Blog

पतीने केला पत्नीचा खून एक मुलगा, दोन मुली पोरकी

सोलापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निघुण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पो लीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. यशोदा सुहास सिद्धगणेश (वय३५ वर्षे) ही महिला आज (१४ ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी यशोदा सिद्धगणेश या महिलेला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली, त्यानंतर यशोदा यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी करून आक्रोश केला. या महिलेची हत्या तिच्या पती-ने केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सोन्याच्या किंमतीने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले, १० ग्रॅम सोन्याचा दर

मुंबई : अमेरिका चीनमधील व्यापार तणाव,जागतिक अनिश्चिततेमुळे सोमवारी भारतातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींत रेकॉर्ड ब्रेक वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. सोन्यासह चांदीचे ही भाव ग्राहकांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत इंडियन बुलियन असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव ( १४ ऑक्टोबर) १ लाख २६ हजार ५९० रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला जात आहे. तर किलोमागे चांदीचा दर एक लाख ६१ हजार ६७० रुपयांवर पोहोचला आहे .दरम्यान, २४ तासांपूर्वी (१३ ऑक्टोबर) सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ५२० रुपये होता आज तो १ लाख २६ हजार ५९० झाला आहे. म्हणजेच २४ तासात सोन्याच्या भावात झालेली वाढ ही २०७० आहे

बस पेटताच प्रवाशांचा आक्रोश, १० ते १२ जण होरपळून दगावल्याची भीती

राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी मोठा अप घात झाला आहे. जैसलपूरहून जोधप रला निघालेल्या बसला अचानक आग लागली. त्यात तीन मुलं आणि चार महिलांसह १० ते १२ जण गंभीररित्या भाजले, त्यांच्या मृत्यूची भीती वर्तवली जात आहे. दुपप्ती साडे तीनच्या सुमारास चैवत गावाच्या जवळ हा अपघात झाला. दुष्टनास्थळ जैसलमेरपासून २० किलोम पेटर दूरवर आहे. बसला अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास बस जैसलमेरहून ५७ प्रवाशांना घेऊन निघाली होती. चैवत गाव सोडल्यावर बसच्या मागील भागा तून धूर निघू लागला. यानंतर अवध्या काही मिनिटांत संपूर्ण बसनं पेट घेतला. प्रवाशांनी आक्रोश सुरु केला. अनेक जण दरवाजे, खिडस्या फोडून कसेबसे बाहेर पडले.ग्रामस्थ आणि वाटसस्नी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केलं. त्यांनी आसपासच्या भागातून पाणी आणि रेती आगूर आग विझवण्याचा प्रयत्न केला. दुर्घटनेची माहिती मिळताच अधिशमन दल आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी पोह चितं. जवळपास तासभरात त्यांनी आग नियंत्रणात आणली.दलाचे पथक दुर्घटनेची माहिती मिळताच अधिशमन पथक १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्याची माहिती नगर परिषदेचे सहाय्यक अधिशमन अधिकारी पृथ्वीपाल सिंह राठोड यांनी दिली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा कस पूर्णपणे जळून खाक झाली होती. ज्याला आम्ही जिवंत बाहेर काढू, अशी एकही व्यक्ती त्यावेळी आम्हाला दिसली नाही. त्यावेळी अंदाजे १० ते १२ जण बसमध्येच होते, असं राठोड यांनी सांगितलं.दुर्घटनेत उखमी झालेल्या स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनंतीन रुग्णवाहिकांच्या मदतीन जैसलमरम चील जवाहर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथमोपचारानंतर जोधपूरला हलवण्यात आले, जवळच असलेल्या लष्करी तळावरील जवानांनीदेखील आद विझवण्यास मदत केलीआग लागण्यामागचं नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम झाल्यानं आग लागली असावी, असा प्राथमिक तपासानंतरचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचे आज १५ ऑक्टोबर रोजी आंदोलन

कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व उपदान मिळावे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

मुंबई : निवृत्तिवेतन, उपदान (ग्रॅच्युईटी), प्रोत्साहन भत्ता, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’चे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तिवेतन व उपदान मिळावे यासाठी १५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपदान (ग्रॅच्यूईटी)देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर उपासम दरमहा ारीची वेळ आली आहे. सरकारच्या या उदासिनतेमुळे अंगणवाडी कर्मचारी हतबल झाल्या आहेत. अंगणवाडीकर्मचाऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये व मतदनीसांना दरमहा एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासनाने आदेश दिले आहेत. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर पवर आपल्या कामाची नोंद करणे बंधनकारकराज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बृजपाल सिंह, कॉ. शुभा शमीम, कॉ. दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, कॉ. जीवन सुरुडे, जयश्री पाटील, कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली १५ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे.केले आहे. राज्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांपैकी ८० टक्क्‌यापेक्षा जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर पवर काम करूनसुध्दा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही.

पीएफमधून १०० टक्के पैसे काढण्यास मान्यता

दिवाळीपूर्वी सरकारने देशातील कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च संस्था असलेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने सोमवारी भविष्य निर्वाह निधी अंशतः काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांसाठी अंशतः पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि उदार झाली असून, सदस्य आता त्यांच्या पात्र शिल्लक रकमेपैकी १००% पर्यंत पैसे काढू शकतील. केंद्रीय कामगार मंत्रीपीएफमधून १०० टक्के पैसे…मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे झालेल्या २३८व्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कामगार मंत्रालयाने सांगितले की, ‘सदस्यांचे जीवनमान अधिक सोपे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.’

एकत्र लढण्याबाबत आठवडाभरात मविआचा निर्णय, पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात.

पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात; ५० टक्के तिकिटे राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या युवकांना मुंबई : स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. उद्या आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल आणि येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत धोरण ठरवले जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणान ५० टक्के तिकिटे दिली जातील असे सुतोवाच करताना, पक्षबांधणीसाठी भाकरीतरुणांना संधीशरद पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या पण पक्षासाठी परिश्रम घेणा-या युवकांना ५० टक्के तिकिटे दिली जावीत, अशा सूचना पदाधिका-यांना दिल्या. संग्राम जगताप यांच्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी पदाधिका-यांना, नेत्यांना जातीय सलोखा ठेवण्याच्या सूचना दिल्या. सरकारम धील काही नेते व मंत्रीच सध्या वादग्रस्त बोलत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.फिरवण्याचे संकेत शरद पवारांनी दिले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची एक बैठक मुंबईत झाली. बैठकीला पक्षाच्याकार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, डॉ. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी आणि पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करावी की नाही याबाबत स्थानिक खासदार, आमदार व पदाधिका-यांची मते जाणून घेण्यात आली. उद्या महाविकास आघाडीचे नेते मतदारयादीतील गोंधळाबाबत राज्य निवडणूक अधिका-यांची भेट घेणार आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे हे ही या शिष्टमंडळात असणार आहेत. त्या भेटीनंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्राथमिक चर्चा होईल व धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. एकत्र लढायचे की नाही, याबाबत निर्णय झाल्यानंतर जिल्हानिहाय, महापालिका निहाय बैठका घेण्याचे आज निश्चित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीतील पक्षांमध्ये मतविभागणी होऊ नाय यासाठी एकत्र लढण्याची आमची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. मनसेच्या आघाडीतील सहभागाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीने पूरग्रस्त शेतक-यांना केलेल्या मदतीवर शरद पवार यांनी टीका केली. अतिवृष्टीच्या संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे ती तटपुंजी आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. पूर्वी केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरघोस मदत देत असे

दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढसोन्यानेही गाठला उच्चांक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. मार्केटम ध्ये चांदी शिल्लक नसल्याचे दरवाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदार कमी झाल्याचा चांदीच्या दरात परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जीएसटीसह चांदीचे दर हे १ लाख ८५ हजार आहेत, सोन्याचे भावइंडस्ट्रियल झोनमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने देखील चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. सातत्याने चांदीचे भाव वाढ होत असल्याने आता चांदी घेताना देखील आठ दिवसाची मुदत घ्यावी लागत आहे. मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याचे देखील मत सोने तज्ञांनी व्यक्त केले आहे.(जीएसटीसह) १ लाख २८ हजार रुपयांवर आहेत.आठवड्याच्या शेवटी दिवाळीला सुरुवात होणार आहे. यापूर्वी सोन्यासह चांदीच्या दरात म ोठी वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. चांदीच्या दरात मागील आठ दिवसांमध्ये २५ हजार रुपयांची मोठी भाववाढ झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या बाजारामध्येसोन्यापाठोपाठ चांदीमध्ये ही मोठी भाव वाढ झाली असून बाजारात चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो १ लाख ८५,००० वर जाऊन पोहोचले आहे आठ दिवसांमध्ये चांदीत २५ हजार रुपयाची मोठी भाव वाढ झाली असून दिवसेंदिवस चांदी ही वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदर कुठेतरी कमी झाले असून गुंतवणूकदार हे सोन्या-चांदीकडे वळल्यामुळे सातत्याने भाववाढ होत आहे.

कफ सिरपमुळे मृत्य

दि. १३ ऑक्टोबर : लहान मुलांचा खोकला दूर व्हावा यासाठी दिल्या जाणाऱ्या कफ सिरप या औषधाबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. मध्यप्रदेशमध्ये तर हे औषध घेतल्याने अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षपिक्षा लहान मुलांना हे औषध देऊ नये, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, यवतम ाळमध्येही असाच काहीसा प्रकारसमोर आला आहे. येथे एका सहा वर्षाच्या मुलाला खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. सुरुवातीला त्याला बरे वाटत होते. नंतर मात्र अचानकपणे त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच त्याला देण्यात आलेल्या औषधांमुळे तर त्याचाम मृत्यू झालेला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित मेडिकल मधून औषधांचे नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवले आहेत.

मुक्तीभूमी, दीक्षाभूमी, चैत्यभूमी प्रेरणादायी मंत्री छगन भुजबळ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क येवला

दि. १३ मुक्तीभूमी, दी क्षाभूमी, चैत्यभूमी या प्रेरणाभूमी आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या मुक्ती भूमीतूनच धर्मांतराची घोषणा केली त्यामुळे या भूमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली आणि या घटनेला आज९० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत येवला येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ, बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी भुजबळ यांनी मुक्तीभूमी स्मारकाच्या विकासाची माहिती देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या तीन भूमी ज्यामध्ये प्रथम मुक्ती भूमी, द्वितीय दीक्षाभूमी आणि तृतीय चैत्यभूमी या पैकी येवला येथील मुक्ती भूमीचा विकास करण्याची संधी प्राप्त झाल्याचे समाधान व्यक्त करत असताना मुक्ती भूमी स्मारकाचे हस्तांतरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे ला केल्याचे प्रतिपादन केले. बार्टी कडे हस्तांतरित झालेल्या स्मारका मध्ये महामानवांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता या ठिकाणीनवीन पुस्तक स्टॉल आज पासून सुरू करत असल्याचे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले. महामानवास अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची स्मारक भूमीमध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बार्टी तसेच स्थानिक प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली होती. या वर्षी कार्यक्रमाच्या नियोजना करिता बार्टीचे येवला स्मारक, बार्टी मुख्यालय कर्मचारी व सुरक्षा रक्षक तसेच समतादूतांनी विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड व निबंधक इंदिरा अस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने उत्तम नियोजन केले होते. धर्मांतर दिन सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक श्री सुमेध थोरात, प्रकल्प अधिकारी रेखा बोर्डे, सचिन नांदेडकर यांच्यासह बार्टीतील कर्मचारी व समतादूत यांनी परिश्रम घेतले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर म तदारसंघ निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठक घेण्यात आली. यात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत म हायुती एकत्रित लढणार असल्याचे संकेत देण्यात आले. मात्र जेथे स्थानिक समीकरणांमुळे महायुती होणे शक्य होणार नाही, तेथे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांसमोर वर्तविण्यात आली.अत्रे ले आऊट परिसरातमहसूलमंत्री भाजपची बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांसोबतच चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.बैठकीच्या अगोदर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारम ाध्यमांशी संवाद साधला. बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीची काय भूमिका राहील याचाही विचार केला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला ५१ टक्के मतं मिळाली पाहिजे अशी तयारी आहे. प्रत्येक ठिकाणी महायुतीची तयारी ठेवा, असे सांगितले गेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या ३१ हजार कोटीच्या पॅकेजचा लाभ दिवाळीपूर्वी प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत काम करून शेतकऱ्यांपर्यंत लाभपोहोचविण्यात पुढाकार घेतले पाहिजेत, अशी सूचनादेखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांनी नेहमी दिशाभूल केली केली आहे. काँग्रेसने कधीच मराठा आणि ओबीसींना न्याय दिला नाही. उलट फक्त त्यांच्यात भांडणे लावली. जरांगेच्या आंदोलनात म राठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या असे वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र आता त्यांनी भूमिका बदलवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले. याबाबतचे जीआर फक्त चार जिल्ह्यांसाठी असताना तो संपूर्ण राज्यासाठी आहे असे खोटे चित्र दावा वडेट्टीवार निर्माण करत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.