पिरळे ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे पाच वर्ष नळाला पाणी नाही


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील लता शिंदे यांच्या ग्रामपंचायत नळाला ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या हलगर्जीपणामुळे गेली पाच वर्षापासून पाणी बंद पण पाणी पट्टी सुरू पाच वर्षात एक थेंबही पाणी आले नाही. याबाबत वेळोवेळी ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना लेखी व तोंडी पाणी येत नसले बाबत तक्रार दिली होती .गेल्या पाच वर्षात जवळपास पाच ते सहा सरपंच झाले असून एकाही सरपंचांनी किंवा सदस्याने दखल घेतली नाही. पाच वर्ष अद्यापही यावर कारवाई झाली नाही त्यासंदर्भात ग्रामसेवक यांना विचारणा केली असता ते याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.ग्रामसेवक जमदाडे यासंदर्भात कोणत्याही बाबत जबाबदारी घेत नसून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.या नळ बंद असलेले संदर्भात9/10/2019 तसेच या अगोदर सुद्धा लेखी तक्रार दिली आहे यावर ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष केले असून अद्यापिही कोणत्या प्रकारची कार्यवाही झाली नाही. म्हणून यासंदर्भात आता मा. गट विकास अधिकारी व कार्यकारी अधिकारी त्यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. गट विकास अधिकारी व कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गेल्यावर ते यासंदर्भात लक्ष घालून कारवाई करतील का हादेखील प्रश्न समोर येत आहे यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

























