विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरळे येथील 22 रुग्णांची मोफत यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिरळे येथील 22 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संदिप नरोळे मित्रपरिवार व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल महंम्मदवाडी हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिर दिनांक 14/ 6 /2022 रोजी मा.आ.श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून पिरळे व परिसरामधील पेशंटचे डोळे तपासणी डॉक्टर शरद शिंदे डॉक्टर संभाजी जगताप यांनी 440 रुग्णांची करण्यात केली .



त्यापैकी 241 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व 48 पेशंट मोतीबिंदू ऑपरेशन साठी निवडले गेले त्यापैकी दिनांक 19/ 6 /2022 रोजी 22 पेशंट पिरळे या ठिकाणावरून एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल महंम्मदवाडी हडपसर पुणे या ठिकाणी पाठवण्यात आले यावेळी रुग्णवाहिका गाडीला सरपंच सौ. अलका रामलिंग नरोळे यांनी श्रीफळ फोडून महिला रुग्ण 11 यांना शाल, पाणी बॉटल, बिस्किट, पुष्पगुच्छ दिले व संदीप नरोळे मित्रपरिवार यांनी पुरुष रुग्ण 11 यांना शाल, पाणी बॉटल,बिस्किट, पुष्पगुच्छ देऊन रुग्णांनाचे ऑपरेशन व्यवस्थित होऊन गेलेली दृष्टी परत येण्याकरता शुभेच्छा देऊन रुग्णवाहिका गाडीमध्ये बसवून दिले यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच संदीप नरोळे , माजी सरपंच बाबुराव गायकवाड ,दत्तात्रेय लवटे, अशोक तोडकर, मेजर दादासो किर्दक, नामदेव दडस, पत्रकार प्रमोद शिंदे, महेश शिंदे ,संजय नरोळे, किरण शिंदे, उत्तमराव कदम सर,सिद्धार्थ डुडू, सचिन ढगे, भाऊसो शिंदे, सुनील नरोळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
















































