Blog

शिवसेना पक्षचिन्हाचा फैसला लांबणीवर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे:

केंद्रीयनिवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, याप्रकरणी आज (०८ ऑक्टोवर) सर्वो च्च न्यायालयात अंतिम सुनावणी अपेक्षित होती. न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे आज सुनावणी होणार होती. शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू गांडणारे वकील असीग सरोदे यांनी याबाबत माहिती दिली होती. तसेच पक्षचिन्ह प्रकरणाचीसुनावणी आज पूर्ण होईल का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली होती. अशातच आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला पुढील १२ आणि १३ नोव्हेंबर तारीख मिळाली आहे.राज्यात होणा या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशीमागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती. परंतु, राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा असावी का? यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात सूर्यकांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, थेट टॅरिफबद्दलचा निर्णय बदलला, 1 नोव्हेंबरपासून 25 टक्के.

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कशावर टॅरिफ लावतील, याचा नेम राहिला नाही. अमेरिकेच्या टॅरिफविरोधात अनेक देश मैदानात उतरताना दिसत आहेत. ब्राझीलने अमेरिकेला थेट मोठा इशारा दिला.हेच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, आमचे आणि अमेरिकेचे आता कोणतेही संबंध राहिले नाहीत. भारत आणि ब्राझीलवर एकसोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावला. आता मध्यम आणि अवजड ट्रकवर तब्बल 25 ‘टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. हा टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. अगोदर हा टॅरिफ 1 ऑक्टोबरपासूनच लागू होणार होता. मात्र, तो आता 1 नोव्हेंबरपासून लागू होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयावर अधिकारी आणि पुरवठादारांनी चिंता व्यक्त केल्याने त्याची मुदत पुढे ढकलण्यात आली.डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली की, जड आणि मध्यम ट्रकवरील टॅरिफ 1 नोव्हेंबरपासून लागेल. अमेरिकन उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल आपण उचलत असल्याचे त्यांनी म्हटले. आता याचा थेट परिणाम हा अमेरिकेत आयात होणाऱ्या ट्रक उत्पादनावर होईल. अनेक देश अमेरिकेमध्ये ट्रक आणि त्याचे पार्ट निर्यात करतात. मात्र, त्यामुळे अमेरिकेत बनणाऱ्या ट्रकची मागणी घटल्याचा दावा त्यांनी केला.अमेरिकेतील व्यापाराला संधी देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकन उत्पादकांना परदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.ट्रम्प यांनी सुरुवातीला असे म्हटले होते की, राष्ट्रीय सुरक्षेमुळेच आपण 1 ऑक्टोबरपासून जड ट्रक आयातीवरील कर लागू करतोय. आता त्यांनी त्यांचे विधान पूर्णपणे बदलले आहे.किल्ल्या हा माझा सर्वात आवडतीचा शब्द असल्याचे काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. टॅरिफमुळे अगदी कमी काळात आपण श्रीमंत होऊ शकतो. अमेरिकेत यापूर्वी कधीही जितका पैसा आला नाही, त्यापेक्षा अधिक पैसा येत आहे. काही देश फक्त आपल्याकडून फायदा करून घ्यायचे आणि त्या बदल्यात आपल्याला काहीच देत नसत. अशांना हा मोठा धडा आहे.

फोंडशिरस येथे शरद बापू मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्य वतीने मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

कार्यक्रम घेण्यात आला.दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालया समोर, हनुमान मंदिर, फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी फोंडशिरस गावचे विद्यमान सरपंच श्री.पोपट बोराटे व ग्रामस्थ
यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 1000 (एक हजार) नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली. या कार्यक्रमास उपस्थिती : मा.श्री.शरद (बापु) मोरे,
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
मा.श्री.रमेश (आप्पा) मोरे
वैभव (भैय्या) मोरे, डॉ.लताताई मोरे, डॉ. मगर मॅडम, पोपट बोराटे (सरपंच), तेजस गोरे (सरचिटणीस), सुनील गोरे (व्हा. चेअरमन शिवप्रसाद वाहतूक संघटना),
मनोज गोरे, संजय कोडलकर, मच्छिंद्र वाघमोडे, माधव दाते, अक्षय कदम, दादा रणदिवे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

२ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती नाही

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
मुंबई : राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी कुणबी मराठाआरक्षणासंदर्भात लागू केलेल्या शासन निर्णयाविरुद्ध अनेक ना ओबीसी संघटना न्यायालयात दाद मागत आहेत. याप्रकरणी, हैदराबाद गॅझेटियर निर्णयाविरुद्ध दाखल याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी संपन्न झाली. या सुना-वणीत न्यायालयाने याचिकाकत्यांच्या मागणीनुसार, संबंधित जीआरला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाच्या न या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केले असून ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे.

हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या
मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून शास-नाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत कुणबी मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण देण्यात आले. मात्र, या निर्णयाला ओबीसी नेते आणि संघटना विरोध करत न्यायालयात गेले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने
२ सप्टेंबरच्या शासन निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार
दिल्याने याचा फटका आगामी निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला बसणार असून हा राज्यातील ओबीसी नेत्यांना मोठा धक्का आहे. त्यामुळे आता सरकारने तातडीने प्रतिज्ञापत्र सादर करावे अन्यथा निवडणुका लांबवाव्यात अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मांडली आहे. तर हा मनोज जरांगे पाटील यांचा विजय नसून अजून कुठलाही निकाल लागलेला नाही, असा दावाही हाके यांनी केला आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

 शेतकऱ्यांचे आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते. अशा स्थितीत पीक करपून गेले, पाण्याखाली गेले, जमीन खरडून गेल्याने पुन्हा पेरणीची स्थितीही उरली नाही.आर्थिक आणि मानसिक त्रास शेतकऱ्यांना झाला. त्याची शंभर टक्के भरपाई कुणीच देऊ शकत नाही परंतु शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे यासाठी पॅकेज तयार केले आहे. ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. २९ जिल्हे आणि २५३ तालुके सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले आहेत. जिथे पिकांचे नुकसान झाले तिथे अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींची मदत जाहीर केली आहे.देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जातील, ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना करणार आहेत. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाईल. खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींमध्ये गाळ गेलाय, नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत केली जाणार आहे असं त्यांनी सांगितले.तसेच ६१७५ कोटी रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत. बियाणे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना १८ हजार ५०० रुपये हेक्टरी, हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना २७ हजार प्रति हेक्टरी, बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० हेक्टर मदत दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे त्यांना १७ हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे. राज्य सरकारच्या वतीने ३१ हजार ६२८ कोटी रूपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे. जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने पिरळे येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती शाळा, सन 2025-26वर्ग क्रमांक 2 आयोजित करण्यात आला.

   

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00  वाजता मौजे पिरळे येथे (श्री. ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर यांच्या प्रक्षेत्रावर, पिरळे)* या ठिकाणी              *फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती शाळा, सन 2025-26* *वर्ग क्रमांक 2* आयोजित करण्यात आला.         कार्यक्रमाची प्रस्तावना पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी अमित गोरे यांनी केली,  शेतीशाळेचा उद्देश, मागील शेती शाळेचा आढावा, चालू च्या शेतीशाळेचे नियोजन सांगण्यात आले. शेती शाळेसाठी निवडलेले शेतकऱ्यांचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले व व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला .सहाय्यक कृषी अधिकारी श्री हनुमंत खरात यांनी कृषी विभागाच्या फळबाग लागवड व विविध योजनांची माहिती दिली.            सहाय्यक कृषी अधिकारी श्री लालासाहेब माने यांनी सी आर ए तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली व त्यामुळे होणारे फायदे सांगितले.         यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पांढरमिसे यांनी डाळिंब रोपवाटिकेतील रोपे निवड, घरच्या डाळिंबीवर गुटी निर्मिती तसेच निरोगी रोपे व तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोग व्यवस्थापन याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.               उप कृषी अधिकारी नातेपुते एक श्री गोरख पांढरे यांनी डाळिंब बागेतील रोग संस्कार, तेलकट डाग व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.              मंडल कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे यांनी पिन होल बोरर कीड व्यवस्थापन, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व शेत नोंदणी, डाळिंब जीआय मानांकन याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.          याच कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांकडून जी आय मानांकन अर्ज भरून घेण्यात आले.            यानंतर उत्कृष्ट डाळिंब उत्पादक शेतकरी श्री ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर यांनी प्रक्षेत्रामध्ये स्वतः करत असलेले नियोजन व त्यामुळे होणारे फायदे याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.              कार्यक्रमावेळी पिरळे गावचे डाळिंब उत्पादक शेतकरी, बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, नातेपुते अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे, उप कृषी अधिकारी श्री गोरख पांढरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पांढरमिसे, श्री ढोबळे, श्री विश्वनाथ दुधाळ, श्री हनुमंत खरात, श्री लालासाहेब माने, श्री कांतीलाल शेंडगे, श्री गणेश जाधव उपस्थित होते.        कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना चहा, नाष्टा देण्यात आला.          कार्यक्रमाचे आयोजन पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमित गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन डाळिंब उत्पादक शेतकरी श्री यशवंत प्रकाश रुपनवर यांनी केले.

सोने-चांदीचे दर विक्रमी पातळीवर, जाणून घ्या आजची किंमत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली देशात आणि परदेशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मागणी वाढत असतानाच भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर घोडदोड करीत आहेत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दागिन्यासाठी सोने खरेदी करणे अवघड झाले आहे.दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 2 हजार 700 रुपयांनी वाढून 1 लाख 23 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या दरात तब्बल 50 टक्के इतकी वाढ झाली आहे. दिल्ली सराफात चांदीचा दर सोमवारी 7,400 रुपयांनी वाढून 1लाख 57 हजार 400 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जानेवारी महिन्यापासून चांदीचा दर 75 टक्क्यांनी वाढला आहे.या दरवाढीबद्दल भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत होत असल्यामुळे जागतिक गुंतवणूकदार सोन्याचा दर जास्त असूनही सोन्याची खरेदी करीत आहेत. रिझर्व बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली असल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ होत आहे.अमेरिकेचे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतील बेरोजगारी आणि इतर आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार सध्याच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करीत असल्यामुळे हे दर वाढत आहेत.जागतिक बाजारात सोन्याचा दर सोमवारी दोन टक्क्यांनी वाढून 3,949 डॉलर या विक्रमी पातळीवर तर चांदीचा दर एक टक्क्यांने वाढून 48.75 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.जागतिक अनिश्चित परिस्थितीमुळे देशातील आणि परदेशातील वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर स्पॉट मार्केटमध्ये वाढीव पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या फक्त गुंतवणूकदारच सोन्याची खरेदी करीत असून दागिने खरेदी कमी झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा सडकी मनुवादी प्रवृत्ती असणाऱ्या वकिलाचा प्रयत्न देशभरातून संतप्त व्यक्त

.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – 

देशाच्या न्यायप्रणालीचा सर्वोच्च स्तर मानल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाजवळ एका वकिलाने अचानक येत बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ दक्षता घेत त्या वकिलाला अटक केली.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” असे म्हणत ही धक्कादायक कृती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सरन्यायाधीशांसारख्या उच्च पदावरील व्यक्तीवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून, अनेक सामाजिक संघटना आणि न्यायप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकारावरून न्यायव्यवस्थेतील जातीय मानसिकता आणि असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.एका अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशांवर न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न होणे, हे सामाजिक समतेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर असा हल्ला होऊ शकतो, तर सामान्य अनुसूचित जातीच्या नागरिकांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच नको.”देशात अजूनही काही ठिकाणी ब्राह्मणी मानसिकतेची खोलवर रुजलेली छाया असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली आर्थिक निकषावर चर्चा होत असताना अशा प्रकारच्या घटनांनी समाजात निर्माण झालेल्या विषमतेची पुन्हा आठवण करून दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गवई यांची फोन करून चौकशी केली.मोदी काय म्हणाले?पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडिया पोस्टमध्ये या संभाषणाची माहिती शेअर केली. ते म्हणाले की, हल्ल्याच्या प्रयत्नाला तोंड देताना न्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. CJI गवई यांनी केलेली वर्तणूक ही न्यायमूर्तींप्रती त्यांची वचनबद्धता आणि आपल्या संविधानाच्या भावनेला बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते पोलिसांकडून मिळालेल माहिती आशि की,
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण राहणार मोराची तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे फलटण = पंढरपूर रोड वरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH-06-CG-5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हांला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हांला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हांला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी पैसे खिशात ठेवले. व पुन्हा मी पैसे मोजत असताना ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने माझे हातातील 6200 रु हिसकावुन घेऊन पळून गेले वगैरेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 345/2025 भारतीय न्याय संहिता कलम 304 (2),3(5), अन्वये गुन्हा दाखल होता… सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री महादेव कदम नातेपुते पोलीस ठाणे हे करत होते…