आंतरराष्ट्रीय

नातेपुते येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी हिंदू व बौद्ध बांधवांचा केला सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)- तालुका माळशिरस येथील मस्जिद मध्ये रमजान ईद निमित्त शीरखुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच रमजान ईद निमित्त नातेपुते व पंचक्रोशीतील हिंदू व बौद्ध बांधवांचा नातेपुते येथील मुस्लिम बांधवांनी मज्जित मध्ये बोलावून सर्वांचा सन्मान केला. व शीरखुर्मा पार्टी देऊन सर्वांचे तोंड गोड केले. रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना मानला जातो. तीस दिवस या महिन्यात कडक उपवास धरले जातात व सांगता रमजान च्या दिवशी शीरखुर्मा करून उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

मुस्लिम बांधवांकडून सर्वांना शीरखुर्मा खाण्याचे निमंत्रण दिले जाते.यामुळे धार्मिक व जातीय सलोखा राखला जातो याच पार्श्वभूमीवर नातेपुते येथे मोठ्या उत्साहात रमजान ईद संपन्न झाली.ए.पी.आय मनोज सोनवलकर, बशीर काझी,अमरशील देशमुख यांनी नातेपुते येथे शांतता व सामाजिक सलोखा राखण्या संदर्भात मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,पी.एस.आय तानाजी पवार ,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नगरसेवक माजी सरपंच अमरशील देशमुख,दादासाहेब उराडे ,दीपक काळे ,शिवसेनेचे नेते अमोल उराडे,विजय पिसाळ, रिपाई चे समीर सोरटे,रोहित सोरटे पत्रकार श्रीकांत बाविस्कर, आनंद लोंढे,प्रमोद शिंदे, आनंद जाधव तसेच अनेक नेते मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोज समस्त मुस्लिम बांधव यांनी केला होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नइस्मलाईल बागवान,अख्तर पठाण, मुज्जमील बागवान, राजु तांबोळी, समीऱ शेख, तोहीद आतार, मुदस्सर शेख,शब्बीर मुलाणी, मुबीनभाई महाडवाले यांच्यासह सर्व मुस्लिम बांधवांना परिश्रम घेतले.

https://youtu.be/b7-Wn-g6lgc

पिरळे येथे आमदार राम सातपुते यांच्या आमदार फंडातून पुरातन शंभू महादेव मंदिर सभामंडप मंजुर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)पिरळे ता माळशिरस येथील पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर सभामंडप आमदार राम सातपुते यांच्या फंडातून मंजूर करण्यात आला आहे.हा सभामंडप आमदार स्थानिक विकास निधी मधून मंजूर करण्यात आला आहे.या सभामंडपाचे काम व्हावे म्हणून पिरळे गावचे सरपंच संदीप नरळे तसेच उपसरपंच व सर्व सदस्य यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,रणजितसिंह मोहिते-पाटील,तसेच आहे धैर्यशील मोहिते पाटील  यांच्याकडे कामासंदर्भात मागणी केली होती त्यांच्याच सहकार्याने आमदार राम सातपुते यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमातून सुमारे आठ लाख रुपये निधी उपलब्ध करून आहे. बांधकाम विभागास सदर कामाचे इस्टीमेंट तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.लवकरचआजपर्यंत दुर्लक्षित असलेले ऐतिहासिक पुरातन हेमाडपंती महादेव मंदिर सभामंडप करण्यात येणार असल्याने गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावच्या वतीने याबाबत संदीप नरोळे यांनी माहिती दिली व मोहिते-पाटील कुटुंब तसेच आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले.

रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी यांना पंढरपूर येथे समाजहितदक्षक ज्ञानदाता पुरस्कार प्रदान

रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी यांना पंढरपूर येथे समाजहितदक्षक ज्ञानदाता पुरस्कार प्रदान करण्यात आला….

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कर

श्री सन्मती सेवा दल व श्री १००८ भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव, पंढरपूर महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नत्रय परिवार सदाशिवनगर चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनंतलाल दोशी यांना डॉ. श्री सतीश दोशी, श्री मिहीर गांधी यांच्या शुभहस्ते समाजहित दक्षक ज्ञानदाता पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी श्री. अनिल जमगे , अध्यक्ष भारतवर्षीय दिगंबर तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्य, श्री.राहुल शहा, चेअरमन रतनचंद शहा को-ऑपरेटिव बँक, मंगळवेढा , श्री.आर के दोशी , चेअरमन महालक्ष्मी मसाला, श्री.सुहास शहा, संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्र, कुर्डवाडी श्री. मिहिर गांधी संस्थापक अध्यक्ष श्री सन्मती सेवा दल, डॉ. राजेश फडे पंढरपूर, श्री.विरकुमार दोशी ,अध्यक्ष श्री सन्मती सेवा दल
आदी मान्यवर उपस्थित होते


क्रांतीअग्रणी, विधायक कृतिशीलता, मातृ-पितृ भक्त, समाजसेवक, धर्मअनुरागी, श्रमदेवतेचे पुजारी, आशावादी व उत्साही सर्वोत्कृष्ट ध्येयाने भारलेले, संकटाकडे सुवर्णसंधी म्हणून तिचा सत्कार्यासाठी वापर करणारे, यशाच्या मागे न पडता यश स्वतःकडे खेचून घेणारे, लौकिक बिझनेस मॅनेजमेंट ची पदवी न घेता अनुभवातून आणि कष्टाने एक कुशल व्यवस्थापक म्हणून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारे, स्व. श्री. रतनचंद देवचंद दोशी व स्व. सौ. सुशीला रतनचंद दोशी यांचे सुपुत्र, सदाशिवनगर निवासी,आदरणीय श्री अनंतलाल रतनचंद दोशी, सदाशिवनगर यांना हा बहुमोल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदरणीय दादा यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. यामध्ये राष्ट्रसेवा पुरस्कार, राजीव गांधी सन्मान पुरस्कार, जैन गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, आदर्श व्यापारी पुरस्कार .
आदरणीय दादा यांनी त्यांच्या कारकिर्दी मध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे.

  • सभापती : – कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर .
  • सदस्य : – फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज , महाराष्ट्र – गुजरात प्रोव्हीयन्स .
  • कार्याध्यक्ष : – फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, सोलापूर जिल्हा .
  • संघपती परमपूज्य प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती १०८ शांतिसागर महाराजजी पालखी यात्रा (दिंडी महोत्सव) प्रथम वर्ष आचार्यश्रीची कर्मभूमी बारामती ते समाधीभुमी श्री सिद्धक्षेत्र कुंथलगिरी पर्यंत .
    *संस्थापक रत्नत्रय पतसंस्था, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी, विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय, रत्नत्रय कंप्यूटर इंस्टिट्यूट,
    अश्या वेगवेगळ्या धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे.

  • *संस्थापक भगवान महावीर जयंती सदाशिवनगर, पुरदांवडे.
    ११ सप्टेंबर २००८ रोजी सदाशिवनगर येथे गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज आणि युवाचार्य गुणधरनंदी महाराजजी तसेच अनेकानेक साधुसंतांच्या शुभ आशीर्वादाने व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रत्नत्रय शिक्षण संस्थेची स्थापना केली. जी पुढे चालून मांडवे येथे १४ वर्ष यशस्वी वाटचाल करीत आहे हे सतत कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी शैक्षणिक वर्ष सन २००८- २००९ पासून रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी प्रत्यक्षात आणली अनेक विद्यार्थ्यांचा त्यांच्या क्षमतेनुसार व्यक्तिमत्व विकास साधणे हेच त्यांचे उच्च ध्येय .त्याचबरोबर येणाऱ्या काही वर्षांमध्ये सर्व सोयींनी सज्ज अद्यावत हॉस्पिटलची स्थापना करणे, शालेय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी सर्व सोयींनी युक्त असे वस्तीगगृह उभारणे, जैन मंदिर उभारणे, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे आदर्श असा रत्नत्रय गुणवत्ता अभ्यासक्रम तयार करणे अशा अनेक ध्येयाने भारवलेल्या आणि यासाठी नावाप्रमाणेच अनंत प्रयत्न करणारे अनंतलाल दादा यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्य करण्याची शारीरिक व मानसिक शक्ती लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना.
    असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे रत्नत्रय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अनंतलाल दोशी यांना समाजहितदक्षक ज्ञानदाता या पुरस्काराने पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले यावेळी
    रत्नत्रय परिवाराचे सदस्य अनिल दोशी, महावीर शहा, अजितकुमार दोशी, राजेश दोशी, प्रमोद दोशी, मृणालिनी दोशी, विनायश्री दोशी, पुनम दोशी, संध्या काटकर, अभिजीत दोभाडा, निलेश पेनुरकर, परेश मरवडेकर, ज्ञानेश राऊत, अमित पाटील, दैवत वाघमोडे, समीर देशपांडे सकल जैन समाज,श्री सन्मती सेवा दलाचे सर्व सदस्य , रत्नत्रय शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पिरळे येथे प्रथमच तीन मजली रथाच्या साह्याने श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ

पिरळे येथे प्रथमच तीन मजली रथाच्या साह्याने श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे तालुका माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मी यात्रेस प्रारंभ झाला आहे.यावर्षीच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे तीन मजली सागवानी भव्य रथाने यात्रेची सुरुवात करण्यात आली. हा सागवानी रथ जवळपास दोन टनांपेक्षा जास्त वजनाचा असून गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी तो रथ ओढत गावा प्रदक्षणा पूर्ण करून श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटर आंतर ओढून नेला असून या रथामध्ये श्री महालक्ष्मी पालखीमध्ये विराजमान करण्यात करण्यात आली.

रथाच्या पुढे पारंपारिक गजी ढोल ,सनई सुर, हलगी च्या तालावर वाजत गाजत महालक्ष्मी मंदिराकडे नेण्यात आला. हा रथ बनवण्यासाठी तब्बल दीड वर्षाचा कार्यकाळ लागला आहे. तसेच हा लाकडी सागवानी रथ बाळासाहेब भिसे,चंद्रकांत भिसे व सूर्यकांत भिसे या कुटुंबीयांनी बारा लाख रुपये खर्च करून भाविकांसाठी भेट दिला आहे. रथा पाठीमागचा उद्देश त्यांचा नवस व गावातील यात्रेची शोभा वाढावी सर्व लोकांनी एकत्र येऊन यात्रा उत्साहात करावी. यासाठी हा रथ भिसे कुटुंबियाकडून  देवस्थानाकडे सुपूर्त करण्यात आला  यावेळी गावचे माझी सरपंच ज्ञानदेव शिंदे,यात्रा प्रमुख दशरथ जाधव, सरपंच संदीप शेठ,नरोळे उपसरपंच खिलारे, पैलवान-पाटणेकर कुटुंब, माजी सरपंच महादेव शिंदे, संभाजी साळवे,पाटील औदुंबर बुधावले, शिवाजी लवटे पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष दादासाहेब शिंदे,प्राचार्य दीपक शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.

नातेपुते येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)

नातेपुते तालुका माळशिरस येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न झाली 14 एप्रिल रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पंचशील रोहन करून महामानवास अभिवादन करण्यात आले.तसेच सायंकाळी फटाक्यांच्या अतिषबाजी देखाव्यांचा व लाईटच्या रोषणाईत भव्य दव्य अशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत पंचक्रोशीतील लहान मुलं ,महिला व भीमा अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक बँड पथक भव्यदिव्य फटाक्यांची आतिषबाजी होती. जयंतीनिमित्त  1 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले होते यामध्ये व्याख्यानमाला ,अंधश्रद्धेवर, जादूचे प्रयोग,वक्तृत्व स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा,फनी गेम्स सदर कार्यक्रम शांततेत पार पडला या जयंती उत्सवात नातेपुते पोलीस स्टेशन च्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जयंती उत्सव समिती नातेपुते व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जि प केंद्र शाळा कळंबोली शाळेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी)

जि प केंद्र शाळा कळंबोली इयत्ता सातवी तील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तसेच कळंबोली शाळेतील शिक्षक दादासाहेब साळवे सर यांनी  इयत्ता सातवीच्या आजी व माझी विद्यार्थ्यांना स्वखर्चातून  दुसऱ्या शाळेमध्ये जाण्यासाठी उत्तम प्रकारचे शाळेचे दप्तर,बाटली, जेवणाचा डबा व डबा पिशवी विद्यार्थ्यांना भेट दिली तसेच त्यांनी अगोदर सुद्धा माळशिरस तालुक्यातील तीनशे शाळांना शिष्यवृत्ती पुस्तकांचे संच दिले आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव संभाजी  फुले सर हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक संघ अध्यक्ष भोसले सर व अशोक रुपनवर व इतर मान्यवर होते. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सचिव संभाजी फुले सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे महत्त्वाचा आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो घेणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थ्यांनी या शाळेतून गेल्यानंतर मोठे होऊन आई-वडील शाळा शिक्षक व गावाचे नाव लवकि केले पाहिजे.आई वडील रोज कष्ट करून आपल्याला शिक्षण देतात त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे .तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी पाहिजे आपले आचार-विचार व संगत चांगले असली पाहिजे.साळवे सर हे आदर्श शिक्षक आहेत त्यांच्यासारखं दानशूर व्यक्तिमत्व नाही तसेच विद्यार्थ्यांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी दादा साहेब साळवे सर, मुख्याध्यापक कलशेट्टी, केंद्रप्रमुख अशोक रुपनवर आदर्श शिक्षक समिती ता अध्यक्ष पोपट भोसले सर, पत्रकार प्रमोद शिंदे,विजय साळवे, मुख्याध्यापक कलशेट्टी मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास केंद्रप्रमुख बाबासाहेब झोडगे सर , आनंद लोंढे सर, घाडगे मॅडम,रानबा वाघमारे सर,पोपट भोसले सर, खिलारे मॅडम, बोधे मॅडम, अक्षय मोरे, कुमार मोरे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बजेटचा कायदा करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत व एन.डी.एम.जे संघटनेची मंत्रालयात संयुक्त बैठक संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई –गेल्या काही वर्षांपासून एन डी एम जे चे राज्य महासचिव सचिव डॉक्टर केवल उके व राज्य सचिव वैभव गीते यांच्या वतीने बजेटच्या कायद्यासंदर्भात शासनाकडे मागणी करून पाठपुरावा सुरू असून त्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन हे करण्यात आले त्याच अनुषंगाने

बौद्ध,अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या (दलित आदिवासी) यांच्या प्रगतीचा निधी इतरत्र वळवू नये.निधी अखर्चित ठेवू नये म्हणून आज मंत्रालयात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके साहेबांनी बजेटच्या कायद्याची मागणी करत केंद्र सरकार व राज्यसरकार यांची अर्थसंकल्पीय निधीची तरतूद,इतर राज्यांनी बनवलेला बजेटचा कायदा,सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांचे अपयश त्यातील जाचक अटी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी,लोकसंख्येच्या प्रमाणात तुटपुंजा निधी,अन्याय अत्याचार या विषयांवर आकडेवारीसह सद्यस्थिती ऍड.डॉ.केवलजी उके यांनी आक्रमक व परखडपणे मांडली.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संघटनेच्या मागण्या कॅबिनेट बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे शशी भाऊ खंडागळे,बंदिश सोनवणे,विजय कांबळे,ऍड.प्रवीण बोदडे,संदेश भालेराव हे बैठकीसाठी उपस्थित होते.

पिरळे येथील महालक्ष्मी यात्रा कमिटी अध्यक्षपदी दादासाहेब शिंदे

पिरळे येथील महालक्ष्मी यात्रा कमिटी अध्यक्षपदी दादासाहेब शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रतिनिधी)-पिरळे तालुका माळशिरस येथील महालक्ष्मी यात्रा कमिटी अध्यक्षपदी दादासाहेब शिंदे सर यांचे एकमताने निवड करण्यात आली आहे. सालाबाद व परंपरेनुसार याहीवर्षी पिरळे येथे महालक्ष्मी यात्रा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्ष महालक्ष्मी यात्रा भरवता आली नाही.शासनाचे निर्बंध असल्यामुळे यात्रेला परवानगी मिळाली नसल्यास दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती. परंतु 1 एप्रिल पासून शासनाने सर्व निर्बंध वाढल्याने यंदा श्री महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या अनुषंगाने काल मारुती मंदिर येथे ग्रामस्थांच्यावतीने बैठक घेण्यात आली.बैठकीत दादासाहेब शिंदे यांची यात्रा कमिटी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या बैठकीस सरपंच संदीप शेठ नरोळे, माजी उपसरपंच दशरथ जाधव, माजी सरपंच महादेव शिंदे,संभाजी साळवे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे,संदीप वाघ सर, गणेश दडस,पांडुरंग साळवे,महादेव होळकर ,दत्तात्रेय लवटे, दीपक शिंदे सर,संतोष पाटणे,दादा ठावरे आदि मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यंदाच्या यात्रेमध्ये लोककला जपणारा पारंपरिक कार्यक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

लोणंद येथे नगराध्यक्षा मधुमती गालिंदे यांच्या हस्ते महेश भांडी केंद्र यांच्या एक्सलंट फर्निचर चे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –लोणंद जिल्हा सातारा राधेश्याम पॅलेस येथे लोणंद शहराच्या विद्यमान नगराध्यक्ष मधुमती गालिंदे व नगरसेवकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते महेश भांडी केंद्र यांच्या एक्सलंट फर्निचर चे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.


याच भव्य फर्निचर प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ मधुमती यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. गणेश मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात .

 या कार्यक्रमाचे आयोजन महेश भांडी केंद्र नातेपुते यांच्यावतीने करण्यात आले होते.

या भव्य प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये या प्रदर्शनात आकर्षक व ब्रँडेड सोफा सेट… इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही, फ्रीज कूलर ,तसेच मजबूत व टिकाऊ भांड्यांचे होलसेल दरात लग्नाची भांडी या सर्व वस्तू होलसेल व माफक दरात एकाच छताखाली. हे भव्य प्रदर्शन गुढीपाडव्यानिमित्त दिनांक 1 एप्रिल ते 5 एप्रिल पर्यंत राहणार आहे. तरी या भव्य प्रदर्शनाचा लोणंद परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष सौ मधुमती गालिंदे यांनी केले.

राजस्थानमध्ये बजेटचा कायदा मंजूर दिल्लीत एन.डी.एम.जे संघटनेचा आनंदोत्सव साजरा

महाराष्ट्रात बजेटचा कायदा करण्यासाठी संघर्ष करणार..ऍड. केवल उके

राजस्थान सरकारचा आदर्श घेत महाराष्ट्राने बजेटचा कायदा करावा अन्यथा आंदोलन करणार….वैभव गिते.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली: प्रतिनिधी
बौद्ध,दलित आदिवासी, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा प्रगतीचा व योजनांचा निधी अखर्चित राहू नये तसेच निधी इतरत्र वळवू नये.म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे.राजस्थान मधील वरिष्ठ नेते ऍड.सतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये सहयोगी संघटनांना सोबत घेत मागील दहा वर्षांपासून बजेटचा कायदा लागू करण्यासाठी संघर्ष सुरू होता.

अखेर राजस्थान सरकारने मागील काही दिवसांमध्ये बजेटचा कायदा लागू केल्यामुळे दिल्लीत इंडियन सोशल इन्स्टिट्यूट येथे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल सिंग,महाराष्ट्र राज्य महासचिव ऍड.केवल उके,राज्य सचिव वैभव गिते यांच्याहस्ते ऍड.सतीश कुमार यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी आनंदोत्सव साजरा करताना ऍड.केवल उके यांनी राजस्थान मधील एन.डी.एम.जे संघटनेच्या सर्व सहयोगी संघटनांचे,नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले

तसेच महाराष्ट्रात बजेटचा कायदा लागू करण्यासाठी अधिकची मेहनत घेणार असल्याचेही उके यांनी सांगितले. वैभव गिते यांनी राजस्थान सरकारचा आदर्श महाराष्ट्र सरकारने घ्यावा आणि बजेटचा कायदा मंजूर करावा असे बोलून महाराष्ट्र शासनाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी राष्ट्रीय टीमच्या श्वेता गमरे,देबाजानी या उपस्थित होत्या.राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी आभार व्यक्त केले.

You may have missed