आंतरराष्ट्रीय

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा पिरळे येथे सत्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रमोद शिंदे)- कृषी अधिकारी शिवलाल गेना कांबळे हे कृषी खात्यातून कृषी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले असल्याने पिरळे येथील अर्जुन नगर येथे प्रमोद भोसले मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला शिवलाल कांबळे हे इंदापूर तालुक्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असून सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी व मित्र परिवाराने त्यांना प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या तसेच पिरळे येथे ही त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी साई उद्योग समूहाचे मॅनेजर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोसले,मित्रपरिवार तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक नातेपुते मॅनेजर बबन गुलाब धाइंजे उपस्थित होते.

कृषी अधिकारी शिवलाल कांबळे यांचा सपत्नीक पिरळे येथे सत्कार

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचा राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -( प्रमोद शिंदे)- कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्यासाठी 15 जून 2020 पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे.
आरोग्य विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी मागील १२ ते १५ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर तुटपुंज्या मानधनावर प्रामाणिकपणे काम करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच समायोजनाबाबत शासनाकडे वारंवार मागणी करीत आहेत. परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी कारणे सांगुन आणि आश्वासने आश्वासने देऊन शासनामार्फत व प्रशासनामार्फत या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येते. आजपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतली ,कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोव्हीड-१९ मध्ये डयुटी लावण्यात यावी आणि नंतर नियमित कर्मचाऱ्यांच्या डयुटी लावण्यात याव्या असा तुगलकी निर्णय देण्यात आला आहे. कोव्हीड -१९ परिस्थितीत ९० टक्के कंत्राटी कर्मचारीच काम करत असल्याचे दृष्य संपुर्ण महाराष्ट्रभर दिसत असतांना मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, महोदयांनी केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याच मानधनामध्ये वाढ करून आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, शासनाने समान काम समान वेतन याची घोषणा केली आहे परंतु यावर शासनाने कसल्याही प्रकारचे वेतन वाढ कर्मचाऱ्यांना दिली नाही .शासनाला आमची गरज नसल्यास, आम्हालाही त्यांची गरज नसल्याचे चित्र संपुर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दिसुन येत आहे.
आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी उच्च शिक्षीत व प्रशिक्षीत यंत्रणा असल्यावर सुध्दा आरोग्य सेवेमधील १७००० रिक्त पदे महाभरतीद्वारे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या गुणांनुसार करण्यात येणार असून नव्याने येणाऱ्या पात्रता धारकांना शासन नियुक्तीचे आदेश देणार असल्याचे मा. आरोग्यमंत्री साहेबांनी जाहीर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आत्मदहनाची वेळ आणली असल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचारी मध्ये असंतोष निर्माण होवून संतापाची लाट उसळली आहे. पत्र संदर्भ क्र ४ व ५ नुसार राज्य संघटनेच्या आंदोलनाची दखल अद्यापपर्यंत शासनाने घेतलेली नसल्यामुळे दि.१५/०६/२०२० पर्यंत शासनस्तरावरून सकारात्मक निर्णय न दिल्यास तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास संपुर्ण महाराष्ट्रातील एन.एच.एम.कंत्राटी कर्मचारी दि.१५ जुन २०२० पासुन महासंघाकडुन राज्य व्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, तसेच या आंदोलनात जे काही नुकसान होईल यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन शासनाला कंत्राटीी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्याध्यक्ष नंदू कासार व संघटने च्या पदाधिकारी यांनी दिले आहे .शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभरातून करण्यात येईल असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

माळशिरस येथे विकास दादा धाइंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभजन थाळी चे वाटप

माळशिरस येथे मोफत शिवभजन थाळी चे वाटप
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (नातेपुते)- माळशिरस येथे आंबेडकरी चळवळीचे नेते माळशिरस चे मा.सरपंच विकास दादा धाईंजे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळी चे वाटप करण्यात आले कोरणा प्रादुर्भावामुळे अनेक गरीब लोकांची उपासमार होत आहे हाताला काम नाही त्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे उपसणारे हाल होत असल्याकारणाने शासनाने शिव भजन थाळी अल्पदरात योजना आणली आहे परंतु अल पदराचे पैसेही देण्यासाठी लोकांकडे नाही याचा विचार करून विकास धाईंजे यांनी सोशल डिस्टंसिंग पळून मोफत 100 शिवभोजन थाळी पार्सल गरजूंना वाटप केले आले यावेळी विकासदादा धाईजे,एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते, पंचायत समिती सदस्य अजय सकट, पत्रकार प्रमोद शिंदे,संजय झेंडे, दत्ता कांबळे, प्रवीण नलावडे, शिवाजी साळे,व कार्यकर्ते उपस्थित होते.

लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा- सलमान शेख

                     

– लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा- सलमान शेख


पुरोगामी महाराष्ट्र्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे

लॉकडाऊन च्या काळात विजबिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा मागणी मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती आरक्षण संघर्ष समन्वय समिती माळशिरस तालुका युवक नेते सलमान शेख यांनी मुख्यमंत्र्यांना केली

महाराष्ट्र राज्यकोविड१९ साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर सारे जग ठप्प झाले आहे राज्यात 18 मार्च पासून लॉकडाऊन घोषित केल्यापासून आजपर्यंत अनेकांचे उदरनिर्वाह करण्याचे साधन ही या आपत्ती मुळे कोलमडुन गेले आहे अनेक खाजगी कंपन्यांनी कर्मचारी यांना विनावेतन सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे गोरगरीब उपेक्षित वंचित व मागासवर्गीय लोक फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत समाजातील जास्तीत -जास्त लोकांना एकमेव मजुरीचा आधार असून त्यांना शेती नाही त्यांचे उद्योगधंदे व्यवसाय नाहीत त्यामुळे हे लोक आता फार मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांना या अडचणीच्या काळात प्रशासनाच्या वतीने आधार देणे फार महत्त्वाचे आहे
ग्रामीण व मध्यम शहरी भागात या लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे राज्याला अन्नधान्य पुरवठा करणारा बळीराजाही दळणवळण ठप्प झाल्यामुळे चिंताग्रस्त आहे. पिकवलेला माल कवडीमोल किंमतीत खरेदी होत असून काहींनी तर सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान केले आहे तर अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी ,मजूर ,वेठबिगारी चाकरमानी व छोटे व्यवसायिक यांना आपल्या सरकार कडून खारीचा वाटा या आशयाप्रमाणे सण २०२०-२०२१ या चालू वर्षात आकारण्यात येणारे विज बिल, घरपट्टी आणि पाणीपट्टी ही करआकारणी राज्य सरकारने सरसकट माफ करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे.

                                                                           कळावे 
                                                                    आपला विश्वासू

                                                                       सलमान शेख
                                                          AIMIM नेते माळशिरस तालुका
                                मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र                                                   
                                                   

पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश

पत्रकारांना मिळणार 50 लाखाचा विमा एन डी एम जे च्या मागणीला यश
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे( नातेपुते)- पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार असल्याची घोषणा नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन डी एम जे) या संघटनेने ग्रामसेवक डॉक्टर आरोग्य कर्मचारी यांच्या प्रमाणे पत्रकारांनाही 50 लाखाचा विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती पत्रकार हा स्वतःचा जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असतो व सत्य परिस्थिती आढावा वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचत असतो परंतु हे काम करत असताना पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नव्हते. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून इतर कर्मचाऱ्यांना बरोबर पत्रकारांनाही कोरोना धोका आहे. त्यांनाही विमासंरक्षण मिळाले पाहिजे. मुंबईमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाआहे ही गोष्ट लक्षात घेत यावर आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संपादक महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पत्रकार प्रमोद शिंदे,पत्रकार प्रशांत खरात यांनी 50 लाख रुपयांचा विमा पत्रकारांना देण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना 50 लाखाचा विमा मिळणार याची घोषणा केली आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे व त्याला कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाल्यास तात्काळ हे 50 लाखाचे विमा संरक्षण मिळणारआहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व पत्रकार बांधवांकडून स्वागत केले जात आहे.

ॲट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून फिर्यादी व साक्षीदारावर जातीवादीद्यांचा प्राणघातक हल्ला




आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे एन डी एम जे संघटनेने केली मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) – दिनांक 25 फेब्रुवारीला समीर नवगिरे याने मिरे येथील जातीयवाद्यांवर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये एट्रोसिटी दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी अकलूज-म्हाळूंग रोडवर समीर नवगिरे याच्यासह साक्षीदारावर तलवारीने खुनी हल्ला केल्याने सदरच्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी एनडीएमजेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 1 जूनला दुपारी 3 वा. च्या दरम्यान फिर्यादी सुधीप बाळकृष्ण नष्टे अकलूज येथील आपले काम आटोपून समीर नवगिरे याच्यासह मिरे या गांवी निघाला होता. त्याचवेळी म्हाळूंग रोडवरील काळा मारूती मंदिरापासून काही अंतरावर 10 ते 12 लोक एकत्र थांबल्याचे त्यांना दिसले. यादरम्यान ते गाडीवर पुढे जात असताना अचानक दोघा तिघांनी मोटारसायकल उभी केली व पांडुरंग गायकवाड, सिध्देश्वर जोरवर, विजय भीमराव गुंड यांनी फिर्यादी व समीर नवगिरे याला मोटारसायकलवरून लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर पांडुरंग गायकवाड त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने मारण्याचा प्रयत्न करून तुम्ही २५ फेब्रुवारीला आमच्याविरूध्द अकलूज पोलिस स्टेशनला खोटी एट्रोसिटी दाखल का केली? ती केस काढून घ्या, नाहीतर तुम्हाला जीवंतच ठेवणार नाही. तुम्हाला लय मस्ती आलीय असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बाजूला उभे राहिलेल्या राजकुमार भिमराव गुंड यानेही हातातील तलवारीने सुधीप नष्टे याच्या डोक्यात मारून जखमी केले. त्याचवेळी पांडुरंग आगतराव गायकवाड त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने फिर्यादी व समीर नवगिरे यास मारहाण करू लागला. त्यानंतर सिध्देश्वर बजरंग जोरवर याचेजवळ असलेल्या लोखंडी कोयत्याने व राजू मारूती होळकर लोखंडी पाईपने सुधीपच्या पाठीत, अंगावर व पायावर सपासप मारहाण करू लागला. विजय भीमराव गुंड याने लोखंडी पाईपने डाव्या हातावर मारून जखमी केले व महेश मिलींद गुंड, बबलू राजकुमार गुंड, संभाजी आगतराव गायकवाड त्यांच्या हातातील लोखंडी गज व दगडाने हातावर मारहाण करीत होते. त्याचवेळी राजू गुंड याने समीर नवगिरे यास मारहाण करीत असताना “ये म्हारड्या तुला लय मस्ती आली आहे, तुझी मस्तीच जिरवतो. आमचे विरूध्द खोट्या केसेस करतो का?” असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी तलवारीने पायावर व शरीरावर मारहाण करून त्याच्या डोक्याचे केस धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने जमीनीवर डोके आपटू लागला. तर सोनू रमेश गुंड हा हाताने लाथा बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करू लागला. या  जीवघेण्या हल्ल्यामुळे सुधीप नष्टे व समीर नवगिरे जखमी अवस्थेत खाली पडलेले असताना विजय भीमराव गुंड व राजकुमार भीमराव गुंड यांचेजवळ असलेली क्रेटा व ब्रेझा गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होते. तर पांडुरंग गायकवाड व सिध्देश्वर बजरंग जोरवर हे सुधीपच्या हाताच्या बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या व समीर नवगिरे जवळील दहा हजार रोख रक्कम घेऊन शिवीगाळ व दमदाटी करीत असताना अकलूजकडून म्हाळूंगकडे जाणाऱ्या अशोक उर्फ भोला युवराज भोसले व भगवान युवराज भोसले हे मारहाण करणाऱ्या लोकांना थांबवत असताना त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करून सदरचे आरोपी आपल्या गाड्या घेऊन निघून गेले. त्यानंतर अशोक उर्फ भोला भोसले व त्याचा भाऊ भगवान भोसले यांनी सुधीप नष्टे यास अकलूज येथील यशोदा  हॉस्पिटलमध्ये तर समीर नवगिरे यास अकलूज क्रेटीकेअरमध्ये दाखल केले. अशाप्रकारची फिर्याद  अकलूज पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आली आहे ही बाब आंबेडकरी चळवळीचे  नेते विकास धाईंजे व वैभव गीते यांना समजताच ते तात्काळ अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तसेच याबाबत अकलूज पोलिस स्टेशनने पांडुरंग आगतराव गायकवाड, सिध्देश्वर बजरंग जोरवर, दादासाहेब होळकर, राजू होळकर, महेश मिलींद गुंड, संभाजी आगतराव गायकवाड, बबलू राजकुमार गुंड, राजकुमार भिमराव गुंड, विजय भिमराव गुंड, सोनू ऊर्फ गणेश रमेश गुंड, रावण वामन जोरवर या आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3(1)(r)(s), 3(2)(v), 3(2)(va) सह भादंवि कलम 307, 326, 329, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 नुसार 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरच्या आरोपींना अटक करून मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी विकास धाईंजे व वैभव गीते यांनी पोलीस अधिक्षक सोलापुर यांच्याकडे केली आहे. 

सोशल संस्थेच्यावतीने स्यानीटायझर व मास्क याचे पोलिसांना वाटप

सोशल संस्थेच्यावतीने स्यानीटायझर व मास्क याचे पोलिसांना वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-सोशल ही संस्था समाजातील वंचित दुर्लक्षित घटकाकरिता गेली दहा वर्षापासून कार्यरत आहे आरोग्य, शिक्षण,मुले दत्तक योजना,लाडली योजना, पंढरपूर वारी निमित्त मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळग्रस्त बांधवास मोफत आरोग्य सेवा, शालेय साहित्य मदत ,ग्रामविकास, महिला सबलीकरण अशा मुद्द्यावर अविरतपणे कार्यरत आहे.
देशासह राज्यात कोरोना ने भीषण संकट निर्माण केले आहे. पोलीस दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी कोरोना या साथीच्या आजाराशी लढा देत आहेत.अनेक पोलीस कोरोना बाधित होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पुरेशी साधने नाहीत.या पार्श्वभूमीवर सोशल डेव्हलपमेंट सोसायटी वतीने बंदोबस्तासाठी असणाऱ्या अकलूज ,वेळापूर,माळशिरस व पिलीव परिसरातील पोलिसांना स्यानिटायझर ,गोल्ज व मास्क इ वस्तूचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर नागरी आघाडीचे नेते अरीफखान पठाण सोशल संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,रिपाइंचे रणजित सातपुते,जय मल्हार चे अरुण बोडरे,संजय करडे इ मान्यवर उपस्थित होते

खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

मुलांच्या शिक्षणासासह कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी वैभवजी गिते यांनी घेतली.

पीडित कुटुंबाच्या शेवटपर्यंत पाठीशी राहू.. विकास दादा धाइंजे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज न्यूज नेटवर्क अकलूज —
मौजे खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथे दिनांक 1 मे 2020 रोजी मातंग समाजातील
रामचंद्र विठ्ठल खंडागळे या तरुणाचा खुन झाला.
या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकासदादा धाइंजे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी खंडाळी येथे भेट दिली.
खंडागळे कुटुंबाचे सांत्वन केले
मयत रामचंद्र खंडागळे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी व दोन लहान मुले आहेत.एक भाऊ मतिमंद आहे.ही परिस्थिती लक्षात घेता वैभवजी गिते यांनी दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसह कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्याची घोषणा घटनास्थळीच केली.तात्काळ समाजकल्याण व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून पीडित कुटुंबास तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेत तीनही आरोपींना अटक केली असून आरोपी सध्या पोलीस कास्टडीमध्ये आहेत.विकासदादा धाइंजे यांनी कुटुंबास केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले.व तहसीलदार यांची भेट घेऊन तातडीची मदत,पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी एन.डी.एम.जे चे नेते बाबासाहेब सोनवणे, भगवान भोसले,दत्ता कांबळे,समीर नावगिरे,वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र साळवे,कल्याण लांडगे
खंडाळीचे ग्रामपंचायत सदस्य महादेव साबळे
बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे,
आबा वाघमारे,
योगेश खंडागळे, सौरभ वाघमारे अभय वाघमारे,प्रवीण खरात, प्रकाश खरात तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव गिते व विकास दादा यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबास कागदपत्रे काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली.

पत्रकारांना 50 लाखांचे विमा संरक्षनासह लॉक डाऊन संपेपर्यंत 6 हजार मानधन द्यावे. ……..वैभव गिते

पत्रकारांना 50 लाखांचे विमा संरक्षनासह लॉक डाऊन संपेपर्यंत 6 हजार मानधन द्यावे. ……..वैभव गिते

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -शासनाने कोरोना विषाणूचा प्रदर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.कोरोना विषाणूशी लढताना कर्तव्य बजावताना अनेक डॉक्टर,नर्स,वार्डबॉय व पोलिस अधिकारी हे स्वतः कोरोना कोविड 19 विषाणूने संक्रमित झाल्याचे निदर्शनास येत आहे.अशा गंभीर परिस्थितीत दैनिक, साप्ताहिक,पाक्षिक,नियतकालिकांचे पत्रकार,वृत्तवाहिन्यांचे,युट्युब चॅनल व पोर्टलवर पत्रकारिता करणारे पत्रकार,विविध वर्तमानपत्रात लेख लिहणारे पत्रकार,स्तंभलेखक हे
स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करत आहेत. समाजातील तळागळातील बातम्या देण्यासाठी पत्रकारांना अनेक ठिकाणी प्रसंगी संक्रमित विभागात जावे लागते पत्रकार हा समाजातील आरसा आहे.सत्य जनतेपर्यंत पोचवणारे माध्यम आहे.
प्रामाणिक पत्रकारिता करीत असताना जर पत्रकारांना कोरोना कोविड 19 या विषाणूची लागण झाली तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकते.
त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला संरक्षण देणे काळाची गरज आहे ज्याप्रमाणे शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतच तलाठी व ग्रामसेवक यांनासुद्धा 50 लाखांचा विमा जाहीर केला आहे त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या पत्रकारांना पन्नास लाखांचा विमा घोषित करून लॉकडाउन संपेपर्यंत प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास (दादा) धाईंजे नॅशनल दलीत फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे यांनी उपविभागीय दंडाधिकारी ताथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज मा.शमा पवार म्याडम यांची भेट घेऊन निवेदन सादर करून गांभीर्य लक्षात आणले एक प्रत मुख्यमंत्री यांना सुद्धा पाठवली प्रांतअधिकारी शमा पवार यांनी हे निवेदन तात्काळ कार्यवाहीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठवले आहे

कलावंतांना तीन महिन्यांकरीता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान द्यावे – वैभव गिते

कलावंतांना तीन महिन्यांकरीता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान द्यावे वैभव गिते

खेळ मांडण्यापूर्वीच मोडण्याची वेळ आली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणीप्रतिनिधी–कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे मार्च ते मे महिन्याच्या हंगामात हातावर पोट असलेले विविध घटक अडचणीत आले आहेत.यामध्ये शिव,फुले,शाहू आंबेडकर,आण्णा भाऊ यांच्या विचारांचा प्रसार प्रचार तळागळापर्यंत पोचवून अंधश्रद्धेचे निर्मूलन करणारे हजारो गायक,शाहीर,जलसाकार तसेच मार्च,एप्रिल व मे महिन्यात गावागावांमध्ये होणाऱ्या जत्रा यात्रांमध्ये रसिक मायबाप जनतेचे मनोरंजन करणारे लावणी शो,ऑर्केस्ट्रा,तमाशा मंडळांसह अनेक कार्यक्रमातील कलाकारांचा समावेश आहे.
पायाला भिंगरी बांधून स्वतःचा संसार पाठीवर बांधून कलावंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या संचासोबत जाऊन जनतेचे प्रबोधन व मनोरंजन करून मिळेल ते मानधन पदरात पाडून चटणी भाजी भाकरी खाऊन दिवस काढतात.याच मानधनावर कलावंत एक वर्षाचे गणित मांडतात उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण,औषधपाणी,देणी घेणी करतात.केंद्रसरकार व राज्यसरकार यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या रद्द केल्याने उपासमारीची वेळ आली आहे.तरीही महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेस पोवाड्याच्या माध्यमातून संदेश दिला आहे सध्या त्यांचा हा पोवाडा सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाला आहे.असे हे कलावंत स्वतःचे दुःख चेहऱ्यावर न दाखवता जनतेस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत
मुख्यमंत्री सहाययता निधीत सध्या 197 कोटी निधी शिल्लक आहेत.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून यामधील निधी कलावंतांना व त्यांच्या संचास तीन महिन्यांकरिता प्रत्येकी पाच
लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात यावेत यामुळे शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही
कलाकारांपुढे खेळ मांडण्यापूर्वीच मोडण्याची वेळ आली आहे.पुरोगामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा परखड शब्दात सांगणाऱ्या व जपणाऱ्या या घटकांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये.कलाकारांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणे खुप गरजेचे आहे.तात्काळ निर्णय घेऊन कलावंतांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड थांबवावी ही विनंती

You may have missed