Blog

नातेपुते पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नातेपुते पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते -प्रमोद शिंदे
नातेपुते पोलीस स्टेशन येथे 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नातेपुते पोलीस स्टेशन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महिलांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नातेपुते ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर नम्रता होरा,महिला बालकल्याण संरक्षण अध्यक्ष वावरे मॅडम तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते ग्रामपंचायत नूतन सरपंच कांचन लांडगे या होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एपी.आय मनोज सोनवलकर यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले की महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे महिला दिन हा एका दिवसापुरता साजरा न करता नेहमीच महिलांचा सन्मान झाला पाहिजे.महिला या शक्तीपीठ आहेत.
तसेच डॉक्टर नम्रता होरा यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली तर महिला बालकल्याण संरक्षण अध्यक्षा वावरे मॅडम यांनी महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा त्यामध्ये लैंगिक हिंसाचार व अनेक हिंसाचाराचे प्रकार सांगितले. सरपंच कांचन लांडगे म्हणाल्या की मुलींना लाडाने परी बनवू नका तर वाघीण बनवा असा संदेश त्यांनी दिला.महिला आर्थिक विकास महामंडळ शेंडगे साहेब यांनी सुद्धा महिलांना मार्गदर्शन केले.तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या वतीने संपादक प्रमोद शिंदे व प्रशांत खरात यांच्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या महिला कर्मचारी डॉक्टर नम्रता होरा, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली पवार, नेहा बोंदर,सामाजिक कार्यकर्त्या जयश्री अटक यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .या कार्यक्रमास रिपाईचे नेते एन के साळवे,दयानंद धाईंजे,पत्रकार लतीफ भाई नदाफ,अभिमन्यू आठवले,आनंद लोंढे,विलास भोसले,आनंद जाधव,भगत महाराज तसेच ग्रामपंचायत सदस्य महिला पोलीस पाटील, बचत गटातील महिला, महिला सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. हा कार्यक्रमात मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून सोशल डिस्टंसिंग मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सोरटे यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे आयोजक रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन.के साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल बबलू गाडे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

महिला दिनानिमित्त सीमाताई आठवले यांना पुरोगामी महाराष्ट्राचा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श पुरस्कार देऊन सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते-(प्रमोद शिंदे)-

रिपाईच्या महिला आघाडी राष्ट्रीय नेत्या सीमाताई रामदास आठवले यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तसेच जिजाऊ-सावित्री जयंती महोत्सव व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.महाराष्ट्रात तसेच देशामध्ये अन्याय अत्याचार झाल्यास अनेक पीडितांना आईच्या माये प्रमाणे प्रेम देऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत स्वतः सीमाताई आठवले ह्या प्रयत्न करून पीडितांना अनेक प्रकारे मदत करत असतात.लॉक डाऊन मध्ये सुद्धा स्वतःची पर्वा न करता अनेक भुकेलेल्या लोकांना स्वतःच्या घरी अन्नदान देण्याचे पुण्य काम केले आहे. अशा अनेक सामाजिक कार्याची दखल घेत पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संचालक एडवोकेट डॉक्‍टर केवल उके साहेब,संपादक प्रमोद शिंदे,कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांच्या वतीने माननीय सीमाताई आठवले यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.हा पुरस्कार बांद्रे मुंबई येथील रामदासजी आठवले साहेब यांच्या संविधान बंगला येथे, शिर्डी येथील पीडित सागर शेजवळ हत्याकांडातील फिर्यादी सीमाताई आठवले यांचे मानसपुत्र आकाश शेजवळ याच्या हस्ते देण्यात आला.यावेळी शिर्डी येथील .त्याप्रसंगी. मंदाताई ठोक,सीमाताई बोरुडे ( रिपाई नगर जिल्हा अध्यक्ष), वैशालीताई सोनवणे (कोपरगाव तालुका अध्यक्ष) कविता_गायकवाड (राहता तालुका अध्यक्ष), तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

दसुर गावच्या पोलीस पाटलावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वेळापूर

माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील दसुर येथील पोलीस पाटील अवैध वाळू धंदा करीत होता. आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पोलीस पाटलाला रंगेहाथ पकडून वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,
महेश अशोक शिंदे, वय 37, रा. दसुर (पोलीस पाटील ) हा वाळूचा अवैध धंदा करीत होता. दरम्यान याबाबत आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दसुर परीसरात या वरती कारवाई केली असून पोलीस पाटील शिंदे सह त्याचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे, रा. खळवे यांचेवर वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदर कारवाई मध्ये 12 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 2 लाख रुपयांची डम्पिंग ट्रॉली, 10 लाख रुपयांचा महिंद्रा ट्रॅक्टर तर 7 हजार रुपयांची वाळू सोबत 25 हजार रुपयांची मोटारसायकल (mh45b9719) असा मुद्देमाल आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षका तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, श पो उ नि खाजा मुजावर, पोहेकॉ नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे हे करीत आहेत सदर अशा प्रकारचा गुन्हा पोलीस पाटलांनी केल्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच पोलीस पाटलाला निलंबित करण्याची ग्रामस्थांकडून होत आहे.

जिद्दी आणि कष्टाळू भारत सोरटे युवकांपुढे ठरला आदर्श

कष्ट हेच भांडवल भारत सोरटे युवकांपुढे ज्वलंत उदाहरण

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

लहानपणापासूनच परिस्थितीची जाण असलेला नातेपुते येथील भारत सोरटे हा युवक जिद्द ,चिकाटी, कष्टाच्या जोरावर आज युवकांसमोर आदर्श ठरत आहे.भारत वसंत सोरटे याची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती वडील हे कुशल कुस्तीगीर वस्ताद होते वडील आजारी पडल्यानंतर आईवडिलांची अत्यंत प्रामाणिकपणे त्याने सेवा केली आहे.तसेच वाट्टेल ते मिळेल ते काम त्याने करून आपले बी.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कधीही कोणासमोर हात न पसरता प्रसंगी गवंड्याच्या हाताखाली तसेच मजुरीचे काम न लाजता त्याने केले.काम करत करत त्याला व्यायामाची अत्यंत आवड होती तो स्वतः निर्व्यसनी राहून व्यायाम करत बलदंड शरीर यष्टी त्याने  कमवली पिळदार शरीराच्या जोरावर त्याने कष्ट करून प्रपंच चालवला परिस्थिती नसताना मित्रांच्या सहकार्याने स्वतःचा शुद्ध पाण्याचा प्लांट उभा केला व संपूर्ण नातेपुते व परिसरात लोकांना थंडगार व शुद्ध पाणी पोहोचवण्याचं काम करीत आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो स्वतःचा प्रपंच चालवत असून त्यामध्ये तो खुश आहे. कितीही अडचणी आल्या तरी तो सतत हसतमुख असतो म्हणून तो आज युवकांपुढे एक आदर्श ठरत आहे.

सतत हसतमुख असणारा भारत सोरटे

भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मुरबाड येथे पोलिस स्टेशनला घेराव

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण:संदेश भालेराव
संविधान सन्मान मोर्चा
मुरबाड (दि. ५) :
भारतीय संविधानाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी सोमवारी आंबेडकरी समाजाने मुरबाड पोलीस स्टेशनला घेराव घातला असता यावेळी पोलिसांनी क्रॉस कंपलेंटची भूमिका घेतल्याने आज तालुक्यातील आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन संताप व्यक्त केला.
मुरबाड तालुक्यातील फणसोली येथील एका इसमाने फेसबुकवर संविधानापेक्षा मनुस्मृति श्रेष्ठ असल्याच्या आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. या गैरप्रकारामुळे संतापाची लाट उसळलेल्या तालुक्यातील आंबेडकरी जनतेने मुरबाड पोलीस ठाण्यात उपस्थित राहून संबंधित घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीला अटक ही करण्यात आली. मात्र यात फिर्यादींवर ही गुन्हे नोंद करण्यात आल्याने संतप्त आंबेडकरी जनतेने आज मुरबाड पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालयावर पायी ‘संविधान सन्मान मोर्चा’ काढून घोषणाबाजी करीत मुरबाड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेचा निषेध केला. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

मात्र आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही मोठ्या मोर्च्याचे आयोजन केले जाईल, असा इशारा अनेक आंबेडकरी नेत्यांनी आपल्या भाषणातून वैक्त केले

एन.आर. सी.कंपनी कामगार आंदोलनास बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनास पाठींबा


एन.आर. सी.कंपनी कामगार आंदोलनास बाळासाहेब आंबेडकर यांची भेट व वंचित बहुजन आघाडी चा आंदोलनास पाठींबा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेरावकल्याण तालुक्याचे राहणीमान उंचावणारे व कल्याणच्या विकासात मानाचा तुरा रोवणारी एन आर सी कंपनी वीस वर्षापूर्वी दिमाखात चालू होती या कंपनीमध्ये नायलॉन या नावाचा धागा बनत होता त्याची क्वालिटी एक नंबरची होती त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी ‌ असल्यामुळे एन आर सी कंपनी मोठ्या जोशात चालत होती. त्यामुळे इथल्या पंचक्रोशीतील दहा ते बारा हजार कामगार अतिशय गुण्यागोविंदाने आणि चांगल्या पद्धतीने आपले जीवन जगत होते पण त्यातच 2009 साली या कंपनीला ग्रहण लागून कंपनी अचानकपणे बंद पाडण्याचा निर्णय कंपनीचे संचालक गोयंका घेतला त्यामुळे कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली कामगारांना पी एफ,फंड व ग्रज्युएटी इत्यादी प्रकारचे देणी न देता एका अदाणी नामक भांडवलदारा जमीन खरेदी देवून जमीन विकण्यात आली. अदानी या भांडवलदारांने गेली सात तेआठ वर्ष झाली पण इथल्या कामगाराला एक रुपाया न देता कामगारांची पिळवणूक करु लागला म्हणून येथील कामगारांनी एकत्रित येऊन कंपनी विरुद्ध न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती.त्यावेळी न्यायालयाने कंपनीच्या सर्व कामगारांचे सर्व देणी दिल्याशिवाय विकत घेणा-या भांडवलदाला एक इंच सुद्धा जमीन ताब्यात घेता येणार नाही. कामगारांना न्याय मिळण्यासाठी
येथील संघटीत कामगारांनी वविविध पक्षातील राजकीय लोकांनी उपस्थिती दाखवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलना ठिकाणी भेट देऊन कंपनीतील कामगारांनी केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला. हे सरकार कामगारांचे शोषन करते आणि भांडवलदारांना पाठीशी घालते अशी टीका बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. गेली 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कॉम्रेड उदय चौधरी, भीमराव डोळस, वळसे पाटील साहेब व कार्यकर्ते आंदोलन सहभागी आहे याआंदोलनाला वंचित बहुजन आघाडी कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब भोईर, महासचिव विजय कांबळे, संघटक विनोद रोकडे, कल्याण शहरअध्यक्ष प्रवीण बोदडे, संदेश भालेराव, सुरेश पंडीत, सुनिता राजगुरू यांनी पाठिंबा दिला.

ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या नोडल ऑफिसर पदी डॉ.श्री सुरेंद्रकुमार बागडे यांची नियुक्ती

नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देताना राज्य सचिव वैभव गीते

नोडल ऑफिसर नियुक्ती करण्यासाठी राज्य महासचिव डॉक्टर एडवोकेट केवल उके व राज्य सचिव वैभव गिते यांनी पाठपुरावा केला.

लोकप्रिय नेते वैभव गिते यांच्या प्रामाणिक व खडतर पाठपुराव्याला घवघवीत यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेअनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर होणाऱ्या अत्याचारास आळा बसण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम 1989 (सुधारित अधिनियम 2015)पारीत केला असून त्याअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक)अधिनियम 2016)तयार करण्यात आले आहे.सदर नियमातील नियम क्रं.9 (1) नुसार या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामामध्ये समन्वय राखण्यासाठी राज्य स्तरावर समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्रमांक,युटीए,2016/प्र.क्र 310/सामासू दिनांक 27 सप्टेंबर 2017 नुसार श्री.शाम तागडे प्रधान सचिव अल्पसंख्याक विभाग,मंत्रालय,मुंबई यांची नेमणूक झाली होती.शयाम तागडे यांनी प्रत्येक तिमाहिस संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेत ऐतिहासिक व रचनात्मक काम करून दाखवले.सद्यस्थितीत मा.श्याम तागडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव असल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) यांची नियुक्ती करावी म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय नेते राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयीन स्तरावरील पाठपुरावा केला यामध्ये वैभव गिते यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यात बौद्ध,अनुसूचित जाती-जमाती (दलित आदिवासींच्या वरील) अन्याय अत्याचार वाढल्याने राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करून मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी म्हणून निवेदन देऊन चर्चा करून पाठपुरावा केला.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यांशीही चर्चा केली.एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या कार्यालयाच्यापुढे 25 जानेवारी 2021 रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले होते.अखेर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 1 मार्च 2021 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे एट्रोसिटी ऍक्ट च्या अंमलबजावणीसाठी (IAS) डॉ.श्री.सुरेंद्र बागडे महाव्यवस्थापक,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम, मुंबई यांची नियुक्ती केली आहे.त्यामुळे सुरेंद्रकुमार बागडे यांना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांचा प्रत्येक तिमाहिस आढावा घ्यावा लागणार आहे. नोडल ऑफिसर ची कार्ये 1) ॲट्रॉसिटी ॲक्ट चा नियमांअंतर्गत नियम 4 मधील उपनीयम (2)आणि (4),नियम 6 व नियम 8 मधील (xi) अंतर्गत राज्यशासनास प्राप्त होणारे अहवाल

2) ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांची सद्यस्थिती 3)अत्याचार प्रवण क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था बाबत स्थितीचा आढावा घेणे
4)अत्याचार पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य त्वरित देण्याबाबत उपाययोजना करणे 5)अत्याचारपीडित व्यक्ती किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना रेशन,कपडे,निवारा,कायदेविषयक सल्ला,प्रवास खर्च,दैनिक भत्ता,आणि वाहनांची व्यवस्था करणे 6)अशासकीय संस्था, संरक्षण कक्ष,विविध समित्या,व कायद्याअंतर्गत इतर तरतुदी अंमलात आणणारे सर्व अधिकारी यांच्या कार्याचा आढावा घेणे 7)सुधारित अधिनियमांच्या प्रकरण 4 अ मध्ये नमूद पीडित व साक्षीदारांच्या अधिकारांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे इत्यादी महत्वपूर्ण कर्तव्य नोडल ऑफिसर यांची आहेत.नोडल ऑफिसर यांची नियुक्ती केल्याबद्दल एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव डॉ. केवल उके व राज्य समन्वयक रमाताई आहिरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, यांचे आभार मानले आहेत.
ज्याप्रमाणे मंत्रालय स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी ॲट्रॉसिटी च्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करून तात्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

नातेपुते ग्रामपंचायत सरपंच पदी कांचन लांडगे तर उपसरपंच पदी अतुल पाटील यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधी.-नातेपुते ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देशमुख पाटील कवितके उराडे ठोंबरे भांड या गटाचे व जनशक्ती विकास आघाडीचे उमेदवार सौ कांचन दादा लांडगे या सरपंच पदी व उपसरपंच पदी अतुल राजेंद्र पाटील त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाची चुरशीची व प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या नातेपुते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनशक्ती विकास आघाडी पॅनल विरुद्ध नातेपुते नागरी संघटना पॅनल ची समोरासमोर दुरंगी लढत लागली होती यामध्ये जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे सात उमेदवार ( वार्ड क्रमांक १ ) मधील सनम सिकंदर मुलानी व सोनल गणेश उराडे (वार्ड क्रमांक ४ ) मधून रंजना मारुती पांढरे व विद्या सोमनाथ सावंत (वार्ड क्रमांक ५ ) मधून अनुराधा भारत उराडे, संदीप चंद्रकांत ठोंबरे, अजय चंद्रशेखर भांड हे बिनविरोध निवडून आले होते. त्यापैकी दहा जागांसाठी २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात निवडणूक लढविण्यासाठी समोरासमोर उभा होते जनशक्ती विकास आघाडी पॅनलचे ७ उमेदवार बिनविरोध व उर्वरित निवडणुकीच्या रिंगणात उभा केलेले १० उमेदवार यामध्ये (वार्ड क्रमांक १ ) मध्ये रणवीर अमरसिंह देशमुख, (वार्ड क्रमांक २ ) मध्ये सुखदेव सदाशिव ननवरे ,कांचन दादा लांडगे भारती बापूराव पांढरे (वार्ड क्रमांक 3 ) मध्ये प्रकाश बबन साळवे, अतुल राजेंद्र पाटील (वार्ड क्रमांक ४ ) मध्ये डॉ. नरेंद्र रघुनाथ कवितके (वार्ड क्रमांक ६ ) मध्ये उत्तम गल्लू बरडकर ,स्वाती अतुल बावकर, शितल गणेश बरडकर हे उमेदवार निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्‍याने निवडून आले त्यामुळे यावेळेस जनशक्ती विकास आघाडीचे सरपंच होणार हे नक्की होते व शासकीय आरक्षणानुसार यावेळी सरपंच पदी सौ कांचन दादा लांडगे व उपसरपंच पदी अतुल राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नातेपुते दहिगाव चौकात ग्रामपंचायत पटांगणामध्ये फटाकडे उडवून जल्लोष साजरा केला

फोंडशिरस सरपंच पदी पोपट बोराटे व उपसरपंच पदी दादा रणदिवे यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रशांत खरात-नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत  फोंडशिरस येथे सरपंच पदी पोपट बाबा बोराटे तर उपसरपंच पदी दादा शिवाजी रणदिवे यांची वर्णी लागली आहे. सरपंच पदाच्या निवडीच्या वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी एस यु तपासे, ग्रामसेवक लोंढे,यांनी काम पाहिले.यावेळी सदस्य कांतीलाल देवकर,प्रदीप गोरे,रंजना बोडरे,अनुसया काळे, सुचिता शिंदे,भानुदास मोठे,सुशीला धायगुडे,मंगल भोसले,सिंधू वाघमोडे,राजेंद्र पाटील,आप्पा बंडगर,मनीषा वाघमोडे,रुक्मिणी ढोबळे,हेमलता गोरे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.पार्टी प्रमुख म्हणून भानुदास पाटील,मधुकर पाटील,लक्ष्मण कोडलकर,राहुल खिलारे,युवराज रणदिवे,रामा धायगुडे,तात्या वाघमोडे,दादासाहेब ढवळे,महेंद्रा  वाघमोडे,हनुमंत गोरे,विष्णू गोरे,विवेक गवळी,दादासाहेब पाटील,सुनील पाटील,राजेंद्र रणदिवे,रामभाऊ ढोबळे,बापूराव बोराटे,प्रशांत खरात,आदी उपस्थित होते.सरपंच पद निवड झाल्यानंतर गुलाल उधळून जल्लोष करत बाणलिंग मंदिर येथे सर्व सदस्यांनी दर्शन घेतले.

राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्यावतीने सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला

कल्याण डोंबिवली महानगर पालिका सफाई कामगार सुभाष वाळकु नागवंशी यांच्या मुलीं चा विवाह थाटात झाला संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव मुलगी स्नेहा हीचा विवाह सागर रामदास जाधव( शिक्षण BA/LLB) यांच्याशी झाला
सुभाष नागवंशी हे के.डी.एम.सी मध्ये सफाई कामगार आसुन त्यांनी आथांग कष्ट करून आपल्या पाच मुलांच शिक्षण वेग वेगळ्या माध्यमातून पुर्ण केल मोठा मुलगा प्रविण सुभाष नागवंशी हा एस.बी.आय बँकेत मॅनेजर पदावर काम करत आहे तर मुलगी स्नेहा सुध्दा काॅमर्स मधुन ग्रॅज्युएट झाली आहे हे सुभाष नागवंशी एक सर्व सामान्य माणूस यांच कैवतुक करायच म्हणजे यांनी केलेल्या मेहनतीच फळ आज दिसून आल की ह्या वैक्ती च्या मुलीच्या लग्नात प्रमुख उपस्थिती …..
मा.सुनिल मेश्राम I.A.S अधिकारी,
मा. डाॅ.विजय कदम, मा श्यामदादा गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष Rpi(S),
मा.गणपतशेठ गायकवाड स्थानिक आमदार, मा.विवेक विश्वास घायवट प्रशासकीय अधिकारी,
महेश गायकवाड नगरसेवक,
विशाल पावशे नगरसेवक, निलेश शिंदे नगरसेवक, शरद पाटील, कल्याण धुमाळ मा.नगरसेवक, रितेश खराडे मा.नगरसेवक, बाळाराम गायकवाड जिल्हा अध्यक्ष Rpi,
संदेश भालेराव ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.संघटक,
माया कांबळे जिल्हा अध्यक्ष वं.ब.आ.,
तानाजी सहाणेसर,
विश्वास घायवट( Lic ब्रँच मॅनेजर), मयंक करनानी (S.B.I.A.S.M.),
विलास बु.गायकवाड एस. आय. (K.D.M.C ),गोरक्षनाथ भनगडे एस.आय. (kdmc),
एस.के.पाटील सी.एस.आय.(kdmc)
सलिम शेख एस.आय.(kdmc)
सुरेश ना.पंडित उपाध्यक्ष (वं.ब.आ.),
जहीर कुरेशी ,विजय मोरे ,संतोष जाधव, व आप्तेष्ट नातेवाईक आणेकाने सोशल नेटवर्किंग द्वारे शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या साक्षीने बुध्द पध्दतीने आणि कोरोना काळाचा विचार करून योग्य ते अंतर ठेवून सॅनेटाईजर मास्क वापरून लग्न सोहळा संपन्न झाला

You may have missed