कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)– कांद्याच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजून पावसाळी कांदा शेतकऱ्यांचा बाजारात आलेला नाही तोवरच कांदा निर्यातीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सध्या कांद्याला मिळणारा चांगला दर थांबला आहे. केंद्र शासनाने भारतात कांद्याचे दर वाढत असल्याने तसेच भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.परंतु या कांदा निर्यात बंदी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.यावर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर त्या निर्णयास विरोध करून केंद्रीय व्यापार वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांना तात्काळ संपर्क साधत व पत्रव्यवहार करून कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी दिनांक 15 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे केली आहे. या पत्रातील मागणीमुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
https://www.shakkyalegal.com/
https://www.shakkyalegal.com/
























