आंतरराष्ट्रीय

ना.चंद्रकांत पाटील यांचे विरोधात नातेपुते शहर कडकडीत बंद.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी): मागील चार दिवसांपूर्वी पैठण येथे झालेल्या सार्वजनिक सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिबा फुले,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना नातेपुते शहरात देखील सर्व बहुजन समाजातील बांधव एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती.या बंद साठी नातेपुते शहरातील नागरिक तसेच सर्व व्यापारी वर्ग यांनी शंभर टक्के गाव बंद मध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी नऊ वाजता युवक वर्गाने नातेपुते शहरात फेरी काढून सर्व महामानव यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी एक वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन निवेदन देण्यात आले .यावेळी बोलताना रिपाईचे जेष्ठ नेते एन के साळवे यांनी सांगितले की या महामानवानी शिक्षणाची दारे बहुजन वर्गासाठी खुली केली नसती तर चंद्रकांत पाटील आज मंत्रीपदावर नसते.
रासप नेते बशीर काझी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बहुजन युवक यांना भरकटविण्याची मोहीम सध्या चालू आहे.

महामानवांवर जे जे बोलतील त्यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन रस्त्यावर यावे मग आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ रोहित सोरटे.

प्रत्येक महामानवाने देशाला समतेची शिकवण दिली आहे तरी काही लोक अजून त्यांचा दुस्वास कसा करू शकतात विशाल सोरटे.

समतेचा विचार देणाऱ्या महामानवांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणी केला तर आज फक्त बंद पाळला आहे जर हे प्रकार थांबले नाहीत तर याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन होतील. समीर सोरटे .

संघर्ष सोरटे यांनी प्रास्ताविक करून बंद मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रणजित कसबे,लखन सोरटे,सूचित साळवे,विशाल साळवे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
शेवटी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन रिपाईचे जेष्ठ नेते युवराज वाघमारे यांनी केले.हे निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्री.चव्हाण,गाव कामगार तलाटी प्रभाकर उन्हाळे,नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वीकारले.
दलीत महासंघ यांचे वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले.
नातेपुते शहरातील बंद यशस्वी करण्यासाठी एन के साळवे,युवराज वाघमारे,सुनील साळवे सर, बीपीन सातपुते, नवाज सोरटे,विनोद रणदिवे,रोहित सोरटे,किरण सोरटे,दादा साळवे,दत्ता सोरटे,अभिजित वाळके,वैभव सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,संघर्ष सोरटे,सूचित साळवे,रणजित कसबे,विशाल साळवे,बाळासाहेब सोरटे ,राहुल सोरटे,विशाल सोरटे,दादा अटक, चंद्रकांत राऊत व सर्व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने आशा डे उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने आशा डे उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)-पुरोगामी महाराष्ट्र व प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस यांच्या वतीने आशा डे उत्साहात संपन्न झाला.संविधान दिन तसेच आशा डे चे औचित्य साधून परिसरातील सर्व आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.तसेच सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुरळे मॅडम ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य सहायिका  व्ही.पी चव्हाण यांनी केले.बोलताना प्रमोद शिंदे म्हणाले की आशा स्वयंसेविका यांनी कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.शासनाचा प्रत्येक कार्यक्रम त्या प्रामाणिक घरोघरी जाऊन राबवतात त्यांचं काम उल्लेखनीय आहे.तसेच त्यांना पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय रुग्णसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भेटवस्तू उस्नेहभोजन देण्यात आले.यावेळी अशा सुपरवायझर कल्पना कुंभार  यांनी सर्व आशांच्या वतीने आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रशांत खरात,आरोग्य सेविका कल्पना जाधव,विजया शिंदे, ज्योती डोंबाळे, वंदना चंदिले, मनीषा कुदळे, गायत्री जाडकर,सी एच ओ तब्बूसुम जुबेरे, पवार मॅडम,वर्षा शिंदे,औषध निर्माता प्रशांत घुंबरे,आरोग्य सेवक गुरुनाथ हिवरे, विठ्ठल काशीद,रमेश बंडगर तानाजी बिबे, बाबूलाल शेख मेजर खिलारे, सचिन गोरे अशा स्वयंसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

नानासाहेब देशमुख यांच्या समाजकारणाची छाप माझ्यावर पडली -डॉ एम के इनामदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे— समाजभूषण नानासाहेब देशमूख याच्या राजकारणात समाजकारणाची छाप होती,त्याच्याच  व्यक्तिमत्वाची छाप माझ्यावर पडल्यामूळे मला समाजकारणाची,समाजात चांगले काम करणार्याला मदत करण्याची सवयी लागली असे मत,प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॅ.एम.के.ईनामदार यांनी व्यक्त केले.  समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्या९६ व्या जयंतीनिमित्त व एस.एस.डी.इटरनॅशनल स्कूल इमारतीच्या पहीला मजला भूमीपूजन  प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड डी.एन.काळे तर प्रमूख पाहूणे म्हणून बापुराव देशमूख(किल्ले वडगांव) हे होते,  डाॅ.एम.के.इनामदार पुढे म्हणाले,कोणतीही संस्था चालवत असताना शिस्त अतिशय महत्वाची असते.शिस्त नसेल तर संस्था टिकू शकत नाहि,परंतू नानासाहेब देशमूख यांना दूरदृष्टी असल्यामूळे त्याच्या नावाने चालवलेली व त्यांनी स्थापन केलेल्या असल्याचे . सर्व संस्था प्रगतीपथावर असल्याचे पाहून समाधान वाटते,आर्थीक शिस्ती बरोबरच वैयक्तीक शिस्तही महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.     प्रास्तावीक करताना एस.एन.डी.स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमूख म्हणाले कि,ग्रामीण भागातील मूलांना शहरातील स्पर्धेत  टिकण्यासाठी सी,बी .एस.सी.अभ्यासक्रम सूरू केला.माझी शाळा माझा विद्यार्थी हि भावना पालकांत दिसून येत असूनहीच यशाची पावती आहे ,अस वाटत.या संस्थेत शिकलेल्या जगाच्याबाजारपेठेत एकनंबर मिळवल असे शिक्षक येथे काम करत आहेत.  यावेळी व्यासपिठावरील सहकारमहर्षि शंकरराव मोहीते पाटील व समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्या प्रतिमाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी स्कूलमधील विद्यार्थाना बक्षिस वितरीत करण्यात आली,यावेळी,स्वेतश्री पिसाळ,मैथिली बडवे.सनद मोटे,श्रीमय भागवय या मूलांनी समाजभूषण नानासाहेब देशमूख यांच्याविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास डाॅ एम .के.इनामदार,डाॅ एम पी मोरे,अॅड डी.एन.काळे.जि.प.माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख,मार्केटकमिटी उपाध्यक्ष मामासाहेब पांढरे, माऊली पांटील,चेअरमन मालोजीराजे देशमूख,अमरशील देशमूख,नाथाजीराव देशमूख,नारायण देशमूख,सौ विनोदिनी देशमूख,कूमूदिनी पवार,भाग्यश्री निंबाळकर.श्रूतिका देशमूख,नगराध्यक्षा उत्कषाराणी पलंगे,अॅड बी,वाय,राऊत,विरेंद्र दावडा,बाहूबली चंकेश्वरा,अॅड शिवाजीराव पिसाळ,महेश शेटे,अतूल बावकर,विलास काळे,अर्जून जठार,मूख्याधिकारी माधव खांडेकर,सपोनी प्रविण संपांगे,ञ्रूतूजा मोरे!शरद मोरे,रोहीतशेटे, विश्वजित पिसाळ उपस्थित होते.सूञसंचालन शकूर पटेल यांनी केले तर आभार प्राचार्य सदिप पानसरे यांनी मानले 

 चौकट—कार्यकर्ता हाच राजकारणा आत्मा असतो,कार्यकर्ताल्या कधीही फसवू नका.जात ,धर्म ,पंथ,पक्ष याचा विचार न करता तळागाळातील गरीब माणसाला मदत करणे,चांगले नाही करता आले तर वाईट करू नकाअसे विचार,समाजभूषण नानासाहेब देशमूख यांचै होते,त्याच्या नावाने एखादी संस्था असावी विचार पुढे येऊन रेणूका परीवाराने एस.एन.डी, स्कूलची स्थापना केली.२०२४ अखेर तीन मजले पूर्ण करून सूसज्ज,ग्रथालय,संगणक लॅब,प्रयोगशाळा असेल,तसेच ११वी १२वीसाठी अॅकॅडमी सूरू करून नातेपूते येथे सर्व शैक्षणिक सूविधा मिळतील असे काम करणार आहोत.     बाबाराजे देशमूख,माजी जिप उपाध्यक्ष

संविधान म्हणजे समता-एपीआय प्रवीण संपांगे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे तालुका माळशिरस येथे जि प शाळा व पुरोगामी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ऍड सुमित सावंत उद्योजक संदीप नरोळे हे होते. एपीआय प्रवीण संपांगे बोलताना म्हणाले की भारतीय संविधान म्हणजे समता या देशामध्ये संविधानामुळे आपण सर्व समान आहोत.कोणीही उच्च नीच नाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान अधिकार दिले आहेत.आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात तरीसुद्धा लोकशाही आहे ती संविधानामुळेच.ऍड सुमित सावंत म्हणाले की संविधान हे सर्व भारतीयांना लागू आहे संविधानाची सुरुवात बाबासाहेबांनी आम्ही भारताचे लोक असे केली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपल्याला संविधान समजून घ्यायच असेल तर जनजागृती करणे गरजेचे आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला होता.त्याचप्रमाणे संविधानाची जनजागृती होण्यासाठी प्रत्येकाला आपला अधिकार व हक्क माहीत होण्यासाठी शासनाने हर घर संविधान घर घर संविधान हा कार्यक्रम राबवला पाहिजे.उद्योजक संदीप नरोळे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमादरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शेंडगे मॅडम व नामदे मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष आनंद लवटे, माजी शिक्षणाधिकारी प्रल्हाद साळवे,संदीप वाघ मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

हनुमान विद्यालय शिंदेवाडी ता माळशिरस येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  ऍड.सुमित सावंत,पत्रकार प्रमोद शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान रॅली काढून करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान पुस्तिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऍड सुमित सावंत बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिला आहे. संविधानामुळे देशात कायदा सुव्यवस्था व समानता आहे.तसेच या देशात कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.तसेच शासनाने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे शासनाने घर घर संविधान हर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार माहित होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर हे होते.याप्रसंगी मुख्याध्यापिका देठे मॅडम,डॉ मचाले सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आखाडे सर यांनी व्यक्त केले..

२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार

२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार

समाजरक्षक वैभवजी गीते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- संविधान सन्मान महोत्सव आयोजित करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना भेटून निवेदन दिले तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या सचिवांना भेटून निवेदन देऊन चर्चा केली होती.याची दखल घेत शासनाने शासन निर्णयानुसार

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण केलेली आहे. सदर राज्यघटना ही दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आलेली आहे. त्यानुषंगाने ज्या संविधानाने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक २६ नोंव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक ६ डिसेंबर हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक २६ नोव्हेंबर, २०२२, संविधान दिन ते ६ डिसेंबर, २०२२, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत “समता पर्व” आयोजित करण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाणे शासन निर्णय काढला आहे यामध्ये खालील कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यक्रम राबविणारी यंत्रणा
दि.२६ नोव्हेंबर २०२२, संविधान दिन ते दि. ६ डिसेंबर, २०२२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीतील समता पर्वामध्ये आयोजित कार्यक्रमाबाबत पत्रकार,राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समाज कल्याण आयुक्तालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे परिषदेचे आयोजन व कार्यक्रमास प्रसिध्दी देणे.
२६ नोव्हेंबर
Walk for Constitution / प्रभात फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालये, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेले सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अनुदानित वसतिगृहे इ.संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये,जिल्हा परिषदा,पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,जिल्हास्तरावर पालकमंत्री,
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा तथा कार्यक्रमाचे आयोजन निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा,लेखी परिक्षा,
२७ नोव्हेंबर २०२२,२८ नोव्हेंबर २०२२,२९ नोव्हेंबर,३० नोव्हेंबर २०२२ राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये, सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अनुदानित इ. राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,संविधानविषयक व्याख्याने (विषय- अधिकार व कर्तव्ये) सामाजिक न्याय भवनात पत्रकारांची कार्यशाळा ( विषय सामाजिक न्याय : विभागाची नवी दिशा) संविधान या विषयावर भित्तीपत्रक,पोस्टर्स, बॅनर इत्यादी बाबत जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे
समाजसेवी प्रतिनिधी,कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा विषय : अनुसूचित जाती उत्थान : दशा व दिशा
१ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा
२ डिसेंबर २०२२ रोजी
स्थळ भेट : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी
जिल्हयातील विविध तालुक्यात जेष्ठ नागरीक,दिव्यांग, तृतीयपंथी व ३ डिसेंबर २०२२ रोजी
वृध्द यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त,सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थीना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरण
४ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र आयोजन राज्यातील सर्व तालुकास्तरावर राज्यातील सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी
५ डिसेंबर ६ डिसेंबर २०२२ संविधान जागर व येणाऱ्या ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनाच्या संदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन, व समता पर्वाचा समारोप राज्यस्तरीय कार्यक्रम चैत्यभूमीवरील कार्यक्रम
अभिवादन रॅली राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पडताळणी समिती
योजनांच्या माहितीची कार्यशाळा अधिकारी व कृषी अधिकारी
राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे,दिनांक २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, २०२२ या कालावधी दरम्यान होणाऱ्या समता पर्व कार्यक्रमाच्या सनियंत्रणाकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत समतादूत उपलब्ध करून देण्याबाबत आदेश काढावेत.कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी त्या त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची राहील व कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पर्यवेक्षणाची
जबाबदारी संबंधित प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण यांची राहील.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांची राहील असे शासनाने आदेश दिले आहेत.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्यासाठी मंत्रालयीन पाठपुरावा केला.संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य महिला संघटक यांनी पंचशीला कुंभारकर
राज्य निरीक्षक दिलीप आदमाणे,राज्य खजिनदार शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे,राज्य व्यवस्थापक अम्पल खरात यांनी शासनाचे अभिनंदन करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

दहिगाव हायस्कूल दहिगावचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे), दहिगाव ता,माळशिरस येथील,प्रगत शिक्षण संस्थेच्या दहिगांव हायस्कूल दहिगांव येथे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तसेच संस्थापक कै.विठ्ठलराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९६८ते२०१५ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांसाठी प्रीतीभोजन स्नेह व मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. वंदनादेवी मोहिते म्हणाल्या की ,या मेळ्याव्याला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील्यात त्याबद्दल धन्यवाद,या संस्थेसाठीआपल्या मदतीचीगरज आहे,आपल्यात स्नेह,प्रेम निर्माणव्हावे,तसेच शाळेसाठी,पिण्याचे पाणी,ग्रथालय,प्रयोगशाळा,स्छच्छपाग्रह,सभोवताली कूंपण,प्रोजेक्ट रूम,ईमारत या भौतिक सूविधा अपूरा पडत आहेत माजी विद्यार्थानी तन,मन,धनाने मदत करूण आपले उत्तरदायित्व द्यावे,या सूविधा मिळ्याल्यास,मूलाच्या गूणवत्तेत सूधारणा,तसेच मूलांना चांगल्या सूविधा देणे शक्यहोणार आहे.
यावेळी सस्थेचे माजी अध्यक्ष कै.विठ्ठलराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील मूलींनी राष्ट्रगीत स्वागतगीताने माजी विद्यार्थाचे स्वागत केले तसेच कोविडमध्ये दुःखद निधन झालेल्या शिक्षक व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे,दहीगांवचे सरपंच रणधिर पाटील,अलका चिकणे,सतिश किर्दक,प्रमोद शिंदे,ज्ञानेश्वर फूले,बी.डी,पाटील,फूलन शिंदे,विठ्ठल मोरे,बी.टी.गायकवाड, दीक्षित सर,किर्दक सर,वनिता संभाजी फुले,योगेश चिकणे,सत्यशील पाटील,संभाजी फूले, मुलाणी सर अमरसिंह पाटील, समाधान पाटील, भाऊसाहेब भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या
कार्यक्रमास,सचिव वर्षाराणी पाटील ऍड वनिता पाटील,संदिप सावंत,दिनकर माने संचालक आशिष मोहिते ,प्रमोद शिंदे,महेश पाटील,हणमत चिकणे, हनुमंत फूले,अलका चिकणे,सपना गांधी, धनंजय खिलारे, विजयसिंह पाटील भंडारे मॅडम, पत्रकार पवार सर,विजय गोसावी मुख्याध्यापक मुकुंद मोरे तसेच सर्व माजी शिक्षक,माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या सख्येने उपस्थित होते,सूञसंचालन औदूबर बूधावले,सय्यद यांनी केले व आभार मूख्याध्यापक मूकूंद मोरै यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.अनेक दिवसातून भेटलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी एकमेकांची विचारपूस केली व बरेच दिवसातून मित्रांना भेटायला मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शिक्षक तसेच आपल्या मित्रांसोबत सेल्फी फोटो चा ही आनंद घेतला. संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थी व मान्यवरांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

याप्रसंगी हायस्कूल साठी,शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे व परीवाराकडूण,१ लाख५१ हजार रू,१९९४ च्या माजी विद्याकडून १ लाख रू,१९९५ च्या माजी विद्यार्थाकडून५१ हजाररू. धनाजी ढगे या माजी विद्यार्थ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्कृष्ट माथाडी कामगार पुरस्कार मिळालेले 51 हजार रुपये शाळेसाठी त्याने दिले,तसेच दहीगांवचे सरपंच रणधीर यांनी१ लाख रू सी.सी.टि.व्ही बसवून शाळेसाठीदेण्याचे जाहीर केले शंकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी उदयसिंह पाटील यांनी एक महिन्याचा पगार संस्थेला देण्याचे जाहीर केले.

वाहतुक कौडीमुळे पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची राजकुमार हिवरकर पाटील यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रतिनिधी ) बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत याच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख

राजकुमार हिवरकर – पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ . तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची मागणी केली.

सोलापूर जिल्हा सरहद ते खुडूस असे पालखी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . त्यातच साखर कारखाने सुरु झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे . यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून , सदरचे जे . एम . म्हात्रे कंपनीचे काम ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत बंद करावे. माळशिरस तालुक्यात पाच व आजू बाजूच्या तालुका मध्ये दहा साखर कारखाने आहेत . वरील कारखान्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे . तसेच सदाशिवनगर येथील श्री. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना चालू झाला आहे . त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे . मुंबई , पुणे या ठिकाणावरून पंढरपूर कडे येणारे भाविक तसेच माळशिरस कोर्ट , तहसिल ऑफिस , पंचायत समिती , अकलूज मधील दवाखाने या ठिकाणी सतत जावे यावे लागते . बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर व रेडीयम दिसत नाही . त्यामुळे साखर कारखाने बंद होई पर्यंत जे . एम . म्हात्रे आणि कंपनीची अवजड वाहतूक बंद करावी व काम थांबवावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन केली आहे .

दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी

दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-

मुख्याध्यापक मुकुंद मोरे चव्हाण सर फुले सर पाटील सर माने सर निर्मळ सर सर्व शिक्षक वर्ग हे स्वतः माजी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना निमंत्रण देत आहेत

प्रगत शिक्षण संस्थेचे
दहिगाव हायस्कूल दहिगाव यांच्यावतीने 20 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता 1968 ते 2022 या कालावधी मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात सुवर्ण महोत्सवानिमित्त तब्बल ५४ वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटणार आहेत.याची उत्सुकता सर्व माजी विद्यार्थ्यांना लागली आहे.दहिगाव हायस्कूल दहिगाव ने अनेक गुणवंत विद्यार्थी समाजाला दिले आहे. या हायस्कूल मधून अनेक उच्चपदस्थ अधिकारी मोठे व्यावसायिक विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी घडवलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना 54 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे काम संस्थेने केले आहे. असे म्हणतात की “ऋणानुबंधाच्या जिथे पडल्या गाठी… भेटीत दृष्टांता मोठी!”विविध ठिकाणी व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. संस्थेच्या वतीने माजी शिक्षक यांचा सन्मान व सर्वांना प्रीती भोजनाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक व कमिटीच्या वतीने निमंत्रित करण्यात आला आहे.

संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे……वैभव गिते

संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे……वैभव गिते

संविधान दिनाची अंमलबजावणी न करणारा देशद्रोहीच…..पंचशीला कुंभारकर

             
                                      नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची  भेट घेऊन निवेदन दिले आहे.निवेदनात 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिवस  म्हणून साजरा करावा आणि जो अधिकारी कर्मचारी प्राचार्य,मुख्याध्यापक टाळाटाळ करील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2008 च्या शासननिर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी.याकरिता राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये जिल्हा परिषद पंचायत समित्या,नगरपालिका,महानगर पालिका,ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस पुढीलप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व शासकीय निमशासकीय विभागांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे.
संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांमार्फत त्या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी.व त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मूलभूत हक्क,कर्तव्य,व जबाबदाऱ्या, इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळक रित्या दिसतील असे बॅनर, पोस्टर वापरावेत.
याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध/भित्तीपत्रके/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.शासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने,कार्यक्रम आयोजित करावेत.संपूर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल व्हिडिओ शूटिंग,फोटो,5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठवावा.
ज्याप्रमाणे केंद्रसरकार व राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे हर घर संविधान असे अभियान प्रत्येक घरोघरी राबविण्यात यावे.अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयीन प्रमुख,महाविद्यालयांचे प्राचार्य,शाळांचे मुख्याध्यापक,26 नोव्हेंबर दिनी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून संविधान दिन साजरा करीत नाहीत.शासनाच्या आदेशानुसार संविधान दिन साजरा करीत नाहीत अशा कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी.सर्व विभागांचा वस्तुनिष्ठ अहवाल संविधान दिन साजरा केल्याचा व्हिडीओ चित्रीकरण करावे म्हणून आदेश देण्यात यावेत.ज्या शाळा संविधान यात्रा प्रभात फेरी काढणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करावी.शासकीय अधिकाऱ्यांनी कसुरी केल्यास देशद्रोही समजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे.यामध्ये कसुरी केल्यास संघटनेच्या माध्यमातून जे कार्यालयीन प्रमुख संविधान दिन साजरा करणार नाहीत अशांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल तसेच आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी.असा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य सचिव मा.वैभव गिते यांनी दिला आहे.हे निवेदन सामान्य प्रशासनाच्या प्रधान सचिवांना,शासनाच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहे.निवेदनावर राज्य संघटक पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कांबळे,राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांच्या सह्या आहेत.

You may have missed