आंतरराष्ट्रीय

चाळीस वर्षानंतर बा ज दाते प्रशालेचे माजी विद्यार्थी आले एकत्र

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे:-चाळीस वर्षानंतर बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला नातेपुते येथील विद्यार्थी जुन्या आठवणींना उजाळा देत एकत्र आले.

नातेपुते येथील डॉ बा ज दाते प्रशाला येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा 1981 /82 च्या बॅचचा स्नेह मेळावा 40 व्या वर्षाने घेण्यात आला,  सध्याच्या धावपळीच्या युगात हा मेळावा करणे,खुप जिकिरीचे होते,परंतु मिडीयाच्या माध्यमातून ते शक्य झाले, सुरुवातीला फेसबुक वर डॉ.बाळासाहेब ननवरे यांनी वर्ग मित्र गुलाब पवार यास संपर्क केला नंतर एक एक मित्रांशी संपर्क होत गेला,

अश्या या माध्यमातून आपला हा ग्रुप तयार केला गेला यामध्ये राजीव देशपांडे, अजित उराडे,सौ.रेखा ठोंबरे व इतर अनेक जणांचे मोलाचे सहकार्य लाभले,या स्नेहमेळाव्याचे सुरुवात सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आपला स्वपरिचय देऊन करण्यात आली आपल्या जीवन रुपी शरीराला देव स्वरूप देणाऱ्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रथमता दीप प्रज्वलन करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने  शिवाजीराव पिसाळ यांनी शिक्षकांबद्दल व विद्यार्थ्यांबद्दल व हा ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश याबद्दल आपल्या प्रास्ताविकात सांगितले तसेच एन के साळवे यांनी 1981 82 विद्यार्थ्यांचा ग्रुप स्थापनेमागे ज्यांचे श्रेय होते त्यांची माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली यावेळी शाळेतील त्याकाळात शिकवणारे शिक्षक एम.पी. कुलकर्णी ,पुरुषोत्तम भरते,चंदनमल शहा, संजय बंदीस्टे ,सर बर्वे मॅडम तसेच प्रभाकर पद्मन ,घनश्याम ढोबळे, महावीर वसवडेकर, सर्जेराव वाघ असा कर्मचारी वर्गही यावेळी उपस्थित होता तसेच शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक प्रवीण बडवेसर,पर्यवेक्षक पिसे सर उपस्थित होते, यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एम.पी.कुलकर्णी सर म्हणाले विद्यार्थी म्हणजे हे एक दैवत असते त्याला घडवून त्याला देवत्व प्राप्त करायचे असते अशी मोठी जबाबदारी शिक्षकांवर असते आज तुम्हा सर्वांना बघून मला अत्यंत आनंद झाला आहे कारण मी घडवलेले विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने घडलेले आहेत , यावेळी बोलताना चंदनमल शहा म्हणाले की मी ज्या ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून सेवा दिली त्या त्या ठिकाणी मला चांगलेच विद्यार्थी मिळाले हे माझं भाग्य आहे आणि आज जो या विद्यार्थ्यांनी आमचा सत्कार घेतला हे पाहून आम्ही भारावून गेलो आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले, यावेळी माझी विद्यार्थ्यांच्या वतीने श्रीकांत बाविस्कर म्हणाले की हा ग्रुप करोना च्या काळात टिकून ठेवायचे काम राजू जठार बापू भांड शिशिर पलंगे दशरथ पवार शिवाजी भोसले अशोक भिसे महावीर लांडगे प्रदीप बरडकर जनार्दन बरडकर सुरेश दळवी यांनी प्रत्येकाचे ज्या तारखेचे वाढदिवस आहे त्या दिवशी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे वाढदिवस साजरे करून हा ग्रुप टिकवण्याचे फार मोलाचे कार्य केले आहे

*त्यामुळे हे संमेलन पार पाडू शकले जगणे आता उत्सव व्हावे,* क्षण क्षण हे भरभरून जगावे,पैसाअडका या हीं पेक्षा,     फक्त आनंद हेच ध्येय असावे,तो रुसला का? ती फुगली का ?      तिथल्या तिथेच सोडून द्यावे,सॉरीची ती कुबडी घेऊन,       नात्याला त्या उचलून घ्यावे,कुणी वागला कसे जरीही,        देवाला न्यायाधीश करावे,सोडुन दयावे दुखरे क्षण अन,         जगणे हे आनंदी करावे या कवितेप्रमाणे आज प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यास सामील झाले होते*
 मनुष्य हा आजीवन विद्यार्थीच असतो तो सदासर्वकाळ शिक्षण घेतच असतो. समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणारे हे माजी विद्यार्थी वाटलेच नाहीत शाळेतील प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी हा सोनेरी दिवस आठवून त्यांनी जो उत्साह दाखविला… ‘माझा हा बेंच..’ तू इथे बसायचा…’ या संभाषणाचा साक्षीदार असल्याने हे तर आपले वर्तमानातील विद्यार्थी अशीच भावना निर्माण झाली… शाळेविषयी जपलेला ऋणानुबंध, वर्गमित्र भेटल्याचा आनंद आणि आपली शाळा डोळ्यांमध्ये साठवून घेण्याची उत्सुकता या माजी विद्यार्ध्यांमध्ये पाहून शिक्षक हा किती श्रीमंत असतो याची जाणीव झाली…. या प्रज्ञावंत,गुणवंत माजी विद्यार्थ्यांशी विद्यार्थिनीशी बोलताना आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेतून संस्काराची शिदोरी घेऊन जीवनात जी यशस्वी वाटचाल केली हीच आम्हा शिक्षकांची खरी कमाई आहे याची जाणीव झाली अशी उपस्थित शिक्षकांनी आपली मतं व्यक्त केली….या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पंखांना गगनभरारी घेण्यासाठी ज्या शाळेने बळ दिले त्या शाळेला विद्यार्थ्यांच्यावतीने डाईज भेट देण्यात आले यावेळी शिशिर पलंगे दशरथ पवार, महावीर  लांडगे ,अजित इनामदार ,जितेंद्र दोशी, डॉ बाळासाहेब ननवरे,ज्ञानदेव ननवरे, राजीव देशपांडे,रविंद्र चांगण,सर, संजय गांधी,  एन.के साळवे, श्रीकांत बाविस्कर, युवराज मोहिते , रवींद्र डूडू नारायणराव बोराटे राजाभाऊ जठार,सुहासराव भांड,ऑडव्होकेट, शिवाजीराव पिसाळ ,महादेव कासार ,मनोज ढाके, जनार्दन बरडकर, प्रदीप बरडकर,शिवाजीराव भोसले, मिलिंद मिसाळ ,गुलाबराव पवार, खाजुद्दीन शेख ,अशोकराव भिसे सुरेशराव दळवी ,अभिनंदन ठोंबरे, प्रकाश ठोंबरे , केशव ठोंबरे ,प्रमोद कुलकर्णी,भारत बावकर ,संभाजीराव पांढरे रघुनाथ टेंबरे ,सोपान जाधव, सुनील कर्णे,सुभाष घरात, शंकर डफळ, संजय पोटे ,व विद्यार्थिनी मध्ये सौ रेखा उराडे  ठोंबरे, छाया बरडकर शिंदे, विभावरी दावडा दोशी, चेलना चंकेश्वरा  दोशी ,संगीता खंदारे इंगळे, कल्पना उराडे सावळकर ,अलका गोरे बनकर, सरोजनी ढवळे खटावकर, वंदना इटकर तवटे ,भारती आदलिंगे बोराटे, मीरा बडवे देशपांडे, संध्या शहा होरा, सुनिता सुतार, सुरेखा काळे माने, नफिसा तांबोळी आतार, ज्योती साळी काजवे ,रुकसाना दारुवाले नदाफ, ताहिरा तांबोळी विद्यार्थिनी उपस्थित होत्या तसेच विविध शासकीय सेवेत रुजू असलेले विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते,

गौतम बुद्ध जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा

गौतम बुद्ध जयंती निमित्त राज्य सचिव वैभव गिते व आंबेडकरी चळवळीचे नेते विका स धाईंजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा

गौतम बुद्ध जयंती निमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क करकंब / प्रतिनिधीनॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त भंडीशेगांव मधील महात्मा फुले पेहरावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळा आयोजित केलेला होता त्याप्रसंगी राज्य सचिव मा. वैभवजी गिते साहेब व मा. प्रबुद्ध साठे संस्थापक अध्यक्ष प्रजासत्ताक जनता परिषद हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते.

तसचे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते मा. विकासदादा धाईंजे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सरपंच सौ. मनिषाताई प्रकाश यलमार व उपसरपंच श्री. विजय कदम पाटील तसेच ग्रा.पं. सदस्या सौ शारदा जाधव, सौ प्रियंका ननवरे, सौ. वनिता ननवरे व उज्जवला गाडे यांच्या शुभहस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम गावातील सर्व ज्येष्ठ लोकांच्या कार्य कर्तृत्वाचा त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम करण्याचा मानस संघटनेतील सर्व युवकांनी करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी गावातील तब्बल ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सन्मान करण्याचे भाग्य लाभले आणि सर्व ज्येष्ठांकडून भरघोस मिळालेल्या प्रतिसादामुळे सर्व कार्यकर्त्या मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक रोहित एक मल्ली युवा नेते तसेच पां. स . सा. कारखान्याचे संचालक गंगाराम विभूते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .

याप्रसंगी गावचे मा. सरपंच राजाभाऊ माने, मा. ग्रा.पं. सदस्य दौलतराव ननवरे, मा. उपसरपंच मधुकर ननवरे, युवा उद्योजक गणेश पाटील , रमेश शेगांवकर तसेच मा. उपसरपंच विश्वास सुरवसे, जुलुस शेख , तसेच अनिल जाधव ,राहुल ताकतोडे ,राजेश काटे, गोरख काटे , सचिन ननवरे ,पत्रकार संजय ननवरे हे ही उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी ननवरे, शहाजी ननवरे यांनी केले प्रास्ताविक मंगेश ननवरे, त्रिसरण पंचशिल नितीन ननवरे तसेच आभार प्रदर्शन सावता ननवरे यांनी केले.

नगरपंचायत नातेपुते स्विकृत नगरसेवक पदी ॲड.रावसाहेब पांढरे यांची निवड.

नगरपंचायत नातेपुते स्विकृत नगरसेवक पदी ॲड.रावसाहेब पांढरे यांची निवड.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे :

नातेपुते नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत मा. जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, राजेन्द्रभाऊ पाटील, कवितके ,भांड यांच्या पॅनल ला ११ जागा तर ॲड. बी. वाय.राऊत,दादासाहेब उराडे यांच्या पॅनल ला ६ जागा मिळाल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात स्विकृत नगरसेवक पदी सत्ताधारी गटाचे अविनाश दोशी हे नगरसेवक पदी विराजमान झाले होते..आज पुन्हा एकदा निवडणूक घेऊन विरोधी गटाचे गट नेते ॲड. बी. वाय.राऊत यांनी मा.सरपंच ॲड.रावसाहेब पांढरे यांना स्विकृत नगरसेवक होण्यासाठी पत्र दिले. त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज न आल्यामुळे ॲड.रावसाहेब पांढरे यांना स्विकृत नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले.


या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उप जिल्हाधिकारी अनिल कारंडे,मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी काम पाहिले.

या निवडी प्रसंगी नगराध्यक्ष सौ उत्कर्षाराणी पलंगे,बांधकाम समिती सभापती अतुल पाटील,नगरसेवक ॲड. भानुदास राऊत, नगरसेवक दादासाहेब उराडे,नगरसेवक रणजित पांढरे,सुरेंद्र सोरटे,सौ.अनिता लांडगे,दीपक काळे,बाळासाहेब काळे तसेच माजी सभापती संजय काळे, ॲड. विलास पिसाळ, मा. ग्रा. पं.सदस्य सुरेश पांढरे,सतीश बंडगर,भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे, शहर अध्यक्ष देविदास चांगन,मोहन वाघमोडे,सतीश राऊत,दादासाहेब पांढरे,नातेपुते एजुकेशन सोसायटी चे सहसचिव संतोष काळे,विठ्ठल अर्जुन,सावता बोराटे,तेजस काळे,दिगंबर पांढरे उपस्थित होते.

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने शाहीर संभाजी भगत यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-आंबेडकरी विचारधारा सांगणारे विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने बुद्ध जयंतीचे औचित्य साधून लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र 2022 चा लोककवी वामनदादा कर्डक विद्रोही शाहीर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बुद्ध जयंती निमित्त अकलूज सारनाथ बुद्धविहार येथे बुद्ध महोत्सव  विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमादरम्यान पुरोगामी महाराष्ट्र चे प्रमुख प्रमोद शिंदे,ऍड सुमित सावंत तसेच सारनाथ बुद्धविहार येथील बौद्ध बांधवांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.विद्रोही आंबेडकरी जलसा च्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केले.

नातेपुते येथे पांढरे ई बाईक शोरूम चे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे(

नातेपुते तालुका माळशिरस येथे सुरेश गणपत पांढरे यांचे पांढरे ई बाईक शोरूम चे उद्घाटन  काँग्रेसचे माजी आमदार रामहरी रुपनवर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, बाबाराजे देशमुख, सुरेश पालवे तसेच अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की ही बाईक ही काळाची गरज आहे सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून पेट्रोल वरची गाडी सर्वसामान्यना परवडत नाही त्यासाठी सर्वांनी इलेक्ट्रिक बाइक चा वापर करावा तसेच उत्तमराव जानकर व बाबाराजे देशमुख ऍड डी.एन.काळे यांनी या व्यवसायासाठी पांढरे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या

. याप्रसंगी नगरसेवक बी वाय राऊत,डॉ मारुती पाटील ,रघुनाथ कवितके, मरसिंह देशमुख,शरद मोरे,गौतम माने,बाबासाहेब माने,दादासाहेब उराडे,पंचायत समिती सदस्य अजय सकट, मधुकर पाटील, गणपत पांढरे,सुरेश पांढरे चेअरमन संतोष काळे,बाळासाहेब पांढरे,चंद्रकांत काळे, दुर्योधन पाटील तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच गाडीची माहिती तुकाराम शेजवळ यांनी दिली सूत्रसंचालन वलेकर सर यांनी केले.

पिरळे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता माळशिरस येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच 38वा अखंड हरिनाम सप्ताह दि.4मे ते 11मे या कालावधी मध्ये उत्साहात संपन्न झाला. हा सप्ताह दरवर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध विष्णू नारायण मंदिर पिरळे येथे सालाबादप्रमाणे आयोजित केला जातो.

याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. या सप्ताह सोहळ्यामध्ये ह भ प राज कदम सर बारामती, स्वप्निल महाराज पवार फोंडशिरस, नवनाथ महाराज मारकड इंदापूर, विठ्ठल महाराज फड बीड, चैतन्य महाराज बारवकर निमगाव केतकी, युवराज महाराज देशमुख आळंदी, केशव महाराज मुळीक लासुर्णे, शिवाजी महाराज काळे औरंगाबाद, यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा झाली.

तसेच या कीर्तन सोहळ्यात साहेबराव जाधव, संताराम माने, सोमनाथ निकम, कांतीलाल माने, जगन्नाथ लवटे, किसन वाघ, भारत माने, चंद्रकांत जाधव, माणिक लवटे, सुनील दळवी, बापूराव जाधव, शहाजी माने, प्रकाश रुपनवर, रामलिंग नरोळे, महादेव जगन्नाथ शिंदे, दत्तात्रय रुपनवर, कालिदास नरळे, सुभाष लवटे, बाजीराव दडस, शरद वाघ, यांनी अन्नदान केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ह.भ.प.धनंजय महाराज कदम ,चंद्रकांत जाधव ज्ञानदेव शिंदे, अजित महाराज खंडागळे, भाऊसाहेब भिसे सर, मोहन महाराज बुधावले, जोतिराम भिवरकर, सोमनाथ गायकवाड, विकास दडस, सुनील दळवी,मामा लवटे,सुनील कुशाबा माने, ऋषिकेश कदम, अजिनाथ होळकर,सोमनाथ वाघ तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.या सोहळ्यास ज्ञानदेव फुले सर, सोमनाथ घोगरे, चंद्रकांत दीक्षित सर, सरपंच अलकाताई नरोळे, पो.पाटील औदुंबर बुधावले तसेच पिरळे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भजनी मंडळ उपस्थित होते.

अकलूज येथे बुध्द महोत्सवाचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकलूज

अकलूज येथील बुद्ध महोत्सव यंदा शनिवार दिनांक १४ मे २०२२ पासून सुरू होत असून या तीन दिवसीय महोत्सवात समाज प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत अशी माहिती बुद्ध महोत्सव समितीने दिली आहे .

शनिवारी सकाळी ठीक ९ -०० वाजता धम्म ध्वजारोहणाने या बुद्ध महोत्सवाची सुरुवात होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ठीक ७-०० वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसाचा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे .

त्यानंतर रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी ठीक ८-३० वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होणार असून सकाळी ठीक १० – ०० वाजता अंधश्रद्धाविषयी जागृती करणी , चमत्कारांमागील सत्य हे प्रयोग | अंनिसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा .

विनायक माळी हे सादर करणार आहेत . तर संध्याकाळी ७-०० वाजता विद्रोही कवी देवदत्त सूर्यवंशी यांच्या | काव्यवाचनाचा आणि ८-०० वाजता बोधिसत्व चॅनलचे संपादक सागर कांबळे यांचा महाराष्ट्रातील बुद्ध लेण्यांविषयीचा कार्यक्रम प्रोजेक्टर द्वारा सादर करणार आहेत . सोमवार दि . १६ मे २०२२ रोजी म्हणजेच बुद्ध पौर्णिमा निमित्त पहाटे ५ ०० वाजता सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक विजय सरतापे आणि संच यांचा बुद्ध पहाट हा कार्यक्रम आयोजित केला असून सकाळी ठीक आठ वाजता धार्मिक विधी होणार आहेत .

त्यानंतर ठीक ९ -०० वाजता मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण आणि सामुहिक बुद्ध वंदना घेतली जाणार आहे . ठीक ५-०० वाजता संपूर्ण शहरातून बुद्ध प्रतिमेची | सजवलेल्या रथातून मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर रात्री ठीक ८-०० वाजता स्नेहभोजनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे . सदर कार्यक्रम पारनेर येथील भंतेजींच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहेत . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चा बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न


डॉ. केवल उके, मा आमदार रामहरी रुपनवर ,आमदार राम सातपुते शिवअमृत दूध संघ चेअरमन धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील ,चळवळीचे नेते विकास दादा धईंजे राज्य सचिव वैभवजी गीते कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे नगराध्यक्षा उत्कर्ष राणे पलंगे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची कार्यक्रमास उपस्थित

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी) पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल चा तृतीय वर्धापनदिन तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त ऑनलाइन चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन पुरोगामी महाराष्ट्र चे संचालक, एन डी एम जे राज्य महासचिव आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य महाराष्ट्र शासन डॉ केवल उके, विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, शिवामृत दूध संघ चेअरमन धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील, विकास दादा धाईंजे, राज्य सचिव वैभव गिते,धैर्यशील भाऊ देशमुख, रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार,डॉ अनिकेत इनामदार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने झाडे लावा झाडे जगवा,अभियानांतर्गत सुमारे दीड लाख वृक्ष लागवड केली असून बेटी बचाओ बेटी पढाओ,माझी वसुंधरा, कोरोना व पूरग्रस्तांना मदत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गणवेश वाटप मोठ्या प्रमाणात केली आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक मान्यवरांच्या कडून करण्यात आले.

या
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार रामभाऊ सातपुते, नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, विशेष सरकारी वकील सोनवणे रिपाई राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,पंचायत समिती सदस्य अजय सकट,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे नागेशजी बनसोडे उमेश पलंगे,ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम.डी.ढोबळे सर, रत्नत्रय शिक्षण संस्था मांडवे चेअरमन प्रमोद दोशी ऍड.सुमित सावंत ,बाळासाहेब सरगर,एकशिव सरपंच शहाजी धायगुडे ,उद्योजक संदीपशेठ नरोळे ,राजेंद्र गायकवाड तीश ढेकळे,पै.उमेश सुळ ,किशोर जाधव,, गणेश गायकवाड, डॉ विवेक महामुनी, डॉ संदीप महामुनी, दत्ता रुपनवर दादासाहेब शिंदे संतोष चव्हाण बंदिश सो yuनवणे ध विजय कांबळे प्रवीण बोदडे धनाजी शिवपालक संदेश भालेराव दत्ता कांबळे सुनील भोसले गणेश गायकवाड नाना गायकवाड गणेश रणदिवे रोहित साळे प्रथमेश कांबळे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ तसेच सामाजिक शैक्षणिक,औद्योगिक,वैद्यकीय, राजकीय क्षेत्रात, प्रशासकीय पोलीस सेवेत उल्लेखनीय काम मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्रा न्यूज चैनल चे प्रमुख प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केले.

सतीश ढेकळे यांनी लोकांची तहान भागवून आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस केला साजरा


आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जन्मदिनी सतिश ढेकळेंनीसलग दोन वर्षे 2 बोअर देऊन सामाजिक बांधिलकी जपत जन्मदिनाच्या आगळ्यावेगळ्या दिल्या शुभेच्छा
 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे)

एकशिव ता माळशिरस येथील युवा उद्योजक  सतिशतात्या ढेकळे यांनी सोलापूर जिल्ह्याचे भाजपा नेते व विधानपरिषद सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकशिव येथे गेल्या वर्षी  उन्हाळ्यात नागरिकांची तहान भागावी व पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी तसेच एकशिव येथील उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई यांचा विचार करून आणि आमदार रणजितदादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी  समाज बांधिलकी जपत बोर होल देऊन नागरिकांना पाण्याची सोय करून देऊन देत

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सतिशतात्यांनी आज पर्यत राजकारणा व्यतिरिक्त फक्त गोर गरीब सामान्य जनतेच्या हितासाठी व कोरोना कालावधी मध्ये एकशिव येथील  ज्यांची परस्तीती नाजूक आहे अशा गोर गरीब सामान्य कुटुंबांना किराणा किट व दवाखाण्यासाठी शक्य तेव्हढि मदत केली तसेच प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये निस्वार्थी पणे सहभागी होऊन अनेक सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत राबवले आहेत पुरोगामी महाराष्ट्र न्यूजने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना पुरोगामी महाराष्ट्राचा युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन सन्मान केला

आहे.सामाजिक कामामुळे अतिश ढेकळे यांचे सर्वत्र कौतुक होत असूनबोरवेल मशीन चे पूजन माळशिरस पंचायत समितीचे मा.उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या  हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच शहाजीदादा धायगुडे, उपसरपंच भारत साळवे,सभापती सुग्रीव मोटे,मा.सरपंच रामभाऊ बागणवर व मा.उपसरपंच गुणवंत पाटील,उद्योजक प्रविण पांढरकर,ग्रा.सदस्य राहुल अवघडे, किसन रुपणवर अय्याज मुलाण,भीमराव जाधव,संजय जगताप, हमीद मुलाणी,प्रहार चे संभाजी गावडे,तात्यासाहेब गावडे,चंद्रकांत माने,बाळासाहेब खंडागळे,शंकर जाधव तोषिफ मुलाणी उपस्थित होते.अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी सतीश ढेकळे यांचा सत्कार केला व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या .

पिरळे येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अपंगांना फॅन व खुर्ची वाटप

पिरळे येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अपंगांना फॅन व खुर्ची वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-

पिरळे ता माळशिरस येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त ग्रामपंचायत पिरळे यांच्यावतीने अपंग व्यक्तींना फॅन व खुर्ची वाटप करण्यात आली.


महात्मा बसवेश्वर जयंती, शिवजयंती,रमजान ईद अक्षय तृतीया निमित्त ग्रामपंचायत पिरळे येथे संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी पिरळे येथे सदिच्छा भेट दिली तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमादरम्यान गावामध्ये शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस पाटील औदुंबर बुधावले,उद्योजक संदीप तात्या नरोळे,माजी विस्ताराधिकारी प्रल्हाद साळवे, पत्रकार प्रमोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्यावतीने फळे वाटप करण्यात आली. यावेळी सरपंच अलकाताई नरोळे,उपसरपंच उमेश खिलारे, ग्रामसेविका शैला साळवे, एकशिव गावचे सरपंच शहाजी धायगुडे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे,सुनील दडस,संदीप वाघ, दादासाहेब शिंदे,महादेव शिंदे,बाबुराव गायकवाड,कैलास निकम शिवाजी गोरे,प्रमोद डुडू, महावितरण चे वरिष्ठ लेखापाल दत्ता रुपनवर, प्रल्हाद नरोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पिरळे व उद्योजक संदीपसेठ नरोळे यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले.

You may have missed