Uncategorized

नातेपुते पोलिसांनी दरोडेखोरांना ४८ तासाच्या आत ठोकल्या बेड्या*


पाच चोरीच्या मोटरसायकली सहज दरोडेखोरांना अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

नातेपुते पोलीस ठाणे मध्ये दाखल झालेल्या दरोडे मधील दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. 
        याबाबत हकीकत अशी की दिनांक 31 मार्च 20 21 रोजी नातेपुते येथील व्यापारी अंबादास उत्तम पलंगे यांचा महिंद्रा पिकप एम.एच.४२ ७१४६ या गाडीमध्ये चाळीस मेंढ्या घेऊन केरळ येथील व्यापाऱ्यास देण्यासाठी ड्रायव्हर फिर्यादी बापूराव महादेव डोंबाळे व त्यांच्यासोबत हनुमंत शेषराव बनसोडे रा.नातेपुते हे शिंगणापूर मार्गे जात असताना अज्ञात सहा जणांनी त्या पिकअप चा पाठलाग करून रात्रीअकरा वाजता घाटातील तिसऱ्या वळणावर चढाला पिकप गाडी समोर मोटरसायकल आडवी लावून पिकप ची चावी काढून बापूराव डोंबाळे व हनुमंत बनसोडे यांना अडवून त्याच्याकडे पैशाची मागणी करून व त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून. त्यांच्या खिशातील ५०००रुपये व २ मोबाइल घेऊन पसार झाले याबाबत बापूराव डोंबाळे रा.नातेपुते यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे गुरन ७७/२०२१, भादवि कलम ३९५,३४१ प्रमाणे गुन्हा केला.नातेपुते पोलीस स्टेशन अंतर्गत असणारा शिंगणापूर व कोथळे घाट या ठिकाणी रात्रीची वाहतूक तुरळक असते सदर ठिकाणी यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.        या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली.नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी तात्काळ चक्र फिरवत या गुन्ह्यासंदर्भात दोन टीम तयार करून आरोपींचा माग काढून आरोपी नामे सोमनाथ उर्फ सागर अनिल बनसोडे वय २२, अक्षय बबन बल्लाळ वय २४, रा.सदाशिवनगर ता.माळशिरस,अभिमान अर्जुन खिलारे रा.मोरोची, धनाजी साधू दडस रा. मार्कडवाडी, गणेश बाळासो जाधव रा.जाधव वाडी, चैतन्य हनुमंत झेंडे रा. मोरोचीता. माळशिरस,या आरोपींना नातेपुते पोलिसांनी ४८ तासात च्या आत  बेड्या ठोकल्या.या गुन्ह्यात आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यासाठी चोरून आणलेल्या ५ मोटरसायकल व चोरून नेले ५ हजार रुपये तसेच २मोबाईल असा एकूण एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.                                                   सदरची ही कामगिरी नातेपुते पोलीस स्टेशन येथील तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोहे ४५० गडदे,पोना १५८१ मसाजी थोरात ,पोकॉ २०३८अजीत कडाळे, पोलीस कॉन्स्टेबल ३४५अमित जाधव,पोलीस कॉन्स्टेबल १२ विशाल घाडगे,पोलीस नाईक १६३५राजेश लांडगे, पोलीस नाईक १८१९ सचिन भोसले, पोलीस नाईक ८५०नवनाथ माने,चालक पोलिस शिपाई २२०२ राहुल भोसले,पोलीस नाईक ५१० सूर्यवंशी,पोलीस कॉन्स्टेबल ८०१ धनाजी मुटकुळे,१७३२ जानकर, पोलीस कॉन्स्टेबल २२४९ कापसे,पोलीस नाईक १७८८महेश पाटील,पोलीस नाईक८८२ नागरगोजे, पोलीस नाईक १५३३ बबलू गाडे, तसेच सोलापूर सायबर पोलीस ठाण्याचे अन्वर आत्तार यांनी कामगिरी केली यासंदर्भात नातेपुते पोलीस स्टेशन  कडून माहिती देण्यात आली .तसेच सदरच्या कामगिरीमुळे नातेपुते परिसरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.

नातेपुतेत प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – प्रमोद शिंदे-
राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढतात आहे.त्याला रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे.तसेच मुख्यमंत्र्यांकडून राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिनांक ६ एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत सोलापूर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व मार्केट दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तसेच रात्री आठ वाजल्यापासून संचार बंदीही करण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर नातेपुते येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे करण्यात आले आहे. तसेच नातेपुते पोलीस स्टेशन च्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक, शिंगणापूर पाटी, व परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून स्वतः नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर हे पेट्रोलिंग करत आहेत रात्री फिरणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणारं वरती व प्रशासनाचे आदेशांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

अण्णाभाऊ साठे चौक येथे नाकाबंदी करताना पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायत 15 टक्के निधीतून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना धान्य वाटप करा-विकास दादा धाईंजे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
( प्रमोद शिंदे) –

ग्रामपंचायत 15 टक्के निधीतून अनुसूचित जाती जमाती च्या लोकांना धान्य वाटप करा यासाठी निवेदन देताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे, प्रमोद शिंदे, सुनील भोसले 

पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना ने परत थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शासनाने लोकांवर कडक निर्बंध टाकण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू केला आहे. व्यवसायामध्ये मंदी आली आहे.महागाईचा भडका वाढत आहे.त्यामुळे लोकांच्या हाथाला काम नाही. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती च्या पंधरा टक्के निधीतून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करा अशी मागणी गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडे माळशिरस येथील माजी सरपंच तथा आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंजे यांनी केली आहे.माळशिरस तालुक्यातील 108 ग्रामपंचायती आहेत या सर्व  ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना आदेश देऊन 15 % अनुसूचित जाती जमाती लोकांच्या विकासाच्या निधीतून लोकांना अन्न धान्य वाटप करण्या साठी खर्च करण्यात यावा असे आदेश तात्काळ देण्यात यावे.यासाठी आंबेङकरी चळवळीच्या वतीने पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनावर ती आंबेडकर चळवळीचे नेतेविकासदादा धाईंजे, रिपाईचे जेष्ठ नेते दयानंद धाईंजे, प्रदीप धाईंजे यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना पत्रकार प्रमोद शिंदे (एन डी एम जे राज्य प्रसिद्धीप्रमुख) व एन डी एम जे तालुका संघटक सुनील भोसले उपस्थित होते.

रासपच्या अल्पसंख्याक दहिवडी तालुकाध्यक्षपदी अल्ताफ मुलाणी यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कराष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्यांक दहिवडी तालुकाध्यक्षपदी अल्ताफ मुलाणी यांची निवड
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर ,व आमदार रत्नाकर गुट्टे, व महासचिव बाळासाहेब दोडतले, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्याक आघाडी चे पच्शिम महाराष्ट्र प्रभारी शाहिद मुलाणी, यांच्या नेतृत्वत नातेपुते येथे निवड करण्यात आली. निवड करतेवेळी मराठवाडा प्रभारी नितिन धायगुडे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक रियाज आतार, माळशिरस तालुका अध्यक्ष माऊली सरक, अण्णासाहेब पाटील, सागर बिचुकले,उद्योजक जब्बार मुलाणी,कमाल मुलाणी, मनोज लाडगे ,तानाजी बोडरे,तेजस पाटील, असलम मुलाणी, जावेद तांबोळी, सुनिल पाटील, पै. दत्तात्रय रुपनवर, बापुराव जानकर, आनंद चोपडे, विनोद पांढरे, गौतम नाईक, शाहरुख मुलाणी राजू सिद्धिकी,रवी बरगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरोगामी महाराष्ट्राच्या न्यूज चा झटका 24 तासाच्या आत तीन कोटी च्या निकृष्ट दर्जाच्या फोंडशिरस -सदाशिवनगर रस्त्याची दुरुस्ती च काम सुरू

पुरोगामी महाराष्ट्राच्या न्यूज चा झटका 24 तासाच्या आत तीन कोटी च्या निकृष्ट दर्जाच्या फोंडशिरस -सदाशिवनगर रस्त्याची दुरुस्ती च काम सुरू
फोंडशिरस -सदाशिवनगर निकृष्ट दर्जाचे केलेले रस्त्याचे काम
सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे काम
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा दणका

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दिनांक एक एप्रिल रोजी “फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन” ही बातमी प्रसिद्ध केली होती यावर चोवीस तासाच्या आत बांधकाम विभाग  अकलूज  च्या अधिकाऱ्याने बातमीची दखल घेत संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे झाले असलेले काम दुरुस्त करण्यास हाती घेतले आहे. याबाबत हकीकत अशी की. फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी रुपये इस्टिमेट बजेटच्या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले आहे.परंतु हे काम अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे झाले होते.यासंदर्भात  फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात , दिनेश भोसले,जमीर मुलानी.संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम झाले या संदर्भात जाब विचारला असता प्रथमता अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला तोंडी व लेखी तक्रार केली होती. यावर  अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची  दखल घेतली नाही.परत एकदा या तिघांनी दिनांक 1 एप्रिल रोजी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले कि फोंडशिरस- सदाशिवनगर सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे.याची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आठ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे असे निवेदन दिले यासंदर्भात ची बातमी  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल ने प्रसिद्ध केली  यावर अधिकार्‍यांची पळापळ झाली या बातमीची दखल घेत अधिकाऱ्यांनी 24 तासात निकृष्ट दर्जाचे झालेले काम दिनांक 2 एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे.परंतु येथील  ग्रामस्थांनी इस्टिमेट प्रमाणे काम करण्याचा आग्रह धरला आहे.कामाची वरिष्ठांकडून  चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली आहे.तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी धरणे आंदोलन ही करणार असल्याचं प्रशांत खरात यांनी सांगितले तसेच अधिकारी हे ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.या कामाची चौकशी न झाल्यास मंत्रालयीन स्तरापर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे ही यांच्याकडून सांगण्यात आला आहे

निकृष्ट दर्जाचे झालेले काम पुन्हा दुरुस्त करण्यासाठी रस्त्याला लावला नांगर
रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करताना सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात, दिनेश भोसले ,जमीर मुलानी

फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन

फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –  फोंडशिरस -सदाशिवनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत तीन कोटी रुपये इस्टिमेट बजेटच्या रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. हे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे निदर्शनास येत आहे.रस्ता पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्या मध्ये खड्डे पडले असून नवीन रस्ता हातानी उकरत आहे.या रस्त्यामध्ये डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या संदर्भात फोंडशिरस येथील ग्रामस्थांकडून रस्त्याचे काम सुरू असताना उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. या पाठी मागचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम करण्यासाठी अधिकारीच पाठीशी घालतात असे ग्रामस्थांकडून आरोप केले जात आहेत. मा.उप अभियंता यांना इस्टिमेट प्रमाणे काम झाले का हे विचारलं असता उपअभियंता व संबंधित अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.यासंदर्भात चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व डोळेझाक अपने बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार व धिकार्‍यावर कारवाई न झाल्यास दिनांक 5 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथे  बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात,जमीर मुलानी ग्रामपंचायत सदस्य दिनेश भोसले यांनी मा.उपविभागीय प्रांत अधिकारी ,मा. तहसीलदार माळशिरस, अकलूज पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे.या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काल एका चार चाकी वाहनाचा अपघात सुद्धा झाला आहे. फोंडशिरस सदाशिवनगर रस्त्याला मोठ्या प्रमाणात वर्दळ असते विद्यार्थी,शेतकरी व अनेक लोक या रस्त्याने ये-जा करतात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामांचा निधी येत असतो व त्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन कामे निकृष्ट दर्जाचे होतात याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे ही दिसून येत आहे.

फोंडशिरस-सदाशिवनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर अपघात चार चाकी गाडीची पलटी
फोंडशिरस सदाशिवनगर रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याकारणाने रस्ता इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावा अन्यथा धरणे आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात ,ग्रामपंचायत सदस्य दिनेश भोसले, जमीर मुलानी बांधकाम विभाग अधिकारी घनवट यांना निवेदन देताना

लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केल्याचे आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस प्रमोद शिंदे.
फोंडशिरस (ता. माळशिरस जि.सोलापुर)येथील कुंभारमळा शिवारात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेला मागील भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केल्याचे आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश माळशिरसचे प्रथमवर्ग ज्युडिशिअल मँजिस्ट्रेट मा. पी.पी.कुलकर्णी यांनी दिले.

लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केल्याचे आरोपातून फोंडशिरस येथील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता
आरोपी तर्फे युक्तिवाद करणारे वकील ॲडव्होकेट सुमित राजू सावंत माळशिरस कोर्ट

या बाबत सविस्तर माहिती अशी की,
सन – २०१४ मध्ये नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत,फोंडशिरस,कुंभारमळा येथील, एका महिलेला लोखंडी गज डोक्यात मारून रक्ताची जखम केल्याबाबत तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्या बाबत फोडशिरस येथिल विजय भोसले, सुनिल भोसले, अतुल ढावरे यांचे विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबाबत माळशिरस येथील फौजदारी न्यायालयात सहा वर्ष केस चालली होती.
सदर केसकामी सरकारी पक्षाने एकुन सहा साक्षीदार तपासले, सर्व साक्षीदार यांच्या साक्षी,महत्वपूर्ण झाल्याने या केस कडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आरोपींतर्फे ॲड.सुमित सावंत यांनी तपासलेले बचाव पक्षाचे साक्षीदार आणि फिर्यादीच्या जखमा, पंचनाम्यात असलेली तफावत, आणि तपासादरम्यान तपासीय अधिकारी यांचे कडून राहिलेल्या त्रुटींवर प्रभावशाली केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री.पी.पी. कुलकर्णी, कोर्टाने तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
सरकारी वकील म्हणून ॲड. किरण सोनवणे यांनी काम पाहिले.

नातेपुते पोलीस स्टेशन येथे तणावमुक्त जीवन जगण्यासाठीची कार्यशाळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांसाठी तनाव मुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात अनेक कामामुळे पोलिस  कर्मचाऱ्यांना तणावात जीवन जगावे लागते हेच ताणतणावाचे जीवन तणावमुक्त होऊन सुखकर होण्यासाठी.रयतकल्याण फाऊंडेशन’ अध्यक्ष- प्रणव थोरात यांच्या संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्षय व्यवहारे सर हे होते.’ तणाव मुक्त व्यवस्थापण’या विषयावर अक्षय व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.तणावमुक्त व्यवस्थापन  कशा पद्धतीने करावे याचं त्यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर हे होते. तसेच या कार्यक्रमास पत्रकार प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, तसेच नातेपुते पोलिस स्टेशन चा सर्व स्टाफ आणि इतर अधिकारी सदर उपस्थित होते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नातेपुते पोलिसांनी केले गुन्हे दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधीनातेपुते येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दिलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर नातेपुते पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तो रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मा.सोलापूर जिल्हा अधिकारी गर्दी टाळण्यासाठी दिनांक 25/3/2021 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्य क्षेत्रांमध्ये असणारी सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळून सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर जमावबंदीचे आदेश ही दिले आहेत. त्याचप्रमाणे शनिवार-रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिनांक 26 3 2021 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान स्वतः नातेपुते पोलीस स्टेशन येथील ए.पी.आय.मनोज सोनवलकर व त्यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल /16-26 सचिन वाघ, 813 तळेकर ,1788  कदम, पोलीस नाईक/1533 बबलू गाडे,1788 पाटील,पोलीस कॉन्स्टेबल 12 घाडगे,2139 कापसे असे सरकारी वाहनाने गस्त करत असताना माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना सत्यजित परमिट रूम जवळ असलेली पानटपरी चालक गणेश बाळासाहेब डफळ रा.नातेपुते हा निर्बंध घातलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ ग्राहक करताना मिळून आला आहे.तसेच नातेपुते वालचंद नगर रोड लगत बोडरे कॉम्प्लेक्स मधील गाळ्यांमध्ये फिटनेस जिम अँड प्रोटीन शॉप मध्ये जाऊन पाहणी केली असता सदर जिम मध्ये 8 ते10 इसमे एकत्र येऊन व्यायाम करत असल्याचे दिसून आल्यानंतर जिमचे मालक माऊली कांतीलाल पोटे रा.नातेपुते तसेच नातेपुते ग्रामपंचायत येथील भेळीचे गाडे जास्त वेळ चालू ठेवून ग्राहक करत असताना भेळ गाडीचे मालक दिपक मधुकर पद्मन व अक्षय निवृत्ती पिसे आढळून आल्याने या सर्वांविरुद्ध भादवि कलमान्वये आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,संस्था,संघटना यांच्यावर भादवि कलम 188 मधील तरतुदी नुसार कायदेशीर  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.                               

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नातेपुते पोलिसांनी केले गुन्हे दाखल

नेहमीच गजबजलेल्या नातेपुतेत शुकशुकाट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन सर्वत्र कडकडीत बंद
अण्णाभाऊ साठे चौक परिसर नातेपुते
सुंधा स्वीट होम परिसर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
नातेपुते येथील प्रमुख बाजारपेठ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाच्या आदेशानुसार नेहमीच गजबजलेली  प्रमुख बाजारी  व्यापारपेठ नातेपुते व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मा.जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांचे दिनांक 25 मार्च रोजीचे आदेश असून या आदेशाचे पालन करण्यात आले. फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 चे कलम 144 नुसार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत शासनाच्या आदेशान्वये प्रतिबंध कायदा 1897 मधील तरतुदीनुसार covid-19 नियंत्रित आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहे.  त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंतच चालू राहतील हे निर्बंध अत्यावश्यक सेवा वगळता करण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवेमध्ये मनुष्य व प्राणीमात्रांना साठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला,फळे,किराणा,दूध,वृत्तपत्र वितरण या बाबींना निर्बंध लाभ राहणार नाही.प्रत्येक शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील त्यादिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना निर्बंध असेल सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार व जनावरांचे बाजार बंद राहतील.खाद्यगृह हे परमिट रूम/बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत कोरोना चे मार्गदर्शक तत्वे पालन करून 50% क्षमतेने सुरू राहतील, किचन व पार्सल रात्री दहा पर्यंत सुरू राहतील, सामूहिक स्पर्धा, कार्यक्रम बंद राहतील. जिम,व्यायाम शाळा,स्पोर्ट,कॉम्प्लेक्स,जलवितरण, वैयक्तिक राहतील.सर्व धार्मिक स्थळे मंदिरे सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत चालू राहतील.        तसेच मास्क वापरणे, सानी टायझर, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक राहील.या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 कलम 188 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र करण्यात येईल 2005 साथरोग नियंत्रण तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आदेश सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. यावर नातेपुते व परिसरात कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे परंतु या बंदमुळे दररोज छोटे-मोठे व्यवसाय करणारे व मजूर हातावर पोट भरणारे यांचे हाल होताना दिसत आहेत.

You may have missed