान पैकी उदाहरण देऊन त्यांना सांगतात वाघ व इतर प्राणी यांना शक्तीने व युक्तीने मारता येते परंतु अस्वलाला मारणे अवघड काम आहे. ब्रिटिशांशी हातमिळवणी करणे म्हणजे अस्वलास कवटाळणे होय अशा पद्धतीचे उपरोधात्मक टोलाही  लगावतात  .अस्वल एखादं शिकार आपल्या कवेत आलं की जोरात घट्ट पकडून गुदगुल्या करून मारते हे सुद्धा  त्या सांगायला विसरले नाहीत अशा पद्धतीने त्यांची राष्ट्रभक्ती या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे जाणवते. ब्रिटिशांशी पेशवाईशी दोन हात करण्याकरता ते मागेपुढे पाहत नाहीत .एवढेच नव्हे तर चोर दरोडेखोर हे  राज्यातील प्रजेवर अन्याय करत असत.त्यांचे परिवर्तन  करण्याचा उद्देशाने  म्हशी ,जमिनी देऊन चोरी कमी करण्याचा प्रयत्न त्या करतात.शेती हे उपजीविकेचे साधन निर्माण झाल्यामुळे दरोडेखोरी चे प्रमाण अत्यल्प झाले त्यांचा उपाय म्हणजे प्रत्यक्ष कार्य होय.न्यायदानाच्या बाबतीत  सुद्धा त्या कठोर होत्या प्रजेस त्रास देणारे व्यक्तीस त्या तोफेच्या तोंडी देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. 

       सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचे कार्य अमुलाग्र असे होते त्यांच्या बाबतीत दैववाद करण्यात काही अपप्रवृत्ती फारच छंद आहे. हे आपणास नाकारून जमणार नाही देवत्व प्राप्त केले त्या व्यक्तीचे कर्तृत्व संपून जाते हे भारतातील वर्ण व्यवस्थेतील प्रकांड पंडितांना चांगलेच माहिती आहे म्हणून अहिल्या बाई होळकर की अहिल्यादेवी होळकर या वादात पडण्यापेक्षा आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा समाजापुढे व देशापुढे प्राणपणाने मांडणे  महत्वाच्याआहे.त्यांनी अनेक ठिकाणी विहीरी तलाव बांधून शेतीपूरक व्यवसायाबरोबरच अन्नछत्र आणि मंदिरे निर्माण सुद्धा केले आहे हा भाव त्यांचा समतेचा पाया आहे.

   एक इंग्रज अधिकारी त्यांना  केथरिन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट यांची उपाधी देतो हे काही कमी नाही. सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक संकटाना तोंड दिले होते.अशा या महान स्वराज्यातील मराठा साम्राज्यातील भटशाहीस आव्हान देणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा 13 ऑगस्त 1795 रोजी मृत्यू झाला.आज त्यांच्या विचाराचा कार्याचा व दातृत्व आणि कर्तुत्वाचा विचार गरजेचाआहे. हे थोर विचार आपणाला एकसंघ ठेवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावताना दिसत आहेत.त्या म्हणतात

     " *ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य असते*
           *तोच खरा लोकाभिमुख राजा बनू शकतो"*

दि.३१ मे २०२१
#जयमल्हार #जयजिजाऊ #जयभीम #जयभारत

लेखक –
डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन
मो.9881643650/7020400150

लेखक –
डॉ.कुमार लोंढे
अध्यक्ष सेंट्रल ह्यूमन राईट संघटन
मो.9881643650/7020400150

भाजपा माळशिरस तालुक्याच्या वती कोविंड योद्धा यांचा सन्मान

*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

नातेपुते( प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तेत आज 7 वर्ष यशस्वी झाली. या निमित्ताने भाजपा माळशिरस तालिक्याचे वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोरोची येथे कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस मा. धैर्यशील भैय्या मोहिते- पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे या आयोजन माळशिरस तालुका अध्यक्ष श्री. बाजीराव काटकर यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमास माजी उपसभापती किशोर सुळ -पाटील,मोरीची गावचे सरपंच समीर गोरे, उपसरपंच अनिल सुळ, दहिगावचे सरपंच रणधीर पाटील,Dr. अभय मेहता,पै रणजित सुळ,पै.उमेश सुळ,सुनील माने, सचिन साळुंके,dr.भोसले,माऊली सुळ,दत्तात्रय साळुंके,सुधीर साळुंके,किशोर वावरे,अप्पा पांडुरंग सुळ,परशुराम झेंडे,मेजर माने,तसेच धर्मपुरीचे युवा नेतृत्व विजयकुमार पाटोळे,मोहन मोरे,गणेश भोकरे, नवा पाटोळे,उपाध्यक्ष सुमित पाटोळे,सचिव विठ्ठल रणदिवे,कार्याध्यक्ष विकास जाधव,अभिजित पाटोळे आदित्य आडके,सौरभ झेंडे,दीपक ढोबळे, ऋषिकेश करवले, तुकाराम झेंडे. आदी मान्यवर उपस्थित होते.

महात्मा फुले जणआरोग्य योजनेमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या डॉक्टर,तालुका समन्वयक,आरोग्यमित्र यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा…. वैभव गिते.

जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथके तयार करून रूग्णालयांवर धाडी टाकाव्यात…विकास धाइंजे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 27 मे 2021 रोजी सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी बाबत शासन परिपत्रक काढले आहे.
अंगीकृत रुग्णालयाने योजनेचे नाव योजनेची संपूर्ण माहिती स्पष्टपणे प्रदर्शित करणारे बॅनर फलक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात बसवणे गरजेचे आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र यांची नेमणूक रुग्णांना मार्गदर्शक म्हणून केली गेली आहे आरोग्यमित्र रुग्णांच्या रेशन कार्डच्या मदतीने रुग्णांची नोंद करण्यासाठी जबाबदार आहे रुग्णालयात नियमित राउंड घेणे आणि रुग्णाला योजनेच्या सर्व लाभ मिळत असल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी आरोग्य मित्राची आहे.तसेच आरोग्य मित्राने रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंत व पाठपुरावा सेवा देण्यासाठी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे परंतु काही कर्मचार्‍यांकडून आरोग्यमित्रांकडून याबाबतची कार्यवाही होत नसल्याचे शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीवरुन निदर्शनास आलेले आहे.यापुढे आरोग्य मित्रांकडून नेमून दिलेल्या कामकाजात रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकांना सहकार्य करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा दुर्लक्ष केल्याच्या किंवा अशा काही इतर बाबी निदर्शनास आल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांनी नियमानुसार आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करावी असे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 27 मे 2021 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकात नमूद केले आहे.तसेच सर्व जिल्ह्यातील सर्व अंगीकृत रुग्णालयांना आठवड्यातून एकदा जिल्हा समन्वयक यांनी भेट देऊन आरोग्य मित्रांच्या कामकाजाचा आढावा घेणे आवश्यक आहे.योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा समन्वयक व विभागीय व्यवस्थापक यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.परंतु जिल्ह्यात व तालुक्यात असे होताना दिसत नाही.
सार्वजनिक आरोग्यविभागाच्या दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 2 नुसार परिशिष्ट 1 मध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेकरिता समितीची रचना व कार्य कक्षा याची निश्चिती केली आहे सदर शासन निर्णयातील परिशिष्ट क्रमांक पाच जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक आहे. जिल्ह्यातील योजनेच्या कामकाजाचा सर्वांगीण आढावा घेणे योजनेच्या अंमलबजावणी करिता विमा कंपनी अंमलबजावणी सहाय्य संस्था यांना सूचना करणे जिल्हा कार्यक्षेत्रातील रुग्णालय अधिकृत करणे कार्यरत रुग्णालयाचे तात्पुरते निलंबन किंवा अंगीकृत करने रद्द करणे याकरिता राज्य आरोग्य सोसायटी शिफारस करते जिल्हा स्तरावरील प्राप्त तक्रारींचे निराकरण करणे समितीची बैठक दर तीन महिन्यातून एकदा आयोजित करणे इत्यादी कार्यकक्षा विहित केलेली आहे तथापि याबाबतची कार्यवाही जिल्हा स्तरावरून होत नसल्याचे दिसून येते जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बैठकी आयोजित करीत नाहीत. जिल्हाधिकारी व संपिरण सनियंत्रण समिती ही कर्तव्यात कसूर करत आहे. जिल्हा समन्वयक यांनी प्रत्येक आठवड्याला प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांना भेट देऊन रुग्णांना मोफत इलाज मिळतो का?हे पाहणे बंधनकारक असताना सुद्धा जिल्हा समन्वयक भेटी देत नाहीत. राज्य आरोग्य हमी सोसायटीने दर तीन महिन्यांनी बैठक घेणे बंधनकारक असताना राज्य आरोग्य हमी सोसायटी सुद्धा या बैठका घेत नाही.कुंपनच शेत खात आहे.ज्यांच्यावर या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे तेच जर कर्तव्यात कसुर करीत असतील त्यांनाच जर जबाबदारीची जाणीव नसेल तर अंगीकृत रुग्णालये,डॉक्टर,आरोग्यमित्र व तालुका समन्वयक प्रामाणिक कसे राहतील?
अंगीकृत ऋग्नालये शासन निर्णयानुसार जर रुग्णांना सेवा सुविधा उपलब्ध करून देत नसतील टाळाटाळ करीत असतील तर अंगीकृत रुग्णालया विरुद्ध राज्य आरोग्य हमी सोसायटीने कारवाई करावी.
अंगीकृत रुग्णालयांचे डॉक्टर आरोग्यमित्र व योजनेचे तालुका समन्वयक एकमेकांशी आर्थिक तडजोड करून रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत.रुग्णालयांचे डॉक्टर आरोग्य मित्र व तालुका समन्वयक यांना प्रत्येक महिन्याला आर्थिक रसद पुरवून भ्रष्टाचार करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 27 मे 2021 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकाची तसेच दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयांची व त्यासोबत जोडलेल्या परीशीष्ठांची तंतोतंत अंमलबजावणी करावी निवेदनाच्या सोबत संदर्भीय शासन परिपत्रक,शासन निर्णय जोडलेले आहेत.कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक जाती-धर्माची गोरगरीब जणता विविध प्रकारे संक्रमित होऊन पैशाअभावी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी जात नाहीत.आणि जिख्यात या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे.जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी प्रांत तहसीलदार यांनी तात्काळ या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी भ्रष्टाचारी डॉक्टर,आरोग्य सेवक व तालुका समन्वयक यांच्यावर फौजदारी कारवाई करून रुग्णांना मोफत उपचार द्यावेत. अंगीकृत सर्व रुग्णालयांना नोटिसा देण्यात याव्यात. तात्काळ कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी (प्रांत) अकलूज यांच्या कार्यालयासमोर दिनांक 14 जून 2021 रोजी तीव्र व उग्र आंदोलन छेडणार आहे.असे मुख्यमंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर माळशिरस शहराचे माजी सरपंच व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाइंजे, नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख वैभव काटे,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबा सोनवणे सोलापूर जिल्हाअध्यक्ष पंकज काटे,दत्ता कांबळे,सचिन झेंडे,सुनील भोसले,आप्पा गाडे,गणेश गायकवाड, प्रशांत खरात,भगवान भोसले,बबन नवगिरे,समीर नवगिरे यांच्या सह्या आहेत.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमात सहभागी होऊन नवदिशा देवकाते हिने अनाठाई खर्च टाळून गरीब मुलींना मदत करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून गोरगरीब  गरजू लोकांना मदत केली जाते.तशा प्रकारचा संदेश इतरांना दिला जातो.याच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज उपक्रमात नवदिशा मार्तंड देवकाते नातेपुते येथील दाते प्रशालेतील ह्या  इयत्ता अकरावी  तील विद्यार्थिनी स्वयंपुर्ती ने सहभागी होऊन स्वतःच्या वाढदिवसाचा अनाठाई खर्च टाळून गरजू व गरीब मुलींना कोरोना काळात मदत व्हावी म्हणून ड्रेस व खाऊ दिले आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे नवदिशाने स्वता वर्षभर युट्युब वर  व्हिडिओ बघून स्वतःच्या हाताने ड्रेस  शिवलेले आहेत.व ते वर्षभर  शिवलेले ड्रेस तिने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयांमध्ये गरीब व गरजू मुलींना देण्यासाठी संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक प्रशांतजी खरात यांच्या स्वाधीन केले आहे.नवदिशा देवकाते व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.गेल्या वर्षी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने गरीब व गरजू लोकांनाअन्नधान्य वाटप करण्यात आले होते.त्यामध्ये कुरबावी येथील वेदांत सागर दडस या चिमुकल्या चार वर्षाच्या मुलाने वाढदिवसानिमित्त त्याच्या खाऊचे पैसे जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी दिले होते.तीच प्रेरणा घेत नवदिशाने  गरजू व गरीब मुलींना वाढदिवसानिमित्त ड्रेस व खाऊ दिले.तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयात संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांच्या वतीने नवदिशाचा वाढदिवस साजरा करून सत्कार  करण्यात आला तसेच नव दिशा आहे चांगली चित्रकार आहे तिने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे सर्वेसर्वा संचालक एन डी एम जे चे राज्य महासचिव तथा आंतरजातीय विवाह मसुदा कायदा समिती सदस्य मंत्रालय मुंबई ॲड.डॉ.केवल उके यांचे हुबेहूब चित्र रेखाटून कार्यालयास भेट दिले.या दानशूर अहिल्या मातेच्या लेकीचे परिसरात कौतुक होत आहे.हे ड्रेस राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गरजू व गरीब मुलींना वाटप करण्यात येणार आहे.यावेळी नवदिशा चे वडील  मार्तंड देवकाते,कन्हैया देवकाते रूपाली किसवे अनुभव देवकाते उपस्थित होते.

नवदिशा देवकाते हिने अनाठाई खर्च टाळून गरीब मुलींना मदत करत वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा 

बुद्ध जयंती निमित्त साई सेवा दल यांच्यावतीने आसू येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जयंती निमित्त साई सेवा दल यांच्यावतीने आसू येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न  

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )बुद्ध  जयंतीचे औचित्य साधून तसेच कोरूना प्रादुर्भावत रक्तपुरवठा कमी होत असल्याने साई सेवा दल बहुउद्देशीय संस्था व सिद्धार्थ तरुण मंडळ आसू यांच्या वतीने मौजे असू तालुका फलटण येथील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन गावचे आसू गावचे सरपंच महादेव सकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  दिप गंगा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक अजयशेठ फराटे,भाजप चे युवा नेते विशाल सिंह माने- पाटील,  ग्रा.पं. सदस्य राजेंद्र गोफणे, नितीन गोडसे, जमीर महात,उपसरपंच धनंजय घोरफडे, साई सेवा दलाचे संस्थापक गुरू कर्चे, सोमा भोसले, राहुल रणदिवे, विशाल भुसारे, शाखा कर्चे, नाना सोरटे, adv. जीवन पवार, पत्रकार अविनाश जाधव अजित निकम तसेच साई सेवा दल व सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नातेपुते येथील मधुर मिलन कार्यालय ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाकडून जोर जबरदस्ती केली जातेय -दोशी कुटुंबीयांचा प्रशासनावर आरोप..

 
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रतिनिधी )मधुर मिलन हे नातेपुते नजीक मांडवे हद्दीतील प्रसिद्ध असे दोन एकरात मोठे मंगल कार्यालय आहे. तसेच हे मंगल कार्यालय अभिजित दोशी व ऍड.दिपक फडे यांच्या मालकीचे आहे. हे मंगल कार्यालय गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना पेशंट विलगीकरण करण्यासाठी प्रशासनाने देखभाल दुरुस्ती तसेच भाडेतत्वावर ताब्‍यात घेतले होते.कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने इमारत अभिजित दोशी यांच्या ताब्यात दिली होती.परंतु कोणत्याही प्रकारचा इमारत वापरल्याबद्दल मोबदला व देखभाल दुरुस्ती शासनाने दिली नाही तसेच याहीवर्षी कोरोनाची दुसरी लाट आली व प्रशासनाने जोर जबरदस्तीने कोरोना पेशंट विलगीकरण करण्यासाठी इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु या इमारतीत सध्या अभिजीत सनद कुमार दोशी व त्यांचे नातलग वास्तव्यास आहेत. हे प्रशासनास माहित असून देखील प्रशासनाने जोर जबरदस्तीने त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध कार्यालय ताब्यात घेतले आहे व त्या मंगल कार्यालयाला बाहेरून कुलूप लावले आहे.असा आरोप अभिजीत सनद कुमार दोशी कुटुंबियांकडून होत प्रशासनावर आहे. दोशी कुटुंब याचं म्हणणं असा आहे कि आमच्या मंगल कार्यालयात लाखो रुपयांची झाड आहेत.गेल्या वर्षी या झाडांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .प्रशासनाने लाईट बिल सुद्धा दिला नाही आम्ही स्वतःच्या पैशाने लाईट बिल भरून ही झाडे जगवली आहेत.काहीही झालं तरी आम्ही ही आमच्या मालकीची इमारत प्रशासनाला देणार नाही  प्रसंगी आम्ही अमरण उपोषणास बसू अशी भूमिका अभिजित दोशी व कुटुंबीयांनी घेतली आहे.यावर मा. तहसीलदार यांनी सांगितले की ही इमारत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदी नुसार जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात दिनांक 18/4/2020 रोजी कोरोना संपेपर्यंत अधिग्रहित केली आहे इमारत कोरोना साठी वापरण्यास बंधनकारक आहे लाईट बिल भाडे संदर्भात वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार केला आहे जेव्हा पैसे येतील तेव्हा देऊ त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे अशाप्रकारे मा.तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी भूमिका मांडली आहे. यावर अभिजित दोशी  यांनी भूमिका मांडली की जर प्रशासनाने जोर,जबरदस्ती केल्यास दोशी कुटुंब मधुर मिलन मंगल कार्यालयात अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. यावर दोशी कुटुंब व प्रशासन यांच्यामध्ये मंगल कार्यालयवरून वाद निर्माण झाला आहे.

मधुर मिलन कार्यालय ताब्यात घेण्यासाठी  प्रशासनाकडून जोर जबरदस्ती  केली जातेय -दोशी कुटुंबीयांचा प्रशासनावर आरोप..

ज्येष्ठ पत्रकार प्रसाद जोगळेकर काका यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)

अकलूज ता. माळशिरस येथील पुरोगामी विचारांचे अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रसाद जोगळेकर काका यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.साप्ताहिक गावकुसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली होती. राज्यातील विविध दैनिकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याची वरदायिनी असलेल्या उजनी पाणी प्रश्नावर त्यांनी आज (मंगळवार दि. २५ मे २०२१) सायंकाळी ५ वा. त्यांनी एक व्हिडिओ वार्तापत्र बनवले. त्यानंतर मित्रांशी गप्पा मारत असतानाच सायं ५.२५ वा. त्यांना अचानक चक्कर आली व ते कोसळले. मित्रांनी त्यांना ताबडतोब अकलूज येथील कार्यालयातून डॉ. देवडीकर यांच्या रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. माळशिरस तालुक्याने एक हरहुन्नरी पत्रकार गमावला असल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

उल्हासनगर 2 येथे शिवबा मोफत अन्न छात्रालय चे उदघाटन संपन्न रोज मिळणार पाचशे ते हजार लोकांना जेवण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (संदेश भालेराव कल्याण)

साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान, संत रोहिदास महाराज समाज प्रबोधन मंडळ, व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा यांच्या आयोजनाचे
. दि.२०/०५/२०२१ पासुन शिवबा मोफत अन्न छात्रालय सर्व सामान्य गोरगरीब जनते साठी सुरू झाले असून तर लाॅकडाऊन सुरळीत होत नाही तोपर्यंत हा उपक्रम चालु असेल.
मार्च २०२० पासुन ते आजतागायत कोरोना सारख्या महामारीमुळे अनेकांचे काम धंदे सुटले आहेत व अनेक परिवारात उपासमारी ची वेळ आली असून एक वेळचे जेवणाची सुध्दा सोय होत नसल्याचे निदर्शनास येताच साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान,
नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस ठाणे जिल्हा,
,संत रोहिदास महाराज समाज सेवा मंडळ ,अनुसूचित जाती,जमाती,इतर मागासवर्गीय शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटना मंत्रालय संघटनांनी मिळुन वस्तु स्वरूपात आर्थिक स्वरूपात मदत घेऊन शिवबा मोफत अन्न छात्रालय उल्हासनगर २ येथील महात्मा गांधीनगर या परिसरात सुरू करण्यात आले आहे.
तरी शिवबा मोफत अन्न छात्रालय चे उदघाटन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके सर
,रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.अण्णासाहेब रोकडे,
समाज सेविका दिपश्रीताई माने-बलखंडे,मंत्रालय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष मा.भारतजी वानखडे, ॲड.स्मिता गोरे,लताताई पडणार,वं.ब.आ.उल्हासनगर शहर अध्यक्ष रेखाताई उबाळे, किरणजी पडवळ, प्रफुल्ल केदारे, एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष मा.बंदिशजी सोनवणे ,
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे,
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश मा.शशिकांत वाघ, एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सचिव विनोद एस .रोकडे,एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सहसचिव सुनिलजी ठेंगे ,
एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदेशजी भालेराव, एन.डी.एम.जे.कल्याण डोंबिवली शहर जिल्हाअध्यक्ष ॲड.प्रविणजी बोदडे,
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा सचिव संदीपजी घुसळे ,संघटक कुशल निकाळे.,आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके सर यांनी समस्त दानशूर दात्यांना जे शक्य होईल ती मदत या शिवबा मोफत अन्न छात्रालयाला पुरविण्याचे आव्हान केले आस्ता
ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटनेने विशेष सहकार्य केले
जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी काबंळे,
क.डो.जिल्हाअध्यक्ष प्रविणजी बोदडे,
यांच्या सयोजनाने
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश यान्ही सुध्दा विषेश सहकार्य केले
अध्यक्ष बंदिश सोनवणे व मुंबई ठाणे प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे , कल्याण ग्रामीण अध्यक्ष नितेश गायकवाड एन.डी.एम.जे.
यांच्या संयोजनांने,

तसेच सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी
साहित्य सम्राट.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा.प्रकाश सोमनाथ जाधव, उपाध्यक्ष पप्पू जाधव, कार्याध्यक्ष दादु चव्हाण, नितीन जाधव, संदिप गवळी,आदर्श कांबळे, प्रविण लोंढे,बबलु कांबळे, राजेश जाधव, यांनी अथक परिश्रम घेतले

नातेपुतेकरांच्या सेवेसाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान च्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू

नातेपुतेकरांच्या सेवेसाठी नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दलाच्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू

नातेपुतेकरांच्या सेवेसाठी नफा ना तोटा तत्त्वावर साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान च्या वतीने ॲम्बुलन्स सेवा सुरू बाबाराजे देशमुख व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

-नातेपुते ता.माळशिरस परिसरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची दवाखान्यात येण्यासाठी गैरसोय होत आहे व ॲम्बुलन्स साठी रुग्णांना जास्त पैसे मोजावे लागतात गरीब आणि गरजू रुग्णांची पैशावाचून हेळसांड होऊ नये यासाठी.साई सेवा दल व मामाश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. या ऍम्ब्युलन्स सेवे चे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे व मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले.यावेळी,ॲडवोकेट शिवाजी पिसाळ पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, अतुल शेठ बावकर,विशाल साळवे, धनाजीराव पांढरे, दादासाहेब लांडगे ,साई सेवादल अध्यक्ष गुरु कर्चे ,रंजीत काळे,सोमनाथ भोसले व मान्यवर उपस्थित होते.

You may have missed