जिल्हा

अकलूज( राऊत नगर )येथील रिक्षाचालक “प्रकाश बनकर” याचा प्रामाणिकपणा

अकलूज( राऊत नगर )येथील रिक्षाचालक “प्रकाश बनकर” याचा प्रामाणिकपणा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
अकलूज( राऊत नगर )येथील रिक्षा चालक प्रकाश हरिभाऊ बनकर यांच्या प्रामाणिकपणामुळे एका रुग्णाच्या नातेवाईकांना त्याचे रिक्षात विसरलेले ए.टी.एम.कार्ड. रोख रक्कम 5000 रु.मनी मंगळसूत्र रुग्णांची हाॕस्पिटल ची फाईल व इतर साहित्य प्रामाणिकपणे परत केल्याने त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की अकलूज येथील अकलूज क्रिटी केअर ट्रॉमा सेंटर येथून दुपारी 4 वाजता एका रुग्णाला घेऊन हा रिक्षा चालक पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे गेला त्या रुग्णासोबत त्याचे नातेवाईक हर्षदा कांबळे उदय नगर या होत्या परंतु त्या रुग्णाला लाईफ लाईन हॉस्पिटल पंढरपूर येथे ऍडमिट करून न घेतल्याने त्या रिक्षाचालकाने त्या रुग्णाला नातेवाईक यांना परत अकलूज (शंकर नगर) येथील नातेवाईकाच्या घरी रात्री 9 वाजता सोडले त्यानंतर रिक्षा चालक घरी आल्यानंतर पाहिले की आपल्या रिक्षात रुग्णाच्या नातेवाईकाचे साहित्य विसरले असून त्यामध्ये बँक ए.टी.एम. रुग्णाची हॉस्पिटल फाईल. आधार कार्ड. रोख रक्कम 5000 रुपये आणि मंगळसूत्र होते. रिक्षा चालकाने तातडीने 9/30 वाजता त्या रुग्णाच्या नातेवाईकाला कॉल करून तुमचे साहित्य रिक्षामध्ये विसरले असल्याचे सांगितले त्यानंतर रिक्षाचालकाने विलास गायकवाड, आजिनाथ जाधव, हर्षदा कांबळे यांचे नातेवाईक दशरथ नवगिरे, यांच्या समक्ष त्यांचे रोख रक्कम5000/- मनी मंगळसूत्र , फाईल एटीएम कार्ड नातेवाईक दशरथ नवगिरे यांच्या स्वाधीन केले रिक्षा चालक प्रकाश बनकर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

वेळापूर व पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण अकलूज रुग्णालयाचा दर्जा देण्याची आ. राम सातपुते यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी अकलूज

वेळापूर व पिलीव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण अकलूज रुग्णालयाचा दर्जा देण्याची आ. राम सातपुते यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचेकडे मागणी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मौजे वेळापूर व मौजे पिलीव ता माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा. अशी मागणी माळशिरसचे आमदार राम सातपुते, यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे लेखी स्वरूपात पत्राद्वारे केली होती , त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत .
आ राम सातपुते यांच्या माळशिरस मतदारसंघात मौजे वेळापूर व मौजे पिलीव हे दोन्ही येत असून तसेच राष्ट्रीय महामार्ग देखील या गावातून जात आहे.
या दोन्ही गावांची लोकसंख्या देखील एक लाख आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने मतदारसंघातील नागरिकांना सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार राम सातपुते यांनी मौजे वेळापूर व मौजे पिलीव या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी मागणी १५ सप्टेंबर रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली होती.त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

काेल्हापुरचे सहाय्यक आयुक्त यांच्या आँफिस बाहेरील माहिती फलक बनला मानुसकीचे प्रतीक

कोल्हापूर प्रतिनिधी
काेल्हापुर म्हटल की आठवण हाेते ती काेल्हापुरची तालीम व छत्रपती राजर्शी शाहू त्यांच्या कारकिर्दित जनहितासाठी केलेल्या अफाट कार्यांची तसेच सर्व धर्म समभाव मनात ठेउन जनहिताचा घेतलेला वसा हा सदैव प्रत्यय देत असताे.असाच प्रत्यय काेल्हापुरातील सहाय्यक आयुक्त यांच्या आँफीस बाहेरील माहिती फलकावरील बातमीने प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना नक्कीच विचार करण्यास भाग पाडले असेल.सहाय्यक आयुक्तांच्या या माहिती फलकाने गर्व अहंकार मी पणा यांच्यावर मात देत झोपलेल्या माणुसकीला जागे करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाआहे.साधी ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाला भेटायचं म्हटलं तरी वेळ मागवा लागतो.पण आयुक्तांच्या या जनहितासाठी दाखवलेल्या प्रेमाने माणुसकीचा प्रत्यय आणून दाखवलेला दिसताे.प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यातून बरच काही शिकण्यासारखं आहे.मिळालेल्या पदाचा पुरेपूर वापर जनहितासाठी कसा राबवता येईल याचे प्रत्येय दिसून येत आहे.नक्कीच याचा बदलाव इतर जिल्ह्यातील तीलतहसील कचेऱ्यापासून प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल अशी आशा बाळगू.

एन डी एम जे च्या वतीने भारतीय दूतावास जयपाल देठे (IFS) व नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

एन डी एम जे च्या वतीने भारतीय दूतावास जयपाल देठे (IFS) व नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेदूतावास ओमन देशाचे दुतीय सचिव इंडियन फॉरेन सर्व्हिस(IFS) तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर विशाल लोंढे यांच्यासह नूतन प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नातेपुते येथे एन डी एम जे संघटनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.
सुट्टी निमित्त ओमान येथून मायदेशी भारतात आलेल्या नातेपुते माळशिरस तालुक्यातील पहिले आय एफ एस भारतीय दूतावास ओमान देशाचे द्वितीय सचिव जयपाल देठे साहेब यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन एन डी एम जे राज्य सचिव वैभव गीते यांच्यावतीने करण्यात आले होते. तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे कोल्हापुर जिल्ह्यातील जातीय अत्याचारात खून झालेल्या सर्व खून प्रकरणात 5000 रुपये पेंशन मंजूर केल्याने केल्याबद्दल व नूतन प्रशासकीय सेवेत विराजमान झालेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव,सिद्धार्थ गायकवाड, वस्तू विक्री कर निरीक्षक शरद आढाव विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत,कृषी अधिकारी कोमल झेंडे,सहाय्यक अभियंता ऐश्वर्या भोसले,भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू किरण नवगिरे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख बनसोडे,बी ए एम एस डॉ. किरण चंदिशि, नातेपुते येथील वडार समाजातील पहिले एलएलबी वकील ऍड विजय काळे,तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय दूतावास ओमान देशाचे द्वितीय सचिव मा.जयपाल देठे, एन.डी. एम.जे राज्य महासचिव ऍड डॉ.केवलजी ऊके,Adv. बी.जी.बनसोडे, विकास दादा धाईंजे,वैभव गीते उद्योजक विनोदजी जाधव,दलित पॅथर चे नेते सु.ग.साबळे यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांना पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने छत्रपती शाहू महाराज आदर्श अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवर व अधिकाऱ्यांच्या वतीने आतापर्यंत 64 कुटुंबाचे पुनर्वसन केल्याबद्दल वैभव गीते यांचा सहकुटुंब विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक विजय सरतापे यांच्या भीम गीतांनी करण्यात आली व कार्यक्रमाचे सांगता सुप्रसिद्ध विद्रोही कवी नितीन चंदनशिवे यांच्या कविताने करण्यात आले.या कार्यक्रमास एन.डी.एम जे चे शिवराम कांबळे,पंचशीलाताई कुंभारकर,बंदिश सोनवणे,शशी खंडागळे,विशाल साळवे,प्रमोद शिंदे रोहित एक मल्ली पंकजकाटे,यताळ खरबडे संघर्ष सोरटे संजय झेंडे बाबासाहेब सोनवणे सुनील भोसले नाना गायकवाड गणेश गायकवाड सचिन झेंडे मुंबई पुणे पंढरपूर सोलापूर बारामती इंदापूर फलटण नातेपुते व पंचक्रोशीतून कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिरळे येथील माजी पोलीस शिंदे साहेब यांनी गरिबांची दिवाळी केली गोड

पिरळे येथील माजी पोलीस शिंदे साहेब यांनी गरिबांची दिवाळी केली गोड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-नातेपुते प्रतिनिधी पिरळे येथील माझी सरपंच, माझी मुंबई पोलीस शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्ते सुनील माने यांनी पिरळे येथील गरीब कुटुंबांना दिवाळीसाठी डाळ तेल,साबण साखर अशा सर्व वस्तूचे जवळपास 100 कुटुंबांना किट दिवाळीसाठी प्रत्येकाच्या घरी जाऊन दिले व त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. सतत गावामध्ये त्यांच्याकडून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे किटचे वाटप करताना ज्ञानादेव शिंदे साहेब,वस्ताद सुनील माने,पप्पू बुधावले,सुदाम बुधावले,आकाश खिलारे व कार्यकर्ते उपस्थित होते.

नातेपुते परिक्षेत्रात मका शेतीशाळा क्षेत्र दिन संपन्न !!

मका शेतीशाळा क्षेत्र दिन संपन्न !!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

यश लाईफस्टाईल मधील दिवाळी धमाका ऑफर T.Vविजेते

महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी नातेपुते कार्यक्षेत्रातील मौजे एकाशीव तांबेवाडी येथे किड व रोग सव्हेक्षण सल्ला मार्गदर्शन प्रकल्पाअंतर्गत या पंचक्रोशीतील ३० कमी जास्त लाभार्थीना वर्ग क.१ शेतकरी निवड मका पिक माहिती ‘ २ – बियाणे वाण निवड ३ – मका बीज प्रक्रिया ४ – एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन व पाणी ५ – एकात्मिक कीड व रोग निमंत्रण व तन नियंत्रण६ – सुक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन व काढणी या विषयावरील माहिती मार्गदशन करण्यात आले . शेतीशाळेचा सांगता व शेवटचा वर्ग क्र ८ ला क्षेत्र दिन कार्यक्रमांचे आयोजन १८ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी मंदीर तांबेवाडी येथे कृषि विज्ञान केंद्र मोहोळ विषय तज्ञ सौ काजल जाधव – माहत्रे यांच्या मका व मुल्यवर्धन .श्री सतिश कचरे मंडळ कृषि अधिकारी नातेपुते तथा प्र तालुका कृषि अधिकारी माळशिरस यांनी रब्बी हंगाम गव्हू ‘ हरभरा ‘मका ‘ऊस जैविक बीज प्रक्रियाचे महत्व विषद केले व श्री दत्तात्राय पांढरमिसे यांनी पीएम – किसान मानधन केवाशी व पीएम किसान किसान क्रेडीट कार्ड बाबत माहिती दिली व २२ मानधन शेतकरी यांचे फॉर्म भरून घेतले . मका व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग संधी व वाव बाबत श्री गोरख पांढरे कृषि पर्यवेक्षक यांनी माहिती दिली. या कार्यक्रमांत कृषि विज्ञान केंद्र मोहोळ अर्थसहायीत पी.एस.बी वी अँझटोबैक्टर यांची ज्वारी बियाणे बीज प्रक्रिया सौ काजल जाधव – महात्रे यांनी प्रत्यक्ष बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले व ज्वारी च्या १५ लाभार्थीना ४किलो अँझटोबॅक्टर व पी.एस.बी मोफत प्रात्यक्षीकसाठी वाटप करण्यात आले . तांबेवाडी उपसरपंच श्री तुषार भोईटे यांनी शेतीशाळा वर्गाचा मागोवा घेऊन यामुळे शेतकरी वर्गाला फायदा झाले चे प्रकर्षाने नमुद केले व ३० प्रशिक्षणार्थी गावातील इतर शेतकरी बांधवांना मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार करणेबाबत हमी दिली व उपस्थिताचे आभार माणले . या कार्यकमांस एकाशिव सोसायटी चेअरमन श्री संजय रुपनवर व श्री राजेन्द्र तांबे महालक्ष्मी शेतकरी गट अध्यक्षही उपस्थित घेते तसेच श्री एन एस गोरे व श्री. व्ही डी दूधाळ उपस्थितीत राहून कार्यकम नियोजन व आयोजनास मदत केली . कार्यक्रमांचे सुत्रसंचालन श्री आर डी नाळे कृषी सहायक यांनी केले व चहापान ने सांगता झाली .

पिरळे जि.प.शाळेत तळीरामांचा हैधुस पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील शाळेच्या वरंड्यामध्ये व परिसरात तळीरामांनी पुन्हा हैधुस घालण्यास सुरुवात केली आहे. जि प शाळा ही तालुक्यामध्ये नावाजलेली शाळा असून शाळेची पटसंख्या सुमारे अडीचशे आहे. शिक्षक वर्ग आठ पेक्षाा जास्त आहेत.गुणवत्ता ही चांगली आहे. परंतु या शाळेच्या आवारामध्ये रोज संध्याकाळी परिसरातील तळीराम दारूच्या बाटल्या घेेऊन तळ ठोकतात व दारू पिऊन झाल्यानंतर त्याच ठिकाणी रिकाम्या बाटल्याा, ग्लास,फुगे,प्लास्टिक च्या पिशव्या चकण्यासाठी आणलेली साहित्य त्याच ठिकाणी टाकून जातात.शाळेच्या आवारात शौचास लघवीसाठी बसतात.
सकाळी शाळाा भरल्यानंतर विद्यार्थीथी शाळेच्या वरंड्यााात व परिसरात आल्यानंतर त्यांना हे दृश्य दिसते व काही नाबालक विद्यार्थी त्या वस्तूंना हात लावतात खाली पडलेला चकना शेंगदाणे वगैरे खाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. अनेकदा पोलिसांनी कारवाई करून सुद्धा हेे तळीराम या ठिकाणी येतात या तळीरामांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी मुख्याध्यापक तसेच शालेय शिक्षण समिती यांनी केली आहे.

या अगोदर नातेपुतेेे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ए पी आय मनोज सोनवलकर यांनी दारू विक्रेते व तळीराम यांना गावामध्ये दारू नविकण्याच्या सूचना दिल्या होत्य तरीसुद्धा त्या सूचनांचे पालन नकरता येथील दारू विक्रेते राजरोसपणे दारू विक्री करतात.अनेकदा ग्रामपंचायतीकडून सुद्धा दारूबंदी संदर्भात ठराव व तरुणांकडून निवेदन देण्यात आले आहेत. दारुमुळ येथील तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. काही लोकांना दारुमुळे प्राण ही गमवावे लागले आहेत.या गंभीर बावीकडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य संघटक पदी हनुमंतराव साळुंखे यांची निवड


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य संघटक पदी हनुमंत साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रस चे जिल्हा अध्यक्ष श्री बळीराम काका साठे यांच्या अध्यक्ष ते तेखली निवड करण्यात आली. हनुमंत साळुंखे यांचं राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम असून त्यांचा मोठ्या प्रमाणात जन संपर्क आहे. निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हनुमंत साळुंखे उद्धव सावंत. पोपट साळुंखे,अमित साळुंखे,स्वप्नील साळुंखे,नारायण साळुंखे, तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य संघटक पदी हनुमंतराव साळुंखे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे

कल्याण येथे बहुजन उद्देशीय संस्थेच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था च्या माध्यमातून
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्य सम्राट.अ

ण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात झाली संपन्न व् ॲड.डॉ.केवलजी उके साहेबांचा करण्यात आला सत्का

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (कल्याण संदेश भालेराव)- बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था या संस्थे च्या वतीने नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस्ट ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे उपस्थितीत तसेच सत्कार मुर्ती आदरणीय नॅशनल दलिंत मुव्हमेंट फॉर जस्टिस राज्य महासचिव अ‍ॅड.डाॅ.केवजी उके सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहिर अण्णाभाऊ साठेचीं जयंती साजरी करत असताना सर्व प्रथम आदरणीय डॉ.केवलजी उके यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मुर्ती समोर मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली व ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयजी कांबळे साहेब यांच्या हस्ते व संस्थेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यालय प्रमुख नथुराम गंगाराम मोहिते व बौध्दचार्य आनंदजी निरभवणे याच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अण्णाभाऊ साठे चीं जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली व जयंतीचे औचित्य साधून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेबांची महाराष्ट्र शासन महीला बालविकास विभाग राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल बहुजन बहुउदेशीय सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद व पदाधिकारी याच्या उपस्थितीत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद श्यामसुंदर रोकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला* कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
संस्थेचे उपाध्यक्ष आयु संदिप मधुकर घुसळे यांनी उत्तम प्रकारे केले यावेळेस उपस्थित
संस्थेतील पदाधिकारी
,, मा.सुनिल ठेगें ,संदेश भालेराव, राजेंद्र सावंत , तसेच सन्माननीय सदस्य ,विक्रम जाधव,अविनाश बावस्कर, श्रीधर शिंदे , राजेंद्र सोनावणे
,कार्यालिन कर्मचारी विजय निकाळे व स्थानिक कार्यकर्ते ईतर मान्यवरांसह कार्यक्रम संपन्न झाला.

बकरी ईद साधेपणाने साजरी करा, पोलीस प्रशासनाची मुस्लिम बांधवांना विनंती*

  • बकरी ईद साधेपणाने साजरी करा, पोलीस प्रशासनाची  मुस्लिम बांधवांना विनंती*
    पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (प्रमोद शिंदे)बकरी ईद साधेपणाने सासरी करण्याचे पोलीस प्रशासनाकडून नातेपुते येथील मुस्लिम बांधवांना विनंती करण्यात आली.आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस प्रशासकीय उपविभागीय अधिकारीसो नीरज राजगुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत व नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय मनोज सोलनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार (दि.१६ जुलै) रोजी सायंकाळी सहा वाजता दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.अकलूज विभागीय अधिकारी मिरज राजगुरू साहेब बैठकीत बोलताना म्हणाले की कोरोना संकट अद्याप टळलेले नसून मुस्लिम बांधवांनी साधेपणाने बकरी ईद साजरी करावी कोरोना विषाणूमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे.त्यानुसार नागरिकांनी बकरी ईद नमाज घरीच अदा करावी,बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये.बकरे जुबा करू नये किंवा एकत्र जमू नये,असेही सूचित करण्यात आले.यावेळी दक्षता बैठकीस चेअरमन हाजीअक्रम बागवान,आमीन काझी,रमजान बागवान,लतीफ बागवान, बशीर काझी,सिकंदर मुलाणी ,नौशादआतार,आयुब काझी,मोहम्मद मुलाणी, शाहिदभाई मुलाणी,हमीद मुलाणी,वाजिद बागवान,निसार झारी,रियाजआतार,राजू शेख मुजम्मिन बागवान,समीरआतार व नातेपुते परिसरातील इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते.तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे  एपीआय मनोज सोलनकर साहेब यांनीआभार व्यक्त केले.या बैठकीचे पोलीस नाईक गणेश कापसे यांनी केले.

You may have missed