आंतरराष्ट्रीय

आदिवासींच्या विविध मागण्याकरिता नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचा बेलापूर सिडको भवनावर भव्य मोर्चा..

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचा सी.बी.डी.बेलापूर सिडको भवनावर आदिवासी वाडी बचाव मोर्चा..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी मुंबई संदेश भालेरावदिनांक १६ डिसेंबर २०२१ रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके यांच्या नेतृत्वात सी.बी.डी. बेलापूर सिडको भवनावर आदिवासिंच्या विविध मागण्याकरिता शेकडो कार्यकत्यांसह भव्य मोर्चा काढण्यात आला.

आदिवासी समुदाय हा येथील जल, जंगल जमिनीचा मूळ मालक असून सुद्धा विकास आराखडयाच्या नावाखाली आदिवासींच्या वाड्या-वस्त्या या जमीनदोस्त केल्या जात आहेत. तसेच गावठाण प्लॉट असलेल्या व अनादी काळापासून आदिवासी राहत असलेल्या पेठाली-तळोजा, पेंधर आणि पापडीचा पाडा या पनवेल तालुक्यातील आदिवासी वस्त्यांच्या जागेवर सिडको प्रशासनाने प्लॉट पडून धनदांडग्या बिल्डरांच्या घश्यात घातलेले आहेत. सिडको प्रशासनाला यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देवून सुद्धा अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्याकरिता नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला असे ॲड.डॉ.केवल उके यांनी सांगितले आणि सर्व मागण्या येत्या २५ दिवसात मंजूर न झाल्यास आझाद मैदान येथे १०००० दलित-आदिवासींचा प्रचंड मोर्चा काढून व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असे आव्हान केले.

तळोज्यातील मूळनिवासी आदिवासी बांधव यांच्यावर सिडको प्रशासनाने जातीय द्वेशातून अन्याय अत्याचार करून त्यांचे वडिलोपार्जित असलेली जमीन धनदांडग्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट रचत असून आदिवासींना बेघर करण्याचे व त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मूलभूत सोई-सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम सिडको करीत आहे असे मत संघटनेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षा सौ.शोभाताई जाधव यांनी व्यक्त केले.

एन.डी.एम.जे. कोकण प्रदेश अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सिडको प्रशासनाला इशारा दिला आहे की जर आठ दिवसांत सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आपल्या विरोधात उपोषणाला बसू तसेच वेळ आली तर आत्मदहन ही करू याची प्रशासनाने दाखल घ्यावी असा इशाराही दिला.

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिसचे राज्य निरीक्षक बी पी लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पेठाली, पेंधर आणि पापडीचा पाडा या टळोजा व पनवेल तालुक्यातील आदिवासी वस्त्यांच्या जागेवर सिडको प्रशासणाने पाडलेले प्लॉट रद्द करणे, आदिवासी गावठाण जाहीर करणे, नागरी सुविधा व शिक्षण पुरविणे, विकास आराखड्यात बाधित होणारे आदिवासींची घरे तोडू नये, आदिवासी वाड्यामध्ये समाज मंदिर व शाळा बांधण्यात यावयात इत्यादी मागण्यांचे निवेदन मा.अप्पर जिल्हाधिकारी श्री.सतिश शेंडगे यांना दिले.

सदरील आदिवासी वाडी बचाव मोर्चात संघटनेचे राज्य निरीक्षक बि.पी.लांडगे, कोंकण प्रदेश अध्यक्ष सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष शोभा जाधव, ठाणे मुंबई प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावणे, पनवेल तालुकाध्यक्ष संजय सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव, स्थानिक कार्येकर्ता राम वाघे, बामा कातकरी, मच्छिंद्र नाईक, संजय वनसे, मारुती वाघमारे, देवकी वाघे, पी.आर.पी. जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, पत्रकार पंचशील शिरसाट व भूमिका जाधव, चंद्रकांत जाधव यांच्यासह शेकडो आदिवासी पिडीत व कार्यकर्ते उपस्थित होते.

नातेपुते येथे महादेवजी जानकर यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ

नातेपुते येथे महादेवजी जानकर यांच्या हस्ते राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे :- नातेपुते येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग नंबर २ मधून सौ सीमा श्रीकांत बाविस्कर ज्या टेबलचे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत व प्रभाग नंबर च४ चे अधिकृत उमेदवार दिपाली मधुकर सातपुते या कप बशी या चिन्ह घेऊन लढत आहे प्रभाग नंबर १३ मधून कोमल सुनील साळवे या टेबल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत प्रभाग नंबर १७ मधून रफिया हनीफ आतार या टेबल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत यांच्या नगरपंचायत निवडणूक साठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जी जानकर साहेब यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला
नातेपुते नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारा समवेत महादेवजी जानकर साहेब यांनी नातेपुते येथील सर्व महापुरुषां चे पुतळ्यांना अभिवादन करून टेकडीवरील गणपती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला
यानंतर त्यांनी पालखी मैदानावरील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन तसेच जानकर वस्ती खडक माळ येथे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पर यात्रा काढली यानंतर महादेवजी जानकर साहेब यांनी पिरळे रोड येथील काळे मळ्यामध्ये जाऊन वस्तीवरील प्रत्येक घरात जाऊन मतदाराच्या गाठीभेटी घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले
या निवडणूक प्रचार फेरी मध्ये*राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री महादेवराव जानकर साहेब, रामदास शेलार सर,अण्णासाहेब रुपनवर ,माऊली सरगर,नितीन दादा धायगुडे, अजित पाटील, शाहिद मुलाणी, रणजीत सुळ, माऊली सरक, रियाज आतार, संजय वलेकर सर, अमरजीत जानकर, बिपिन सातपुते, सनी बाविस्कर, विशाल सोरटे, नामदेव टकले, शंकर शेंडगे, बर्वे, मेटकरी, बापू जानकर, सागर मदने व बहुसंख्य राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते

नातेपुते येथे जनशक्ती विकास आघाडी उमेदवाराचा नारळ फोडून प्रचार प्रारंभ


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)-नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक 2021 साठी माळशिरस नागरी आघाडी पुरस्कृत जनशक्ती विकास आघाडी चा नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ झाला हा प्रचाराचा नारळ जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला.
प्रचार प्रारंभ साठी मार्केट कमिटी नातेपुते येथे जनशक्ती विकास आघाडीचे सर्व उमेदवार व कार्यकर्ते एकत्र येऊन हलगीच्या कडकडाटा सह नातेपुते येथील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार व अभिवादन करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला.तसेच नातेपुते एस.टी स्टँड येथील गणेश मंदिरात श्रीगणेशाची आरती घेऊन मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सर्वांच्या वतीने बाबाराजे देशमुख म्हणाले की गावचा विकास हेच जनशक्ती विकास आघाडीचे ध्येय आहे.त्यासाठी विकासाचा जाहीरनामा तयार केला आहे त्यासाठी जनशक्ती विकास आघाडी तील प्रभाग क्रमांक 1 ते 17 सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 1 ते 17 चे सर्व उमेदवार तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनशक्ती विकास आघाडी चा नारळ फोडून उपस्थितांना मार्गदर्शन करताना जनशक्ती विकास आघाडीचे प्रमुख माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख
जनशक्ती विकास आघाडी चे प्रभाग क्रमांक 1 ते 17 उमेदवार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एकत्रित
प्रभाग क्रमांक 1 ते 17 मधील उमेदवार

दादा महाराज रणदिवे या च पुरस्कार मिळाल्याबद्दल फोंडशिरस येथे सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रशांत खरात) मानवी हक्क दिनानिमित्त फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते तात्या नाथ यांचे सुपुत्र महाराज दादा महाराज रणदिवे दिवे यांना  मानवी हक्क पुरस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल फोंडशिरस ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला तसेचमानवी हक्क संरक्षणार्थ ,(HUMAN RIGHTS) कोर कमिटी सदस्य पदी माजी सरपंच दादा महादेव रणदिवे यांचे निवड झाल्याबदल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहिगाव येथे आचार्य वर्धमान सागरजी महाराज चे वाजत गाजत स्वागत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-दहिगाव येथे आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज यांचे सहसंघ वाजत गाजत उत्साहात स्वागत करण्यात आले.आचार्य वर्धमान सागरजी महाराज व सहा संघ.यांचा आयटीआय दहिगाव येथे मंगल प्रवेश झाला दहिगाव येथे  भाविकांनी सर्वांचे बँड वर संगीत अजून जोरदार स्वागत केले आचार्य वर्धमान सागर जी महाराज यांनी ऐतिहासिक ठिकाणी श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव येथे भेट दिली व पूजा अभिषेक करून भाविकांना मंगल प्रवचनाची सेवा दिली यावेळी नातेपुते फलटण अकलूज बारामती इंदापूर परिसरात असंख्य भाविक उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी माळशिरस विधानसभा उमेदवार राज कुमार नातेपुते येथे धावती भेट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस विधानसभा उमेदवार राज यशवंत कुमार यांचे नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक संदर्भात धावती भेट झाली.महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भेटीचे सत्र सुरू झाले.या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला व आपण मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली सर्व जागा ताकतीने लढवणार असल्याचं सांगितले तसेच उमेदवारांना मार्गदर्शन केले.यावेळी, इंदापूर बिजवडिचे माजी सरपंच तालुका महासचिव रोहित नवगिरे व नातेपुते शहर अध्यक्ष धर्मा सावंत व पदाधिकारी उपस्थित होते.

फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!

फुले एज्युकेशन तर्फे जयंती चित्रपट टीम चा सन्मान !!!

आजच्या आधुनिक काळात जयंती चित्रपटाने समाजप्रबोधनाचे काम केले आहे – सत्यशोधक रघुनाथ ढोक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे / – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे नुकतेच महापरिनिर्वाणदिनी हडपसर येथील वैभव सिनेमागृहात जयंती चित्रपट समन्वयक डॉ.वैशाली जगताप ,निर्माता शैलेश नरावडे,कार्यकारी निर्माता वैभव छाया , सह निर्माता अमोल धाकडे यांचा आजच्या काळात सह कुटुंबाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा चित्रपट तयार करून पहाण्याची संधी दिली म्हणून संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सायंकाळी ७ चा शो महात्मा फुले यांच्या वेशभूषेत पाहून जयंती चित्रपट टीमचा थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम आणि शाल श्रीफळ देऊन येथोचीत सन्मान केला.यावेळी सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र शेलार, जागृती न्यूज चँनेल संपादक विजय भुजबळ ,युवराज सावंत उपस्थीत होते.
या प्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले कि या जयंती चित्रपटात एक कमी शिकलेला मुलगा उनाड असतो तो काही कारणाने तुरुगात जातो तो सुधारावा म्हणून एक मागासवर्गीय शिक्षक तुर्गाधिकारी शी बोलून हिरो संथ्या चा संतोष करण्यात यशस्वी होतात कारण त्याला खरे महापुरुष कोण कशे, त्यांचे विचार काय आहेत हे युगपुरुष शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ.आंबेडकर यांचे पुस्तके वाचनाचे गोडीतून कळते आणि त्यास जामीन देऊन काही दिवसांतच योग्य जिद्धीने आणि श्रमाने आपल्या जुन्या मित्राचे सहाय्याने पडेल ते कष्ट करून हॉटेल व्यवसायिक होतो .त्याचप्रमाणे एका मुलाचे आईवर बलात्कार झालेला असतो त्या केस साठी झालेली चुक सुधारून मदत करतो.स्वतःचे कुटुंबाला व इतरांना जवळ करतो.हे सर्व प्रसंग सर्वाच्या जीवनात घडत असतात त्यामुळे हा चित्रपट सर्वाना आवडतो आहे. सध्याचे वास्तव स्वरूप पदोपदी दिसत असल्याने उनाड व उनाड होणाऱ्या मुलांना योग्य परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाणारा व सर्व मागासवर्गीय समाजाला तसेच कुटुबाला एकत्रित बाधून टेवनारा हा जयंती चित्रपट आहे. हा चित्रपट निर्माण करून समाजाचे प्रबोधन करणारे मोठे काम केले आहे. अशा प्रकारचे चित्रपट यापुढे हि समाज प्रबोधनासाठी कायम निर्माण करावेत असे देखील शुभेच्या देऊन पुणेकरांना आव्हान केले की वाचन संस्कृती कमी होत चालल्याने सहकुटुंबाने सिनेमागृहात जावूनच हा जयंती चित्रपट पहावा.शासनाने हा चित्रपट आवर्जून मागासवर्गीय मुलामुलीच्या वसतिगृहातील मुलांना दाखवावा.तसेच तिकीट दर कमी होण्यासाठी अनुदान ध्यावे आणि जास्तीजास्त सिनेमागृहात हा चित्रपट लावण्यासाठी निवेदन पत्र देणार असल्याच्रे म्हंटले आहे.
यावेळी राजेंद्र शेलार म्हणाले कि आम्ही वाल्याचा वाल्मिकी होताना वाचले पण आज आम्ही प्रत्यक्ष संथ्याचा संतोष पाहून हा चित्रपट नक्कीच समाजातील मुलानावर चांगले संस्कार केल्याशिवाय रहाणार नाही.इतका चांगला चित्रपट दिला म्हणून सर्वाचे अभिनदन केले. यावेळी अनेक आदिवासी वसतिगृहातील मुलांनी चित्रपट आमच्यामध्ये टर्निग पॉईट असल्याचे म्हंटले.तर डॉ वैशाली जगताप यांनी सर्वाचे आभार मानले.

मानव जन्म अत्यंत मौल्यवान आहे- श्री१०८ वर्धमान सागरजी महाराज


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे):-सर्वात मौल्यवान असलेला मानव जन्म हा आहे आपण मौल्यवान वस्तू जपून ठेवतो तसाच मानव जन्मही मौल्यवान असून जपून ठेवला पाहिजे.आपण जपला पाहिजे कारण मनुष्य जन्मानंतर मोक्ष प्राप्त होतो असे नातेपुते येथे श्री १०८ वर्धमान सागरजी महाराज यांनी जैन समाज बांधवांना प्रवचनात दरम्यान मार्गदर्शन केले पुढे ते म्हणाले.शरीर हे आत्म्याचे निवासस्थान आहे, एका इंद्रियेपासून पंचेंद्रियांपर्यंत, धर्मावर प्रेम केले पाहिजे कारण त्याचा आत्म्याला फायदा होतो आणि ८४लाख फेऱ्यांतून सुटका करून सिद्ध पद प्राप्त करता येते, असे शिक्षक सांगतात. भरत चक्रवर्तीला ३६००० राण्या होत्या, तो आनंदात मग्न होता, तरीही आश्चर्य का वाटतं की तो सुखांपासून अलिप्त होता, तो खूप संपत्ती, वैभव इत्यादी योजना आखत होता.आज टीव्हीचे युग आहे जे लोक टीव्ही बघतात व ते तेच आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात परंतु ते आत्म्याच्या हिताचे नाही, ते पुढे म्हणाले, “जेव्हा आम्ही छत्तीसगड येथे विहार करत होतो तेव्हा दुकानाचे नाव अरहंत शृंगार असे होते ते योग्य वाटत नाही देवाचे नाव हॉटेल व इतर ठिकाणी टाकू नये असे त्यांनी यावेळी प्रवचनात बोलताना सांगितले.
आचार्य श्री १०८ वर्धमान सागर जी महाराज यांचे नातेपुते येथे गुरुवारी सकाळी ७ वाजून१५ ला नातेपुते येथे त्यांचे आगमन झाले त्यावेळी सकल जैन समाज बांधवांनी व नातेपुते येथील नागरिकांनी त्यांचे भव्य असे स्वागत केले सकाळी साडेसहा वाजता मधुर मिलन मंगल कार्यालय मधून नातेपुते कडे त्यांनी प्रयाण केले व सव्वासात वाजता नातेपुते येथे त्यांचे स्वागत करण्यात आले ८ वाजून १५ मिनिटांनी आचार्यश्री चे जैन मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले ,साडेआठ वाजता श्री आचार्य श्री चे पद प्रक्षालन पूजन ,शास्त्र भेट ,जपमाळ भेट, इत्यादी कार्यक्रम करण्यात आले ८ वाजून ४५ मिनिटांनी आचार्य जी चे मंगल प्रवचन करण्यात आले सकाळी साडेनऊ वाजता पंचामृत अभिषेक करण्यात आला.
सकल जैन समाज बांधवांनी भव्य अशा मिरवणुकीमध्ये ढोल ताशाच्या गजरात, धर्म पताका फिरवत श्री आचार्य १०८ वर्धमान सागरजी महाराज व त्यांच्या बरोबर असलेले सर्व जैन मुनि यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

नातेपुते ऐतिहासिक नगर पंचायत निवडणुक 17 जागांसाठी 94 अर्ज दाखल

नातेपुते ऐतिहासिक नगर पंचायत निवडणुक 17 जागांसाठी 94 अर्ज दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-नातेपुते तालुका माळशिरस ही ऐतिहासिक नगरपंचायत निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला खूप महत्त्व आहे कारण पहिल्यांदाच नगरपंचायत स्थापन झाल्या मुळे पहिली निवडणूक होत आहे. त्या पहिल्या निवडणुकीला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.त्यामुळे सतरा प्रभागातील नगरसेवक उमेदवार जागेसाठी 94 अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक महत्वपूर्ण सुद्धा राहणार आहे या निवडणुकीसाठी मोठे पक्ष भाजप, राष्ट्रवादी,शिवसेना, काँग्रेस,आरपीआय चिन्हावर लढणार नसून तर स्थानिक पातळीवर आघाड्या तयार करून निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक पंचरंगी निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.त्यामध्ये माळशिरस नागरी आघाडी पुरस्कृत जनशक्ती आघाडी,तसेच निवडणूक पूर्व नोंदणी नागरी विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी,राष्ट्रीय समाज पक्ष यासह अपक्ष ही मोठ्या प्रमाणात रिंगणात उतरले आहेत.यामध्ये वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.तर यातील एक आघडीला एक सारखी चिन्ह मिळणार असल्याचं संकेत आहेत.तर अपक्षांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामध्ये माळशिरस नागरी आघाडी22, महाराष्ट्र विकास आघाडी4, वंचित बहुजन आघाडी6, राष्ट्रीय समाज पक्ष6 अपक्ष 56 असे एकूण 94 अर्ज प्राप्त आहेत यामध्ये आणखीन आघाडी होण्याची शक्यता आहे.नातेपुते हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रमुख बाजारपेठ असून पुणे,सातारा,सोलापूर जिल्ह्या च्या बॉण्ड्री वर असल्याने नातेपुतेला खूप महत्त्व आहे.नातेपुते नगरपंचायत वर सर्वच पक्षांच्या नेत्यांचे लक्ष आहे विधानसभा व लोकसभा निवडणुकीला नातेपुते हे शहर महत्त्वाचे मानले जाते.म्हणून सर्व नेत्यांचे लक्ष नातेपुते शहरावर असून प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सत्तेच्या चाव्या हातात घ्यायच्या आहेत.राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे स्वतः त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी नातेपुते शहरात उपस्थित होते.नातेपुते ही 88 वर्षापूर्वी स्थापन झालेली ग्रामपंचायत विसर्जित होऊन नव्याने नगरपंचायत झाल्यामुळे नवीन उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.व पहिला नगरसेवक होण्याचा मान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.यातील किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील हे छाननी नंतरच समजणार आहे.नातेपुते नगर पंचायत निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर हे पाहात आहेत.

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी केलेले अर्ज

जात पडताळणी समिती अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थी गॅसवर

जात पडताळणी समिती अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थी गॅसवर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सोलापूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.काही विद्यार्थ्यांनी एकमहिना ,दोन महिने,तीन महिने अगोदर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. परंतु त्यांना जात पडताळणी कार्यालय यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा मेसेज न आल्याने विद्यार्थी व पालक थेट जातपडताळणी समिती कार्यालयात धडकले. उद्या 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा दिवस असून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकत नाही.असे असतानाही जात पडताळणी कार्यालयात जात पडताळणी समितीचे सन्मानीय अध्यक्ष साहेब कार्यालयात उपलब्ध नसल्याने विद्यार्थी भलतेच अडचणीत सापडले आहेत.जात पडताळणी समिती सचिव व उपायुक्त यांच्या प्रकरणावरती सह्या झाल्या असून अध्यक्षांची सही राहिल्यामुळे आज विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळू शकले नाही.सध्या अध्यक्ष सांगली येथे असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.प्रकरण सांगली येथे अध्यक्षांच्या सहीसाठी संध्याकाळी रवाना होणार व नंतर पोर्टलल अपलोड केली जाणार सोलापूर येथून सांगली ला जायला चार तास लागतात व येण्यासाठी चार तास लागतात संध्याकाळी सहा वाजल्या तरी सोलापूर येथील प्रक्रिया पूर्ण झाली नाही.जर विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी ॲडमिशन प्रक्रियेला जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.विद्यार्थ्यांना दोनशे किलोमीटरचा प्रवास करून कॉलेज ला जायच आहे.जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या अंधारमय दिसत आहे.जर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर याला जबाबदार कोण? असा सवाल या ठिकाणी निर्माण झाला आहे.अगोदर जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना कागदांची जुळवाजुळव करण्यासाठी पराकाष्टा करावी लागते वेळ आणि पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागतात त्यातून असा प्रकार घडला तर विद्यार्थी खचून जातो नाउमेद होतो.विद्यार्थ्यांकडून लवकर जात प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.तसेच प्रवेश प्रक्रियेला वाढीव मुदत देण्याची मागणी ही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळाले नाही म्हणून प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांची जबाबदारी संबंधित विभागाचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनीच घ्यायला हवी या प्रकरणांमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालण्याची मागणी पालकांतून होत आहे. 

You may have missed