प्रमोद शिंदे

मंत्रालयात रंगीबेरंगी पोशाखाला बंदी केल्याने मला मंत्रालयात प्रवेश मिळेल का? केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा मिश्किल सवाल


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि. 13 – महाराष्ट्र राज्यसरकारने  मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल ? असा मिश्किल सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे. 
ना. रामदास आठवले हे रंगीबेरंगी नक्षीकाम वाले पोशाख परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच मीश्किलीपणे खुसखुशीत विनोद करण्यात ही ते प्रसिध्द आहेत. त्यानुसार मंत्रालयात ड्रेसकोड च्या बातमीवर ना.रामदास आठवले यांनी मिश्किलपणे आपल्याला मंत्रालयात प्रवेश मिळेल का असा  प्रश्न विचारला आहे.    
         

अवैद्य दारू विक्री करणाऱ्यां वर कडक कारवाई केली जाईल- एपीआय मनोज सोनवलकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे व व परिसरात  अवैधरित्या चोरून दारूविक्री सुरू असल्याने पिरळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम बुधावले यांनी उत्पादन शुल्क  सोलापूर  व नातेपुते पोलीस स्टेशन यांना पिरळे येथे चोरून मोठ्या प्रमाणात दारू विक्री चे धंदे सुरू असले बाबत तक्रार केली असता नातेपुते पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी चोरून दारू विक्री करणार्‍यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे सांगितले तसेच ते म्हणाले असे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधा दारू विक्री करणाराचा लगेच बंदोबस्त केला जाईल  असे सांगितले.

शरद पवार साहेब यांचा वाढदिवस कुटुंबासमवेत मुंबई येथे साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कदेशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांचा वाढदिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला.कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करुन त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते.

गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या मुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहचली : बाळासाहेब सरगर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज प्रमोद शिंदे प्रतिनिधी: 
     गोपीनाथराव मुंडे साहेबा मुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात तळागाळापर्यंत  पोहोचली असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी आज माळशिरस येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय माळशिरस येथे जयंतीच्या निमित्ताने  ते बोलत होते .
        या कार्यक्रमाला भाजपा तालुका सरचिटणीस संजय देशमुख मोटेवाडीचे सरपंच दादासाहेब खरात युवानेते युवराज वाघमोडे नगरसेवक आकाश सावंत बालाजी नरळे गणेश सीद तुळशीराम घुले राहूल बंडगर  आदी उपस्थित होते. 
    ते पुढे बोलताना सरगर  म्हणाले की  भारतीय जनता पार्टी ही दोन खासदाराची पार्टी शहरी भागापुरती मर्यादित होती परंतु गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत जाऊन आज 302 खासदाराची पार्टी म्हणून देशात एक नंबर ला आहे. म्हणून मुंडे साहेबांचे काम हे आजच्या भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आहे .1995 झाली काढलेल्या संघर्षयात्री मुळे महाराष्ट्र राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा पासून भाजपला राज्यात वैभव प्राप्त झाले त्याचे श्रेय मुंडे साहेबांना जाते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवराज वाघमोडे यांनी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे काव्य संमेलन – शेखर खिलारे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे काव्य संमेलन – शेखर खिलारे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अकलूज(प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती युवासेना शहरप्रमुख शेखर खिलारे यांनी दिली.
      सदरचे संमेलन दिनांक१३.१२.२०२० रोजी सायंकाळी ४.३०वाजता, सदुभाऊ चौक अकलूज येथील विकास सोसायटी हॉल मध्ये होणार असून      श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक) व अमित प्रभा वसंत (पेरलोनी) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समाज प्रबोधनात्मक उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून प्रबोधनात्मक काव्यसंमेलन आयोजित केले आहे.तरी माळशिरस तालुक्यातील सर्व साहित्यिक,कवी,कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शेखर खिलारे यांनी केले आहे.तर आपली कविता सादर करायची असेल तर  शेखर राजाभाऊ खिलारे 8390009006 या नंबर वरती संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
   या संमेलनाचे  निमंत्रित कवि म्हणून नितीन चंदनशिवे (दंगलकार),सागर रामचंद्र काकडे (सातारा) सुमित गुणवंत (पुणे),चंद्रशेखर गायकवाड(अकलूज) रोहित देशमुख (वेळापूर) व युवासेना तालुका प्रमुख गणेश इंगळे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे आयोजन युवासेना व योद्धा प्रतिष्ठान अकलूज यांच्या वतीने करण्यात आले आहे.

माळशिरस तहशील कार्यालय येथे बिलोली येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेना आक्रमक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील झोपडपत्ती मध्ये राहत असलेल्या मातंग समाजाच्या मूकबधिर मुलीवर 27 वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा दगडांनी तोंडावर ठेवून माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 09/12/2020 रोजी घडलेली आहे त्या अनुषंगाने लहुजी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन माळशिरस येथे निषेध नोंदवण्यात आला व अन्य पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने निवेदनामध्ये बलात्कार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे, पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी, पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अशा विविध मागण्या माळशिरस तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना करण्यात आल्या यावेळी लहुजी शक्‍ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख सतीश सपकाळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव तुपसौंदर,युवक जिल्हा अध्यक्ष सागर लोखंडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष अवघडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन रणदिवे माळशिरस तालुका युवक अध्यक्ष महादेव भिंगारदिवे,तालुका युवक उपाध्यक्ष विकास लोखंडे,माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल रणदिवे,वेळापुर शहराध्यक्ष बजरंग कानगे,पिनु भाऊ एडगे,महेंद्र साठे,शहराध्यक्ष समाधान साठे,,पिंटु वायदंडे,शंकर वायदंडे,पप्पु साठे,आंबादास पाटुळे,भैय्या पाटुळे,अमोल कांबळे, इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्यशोधक विवाहाचे कार्य रघुनाथ ढोक यांनी तेलंगाणा राज्यात प्रथम सुरु केले ही आनंदाची बाब !!! ना. छगन भुजबळ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे तेलंगाणा राज्यातील पहिला सत्यशोधक विवाह रजिस्टर नोंदणी करून महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने माळी समाजाचे संतोष सोनूले (BA) जिल्हा आदिलाबाद आणि ईश्वरी नागोशे (5वी) जिल्हा आसिफबाद यांचा सत्यशोधक विवाह नुकतेच 7 डिसेंबर 2020 रोजी दु.2.30 वाजता रहाते घरी दुब्बागुडा , आसिफाबाद येथे विधीकर्ते म्हणुन अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभुषेत मोफत जाऊन मोफत लावला.
या सत्यशोधक विवाहास शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागाचे मंत्री नामदार छगन भुजबळ म्हणाले की महाराष्ट्राचे बाहेर जाऊन तेलंगणा मध्ये प्रथम सत्यशोधक विवाह होत आहे ही आनंदाची बाब आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड व आर्थिक उधळपट्टी होऊ न देता महापुरुषांचे विचार रुजवून फुले एज्युकेशन च्या माध्यमातून रघुनाथ ढोक यांनी 22 वा मोफत सत्यशोधक विवाह लावला यातून लोक नक्कीच प्रेरणा घेतील असे ही भुजबळ म्हणाले आणि हे कार्य महापुरषांचे विचाराने अखंड राज्यात – परराज्यात चालू ठेवावे अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी यवतमाळचे राजेंद्र महाडोळे यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट दिली.तर आईवडिलांना व विवाह घडवून आणणारे तसेच मदत केली त्या सर्वांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ ,महापुरुषांचे प्रतिमा भेट देऊन मान्यवरांसह स्वागत केले.
याप्रसंगी महात्मा फुले रचित मंगलाष्टके, व कवी डॉ.वडगांवकर , लिखित महात्मा फुले यांचा पोवाडा ,संत सावतामहाराज, संत तुकडोजी महाराज व स्वागत गीत प्रथमच करंजी ,नांदेड च्या श्री गुरुदत्त सेवा मंडळाने स्त्री पुरुष आवाजात गाऊन प्रेरणादायी वातावरण करून लौकीक मिळवला तसेच स्थानिकांनी तेलगू भाषेत महात्मा फुले यांचेवर देखील गाणी गायिली. त्या टीमचे रघुनाथ ढोक यांनी सन्मानपत्र व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले.
प्रथमच होणाऱ्या सत्यशोधक विवाहासाठी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तेलंगाणा व आंध्र देश या ठिकाणावरून अनेक संस्थाचे प्रतिनिधी, सरपंच तुळशीराम फाटाळे, मंगलाताई रामसिडाम, निवृत्त पोलीस अधिकारी तुकारामजी जीवणे, चंद्रपूरचे सत्यशोधक दिलीप कोटरांगे उपस्थितीत होते.
या कार्यक्रमाचे नियोजनासाठी तेलंगाणा चे अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष सुकुमार पेटकुले आणि माजी न्यायमूर्ती शिवदास महाजन यांनी मदत केली तर सूत्रसंचालन प्रा.सुदाम धाडगे,अमोलभाऊ गुरुनुले यांनी केले. तर मोलाचे सहकार्य देऊळगाव राजाचे माजी नगराध्यक्ष जेष्ठ समाजसेवक तुकाराम खांडेभराड, नांदेड विध्यापीठ चे डॉ.राजाराम माने ,शिवगोविंद कुशावाह व आकाश-क्षितीज ढोक यांनी केले. सुरुवातीला वधूवर यांनी सभामंडपात येताना आपले राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,महात्मा फुले समग्र वाड्मय हातात घेऊन फुलाच्या पायघड्यांवरून आगमन केले नंतर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी ५ झाडाची पूजा करून ती झाडे वाढविण्याचा संकल्प करून त्यांचे हस्ते मुली ,व महिलांना सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट दिले. यावेळी अक्षता म्हणून फुलांचा वापर केला.

ए.पी.आय मनोज सोनवलकर यांचेकडुन अवैध धंदे व वाळु तस्करावर कारवाई

         
पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) नदी,ओढे,नाळे येथुन अवैध रित्या वाळु उपासा करणा-यावर वाळु तस्करावर नातेपुते पोलीस ठाणेचे नुतन प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर यांनी चार्ज घेतलेपासुन कारवाई केली यावेळी पोलीसांकडुन जप्त करण्यात आलेले जप्त मुददे माल 1 टिपर,1 ट्रॅक्टर  व ट्राॅलीसह ,2 छोटा हत्ती,6 ब्रास वाळु सह तब्ब्ल 29,75,000 रु/- मुददेमाल हस्तगस्त केले असुन सदर गुन्हयात 6 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.तसेच नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये अवैध दारु विक्री करणा-यावर एकुण 11 इसमावर केसेस करुन 15 लिटर हातभटटी दारु व देषी विदेषी 168 क्वाॅटर मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच नातेपुते पोलीस ठाणे गुरन  185/2020 भादवि कलम 307 मधील सहा माहिन्यापासुन फरारी असलेल्या सराईत गुन्हेगार  राजु भाळे यास नातेपुते पोलीस ठाणेकडील पथकाने सापळा रचुन शेळगाव  ता.इंदापुर जि.पुणे येथुन यशस्वी रित्या पकडण्यात आला असुन त्यांचेवर माळशिरस,इंदापुर, फटलण, बारामती ,वालचंदनगर ,स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण याठिकाणी वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपी अटक करुन मा.हु।।कोर्टात हजर करण्यात आले आहे.तसेच नातेपुते शहरातील मेन रोड, बाजारतळ कडे व ग्रामीण भागातील लोंणद,फडतरी,निटवेवाडी,लोंढे मोहितेवाडी जाणारे रस्तावर भाजी पाला विक्रेतेची व लोंकाची गर्दी तसेच वाहनाची कोंडी होत असल्याने गर्दीचे व आस्थाव्यस्थ लावणारे वाहनावर कारवाई करुन  व वाहन तळाचे नियोजन करुन वाहतुकीस व लोकांना येणे जाणे करीता सुरळीत करुन दिला.याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की,मा.पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते साो,सोलापुर ग्रामीण यांचे अवैध धंदयावर कारवाई करण्याबाबत आदेशानुसार व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे साो व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नीरज राजगुरु  साो अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नुतन नातेपुते पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी मनोज सोनवलकर यांनी पदभार स्वीकारले पासुन पोलीस ठाणेच्या हददीत अवैध धंदे बेकायदेशीर वाळु उपासा करणारे यांचेवर पोलीस ठाणेकडील पथक नेमुण कारवाई करण्यात आली आहे.सदर पथकामध्ये सहा.पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर पोसई इंगळे पोहे/450 गडदे ,पोहे/1589 मदभावी,पोहे/36 डेंगळे पोना/1625 लांडगे पोना/1533 गाडे पोना/1788 पाटील पोहे/211 रणनवरे पोकाॅ/12 घाडगे चालक पोलीस षिपाई /2202 राहुल भोसले पोकाॅ/1038 कडाळे पोकाॅ/345 जाधव पोका/562 लोहार वरील गुन्हयाचा तपास पोहे/1626 वाघ पोहे/1413 काझी पोना/1664 खाडे हे करीत आहेत.        चौकट- सहा महिन्यापासून चकवा देत असलेला फरार गुन्हेगार राजू भाळे ला पकडण्यात नातेपुते पोलिसांना यश

चौकट- सहा महिन्यापासून चकवा देत असलेला फरार गुन्हेगार राजू भाळे ला पकडण्यात नातेपुते पोलिसांना यश

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो आदर्श विद्यार्थी घडतील! – डॉ.कुमार लोंढे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो आदर्श विद्यार्थी घडतील!
– डॉ.कुमार लोंढे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-महामानव,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोशल या संस्थेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्राची निर्मिती करून आगळी वेगळी आदरांजली अर्पण केली.
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज च्या प्रारंगणात भूमिपूजन करून सेंटर ची सुरुवात करण्यात आली .सुरुवातीस महामानवांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश देठे ( माजी पोलीस निरीक्षक) शाळा समितीचे बाळासो जाडकर,जितेंद्र देठे प्रमुख पाहुणे नानासो वाघम्बरे विश्वस्त डॉ. पंचशीला लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासो जाडकर म्हणाले ” ही शाळा फक्त विद्यार्थी घडवत नाही तर शिस्त व संस्कार ही देत आहे. डॉ.पंचशीला लोंढे म्हणाल्या या सेंटर चे स्वप्न आहे उच्च पदस्थ अधिकारी निर्माण करून संविधान व मानवी मूल्य याची जनजागृती करणे.सुरेश देठे साहेब म्हणाले डॉ.कुमार लोंढे यांचे कार्य आदर्शवत आहे.
सोशल या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ.कुमार लोंढे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ” डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र च्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो आदर्श विदयार्थी घडतील ! संविधान जनजागृती,मूलभूत अधिकार,हक्क व कर्तव्य,राष्ट्रीय आंतराष्ट्रीय परिसंवाद,विज्ञानवादी दृष्टीकोन,अभ्यासिका,उच्च पदस्थ अधिकारी,मार्गदर्शन व शिस्त व शीलवान पिढी घडविणे हाच उद्देश घेऊन सेंटर कार्य करेल!महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर डोक्यात घेऊन नाचण्याचा विषय आहे.या सुसज्ज सेंटर च्या निर्मितीसाठी समाजातील परिवर्तनवादी व्यक्तींनी हातभार लावणे महत्वाचे आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुंडलिक साठे यांनी केले.कार्यक्रमास बाळासो काटे,प्रा.दीपक काटे,प्रा.वायदंडे,गोरड, सरतापे,समाधान खरात,अंकुश देठे इ मान्यवर उपस्थित होते.शेवटी आभार प्रा.विठ्ठल धाइंजे यांनी मानले

होमगार्डच्या कुटुंबियावरील उपासमार थांबवा आन्यथा आंदोलन करू. एन.डी.एम. जे.

होमगार्डच्या कुटुंबियावरील उपासमार थांबवा आन्यथा आंदोलन करूत…. एन.डी.एम. जे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

राज्यामध्ये होमगार्ड जवानांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आलेली आहे, तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या सरकारने होमगार्ड साठी वर्षामध्ये १८० दिवस काम आनिवार्य करून सर्व होमगार्डना दिलासा दिला होता परंतू सध्या याच होमगार्ड जवानांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारिची वेळ आलेली आहे,
कोव्हीड १९ च्या कार्यकालात पोलिसप्रशासनाच्या खांद्याला खांदा लाऊन सव्त:च्या जिवाची पर्वा न करता स्वत:चा जिव धोक्यात घालुन सर्व होमगार्डनी कर्तव्य बजाउन देशसेवा केली आहे, परंतु याच कोव्हिड १९ च्या कार्यकालात आनेक ४५ वर्षापेक्षा जास्त वय आसलेल्या होमगार्डांना संसर्ग होऊ नये म्हनुन कामवरून कमी करन्यात आले होते महाराष्ट्रातिल आशा सर्व होमगार्डच्या कुटुंबाची परिस्थिती खुप विदारक आहे, महाराष्ट्रातिल सर्वच होमगार्ड सध्या हालाखीचे जिवन जगत आहेत, आनी होमार्ड यांच्यावर होत आसलेला आन्याय नँशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटना कदापी सहन करनार नाही म्हनुन तात्काळ महाराष्ट्र सरकारने होमगार्ड यांच्यावर होनारा आन्याय थांबऊन होमगार्डांना कायम रोजगार द्यावा त्याच बरोबर व रिक्त आसलेली सर्व पदे भरावीत त्याना विविद्ध भत्ते देन्यात यावेत आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तहसिलदार औंढा नागनाथ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे, तात्काळ होमगार्ड बांधवांना न्याय न मिळाल्यास नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतिने महाराष्ट्र भर तिव्र आंदोलन करन्यात येईल आसा ईशारा दिला आहे सदरिल निवेदनावर नँशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हाउपाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसन नवले, जिवन चव्हान, संतोस काशिनाथ आडानी, यशवंत पंडित, जिवन चव्हान ईत्यादी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत,

You may have missed